Winamp Logo
सोपी गोष्ट Podcast Cover
सोपी गोष्ट Podcast Profile

सोपी गोष्ट Podcast

Marathi, Fitness / Keep-fit, 1 season, 774 episodes, 2 days, 23 hours, 57 minutes
About
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Episode Artwork

बजेटनंतर घर विकणं महागणार? LTCG टॅक्समध्ये बदल काय? BBC News Marathi

अर्थसंकल्पामध्ये टॅक्सचे स्लॅब्स बदलले, तुमच्यातल्या काही लोकांना कदाचित याचा फायदा होईल. लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स मध्ये बदल केल्याचंही तुम्ही वाचलं - ऐकलं असेल. पण या बजेटमध्ये आणखी एक बदल झालाय, ज्याचा परिणाम तुम्ही घर विकत असताना होणार आहे आणि त्यासाठी 2001 हे वर्षं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही तुमच्या मालकीचं घर विकलंत, तर तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागणार का, हे या 2001 वर अवलंबून असेल. काय बदललंय नेमकं...जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन :अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे
7/25/20243 minutes, 44 seconds
Episode Artwork

अर्थसंकल्पातल्या घोषणांवर निवडणुकीच्या निकालांचा प्रभाव आहे का? BBC News Marathi

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाला वेगवेगळे कंगोरे आहेत. लोकसभा निवडणुकीत जे जे मुद्दे महत्वाचे ठरले त्या मुद्द्यांशी संबंधित घटकांविषयी घोषणा करण्याची विशेष काळजी या अर्थसंकल्पात घेतल्याचं दिसतंय. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आले होते. त्याचे पडसाद या बजेटमध्ये कसे पहायला मिळाले...समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
7/24/20247 minutes, 51 seconds
Episode Artwork

कमला हॅरिस यांची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी नक्की आहे का? BBC News Marathi

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपण राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचं अखेर जाहीर केलं. त्यांनी हा निर्णय घ्यावा असं आवाहन अनेकांकडून गेल्या काही आठवड्यांमध्ये करण्यात आलं होतं. बायडन हे आता त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करतील. राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाद्वारे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यासही त्यांनी समर्थन जाहीर केलंय. डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन महिन्याभरावर आलेलं असताना बायडन यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला आता एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय जो बायडन यांनी जाहीर केल्यानंतर आता पुढे काय होईल? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
7/24/20245 minutes, 40 seconds
Episode Artwork

चांदीपुरा विषाणू काय आहे? तो कसा रोखता येईल? BBC News Marathi

गुजरात राज्यात आतापर्यंत चांदीपुरा व्हायरसचे 12 संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं गुजरात सरकारने म्हटलंय. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासासाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजीकडे (NIV) पाठवण्यात आलेयत. 1965 साली नागपुरातल्या एका परिसरातल्या रुग्णांच्या रक्तामध्ये एक व्हायरस आढळला. ज्या गावात ६५ साली हा व्हायरस सापडला, त्याचं नाव व्हायरसला देण्यात आलंय. - चांदीपुरा विषाणू. किती घातक आहे हा विषाणू? य़ाचा प्रसार आणि संसर्ग कसा होतो? आणि मुलांसाठी तो जीवघेणा का ठरतोय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन - अमृता दुर्वे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
7/23/20243 minutes, 29 seconds
Episode Artwork

पृथ्वीचा आतला भाग आणि बाहेरचा भाग उलट सुलट फिरतायत? BBC News Marathi

पृथ्वीचा केंद्रबिंदू जमिनीपासून साधारण 5000 किमी खोल आहे. त्यापैकी 12 किमी खोल भागाबद्दलच आपल्याला माहिती मिळाली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसने शोध लावला आहे की, पृथ्वीचा गाभा हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत विरुद्ध दिशेला फिरतो.वैज्ञानिकांच्या एका टीमच्या असं लक्षात आलं आहे की, पृथ्वीच्या गाभ्याचा परिवलनाचा वेग 2010 पासून म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून कमी झाला आहे. आता या परस्पर विरोधी दिशांना फिरण्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल? निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
7/23/20244 minutes, 12 seconds
Episode Artwork

चंद्रावर सापडली गुहा! माणूस राहू शकेल का? BBC News Marathi

वैज्ञानिकांना पहिल्यांदाच चंद्रावर गुहा सापडली आहे. किमान 100 मीटर खोली असणारी ही गुहा कदाचित माणसांना राहण्यासाठी योग्य असू शकते. इथे एक कायमचा तळ तयार करता येऊ शकतो असा संशोधकांचा कयास आहे. अशा अजूनही न सापडलेल्या शेकडो भूमिगत गुहा असण्याची शक्यता असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे. कशी आहे ही चंद्रावरची गुहा? ती किती मोठी आहे? कोणी आणि कशी शोधली ? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट - जॉर्जिना रेनार्ड निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
7/23/20245 minutes, 19 seconds
Episode Artwork

भारतात लग्नावर इतका खर्च का केला जातो? BBC News Marathi

जगामध्ये भारतात सर्वाधिक म्हणजे 80 लाख ते 1 कोटी लग्नं होतात. कारण भारतामध्ये तरूण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यापैकी 34% लोकसंख्या लग्नाच्या वयाची, 20 ते 39 वयोगटातली आहे. भारतापाठोपाठ चीनमध्ये दरवर्षी 70 ते 80 लाख लग्नं होतात. तर अमेरिकेत वर्षाला 20 ते 25 लाख लग्नं होतात. भारतामध्ये एखाद्या कुटुंबात शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाच्या दुप्पट खर्च लग्नामध्ये होतो, असं एक रिसर्च सांगतो. किती मोठी आहे भारतातली वेडिंग इंडस्ट्री? आणि मुळात लग्नांवर इतका खर्च का केला जातो?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये iलेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
7/22/20244 minutes, 32 seconds
Episode Artwork

नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट कुणाला मिळतं? BBC News Marathi

ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक उल्लेख झाला तो त्यांनी 'नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट' वापरल्याचा. काय असतं हे नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट? ते कोणाला मिळू शकतं? आणि त्याचे फायदे काय आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
7/12/20242 minutes, 50 seconds
Episode Artwork

जागतिक लोकसंख्या दिन: जगात 800 कोटींपेक्षा जास्त लोक, स्थलांतराचा कसा होतोय परिणाम? BBC News Marathi

जगाची लोकसंख्या संख्या सध्या 820 कोटी आहे आणि ती वाढून 1030 कोटी होणार असल्याचं युनायटेड नेशन्सच्या ताज्या अहवालात म्हटलंय. जगाची लोकसंख्या 2080च्या मध्यात सर्वोच्च असेल आणि त्यानंतर ती कमी होऊ लागेल असं 'वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेटक्ट्स' नावाच्या या अहवालामध्ये म्हटलंय. आज जन्माला आलेल्या मुलांचं सरासरी आयुर्मान 73.3 वर्षांचं असून 1995 पासून हे सरासरी आयुर्मान 8.4 वर्षांनी वाढल्याचंही हा अहवाल सांगतो. संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असणाऱ्या देशांच्या जनगणनेचा डेटा, जन्म आणि मृत्यू दर आणि लोकसंख्येशी संबंधित इतर पाहण्यांच्या मदतीने युनायटेड नेशन्स गेल्या 50 वर्षांपासून नियमितपणे जागतिक लोकसंख्येविषयीचे अंदाज मांडत आलेलं आहे. जगाची लोकसंख्या कधीपर्यंत वाढत राहणार? लोकसंख्येवर स्थलांतराचा कसा परिणाम होतोय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
7/11/20245 minutes, 28 seconds
Episode Artwork

हवामान खात्याचे अंदाज असे का चुकतात? BBC News Marathi

8 जुलैला मुंबईत धो-धो पाऊस पडला, पाणी तुंबलं, ट्रेन्स बंद झाल्या. 9 जुलैलाही पावसाचा रेड अलर्ट होता. म्हणून मग मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी शाळांना सुटी दिली. आणि पाऊसच पडला नाही... असं का होतं? भरपूर पाऊस पडणार, असं हवामान खातं सांगत असताना, पाऊस न पडणं वा अतिशय कमी पडण्याचं कारण काय? भारतातल्या हवामान खात्याकडे खरंच किती अत्याधुनिक यंत्रणा आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
7/10/20245 minutes, 54 seconds
Episode Artwork

कृत्रिम मंगळावर राहून हे संशोधक वर्षभर काय करत होते? BBC News Marathi

मंगळावरच्या भविष्यातल्या कॉलनीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यासाठी मानवाला कोणती कौशल्यं शिकून घ्यावी लागतील, तिथपर्यंतचा मोठा प्रवास लोकांना कसा करता येईल आणि तिथल्या कठीण परिस्थितीत कसं राहता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नासाने एक प्रयोग केला. अमेरिकेतल्या टेक्सास राज्यामध्ये ह्यूस्टनमधल्या नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये मंगळ ग्रहासारखंच वातावरण आणि भूभाग असणारी फॅसिलिटी - कृत्रिम मंगळ ग्रह तयार करण्यात आला आणि नासाचे 4 संशोधक तिथे वर्षभर राहिले. या काळात या वैज्ञानिकांनी नक्की काय केलं? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - शरद बढे
7/10/20244 minutes, 30 seconds
Episode Artwork

मेंदू पोखरणारा अमिबा काय आहे? BBC News Marathi

केरळमध्ये गेल्या काही महिन्यांत 3 मुलांचा मृत्यू ब्रेन इटिंग अमिबा म्हणजेच मेंदू पोखरणाऱ्या अमिबाच्या संसर्गामुळे झाला आहे. हा अमिबा कोणता आहे? आणि त्याचा संसर्ग कसा आणि कधी होऊ शकतो? असं झाल्यास मृत्यू अटळ आहे का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्येरिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - शरद बढे
7/9/20243 minutes, 43 seconds
Episode Artwork

Epilepsy वर उपचारांसाठी कवटीवर इम्प्लांट लावणं कितपत यशस्वी? BBC News Marathi

एपिलेप्सीचा गंभीर त्रास असणाऱ्या मुलाच्या कवटीमध्ये फीट नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदाच एक उपकरण बसवण्यात आलंय. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार. या आजारात Seizures येतात. म्हणजे फीट किंवा आकडी येणं. यालाच मिर्गी असंही म्हणतात. कवटीमध्ये बसवण्यात आलेला हा न्यूरोसिम्युलेटर मेंदूच्या आतवर इलेक्ट्रिकल सिग्नल्स पाठवेल. ओरान नॉल्सनला दिवसा येणाऱ्या फीटचं प्रमाण यामुळे 80 टक्क्यांपर्यंत कमी झालंय, तो आता अधिक आनंदात असून आयुष्य अधिक चांगल्यारीतीने जगू शकत असल्याचं त्याची आई जस्टिन यांनी सांगितलंय. कसं आहे हे उपकरण? ते काम कसं करतं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - फर्गस वॉल्श निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
7/6/20245 minutes, 6 seconds
Episode Artwork

युकेमध्ये सत्तापालट: ऋषी सुनक पराभूत, किएर स्टार्मर पंतप्रधान का होणार? BBC News Marathi

युकेमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यात सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव करत लेबर पार्टी तब्बल 14 वर्षांनी सत्तेत आलीय. सर किएर स्टार्मर युकेचे नवे पंतप्रधान असतील. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या पराभवाची कारणं काय आहेत? आणि मजूर पक्ष सत्तेत आल्याचा भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - झुबैर अहमद निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
7/6/20245 minutes, 34 seconds
Episode Artwork

लोकसभेत माईकचं नियंत्रण कुणाच्या हाती असतं? BBC News Marathi

लोकसभेत आपण बोलत असताना आपला माईक बंद करण्यात आल्याचा आक्षेप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याला उत्तरही दिलं. सदनामध्ये विरोधकांचे माईक्स बंद करण्यात येत असल्याचा आरोप यापूर्वीही विरोधकांनी केलेला आहे. विरोधक भाषण करत असताना त्यांच्या चेहरा टीव्हीवर फारसा दाखवत नसल्याचा आरोपही करण्यात आलेला होता. संसदेच्या सभागृहातील माईक आणि कॅमेरा यावर नियंत्रण कुणाचं? विरोधकांची गळचेपी करण्यासाठी या गोष्टी वापरल्या जातायत का? अध्यक्ष आणि विरोधक याबद्दल काय म्हणतायत? यापूर्वी असं घडलं होतं का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - बीबीसी मराठी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
7/5/20246 minutes, 12 seconds
Episode Artwork

शेअर बाजारात अचानक इतकी तेजी का आली? BBC News Marathi

3 जुलै 2024 ला मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स निर्देशांकाने 80,000 ची पातळी ओलांडली. सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी सर्वाधिक घसरण झालेला शेअर बाजार महिन्याभराच्या काळात उच्चांकी पातळीवर कसा पोहोचला? स्टॉक मार्केटच्या या घोडदौडीमागे काय कारणं आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
7/5/20244 minutes, 27 seconds
Episode Artwork

जो बायडन विरुद्ध डोनाल्ड ट्रंप - अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? BBC News Marathi

अमेरिकेतही 2024मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होतेय. 5 नोव्हेंबरला ही निवडणूक होईल आणि नवीन राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2025मध्ये पदभार स्वीकारतील. पण असं असलं तरी त्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील 'प्रेसिडेन्शियल डिबेट' गुरुवारी (27 जून) रात्री जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होत आहे. नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे, प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे काय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
6/28/20246 minutes, 32 seconds
Episode Artwork

अंमली पदार्थांचे शरीरावर काय परिणाम होतात? BBC News Marathi

26 जून हा दिवस अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थ आणि व्यसनांविरोधातला जागतिक लढा बळकट करण्यासाठी 1987मध्ये युनायटेड नेशन्सने हा दिवस पाळायला सुरुवात केली. Drugs म्हणजे असे घटक वा पदार्थ ज्यांचा शरीरावर परिणाम होतो. ड्रग्सबद्दलच्या बातम्या, चर्चा सध्या सतत कानावर येत असतात. उत्तेजकं, ओपिऑईड्स, मेफेड्रोन, फेंटानिल असे वेगवेगळे शब्द कानावर पडत असतात. याचा अर्थ काय? या मादक पदार्थांमध्ये असं काय असतं, ज्याची सवय लागते? आणि या सेवनाचे शरीरावर, आयुष्यावर काय परिणाम होतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येलेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
6/26/20247 minutes, 54 seconds
Episode Artwork

वजन घटवण्यासाठी औषधं घेताय? सावधान! आधी हे ऐका | BBC News Marathi

वजन घटवणं किंवा Weight Loss याविषयी सगळीकडे चर्चा सुरू असतात. त्यासाठी वेगवेगळे सल्ले दिले जातात. वजन घटवण्यासाठीचा असाच एक मार्ग - एक शॉर्टकट धोक्याचा धरू शकतो असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिला आहे. हा इशारा आहे वेट लॉससाठीच्या एका औषधाबद्दल...हे औषध कोणतं आहे? आणि WHOने त्याबद्दल काय म्हटलंय?Ozempic हे औषध सध्या 'Weight Loss Drug' म्हणजे वजन घटवणारं औषध म्हणून प्रसिद्ध झालंय. याला Skinny Jab असंही म्हटलं जातंय. पण याच प्रसिद्धीमुळे या औषधाचा अनेकदा तुटवडा निर्माण होतोय आणि सोबतच याच्या इतर अनेक आवृत्त्याही बाजारात आल्यायत. आणि याचविषयीचा खबरदारीचा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलाय. समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
6/24/20246 minutes, 34 seconds
Episode Artwork

प्राण्यांना तुमच्या-आमच्यासारख्या जाणिवा, संवेदना असतात का? | सोपी गोष्ट पॉडकास्ट

प्राण्यांना जाणिवा असतात का? ते विचार करू शकतात का? शास्त्रज्ञांना, संशोधकांना गेली काही शतकं हा प्रश्न छळतोय. पण प्राणी विचार करू शकतात, त्यांना संवेदना असतात हे डार्विन यांचं म्हणणं तेव्हाच्या वैज्ञानिक समजांपेक्षा वेगळं होतं. मग आता शास्त्रज्ञांचं म्हणणं काय आहे? प्राण्यांना conscious - म्हणजेच जाणिवा, संवेदना असतात का? जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.रिपोर्ट - पल्लब घोष निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
6/17/20244 minutes, 41 seconds
Episode Artwork

भारतीय कामगार इतक्या मोठ्या प्रमाणात आखाती देशांत का जातात? BBC News Marathi

GCC म्हणजे गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये सहा देश आहेत - सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेट्स (UAE), ओमान, बहारिन, कतार आणि कुवेत. 1981 मध्ये या गटाची स्थापना करण्यात आली. या सहा देशांमध्ये नोकरी - रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. आखाती देशांमधील कामगारांच्या परिस्थितीबाबत अनेकदा बातम्या येतात, दुर्घटनांनंतर याबद्दलची चर्चा होते. पण जगण्या-राहण्यासाठीची परिस्थिती इतकी बिकट असूनही भारतीय कामगार कामासाठी आखाती देशांमध्ये का जातात? कधीपासून जातात? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
6/15/20247 minutes, 39 seconds
Episode Artwork

वर्षातून दोनदा विद्यापीठात ॲडमिशन कशा होणार? विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? BBC News Marathi

भारतामध्ये जून - जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि एप्रिल - मे महिन्यात संपतं. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी UGCने दिलीय. जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये सध्या वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया होते. म्हणजे अमेरिकेत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये फॉल (Fall) सीझनच्या ॲडमिशन्स होतात, तर जानेवारीमध्ये स्प्रिंग (Spring) सीझनच्या ॲडमिशन्स होतात. वर्षातून दोनदा ॲडमिशन्स होणार, म्हणजे नेमकं काय होणार? त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? युजीसीने नेमकं काय म्हटलंय? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - विशाखा निकम एडिटिंग - निलेश भोसले
6/13/20244 minutes, 6 seconds
Episode Artwork

NEET परीक्षा निकाल वादात का? परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी का होतेय? BBC News Marathi

NEET म्हणजे National Eligibility cum Entrace Test. वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशासाठीची ही प्रवेश परीक्षा असते. 5 मे रोजी यावर्षीची नीट परीक्षा झाली. या परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23.33 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले. 4 जूनला निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले आहेत. पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या 67 टॉपर्सपैकी 6 जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एकाच सेंटरमधून परीक्षा दिली होती. देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेत, परीक्षेचं आयोजन योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं म्हणत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केलीय. रिपोर्ट - उमंग पोद्दार निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
6/11/20244 minutes, 7 seconds
Episode Artwork

नितीश, नायडूंना हवा असलेला विशेष राज्याचा दर्जा काय आहे? BBC News Marathi

भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आघाडीचं सरकार आता भारतात स्थापन होईल. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागी विजय मिळाला पण पूर्ण बहुमत मिळालं नसल्याने त्यांना संयुक्त जनता दल (JDU) आणि तेलगु देसम पार्टी (TDP)ची मदत घेऊन सरकार स्थापन करावं लागेल. आंध्र प्रदेशला Special Category Status - विशेष श्रेणी दर्जा देण्यात यावा ही मागणी गेल्या दशकभरापासून अधिक काळ करण्यात येतेय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आंध्र प्रदेशाला असा विशेष दर्जा देण्याचा मुद्दा होता आणि आपण हे वचन पूर्ण करू असं त्यांनी म्हटलं होतं. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 4 जूनला निकालाच्या दिवशी याबद्दलचं सूचक ट्वीटही केलं होतं. भाजपला आता चंद्राबाबू नायडू आणि तेलगु देसम पार्टीची गरज असताना चंद्राबाबू राज्याला विशेष दर्जा देण्याची मोठी मागणी ठेवतील असा कयास आहे. सोबतच भाजपला पाठिंबा जाहीर करणारे नितीश कुमारही बिहारला असा विशेष श्रेणी दर्जा देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. हा स्पेशल कॅटेगरी स्टेटस काय असतो? असा विशेष दर्जा मिळाल्याने राज्यासाठी काय बदलतं?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
6/7/20244 minutes, 26 seconds
Episode Artwork

एक्झिट पोल म्हणजे काय? ते किती अचूक असतात? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

मतदान करून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडून एक्झिट पोल्स केले जातात. निवडणुकीत मतदान झाल्यानंतर निकालाबद्दलचे अंदाज याद्वारे व्यक्त करण्यात येतात. हे अंदाज कोणत्या संस्था बांधतात? ते किती अचूक असतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - इक्बाल अहमद निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
6/1/20245 minutes, 12 seconds
Episode Artwork

मोठाल्या शहरांमुळे तापमान जास्त वेगाने वाढतंय का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/30/20245 minutes, 56 seconds
Episode Artwork

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताची तपासणी इतकी महत्त्वाची का? BBC News Marathi

पुण्यात मध्यरात्री दारूच्या नशेत पोर्शे कारने धकड दिल्याने दोन निष्पाप व्यक्तींचा जीव गेला. तेव्हा एक अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत कार चावलत असल्याचं समोर आलं आहे. पण 19 मेच्या रात्री जेव्हा त्या मुलाच्या रक्ताचे सँपल घेतले आणि त्याची चाचणी केली. तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेत छेडछाड झाल्याचं आता पुणे पोलिसांना सांगितलं आहे. खरंच शरीरातील दारूचं प्रमाण जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी लवकर करणं किती महत्त्वाचं असतं? या चाचणीचे रिपोर्ट कोर्टात सबळ पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो का? हेच मुद्दे आपण आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊयात. लेखन - गणेश पोळ निवदेन - विशाखा निकम एडिट - निलेश भोसले
5/30/20245 minutes, 56 seconds
Episode Artwork

कांद्यावर निर्यात शुल्क लावून ग्राहकांचा फायदा - शेतकऱ्यांचा तोटा झाला का? BBC News Marathi

केंद्र सरकारने एप्रिलमध्ये पांढऱ्या कांद्यावरची आणि मे महिन्यात लाल कांद्यावरची अशी सरसकट निर्यातबंदी उठवली. याचा शेतकऱ्यांना फायदा होणं अपेक्षित होतं, पण दुसरीकडे सरकारने तब्बल 40% निर्यात शुल्क लावलं. कांद्याची निर्यातबंदी, निर्यातशुल्क, बाजारातल्या कांद्याच्या किमती आणि शेतकऱ्याचा/व्यापाऱ्यांचा फायदा – तोटा या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सतत ऐकतो, पण यांचं एकमेकांशी काय नातंय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन - गणेश पोळ निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
5/28/20245 minutes, 54 seconds
Episode Artwork

पॅलेस्टाईनला तीन युरोपीय देशांनी मंजुरी दिल्यामुळे काय बदलेल? BBC News Marathi

जगातल्या 143 देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलीय, पण त्यांच्याकडे स्वतःची अशी एक जमीन नाही, ते वेगवेगळ्या भूभागांवर राहतात. अशातच आणखी तीन युरोपीय देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केलीय. यामुळे काय बदलेल? इस्रायलला यामुळे नुकसान होईल का? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्येलेखन - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
5/25/20245 minutes, 49 seconds
Episode Artwork

निवडणूक आयोगावर सातत्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे त्यांची प्रतिमा ढासळली आहे का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/23/20247 minutes
Episode Artwork

इराणसमध्ये आता राजकीय उलथापालथ होणार? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/22/20245 minutes, 3 seconds
Episode Artwork

अल्पवयीन मुलाच्या गुन्ह्यासाठी पालकांना तुरुंगात जावं लागणार? कायदा काय सांगतो? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/21/20245 minutes, 29 seconds
Episode Artwork

इजिप्तमधले प्रचंड पिरॅमिड्स कसे बांधले? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/20/20244 minutes, 20 seconds
Episode Artwork

अटक होत असलेल्या व्यक्तीला कायद्याने काय हक्क आहेत? अटक करण्यासाठीचे नियम काय असतात? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/16/20245 minutes, 49 seconds
Episode Artwork

चाबहार बंदर कुठे आहे? या बंदराच्या कामकाजात भारताला रस का आहे? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/14/20245 minutes, 30 seconds
Episode Artwork

जादूटोणाविरोधी कायद्या नेमका काय? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/10/20245 minutes, 56 seconds
Episode Artwork

हिंदू लग्नात सप्तपदी, कन्यादान, मंगळसूत्र नसेल तर ते अवैध ठरतं? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/8/20244 minutes, 13 seconds
Episode Artwork

सुनीता विल्यम्स यांची तिसरी अंतराळवारी असणारी ही मोहीम काय आहे? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/6/20244 minutes, 54 seconds
Episode Artwork

वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे, माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आहे का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/3/20249 minutes, 35 seconds
Episode Artwork

एप्रिल महिना इतका भयंकर उष्ण का होता? मे महिना असाच गरम असेल का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/2/20243 minutes, 20 seconds
Episode Artwork

मतदानाच्या आकडेवारीवरून निवडणूक आयोगावर का टीका होतेय? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/1/20245 minutes, 21 seconds
Episode Artwork

अमेरिकन विद्यापीठांतले विद्यार्थी निदर्शनं का करतायत? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
5/1/20245 minutes, 13 seconds
Episode Artwork

अंटार्क्टिकाच्या वन्यप्राण्यांना का होतोय सनबर्न? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
4/29/20244 minutes, 49 seconds
Episode Artwork

सॅम पित्रोडा - वारसा कराचा वाद काय आहे? वारसा कर म्हणजे काय? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
4/25/20245 minutes, 40 seconds
Episode Artwork

कॅन्सरचा धोका ज्यामुळे वाढतो, ते कार्सिनोजेन्स काय असतात? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
4/24/20244 minutes, 57 seconds
Episode Artwork

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोणते खटले सुरू आहेत? ते तुरुंगात जाऊ शकतात का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
4/23/20246 minutes, 3 seconds
Episode Artwork

अतिरिक्त साखरेचे शरीरावर काय परिणाम होतात? BBC Marathi News

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
4/22/20246 minutes, 2 seconds
Episode Artwork

डीप फेक म्हणजे काय? आमिर, रणवीर यांनी खरंच लोकसभा निवडणूक प्रचार केला? BBC News Marathi

अभिनेता आमिर खान आणि रणवीर सिंहचे व्हीडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरतायत. यात हे अभिनेते एका राजकीय पक्षाबद्दल बोलत आहेत.खरंच या अभिनेत्यांनी राजकीय प्रचार केला का? डीपफेक म्हणजे काय? असे बनावट फोटो - व्हीडिओ कसे ओळखायचे?जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
4/19/20245 minutes, 23 seconds
Episode Artwork

क्लाऊड सीडिंग म्हणजे काय? दुबईत त्यामुळे पूर आला का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
4/18/20246 minutes, 22 seconds
Episode Artwork

जागतिक वसुंधरा दिन कधी आहे? यावेळची थीम काय? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
4/17/20245 minutes, 44 seconds
Episode Artwork

इराण - इस्रायल तणावाचे भारतावर काय परिणाम होऊ शकतात? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
4/16/20246 minutes, 39 seconds
Episode Artwork

भारतात हेपेटायटिसचं प्रमाण अधिक का आहे? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
4/15/20245 minutes, 23 seconds
Episode Artwork

अंतराळातला महास्फोट जो आयुष्यात एकदाच पाहता येईल BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
4/11/20244 minutes, 53 seconds
Episode Artwork

VVPAT पडताळणीचा वाद काय आहे? VVPAT सोबत छेडछाड होऊ शकते का?

ईव्हीएम मशीनवर मतदान केल्यावर (VVTAP) व्हीव्हीपॅटद्वारे मिळणाऱ्या पावत्या 100 टक्के पडताळून पाहाणे शक्य आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि सरकारला केलाय. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी VVPAT प्रणाली आणली गेली होती, मग VVPAT – EVM बद्दल पुन्हा इतकी चर्चा का होतेय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये निवेदन – अभिजीत कांबळे एडिटिंग – निलेश भोसले
4/2/20245 minutes, 18 seconds
Episode Artwork

जगभरात 105 कोटी टन अन्न जातं फुकट! युनायटेड नेशन्सचा अहवाल BBC News Marathi

या अहवालानुसार जगभरात खाण्यासाठी उपलब्ध असलेल्या - खाण्यायोग्य अन्नापैकी 19% अन्न दरवर्षी वाया जातं. घरामध्ये, स्टॉल्स - खानावळ - रेस्टोरंटसारख्या फूड सर्व्हिस आणि रिटेल दुकानांमध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचं हे एकूण वर्षातलं प्रमाण आहे.लेखन - अमृता दुर्वे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
4/2/20244 minutes, 53 seconds
Episode Artwork

विमा सरेंडर केल्यास किती पैसे मिळणार? BBC News Marathi

तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी किंवा आयुर्विमा आहे का? आणि ती पॉलिसी सरंडर करण्याचा विचार तुम्ही करताय का? तसं असेल 1 एप्रिलपासून काही नियमांमध्ये बदल होतायत. कोणते बदल आहेत हे? समजून घेऊया या सोपी गोष्टमध्ये.लेखन - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
4/2/20243 minutes, 16 seconds
Episode Artwork

सुशिक्षित तरुणांना भारतात नोकऱ्या का मिळत नाहीयत? BBC News Marathi

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन - ILO आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या या अहवालात भारतातील रोजगार आणि बेरोजगारीसंदर्भातली महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहेत. लेखन - अमृता दुर्वे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
4/2/20246 minutes, 1 second
Episode Artwork

नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासूनच सुरू का होतं? BBC News Marathi सोपी गोष्ट

1 जानेवारी म्हणजे जगभरात हॅप्पी न्यू ईयर. तर मराठी नवीन वर्ष गुढी पाडव्यापासून, म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतं. पण नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिलपासून... असं का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्येलेखन - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
3/28/20244 minutes, 21 seconds
Episode Artwork

‘आई, मला वाचव’ असा फोन तुम्हाला आला तर काय कराल? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
3/26/20244 minutes, 20 seconds
Episode Artwork

घरून किंवा पोस्टानं मतदान कोण आणि कसं करू शकतं? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
3/25/20245 minutes, 17 seconds
Episode Artwork

अमेरिकन सरकारने अॅपल कंपनीवर खटला का दाखल केला? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
3/22/20244 minutes, 38 seconds
Episode Artwork

ईडी, आयकर विभागाच्या धाडी आणि इलेक्टोरल बाँड्स खरेदीचा पॅटर्न BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
3/20/20246 minutes
Episode Artwork

कधी भूकंप, कधी जाळपोळ, या देशात काय घडतंय? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
3/19/20243 minutes, 54 seconds
Episode Artwork

पुतिन पुन्हा सत्तेत आल्याचा भारतासोबत नात्यावर काय परिणाम होईल? BBC Marathi News

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
3/18/20246 minutes, 45 seconds
Episode Artwork

भारतीय सैनिक परदेशात काय करतायत? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
3/15/20245 minutes, 14 seconds
Episode Artwork

कुणी विकत घेतलेले बाँड्स कोणत्या पक्षाला दिले हे अजूनही गुलदस्त्यातच BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
3/15/20244 minutes, 31 seconds
Episode Artwork

एखादा फोटो खरा की खोटा, हे कसं ओळखायचं? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
3/13/20245 minutes, 14 seconds
Episode Artwork

CAA सुप्रीम कोर्टात टिकेल का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
3/12/20245 minutes, 48 seconds
Episode Artwork

भारतीय निवडणूक आयोगाचं काम कसं चालतं? वाद आणि इतिहास | BBC News Marathi

भारतात निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगावर असते. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था 1950 पासून देशातल्या संसदीय आणि विधिमंडळ निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.निवडणूक आयोगाची रचना कशी असते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि निवडणूक आयुक्तांविषयी जाणून घेऊया. पाहा ही सोपी गोष्ट.लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
3/12/20246 minutes, 6 seconds
Episode Artwork

अनंत अंबानींचा वनतारा प्राणी संग्रहालय प्रकल्प वैध आहे की नाही? BBC News Marathi

जामनगरमध्ये शेकडो एकर जमिनीवर अंबानींनी Greens Zoological Rescue and Rehabilitation Centre आणि Radhe Krishna Temple Elephant Welfare Trust अशा दोन संस्थांच्या माध्यमातून वनतारा प्रकल्प उभा केलाय. यात विविध दुर्मिळ प्राण्यांचं संवर्धन करण्याची त्यांची योजना आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल, पैसे असतील तर त्याला अशा पद्धतीचं प्राणिसंग्रहालय उभं करता येतं का? हा खरा प्रश्न आहे. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
3/12/20245 minutes, 2 seconds
Episode Artwork

महिलांची पुरुषांपेक्षा जास्त प्रगती झाली आहे का? BBC News Marathi

शिक्षण, आरोग्य, राजकारण, नोकरी आणि व्यवसायात महिलांची भागीदारी वाढली आहे हे विविध सर्वेक्षणांमधून सिद्ध तर झालंय पण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महिलांना न्याय मिळाला आहे का? शिक्षणातील महिलांचं प्रमाण वाढत असलं तरी त्यांना पुरुषांएवढाच पगार मिळतो का? भारत याबाबत कसं काम करतो आहे? या आणि महिलांबाबतच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सोपी गोष्टच्या या भागात लेखन - रित्विक दत्ता निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
3/12/20244 minutes, 58 seconds
Episode Artwork

फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे तुम्ही अस्वस्थ का झाला होता? BBC News Marathi

सोशल मीडिया आणि नैराश्य यांचा थेट संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार सोशल मीडिया वापरल्याने 67% किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्याबाबत नकारात्मक विचार येतात. एका अभ्यासानुसार भारतात एक माणूस दररोज सरासरी 141.6 मिनिटांचा वेळ फेसबुकवर घालवतो. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
3/7/20244 minutes, 41 seconds
Episode Artwork

गर्भपाताच्या अधिकाराला फ्रान्सने घटनात्मक संरक्षण का दिलं?

संसदेतील सदस्यांनी महिलांना 'स्वातंत्र्याची हमी' या 1958 च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी नुकतंच मतदान केलं. संसदेत या कायद्याच्या सुधारणेच्या बाजूने 780 मतं पडली. तर विरोधात 72 मतं होती. फ्रान्समध्ये 1975 पासून गर्भपात करणं कायदेशीर आहे परंतु देशाच्या 85 टक्के नागरिकांचा कल हा अधिकार राज्यघटनेतून मिळावा याकडे होता.निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
3/6/20244 minutes, 39 seconds
Episode Artwork

मुलांंचं लैंगिक शोषण होऊ नये यासाठी पालकांनी कसं जागरुक राहावं? BBC News Marathi

खरं तर आजचे पालक नवीन आव्हानांना तोंड देतायत. दोन्ही पालक working असणं, काम संपेल पण कामाचा ताण नाही ही बहुधा प्रत्येकच घरातली परिस्थितीय. अभ्यासासोबतच इतर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्याचा ताण, या सगळ्याचा परिणाम मुलांच्या वागण्यात सुद्धा डोकावतो. कित्येकदा मुलं आपल्यासमोर असतात पण सुसंवादात कमी असतो. अशा परिस्थितीत Safe- Unsafe Touch, Well- being यासारख्या विषयांवर संवाद होणं कठीण असू शकतं.निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
3/4/20246 minutes, 7 seconds
Episode Artwork

शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज का गरजेचा? | BBC News Marathi

उन्हाळ्याची चाहूल लागली की गाव खेड्यात शेतीच्या मशागतीची कामं सुरु होतात. या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न असतो - यंदा पाऊस कसा असेल. शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज दिला तर त्यांना त्याचा कसा फायदा होईल? कमी पाऊस झाल्याने होणारं नुकसान कसं टाळता येईल? याविषीय अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने केलेलं संशोधन नुकतंच प्रकाशित झालं. त्यात काय सांगितलं आहे, जाणून घ्या. लेखन – आशय येडगे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
3/1/20245 minutes, 17 seconds
Episode Artwork

पेटीएम फास्टॅग बंद करून पैसे परत कसे मिळवाल? | BBC News Marathi

सुरुवातीला लोकप्रिय ठरलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. त्यानुसार आता 15 मार्च 2024 नंतर पेटीम फास्टॅग रिचार्ज किंवा टॉपअप करता येणार नाही. तुम्ही हा फास्टॅग अजूनही वापरत असाल तर तो निष्क्रिय करण्याची प्रक्रिया आणि त्यातल्या पैशांचा रिफंड।मिळवण्याची प्रक्रिया समजून घेऊया सोपी गोष्टच्या या भागात.लेखन - आशय येडगेनिवेदन – अमृता दुर्वे एडिटिंग – अरविंद पारेकर
3/1/20244 minutes, 20 seconds
Episode Artwork

महाराष्ट्रात गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांची दारं बंद? | BBC News Marathi

आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षण मिळावं यासाठी शिक्षणहक्क कायदा बनवण्यात आला. या कायद्यानुसार राज्यातल्या खासगी शाळांमध्ये या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण आता या कायद्यात बदल केल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना या आरक्षणापासून वंचित रहावं लागणार आहे. या कायद्यात कोणता बदल केला गेलाय? त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आणि सरकारने हा निर्णय का घेतलाय? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - दीपाली जगताप निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
2/28/20246 minutes, 2 seconds
Episode Artwork

भारताच्या चांद्र मोहिमेतही ओडिसियसनं केलेलं संशोधन मदत करू शकतं BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
2/23/20244 minutes, 36 seconds
Episode Artwork

मराठा आरक्षण कायदा : तुम्हाला पडलेल्या 5 प्रश्नांची 5 उत्तरं BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
2/21/20246 minutes, 7 seconds
Episode Artwork

‘दंगल’ गर्ल सुहानी भटनागरचा मृत्यू झाला, तो आजार काय आहे? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
2/20/20244 minutes, 45 seconds
Episode Artwork

युरोप आणि भारतातील शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
2/16/20243 minutes, 44 seconds
Episode Artwork

‘इलेक्टोरल बाँड्स घटनाबाह्य’ सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा कुणाला फायदा? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
2/15/20245 minutes, 16 seconds
Episode Artwork

पाकिस्तानातल्या निकालानं भारताची चिंता वाढली आहे का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
2/14/20245 minutes, 39 seconds
Episode Artwork

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू का झाल्या नाहीत? BBC Marathi News

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
2/13/20245 minutes, 31 seconds
Episode Artwork

इस्रायल हमास युद्ध : रफा बॉर्डर काय आहे? तिथे लाखो लोक का जमले आहेत? BBC News Marathi

इजिप्त आणि गाझाच्या सीमेवर रफा शहरात इस्रायल मोठा जमिनी हल्ला करेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे रफामधल्या लाखो निर्वासितांच्या मनात चिंता आणि भीतीचं सावट आहे. रफा शहर महत्त्वाचं का आहे आणि इस्रायल इथे बाँबहल्ले तीव्र का करत आहे, जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
2/13/20244 minutes, 58 seconds
Episode Artwork

कॉपी रोखण्यासाठीचा कायदा काय आहे? तो किती उपयुक्त ठरेल? BBC News Marathi

परीक्षेत कॉपी करणाऱ्यांसाठी भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद होती पण आता यासाठी स्वतः केंद्र सरकारनेच एक कायदा बनवलाय. केंद्र सरकारचा कॉपी रोखण्यासाठीचा हा कायदा नेमका काय आहे? परीक्षेत कॉपी केली किंवा एखाद्याला कॉपी करण्यात मदत केली तर किती वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या परीक्षांसाठी हा कायदा बनवला गेला आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्येलेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
2/9/20244 minutes, 3 seconds
Episode Artwork

लिव्ह इन रिलेशनविषयी उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यात काय म्हटलंय? | BBC News Marathi

उत्तराखंडच्या भाजप सरकारनं राज्याच्या विधानसभेत समान नागरी संहिता 2024 विधेयक पास केलं. पण या कायद्यातल्या लिव्ह इन म्हणजे एकत्र राहणाऱ्या अविवाहित जोडप्यांबाबतच्या नियमाने जास्त लक्ष वेधून घेतलं आहे. या कायद्यात आहे तरी काय? आणि त्यावरून वाद का होतोय?पाहा ही सोपी गोष्ट लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
2/8/20245 minutes, 42 seconds
Episode Artwork

शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह का गेलं? | BBC News Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांकडे राहील असा मोठा निर्णय निवडणूक आयोगानं 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिला. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगानं कोणत्या नियमांच्या आधारे हा निकाल दिला, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
2/7/20244 minutes, 55 seconds
Episode Artwork

कलम 370 रद्द झाल्यानं लडाखला फटका बसला का? स्थानिक का रागावलेत? | BBC News Marathi

लडाखची राजधानी लेहमध्ये 3 फेब्रुवारीला हजारो लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकही या आंदोलनात सहभागी झाले होते. पण हे आंदोलन कशासाठी होतं? लडाखमध्ये काय सुरू आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
2/6/20245 minutes, 11 seconds
Episode Artwork

पाकिस्तान निवडणुकीचा भारतावर काय परिणाम होईल? | BBC News Marathi

पाकिस्तानात सलग तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. 8 फेब्रुवारी 2024 रोजी या देशात मतदान होणार आहे. सध्या तिथे सत्तेच्या खेळात नवाझ शरीफ, इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांच्यात त्रिकोणी राजकीय चढाओढ सुरू आहे. नेमकी काय समीकरणं आहेत आणि त्यांचा भारतावर काही परिणाम होईल का, जाणून घ्या. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
2/6/20245 minutes, 23 seconds
Episode Artwork

प्लॅस्टिकचे कण शरीरात गेल्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात? | BBC News Marathi

जमिनीत मिसळलेल्या प्लॅस्टिकमुळे शेकडो एकर जमीन खराब झाल्याचं एक संशोधन सांगतं. मायक्रोप्लॅस्टिकचे कण पोटात गेल्याने अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. प्लॅस्टिकच्या प्रदूषणापासून स्वतःला कसं वाचवायचं? आणि हे प्रदूषण कमी करण्याचे उपाय काय आहेत? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
2/2/20244 minutes, 9 seconds
Episode Artwork

पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ठेवणं कितपत सुरक्षित? BBC News Marathi

भारतात सुमारे 9.3 कोटी लोक पेटीएम वापरतात. पण 31 जानेवारी 2024 ला रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली. आता पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांवर याचा नेमका काय परिणाम होईल? रिजर्व्ह बँकेने कोणते निर्बंध लादले आहेत? भारतीय डिजिटल पेमेंट क्षेत्रात एकेकाळी पहिल्या नंबरवर असणाऱ्या पेटीएमवर अशी वेळ का आली? पाहा या सोपी गोष्ट मध्ये.लेखन - आशय येडगे, गुलशनकुमार वनकर निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
2/2/20245 minutes, 48 seconds
Episode Artwork

मेंदूत चिप बसवली तर फक्त विचार करून काॅम्प्युटर चालवता येईल का? | BBC News Marathi

उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीने माणसाच्या मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्याची माहिती दिलीय. आता मेंदूतल्या विचारांच्या जोरावर मोबाईल, कम्प्युटर किंवा कोणतंही डिजिटल डिव्हाईस चालवता येईल असं मस्क म्हणालेत. नेमका हा प्रयोग काय आहे? शस्त्रक्रिया करून मेंदूत चिप बसवली तर त्याचा माणसावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
2/1/20244 minutes, 19 seconds
Episode Artwork

म्यानमार सीमेवर भारत कुंपण का घालणार? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
1/30/20244 minutes, 1 second
Episode Artwork

गर्भाशयाच्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देईल का? BBC News Marathi

दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे जगभरात तब्बल ३ लाख महिलांचा मृत्यू होतो. पण एका नवीन लशीमुळे या गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका नव्वद टक्के कमी होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. काय आहे ही HPV लस? कोणत्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देऊ शकते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा ही लस घेतली की किती वर्ष संरक्षण मिळू शकतं? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.लेखन - आशय येडगे निवेदन – विशाखा निकम एडिटिंग – निलेश भोसले
1/26/20243 minutes, 58 seconds
Episode Artwork

कोरोनासारखीच आणखीन एक महामारी येईल का? | BBC News Marathi

जानेवारी 2024 ला दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसुस यांनी भविष्यात कोरोनापेक्षा गंभीर आजाराची साथ येऊ शकते असा इशारा दिलाय. 'Disease X' म्हणजे नेमकं काय? यामुळे आणखीन एक जागतिक साथ येऊ शकते का? आणि भविष्यात असा रोग आलाच तर त्यासाठी काय तयारी केली जात आहे? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
1/24/20244 minutes, 17 seconds
Episode Artwork

मराठा समाजाच्या सर्वेक्षणात ‘हे’ प्रश्न विचारले जाणार | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
1/22/20244 minutes, 8 seconds
Episode Artwork

वर्क फ्रॉम होम स्कॅम नेमका काय आहे? त्यापासून वाचायचं कसं? BBC News Marathi

युट्युबचे काही व्हिडिओ लाईक करा आणि घरबसल्या पैसे कमवा, दिवसातले दोन तास द्या आणि हजारो रुपये कमवा या आणि अशा अनेक जाहिराती तुम्ही बघितल्या असतील. तर हा वर्क फ्रॉम होम स्कॅम नेमका काय आहे? वर्क फ्रॉम होम स्कॅमचे किती प्रकार आहेत? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
1/19/20242 minutes, 57 seconds
Episode Artwork

काश्मीरमध्ये बर्फ का पडला नाही? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
1/18/20243 minutes, 30 seconds
Episode Artwork

जगातली गरिबी संपायला अजून 230 वर्षं लागतील, ऑक्सफॅमचा अहवाल आणखी काय सांगतो? | BBC News Marathi

एकीकडे येत्या दशकात जगाला पहिला Trillionaire मिळेल तर दुसरीकडे याच काळात आणखीन कितीतरी लोक गरिबीत ढकलले जातील. ऑक्सफॅमचा रिपोर्ट नेमका काय आहे आणि वाढत चाललेल्या आर्थिक विषमतेचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टीच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानूएडिटिंग – मयुरेश वायंगणकर
1/18/20244 minutes, 40 seconds
Episode Artwork

दहशतवादाचे आरोप करत इराणने पाकिस्तानवर हल्ला का केला? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
1/17/20244 minutes, 15 seconds
Episode Artwork

आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पॅकेजची माहिती आता जाहीर केली जाणार नाही, कारण... | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
1/15/20244 minutes, 6 seconds
Episode Artwork

भारताच्या नाराजीचा मालदीववर काय परिणाम होऊ शकतो? | BBC News Marathi

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आणि सोशल मीडियावर एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अनेक भारतीयांनी असं ट्विट केलंय की आता मालदीवऐवजी लक्षद्वीपला पर्यटनासाठी जायला हवं. पण मालदीवच्या काही मंत्र्यांनी याला विरोध केला आणि सोशल मीडियावर एक वॉर सुरु झालं. खरंच भारतीय लोकांनी मालदीवचा बहिष्कार केला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगेनिवेदन - सिद्धनाथ गानूएडिटिंग – शरद बढे
1/9/20244 minutes, 8 seconds
Episode Artwork

महाराष्ट्रात जानेवारी उजाडला तरी थंडी का आली नाही? | BBC News Marathi

कॅलेंडरवर हिवाळा सुरु झाला, पण अजून महाराष्ट्रात थंडी दिसत नाही. डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान होतं पण आता जानेवारीतही थंडी येणार नसल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नेमकं असं का होतंय? मागच्या वर्षीचं तापमान नेमकं किती होतं? जानेवारी ते मार्च या थंडीच्या महिन्यांमध्ये नेमका कुठे पाऊस पडेल आणि याचा पिकांवर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
1/3/20244 minutes, 36 seconds
Episode Artwork

'बॉक्सिंग-डे' क्रिकेट मॅचचा बॉक्सिंगशी काही संबंध आहे का? | BBC News Marathi

नाताळच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड आणि काही राष्ट्रकुल देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जातो. हा दिवस कधीच रविवारी येत नाही. गरिबांना भेटवस्तू देण्याच्या परंपरेतून सुरु झालेल्या या दिवसाचं स्वरूप आता कसं बदललं आहे? आणि याच दिवशी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटचे सामने का भरवले जातात? याचाच रंजक इतिहास, पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगेनिवेदन - सिद्धनाथ गानूएडिटिंग – अरविंद पारेकर
1/1/20243 minutes, 26 seconds
Episode Artwork

हूती बंडखोरांनी समुद्रात केलेल्या हल्ल्यांमुळे भारतात महागाई वाढणार? | BBC News Marathi

येमेनची माजी राजधानी सनावर ज्यांचा ताबा आहे अशा हूती बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले केले. इस्रायल-हमास संघर्षात हूती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे एक नवीन आघाडी उघडली गेली आहे. याचा जागतिक व्यापारावर काय परिणाम होईल? भारतात यामुळे महागाई वाढेल का? पाहूया या प्रश्नांची उत्तरं, सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
12/29/20235 minutes, 4 seconds
Episode Artwork

नवीन फौजदारी कायद्यांचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? | BBC News Marathi

गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे होणारे बदल नेमके काय आहेत? सामान्य माणसाच्या आयुष्यात यामुळे कोणते महत्त्वाचे बदल होऊ शकतात? आणि विरोधकांनी या कायद्यांमुळे केंद्र सरकारवर का टीका केलीय? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
12/27/20235 minutes, 31 seconds
Episode Artwork

आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल का? | BBC News Marathi

महाराष्ट्राच्या माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांच्या मुलाला त्यांच्या आईची जात लावता आली नव्हती पण तशाच एका प्रकरणात न्यायालयाने गुजरातमध्ये मुलाला आईची जात लावण्याची परवानगी दिली होती. भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या देशामध्ये आईची जात मुलांना लावण्याबाबत कायदा काय सांगतो? याआधी अशी प्रकरणं घडली आहेत का? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
12/26/20235 minutes, 20 seconds
Episode Artwork

नवीन कोरोना व्हेरियंटमुळे बूस्टर डोस घ्यावा लागणार? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
12/22/202330 minutes, 54 seconds
Episode Artwork

COVID-19 आरोग्य संकट संपलं होतं, मग कोरोनाचे रुग्ण परत का सापडतायत? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
12/22/20234 minutes, 23 seconds
Episode Artwork

डंकी सिनेमातला परदेशात जाण्याचा ‘डाँकी रूट’ म्हणजे काय? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
12/21/20234 minutes, 50 seconds
Episode Artwork

संसदेतून खासदारांना निलंबित करण्याचे नियम काय आहेत? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
12/20/20235 minutes, 22 seconds
Episode Artwork

काँग्रेसवर निवडणुकांसाठी लोकांकडून देणगी मागण्याची वेळ का आली? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
12/19/20235 minutes, 4 seconds
Episode Artwork

श्रीकृष्ण जन्मस्थानाचा वाद काय आहे? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
12/18/20235 minutes, 15 seconds
Episode Artwork

केंद्राने इथेनॉल बनवण्यावर बंदी का घातली? BBC Marathi News

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
12/15/20235 minutes, 20 seconds
Episode Artwork

संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कुणावर असते? संसदेत जाण्यासाठी काय करावं लागतं? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
12/14/20234 minutes, 35 seconds
Episode Artwork

राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्यांचे राजीनामे, आयोगाची कामं नेमकी काय असतात? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
12/13/20235 minutes, 49 seconds
Episode Artwork

जगात एकाच वेळी 8 ठिकाणी सुरू असलेल्या युद्धांचा फटका कुणाला बसतोय? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
12/12/202331 minutes, 15 seconds
Episode Artwork

Google Gemini हे तंत्रज्ञान Chat GPT पेक्षा अधिक वेगवान आणि अचूक असेल का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
12/11/20234 minutes, 9 seconds
Episode Artwork

काश्मीरमध्ये नवीन आरक्षण, पण निवडणुका कधी? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
12/8/20234 minutes, 24 seconds
Episode Artwork

राजकीय सल्लागार निवडणुका जिंकून देऊ शकतात का? BBC News Marathi

हरणाऱ्या आणि जिंकणाऱ्या चेहऱ्यांमागचे कलाकार तुम्हाला क्वचितच ठाऊक असतील. उमेदवारांच्या आणि नेत्यांच्या नावावर प्रचार होतो, तो करण्यासाठी जसे पक्षाचे कार्यकर्ते असतात तसेच प्रोफेशनल कार्यकर्तेही असतात. हे राजकीय सल्लागार किंवा पॉलिटिकल कन्सल्टंट्स कोण असतात? खरंच राजकीय सल्लागार निवडणुका जिंकण्या – हरण्यात इतकी महत्त्वाची भूमिका बजावतात का?लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
12/5/20234 minutes, 33 seconds
Episode Artwork

निवडणूक आयोगाने एकाच राज्याचे निवडणूक निकाल एक दिवस उशीराने का दिले?

निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा ठरवताना कोणत्या कायद्याचा आधार घेतं? निवडणूक प्रक्रियेच्या तारखा ठरवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात? पाहुया आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
12/4/20234 minutes, 9 seconds
Episode Artwork

अमेरिकेच्या दाव्यानंतर भारत अमेरिका संबंधांवर ताण पडेल का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
12/1/20234 minutes, 49 seconds
Episode Artwork

हवामानामुळे 9 महिन्यांत इतकं नुकसान का झालं? BBC News Marathi

नोव्हेंबरच्या दोन दिवसांत महाराष्ट्रात असा पाऊस पडला की 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं, त्यापूर्वी 55 वेळा वीज पडून 70 लोकांचा जीव गेला तर पूर आणि दरड कोसळून 103 लोक दगावले. हे नेमकं काय घडतंय? हवामान बदलाबद्दल आपण अनेकदा बोलतो पण हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. भारतात जानेवारी ते सप्टेंबर 2023 या 9 महिन्यांमध्ये जवळपास दर दिवशी तीव्र हवामानाची एकादी घटना घडते आणि यात अपरिमित हानी झालीय. गेल्या 9 महिन्यांत भारताला बसलेल्या हवामानाच्या या तडाख्याची ही सोपी गोष्ट.
11/30/20234 minutes, 35 seconds
Episode Artwork

रॅट होल माइनिंग काय आहे? त्यामुळे उत्तरकाशीत मजूर कसे वाचले? BBC News Marathi

अखेर 17 दिवसांनंतर उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले मजूर बाहेर आले. खरंतर त्यांच्या सुटकेसाठी वेगवेगळ्या यंत्रणा आणि मोठाली यंत्रं एकत्र काम करत होती, पण अखेरच्या टप्प्यात जेव्हा यंत्रंही निकामी व्हायला लागली, तेव्हा शेवटचे काही मीटर खोदण्याची जबाबदारी रॅट होल मायनर्सनी पार पाडली.उंदराच्या बिळावरून नाव पडलेल्या या खाणकामाच्या पद्धतीवर देशात बंदी आहे, पण उत्तरकाशीत त्यामुळेच एवढे जीव कसे वाचले? मुळात हे रॅट होल मायनिंग काय आहे? देशात ते कुठे-कुठे वापरलं गेलंय आणि त्याच्यावर बंदी का आली? पाहूया, आजच्या सोपी गोष्टमध्येसंकलन – आशय येडगेनिवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
11/29/20235 minutes, 51 seconds
Episode Artwork

अवकाळी पाऊस म्हणजे काय? | BBC News Marathi

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे सध्या महाराष्ट्रात शेतीचं बरंच नुकसान झालं आहे. पण अवकाळी पाऊस म्हणजे नेमका कोणता पाऊस? तो पडण्यामागची कारणं काय आणि त्यामुळे होणारं नुकसान कसं टाळता येईल?लेखन, निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – नीलेश भोसले
11/28/20234 minutes, 46 seconds
Episode Artwork

युध्दविरामामुळे हमासला मदत झाली का? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
11/27/20233 minutes, 28 seconds
Episode Artwork

मोदींना पनौती म्हटल्याने राहुल गांधींना नोटीस, निवडणूक आयोगाने काय म्हटलं? BBC News Marathi

राजस्थानमध्ये प्रचाराला गेलेल्या राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात पनौती हा शब्द वापरल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली . हा शब्द निवडणूक आयोगाला वादग्रस्त का वाटला? पनौती शब्दाचा जन्म कसा झाला? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
11/24/20235 minutes, 15 seconds
Episode Artwork

पंजाबच्या सतलज नदीत सापडलेला 'तो' धातू एवढा महत्त्वाचा का? BBC Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
11/23/20233 minutes, 44 seconds
Episode Artwork

जाहिरातींनी दिशाभूल करू नये म्हणून भारतात काय नियम आहेत? BBC News Marathi

रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद ही कंपनी अनेक कारणांनी अनेकदा वादात अडकलेली दिसते. अध्येमध्ये कुठल्यातरी जाहिरातींवरून वाद झालेले आपणही पाहिले असतील. एखादी जाहिरात दिशाभूल करते म्हणजे नेमकं काय? काय आहेत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबतचे नियम? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
11/23/20234 minutes, 40 seconds
Episode Artwork

ChatGPT आणणाऱ्यालाच कंपनीने का काढून टाकलं? BBC News Marathi

फक्त ChatGPTच नव्हे तर OpenAI कंपनीने Dall-E हे आणखी एक AI tool विकसित केलंय, ज्यात एका ओळीचं टेक्स्ट टाकल्यावर काही सेकंदात ते दाखवणारं एक चित्र तयार होतं. गेल्या वर्षभरात या दोन्ही तंत्रज्ञानांवर वेगवेगळ्या ॲप्स विकसित झाल्या, ज्यामुळे लोक वाटतील तसे काल्पनिक फोटो आणि व्हीडिओ तयार करू लागले, एका झटक्यात 500 शब्दांचे निबंध, काल्पनिक बातम्या आणि अगदी व्हीडिओ सहज तयार करू लागले. सॅम ऑल्टमन यांची यात महत्त्वाची भूमिका होती, पण त्यांना Open AI ने का काढून टाकलं? लेखन - आशय येडगे निवेदन - गुलशनकुमार वनकर व्हीडिओ एडिटिंग - निलेश भोसले
11/21/20234 minutes, 49 seconds
Episode Artwork

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा हा आहे प्लॅन BBC News Marathi

12 नोव्हेंबर 2023 ला उत्तरकाशी जिल्ह्यातला एक बोगदा कोसळला आणि तिथे काम करणारे 41 मजूर आठ दिवसांपेक्षा जास्त काळ त्यात अडकून पडले आहेत. भारत सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांसोबत जगभरातले तज्ज्ञ त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
11/20/20234 minutes, 21 seconds
Episode Artwork

इस्रायलविरोधात लढण्यासाठी हमासला कोण पैसे देतंय? BBC News Marathi

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळं हमासला कोणते देश, संघटना मदत करतात किंवा या मोठ्या इस्लामिक संघटनेकडं पैसा कुठून येतो? कोणकोणते देश हमासला मदत करतात? हमास क्रिप्टोमधून पैसे कसे मिळवतं? पाहा सोपी गोष्टच्या या भागात लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
11/17/20234 minutes, 33 seconds
Episode Artwork

कालवा काढण्यासाठी इस्रायल आपल्या वाळवंटात 520 अणुबॉम्ब फोडणार होतं का? BBC News Marathi

भूमध्य समुद्र आणि तांबड्या समुद्राला जोडणारा जगातला एकमेव मार्ग म्हणजे इजिप्तचा सुएझ कालवा. पण राजकीय परिस्थिती बदलली की हा कालवा अनेकदा अडचणीत सापडतो. याला पर्याय म्हणून अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इस्रायलच्या वाळवंटात अणुस्फोट करून एक नवीन कालवा बनवण्याची योजना तयार केली होती. इस्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन यांच्या नावे असलेली ही योजना वारंवार चर्चेत का येते? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
11/16/20234 minutes, 45 seconds
Episode Artwork

ग्रीन फटाके म्हणजे काय, ते किती परिणामकारक? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
11/13/20234 minutes, 20 seconds
Episode Artwork

पाऊस आला की हवेतलं प्रदूषण कमी का होतं? BBC News Marathi

मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरात प्रदुषणाची पातळी वाढत चालली आहे. त्यासाठी नुकतीच राज्यात एक खास मीटिंगही झाली. यात अनेक उपायांवर चर्चा झाली त्यात एक उपाय होता क्लाऊड सीडिंगचा, म्हणजे कृत्रिम पावसाचा. पण कृत्रिम पावसाने खरंच प्रदुषणाची पातळी कमी होते का? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - अनघा पाठक निवेदन - एडिटिंग - सिद्धनाथ गानू
11/10/20234 minutes, 32 seconds
Episode Artwork

ओबीसी कोट्याविना मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे का? BBC News Marathi

एवढ्या मोठ्या समाजाचं आरक्षण संपवण्याचा घाट गेल्या काही दिवसांपासून घातला जातोय. त्यासाठी मंत्रालयापासून खालपर्यंतचे लोकं जबाबदार आहेत.” छगन भुजबळांच्या या विधानानंतर राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू झाल्याचं दिसतंय. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये असा ओबीसी संघटनांचा आग्रह आहे. सरकारही तेच म्हणत आलंय पण कुणबी प्रमाणपत्रं देऊन मराठा समाजाला ओबीसी दर्जा देणं म्हणजे आतापर्यंत ओबीसी गणल्या गेलेल्या जातींना फटका असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाईल या सरकारच्या दाव्यात किती तथ्य आहे? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारपुढे दुसरा कुठला मार्ग आहे का? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
11/9/20235 minutes, 10 seconds
Episode Artwork

वारंवार बंदी घालूनही फटाके फोडण्याचं प्रमाण कमी का होत नाही? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
11/9/20235 minutes, 5 seconds
Episode Artwork

गाझामध्ये एका महिन्यात जितके मृत्यू झाले तितके युक्रेनमध्ये 21 महिन्यांतही झाले नाहीत BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
11/7/20234 minutes, 37 seconds
Episode Artwork

मास्क वापरून प्रदूषणापासून बचाव होतो का? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
11/6/20235 minutes, 1 second
Episode Artwork

अफगाण निर्वासितांना पाकिस्तानबाहेर काढण्याचा निर्णय पाक सरकारने का घेतला? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
11/3/20234 minutes, 2 seconds
Episode Artwork

तुमचे आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती विकली जात आहे का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
11/1/20234 minutes, 50 seconds
Episode Artwork

मोर्चे, आयोग, उपोषण - मराठा आरक्षण आंदोलनाच्या इतिहासाची सोपी गोष्ट |BBC News Marathi

22 मार्च 1982ला अण्णासाहेब पाटील यांनी मंडल कमिशनला विरोध करत मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला. आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीही त्यावेळी करण्यात आलेली होती. मात्र त्यांची एकही मागणी मान्य न झाल्याने अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली आणि आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज एकत्र यायला सुरुवात झाली. लेखन - नामदेव काटकर निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
11/1/20235 minutes, 24 seconds
Episode Artwork

अपार क्रमांक म्हणजे काय? केंद्र सरकारची ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना काय? BBC News Marathi

भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असणारी ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना नेमकी काय आहे. अपार क्रमांक काय आहे? आधार क्रमांक आणि अपार क्रमांक यामध्ये काही फरक आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार क्रमांक असताना या नवीन अपार क्रमांकाची गरज आहे का? लेखन - आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
10/31/20234 minutes, 28 seconds
Episode Artwork

इस्रायल - गाझा युद्धात हिजबुल्लाह उडी घेईल का? BBC News Marathi

इस्रायल हमासबरोबर युद्धात गुंतलेलं असताना तिकडे लेबनॉन मधून हिझबुल्लाह इस्रायलवर हल्ला करू शकते का? हिझबुल्लाह राजकीय पक्ष आहे की कट्टरतावादी संघटना? पाहा सोपी गोष्ट.
10/20/20234 minutes, 39 seconds
Episode Artwork

इस्रायलवर हमासने हल्ला केला, पण त्यामागे इराणचा हात होता? BBC News Marathi

7 ऑक्टोबरला हमासने गाझामधून इस्रायलवर हल्ले केले. गेली अनेक वर्षं काहीशी बॅकफुटवर वाटत असलेली हमास संघटना इतका मोठा हल्ला केवळ स्वतःच्या जोरावर करू शकते का, हा प्रश्न लगेचच उभा राहिला आणि संशयाची सुई वळली इराणकडे. खरंच हमासचा हल्ला इराणच्या पाठिंब्याने झाला होता का? पाहू या या सोपी गोष्टमध्ये
10/19/20235 minutes, 17 seconds
Episode Artwork

इस्रायलने जेव्हा 6 दिवसांच्या युद्धात गाझा काबीज केलं BBC News Marathi

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष नवीन नाही. 1948 साली स्थापना झालेल्या इस्रायलने आजवर अनेकदा आपल्या शेजाऱ्यांशी लढाई केली आहे. 1967 साली झालेल्या लढाईत इस्रायलने निर्णायक विजय मिळवला होता. फक्त 6 दिवसांत इस्रायलने सीरिया, जॉर्डन आणि इजिप्तचा भूप्रदेश काबीज करत विजय मिळवला होता. काय होतं हे युद्ध? पाहा. निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
10/17/20235 minutes, 24 seconds
Episode Artwork

इस्रायल - पॅलेस्टाईन संघर्ष होतोय ती गाझा पट्टी आहे तरी काय? BBC News Marathi

मासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीतून आधी इस्रायलवर हल्ला झाला आणि त्यानंतर इस्रायलने गाझावर बॉम्बहल्ले सुरू केले. आकाराने मुंबईपेक्षा लहान असणारा हा भाग या युद्धात एवढा महत्वाचा का आहे? तिथे राहणाऱ्या सामान्य लोकांची परिस्थिती नेमकी काय आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
10/12/20235 minutes, 25 seconds
Episode Artwork

इस्रायल की पॅलेस्टाईन? भारत नेमका कुणाच्या बाजूने? BBC News Marathi

भारताच्या फाळणीच्या काळातच इस्रायलचा जन्म होत होता. त्या दरम्यान गांधीजींनी इस्रायलच्या स्थापनेलाच विरोध केला होता, त्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणावर बराच काळ गांधींचा प्रभाव राहिला. मात्र मागील तीन दशकांमध्ये भारत इस्रायलचा मित्र बनला आहे. नेमके भारत इस्रायल संबंध आणि पॅलेस्टाईनबद्दलची भारताची भूमिका कशी बदलत गेली? पाहा ही सोपी गोष्ट निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
10/12/20235 minutes, 53 seconds
Episode Artwork

राज ठाकरेंचं टोल आंदोलन, पण टोल कुठे, कसा आकारला जाऊ शकतो? BBC News Marathi

आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा टोलमुक्तीचा प्रश्न चर्चिला जातोय. पण मुळात टोल का घेतात? टोलचे नियम काय आहेत? रोड आणि टोल टॅक्स वेगळाय का? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
10/11/20234 minutes, 30 seconds
Episode Artwork

इस्रायल हमास संघर्षाचा आपल्यावर काय परिणाम? 5 प्रश्न, 5 उत्तरं | BBC News Marathi

हमास या सशस्त्र कट्टरतावादी संघटनेने इस्रायलवर 7 ऑक्टोबरला मोठमोठे मिसाईल हल्ले केले. प्रत्युत्तरात इस्रायलने गाझा पट्टीसह पॅलेस्टिनी गडांवर हल्ले केले आहेत. आतापर्यंत शेकडो मृत्यू झालेत, हजारो विस्थापित झालेत, आणि कित्येक जण अजूनही या संघर्षात अडकलेत. पण जगात आणखी एक युद्ध का पेटलंय? आणि त्याचे आता आपल्यावर काय परिणाम होतील? पाहा तुमच्या मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - टीम बीबीसी लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
10/10/20235 minutes, 42 seconds
Episode Artwork

महादेव बेटिंग ॲप काय आहे? बॉलिवूडशी या सगळ्याचं काय नातं आहे? BBC News Marathi

सोशल मीडियावरून लोकप्रिय झालेलं हे ॲप देशभर पसरलं. बघता बघता काही महिन्यांतच 12 लाखांहून अधिक सट्टेबाज 'महादेव बुक'मध्ये सामील झाले. हजारो प्रकारच्या बँक खात्यांमधून पैशांचे व्यवहार सुरू झाले, क्रिकेटपासून ते निवडणुकांपर्यंत सगळ्याच गोष्टीवर सट्टा लावला जाऊ लागला. ईडीने तपास हाती घेतल्यानंतर काही सिने आणि टीव्ही अभिनेत्यांनाही समन्स पाठवलं आहे. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
10/6/20234 minutes, 24 seconds
Episode Artwork

जागतिक बँक म्हणते ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा वेग कमी झाला BBC News Marathi

: स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणेनंतर भारतातील शौचालयांमध्ये वाढ झाली पण बांधलेल्या शौचालयांचा वापर किती होतोय याबाबत जागतिक बँकेचा एक अहवाल प्रकाशित झाला आहे. भारतात शौचालये वापरणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? अनुसूचित जाती जमातींमध्ये शौचालय वापरण्याचं प्रमाण कमी होत आहे का? देशातील श्रीमंत आणि गरीब राज्यांची परिस्थिती काय आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन : आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
10/5/20234 minutes, 38 seconds
Episode Artwork

बिहारप्रमाणे जातीनिहाय जनगणना महाराष्ट्रात करता येऊ शकेल का? BBC News Marathi

बिहार सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये ही मागणी जोर धरू लागली आहे. ही आकडेवारी काय आहे? बिहारने ही जनगणना नेमकी कशी केली? महाराष्ट्रातील राजकारणावर या घोषणेचा काय परिणाम होणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे समाजातील वंचित घटकांना फायदा होऊ शकतो का? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन : आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
10/3/20234 minutes, 44 seconds
Episode Artwork

मालदीवच्या निकालामुळे भारताचं नुकसान आणि चीनला फायदा होईल? BBC News Marathi

मालदीवच्या निवडणुकांमध्ये 'इंडिया आऊट'ची घोषणा देणारे मोहम्मद मुइज्जू निवडून आले. गुंतवणूक आणि सामरिकदृष्ट्या भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मालदीववर खूप लक्ष केंद्रित केलं आहे. हे निवडणूक निकाल काय बदल घडवून आणू शकतील का? मोहम्मद मुइज्जू कोण आहेत? आता मालदीव कुणाच्या बाजूने असेल? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन : आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
10/2/20234 minutes, 6 seconds
Episode Artwork

झिलँडिया पृथ्वीवरचा आठवा खंड बनू शकेल का? BBC News Marathi

पृथ्वीवर शास्त्रज्ञांना एक नवीन खंड सापडल्याचा दावा 2017 मध्ये करण्यात आला. झिलँडिया नावाचा हा खंड नेमका कुठे आहे? तो किती मोठा आहे? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये. निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
9/28/20234 minutes, 17 seconds
Episode Artwork

डेंग्यूवर अजूनही लस का बनू शकली नाही? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/27/20233 minutes, 46 seconds
Episode Artwork

अण्णा द्रमुकने NDA सोडल्याने भाजपला दक्षिणेची दारं बंद? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/26/20235 minutes, 58 seconds
Episode Artwork

भारताच्या गुप्तहेर संस्थेमध्ये एजंट होण्यासाठी काय करावं लागतं?

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/25/20234 minutes, 11 seconds
Episode Artwork

धनगर आरक्षणाचा तिढा काय आहे? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/22/20234 minutes, 16 seconds
Episode Artwork

महिला आरक्षणाचं विधेयक पास झालं खरं पण प्रत्यक्षात यायला 2039 उजाडेल? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/21/20235 minutes, 43 seconds
Episode Artwork

खलिस्तान चळवळ कशी आणि कधी सुरु झाली? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/20/20235 minutes, 20 seconds
Episode Artwork

भारत - कॅनडा संबंध का बिघडले आहेत? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/19/20235 minutes, 35 seconds
Episode Artwork

सूर्यमालेत पृथ्वीसारखा नवीन ग्रह सापडला आहे का? BBC News

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/18/20235 minutes, 11 seconds
Episode Artwork

एलियन्स खरंच असतात का? NASA उडत्या तबकड्यांबद्दल काय म्हणतं? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/15/20235 minutes, 14 seconds
Episode Artwork

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवर नेमका वाद काय? BBC News Marathi

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवरून गेला काही काळ देशात चर्चा सुरू आहे. वर्तमान पद्धतीला स्थगिती देऊन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला यासंदर्भात कायदा आणायला सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाने मधल्या काळात एक समितीही नेमली पण सरकारने त्या समितीच्या रचनेत बदल करून एक विधेयक राज्यसभेत मांडलं, हे विधेयक आता लोकसभेत चर्चेसाठी येणार आहे. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की हे विधेयक निवडणूक आयुक्तांना ‘पंतप्रधानांच्या हातचं बाहुलं’ बनवण्याचा प्रयत्न आहे. काय आहे या विधेयकात? ते विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकार का मांडत आहे? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
9/14/20235 minutes, 42 seconds
Episode Artwork

भारतात डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/13/20235 minutes, 42 seconds
Episode Artwork

भारताला युरोपशी जोडणारा इकॉनॉमिक कॉरिडॉर काय आहे? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
9/12/20234 minutes, 17 seconds
Episode Artwork

सिनेमा वाटावा अशा नाट्यमय पद्धतीने चंद्राबाबूंना अटक केली गेली, पण त्यांच्यावर आरोप काय आहेत? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/12/20233 minutes, 58 seconds
Episode Artwork

शुक्राणू, स्त्रीबीज आणि गर्भाशिवाय प्रयोगशाळेत भ्रुणाची निर्मिती | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/8/20235 minutes, 40 seconds
Episode Artwork

वंशावळ म्हणजे काय? ती कशी काढतात? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/7/20234 minutes, 10 seconds
Episode Artwork

भारत, हिंदुस्तान, इंडिया - देशाची इतकी नावं कशी पडली? | BBC News Marathi

संविधानाच्या पहिल्या कलमामध्ये 'इंडिया दॅट इज भारत' असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र मागच्या दोन दिवसांपासून आपल्या देशाचं नाव इंडिया असं वगळून फक्त भारत ठेवलं जाण्याची चर्चा सध्या सुरूय. जून 2020 मध्ये भारताच्या संविधानातून इंडिया हा शब्द काढून तिथे फक्त भारत असा उल्लेख करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं होतं की संविधानात आपल्या देशाचा इंडिया म्हणजेच भारत असा उल्लेख करण्यात आलेला आहे. इंडिया आणि हिंदुस्थान हे नाव कुठून आलं? संशोधन - अजित वडनेरकर, भाषातज्ज्ञ लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
9/7/20235 minutes, 53 seconds
Episode Artwork

G20 परीषद का होतेय? भारतासाठी हे अध्यक्षपद का महत्त्वाचं आहे? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/5/20236 minutes, 34 seconds
Episode Artwork

एक देश, एक निवडणूक शक्य आहे का? फायदे काय? तोटे काय? सोपी गोष्ट | BBC News Marathi

‘एक देश एक निवडणूक’ या शक्यतेच्या चाचपणीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केंद्र सरकारने केली आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशनही बोलावलं आहे. पण खरंच एक देश एक निवडणूक शक्य आहे का? त्याचे फायदे काय? तोटे काय? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन – आशय येडगे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
9/5/20235 minutes, 47 seconds
Episode Artwork

दुष्काळ कधी जाहीर केला जातो? सरकार टाळाटाळ का करतं? BBC News Marathi

2023च्या पावसाळ्यात काही आठवडे धोधो पाऊस कोसळला, पण मग पावसाने अशी काही दडी मारली की शेतंच्या शेतं कोरडी ठक्क पडली. धरणांचा साठा पुरेल की नाही, गुरांचं काय होणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, दुष्काळ पडला तर शेतीचं काय, हे सगळं प्रश्न आ वासून उभे आहेत. पण दुष्काळ कसा ठरवतात? तो कोण जाहीर करतं? आणि दुष्काळ जाहीर करण्यात सरकार टाळाटाळ करतंय, असे आरोप नेहमी का होतात, याबद्दल बोलणार आहोत. मी सिद्धनाथ, तुम्ही पाहताय बीबीसी मराठीची सोपी गोष्ट. संशोधन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
9/1/20234 minutes, 45 seconds
Episode Artwork

इस्रो आता सूर्याकडे आदित्य L1 मोहीम का पाठवतंय? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
8/30/20235 minutes, 36 seconds
Episode Artwork

चंद्रावरच्या मातीत रोप लावणं शक्य आहे का? BBC News Marathi

भारताचं चंद्रयान-3 23 ऑगस्टला यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरलं. आणि त्यातून आता प्रज्ञान रोव्हर बाहेरही आलं आहे, ज्याच्या मदतीने इस्रो पुढचं संशोधन सुरू करेल. पण हे सगळं संशोधन चंद्रावरच होईल, कारण चंद्राची माती आणि इतर खडक काही पृथ्वीवर परत आणणं सध्याच शक्य नाही. पण तुम्हाला माहिती असेलच, यापूर्वीच्या अनेक चांद्र मोहिमांमध्ये रशिया, अमिरेका आणि चीनने चंद्रावरून बराच मालमसाला पृथ्वीवर संशोधनासाठी आला आहे. एक प्रश्न अनेक जण विचारत आहेत – चंद्रावरची माती कशी असते? त्यात काही पिकवणं शक्य आहे का? शोधू या याच प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
8/30/20235 minutes, 23 seconds
Episode Artwork

आदित्य L1 सूर्याच्या किती जवळ जाईल? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
8/29/20235 minutes, 59 seconds
Episode Artwork

विक्रम, प्रग्यान 14 दिवसांनंतरही काम करतील? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
8/28/20234 minutes, 50 seconds
Episode Artwork

गेल्या 50 वर्षांत चंद्रावर अंतराळवीर का नाही गेले? BBC News Marathi

भारताचं चंद्रयान तर चंद्रावर पोहोचलंय. आता ते तिथून त्याचं लँडर रोव्हर काय माहिती, काय फोटो पाठवतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पण हो, तिथून आपल्याला काही माती किंवा खडक आत्ताच आणता येणार नाही. कारण त्यासाठी पृथ्वीवर परत येण्याचीही सोय करावी लागते. पण मग जर चंद्रावर एक यान लँड करणं जर इतकं कठीण असेल, तर कल्पना करा ना, चंद्रावरून तेच यान पृथ्वीवर कसं आणलं जात असेल? आणि म्हणूनच गेल्या 50 वर्षांत कुणी चंद्रावर जाऊन परत नाही आलंय का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
8/25/20236 minutes, 19 seconds
Episode Artwork

चंद्रयान-3 यशानंतर इस्रो चंद्रयान-4 मोहिमेत अंतराळवीर पाठवणार? BBC News Marathi

अखेर चंद्रयान-3चं लँडर आणि रोव्हर चंद्रावर लँड झालं. अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीननंतर चंद्रावर यशस्वीरीत्या लँड करणारा चौथा देश बनला आहे. त्यातच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत पहिला देश बनला आहे. आता देशभरात जल्लोष असतानाच उत्सुकता आहे पुढच्या शक्यतांची? चंद्रावर पुढे काय होणार? भारत आता चंद्रयान 4 मध्ये चंद्रावर मानव पाठवू शकेल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – श्रीकांत बक्षी, लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
8/23/20235 minutes, 21 seconds
Episode Artwork

चंद्रयान 3 सारख्या चांद्र मोहिमांमुळे आजवर मिळालेल्या 5 कामाच्या गोष्टी | BBC News Marathi

चंद्रयान-3च्या लँडिंगची उत्सुकता शिगेला आहे. रशियाच्या अपयशानंतर नक्कीच जरा धाकधूकही वाढली आहे. कारण फक्त भारताचंच नाही तर अख्ख्या जगाचं लक्ष सध्या या मोहिमेवर आहे. पण तुम्हाला माहितीय, चंद्रयानसारख्या मोहिमांमुळे आपल्या फक्त चंद्राविषयीच माहिती कळते, असं नाही. अशा मून मिशन्समुळे आपल्या आजवर अनेक गोष्टी मिळाल्या आहेत, ज्यामुळे आपलं पृथ्वीवरील आपलं जगणंही जास्त आरामदायी बनलंय. पण कोणत्या गोष्टी? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
8/23/20236 minutes, 22 seconds
Episode Artwork

चंद्रयान-3 चं लँडर चंद्रावर नेमकं कसं उतरेल? BBC News Marathi

चंद्रयान-3 चं लँडर यान 23 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.04 मिनिटांच्या सुमारास चंद्रावर उतरण्यास सुरुवात करेल. हे यान चंद्रावर उतरवताना अखेरची साधारण पंधरा मिनिटं अतिशय महत्त्वाची असतील. या पंधरा मिनिटांत नेमकं काय काय घडेल, जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
8/21/20235 minutes, 30 seconds
Episode Artwork

चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर का लँड करणार आहे? | BBC News Marathi

इस्रोचं चांद्रयान-3 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. पण त्या आधीच 11 ऑगस्टला लाँच झालेलं रशियाचं लुना 25 हे यान इथेच दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचू शकतं. असं काय आहे या चंद्राच्या साऊथ पोलजवळ की भारत आणि रशिया दोघांनाही इथेच उतरायचंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन – जान्हवी मुळे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
8/18/20234 minutes, 21 seconds
Episode Artwork

राज्य सरकार NEETची परीक्षा रद्द करू शकतं का? | BBC News Marathi

तामिळनाडूमध्ये NEET परीक्षा दिल्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जागा न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची यादी मोठी आहे. मात्र अशाप्रकारे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनीही आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता तामिळनाडू सरकारने राज्यातून NEET हद्दपार करायचं ठरवलंय. पण काय असते ही परीक्षा? ती रद्द झाली तर काय पर्याय काय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
8/17/20234 minutes, 44 seconds
Episode Artwork

अक्षय कुमारने भारताचं नागरिकत्व कसं मिळवलं? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
8/16/20236 minutes, 4 seconds
Episode Artwork

केंद्र सरकारच्या या निर्णयाने पेन्शनधारकांना आलंय टेन्शन? | BBC News

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
8/15/20235 minutes, 4 seconds
Episode Artwork

हवाईत वादळानं आग कळशी पेटवली? BBC News Marathi

हवाईच्या माऊई बेटावरचं लहायना हे अख्खं शहर या वणव्यात बेचिराख झालं आहे. ही विनाशकारी आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास अजून सुरू आहे. पण हा वणवा कोरडं, उष्ण वातावरण आणि वादळी वारे यांमुळ जास्त पसरला आहे, यावर बहुतांश तज्ज्ञांचं एकमत झालंय. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
8/15/20234 minutes, 45 seconds
Episode Artwork

चंद्रयान 40 दिवसांत चंद्रावर, मग रशिया 10 दिवसांत चंद्र कसा गाठणार? BBC News Marathi

तब्बल 47 वर्षांनंतर रशियाचं एक रॉकेट चंद्राच्या दिशेने झेपावलंय. पण रशियाचं हे लुना 25 रॉकेट भारताशी अक्षरशः स्पर्धा करतंय. आणि त्याला इस्रोच्या चंद्रयानच्या आधी चंद्रावर पोहोचायचंय. असं खरंच शक्य आहे का? आणि रशियाला भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड का करायचंय? समजून घेऊ या.. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
8/12/20235 minutes, 31 seconds
Episode Artwork

कर्ज वसुलीची प्रक्रिया काय असते? बँकेचे एजंट धाक दाखवत असतील तर काय? BBC News Marathi

प्रत्येकाला पैशांची गरज असते, पण कर्ज नकोय. फेडणार कोण? एखादा कर्जाचा हफ्ता चुकला तर काय - आपली गाडी, घर जप्त होईल का? असे कॉल्स आणि असलं टेन्शन तुम्हालाही येत असेल. आपण एखादं कर्ज फेडताना एखादा हफ्ता चुकला की काय होईल? बँक कधी तुमच्या घरी एजंट पाठवून जप्ती करू शकतं? आणि कर्ज घेताना तुमचे काय अधिकार आहेत? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
8/11/20235 minutes, 5 seconds
Episode Artwork

मोदी सरकार 'हा' कायदा आणून तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकेल का? BBC News Marathi

3 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय संपर्क, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत The Digital Personal Data Protection Bill, 2023 मांडलं. मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की या विधेयकाद्वारे भारतीय नागरिकांची डिजिटल प्रायव्हसी सुरक्षित ठेवणारा देशातला पहिला कायदा बनेल. नागरिकांच्या डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी दोषींना शिक्षेची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
8/9/20236 minutes, 2 seconds
Episode Artwork

शाळा, कॉलेजमध्ये मुलांची रॅगिंग झाली तर काय करावं? BBC News Marathi

कॉलेजचे दिवस आयुष्यातले बेस्ट दिवस असे म्हणतात. पण अशात काही जणांसाठी कॉलेज हा एक धक्कादायक अनुभव असतो... तो रॅगिंगमुळे. आता काळ बदललाय तसं रॅगिंगचं स्वरूप आणि व्याख्याही. आज रॅगिंग म्हणजे नेमकं काय? ते फक्त कॉलेजमध्येच होतं का, की शाळेतही होऊ शकतं? आणि तुमच्यासोबत किंवा तुमच्या मुलांसोबत रॅगिंग झाली तर काय करावं? पाहू या सोपी गोष्टमध्ये... वार्तांकन - रवी प्रकाश, बीबीसी हिंदीसाठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
8/9/20236 minutes, 21 seconds
Episode Artwork

इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपली आहे का? BBC News Marathi

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाम तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली असून त्यांना तीन वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे. या शिक्षेमुळे ते येत्या निवडणुकीत लढण्यासाठी अपात्र ठरतील. मग ही इम्रान यांच्या राजकीय कारकीर्दीची अखेर मानायची का? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
8/8/20234 minutes, 59 seconds
Episode Artwork

चित्त्यांचे मृत्यू थांबत का नाहीयेत? खरंच रेडिओ कॉलरमुळे चित्ते दगावतायत का? | BBC News Marathi

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आलेल्या एकूण 20 चित्त्यांपैकी एकापाठोपाठ एक 9 चित्त्यांचे मृत्यू झालेत. इथे चार बछड्यांना जन्मही दिला, पण त्यापैकीही तीन दगावले. यासाठी कुणी या चित्त्यांच्या मानेभोवती लावलेल्या रेडिओ कॉलरला दोष देतंय तर कुणी वातावरणाला. खरंच या चित्त्यांचे मृत्यू का होतायत? आणि ते रोखायला भारताने काय करायला हवं? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
8/4/20236 minutes, 51 seconds
Episode Artwork

डेंग्यू कसा होतो? लक्षणं, उपचार, निदान काय? | BBC News Marathi

पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. अशात हा आजार नेमका काय आहे? तो कसा होतो आणि त्यापासून बचाव कसा करायचा? समजून घेऊयात. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
8/2/20234 minutes, 27 seconds
Episode Artwork

ITR Filing: आयकर परतावा अजूनही भरला नाही? आता काय कराल? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
8/1/20233 minutes, 48 seconds
Episode Artwork

भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली तर तुम्हीही श्रीमंत व्हाल का? BBC News Marathi

पंतप्रधानांनी दावा केलाय - जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल. ही आकडेवारी कशी ठरते? तर जीडीपीच्या वाढीच्या दरावर. गेल्या 9 वर्षांत भारताचा जीडीपी 83 टक्क्याने वाढला असला तरी तुमच्यातले काही लोक म्हणतील की आमचा पगार आणि खर्च याची सांगड पूर्वी होती तशीच आहे किंवा त्यापेक्षा वाईट आहे. आमची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. हे कसं? देशाची अर्थव्यवस्था वाढणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या वाढलेल्या उत्पन्नाचं वाटप आणि वितरण कसं आहे? जीडीपीच्या बाबतीत भारत आज जगात पाचव्या क्रमांकावर आहे,पण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताचं स्थान जगातील पहिल्या 100 देशांमध्ये नाही. असं का? लेखन - अनंत प्रकाश निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
7/31/20234 minutes, 16 seconds
Episode Artwork

डोळे येणं म्हणजे काय? त्यापासून वाचायचं कसं? | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
7/28/20233 minutes, 52 seconds
Episode Artwork

भारताच्या ‘या’ एका निर्णयामुळे अमेरिकेत तांदूळ महागला | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
7/27/20233 minutes, 48 seconds
Episode Artwork

मणिपूरमधला हिंसाचार थांबेल का? 3 महिन्यानंतरही हे राज्य का धगधगतंय? | BBC News Marathi

मणिपूर - गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून आपण सातत्याने हे एक नाव बातम्यांमध्ये ऐकतोय, पाहतोय. पण आजही मणिपूर अशांत आहे. आता एक धक्कादायक व्हीडिओ समोर आलाय, ज्यात दोन महिलांना एक जमाव नग्न करून घेऊन जाताना दिसतोय. कुकी आणि मैतेई या दोन प्रमुख जमातींमधला संघर्ष इतका का चिघळलाय? इथल्या या दोन समुदायांचा लोकांना एकमेकांवर, सरकारवर आणि लष्करावरही भरवसा का नाही? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – राघवेंद्र राव, बीबीसी प्रतिनिधी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
7/26/20236 minutes, 18 seconds
Episode Artwork

इर्शाळवाडीत दरड का कोसळली? भूस्खलन का होतं? BBC News Marathi

रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी गावावर 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली. किमान 100 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जातेय, मृतांचा आकडा वाढतोच आहे. दरवर्षी पावसाळा आला की हिमालयापासून सह्याद्रीपर्यंत, सगळीकडून अशा दरडी कोसळण्याच्या, भूस्खनलनाच्या बातम्या येतात, व्हीडिओही येतात. पण मुळात भूस्खलन म्हणजे काय? ते का होतं? आणि ते टाळता येतं का? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
7/26/20235 minutes, 38 seconds
Episode Artwork

खारफुटी, कांदळवनं महत्त्वाची आहेत, कारण... | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
7/26/20235 minutes, 41 seconds
Episode Artwork

तापमानानं मोडले ‘हे’ चार विक्रम | BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
7/25/20235 minutes, 41 seconds
Episode Artwork

2024 लोकसभेसाठी भाजप NDAमध्ये लहान प्रादेशिक पक्षांना का जोडतोय? | BBC News Marathi

DES - भाजपप्रणित National Democratic Alliance NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार. आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय. 23 जूनला बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या निमंत्रणावरून काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि PDPसह अनेक विरोधी पक्षांचे नेते पाटण्यात एकत्र आले होते. आणि आता दुसरी बैठक बंगळुरूत पार पडली. पण विरोधकांही ही आघाडी मोदींना आव्हान देऊ शकेल, याविषयी अनेकांच्या मनात शंका आहे. पाहू यात अशा 4 गोष्टी ज्या या आघाडीच्या निर्मितीत अडथळे निर्माण करू शकतात... वार्तांकन – कीर्ति दुबे, बीबीसी हिंदी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
7/19/20235 minutes, 22 seconds
Episode Artwork

नरेंद्र मोदींविरुद्ध कोण? NDA विरोधात INDIA आघाडीत 4 अडथळे | BBC News Marathi

भाजपप्रणित National Democratic Alliance NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार. आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय. वार्तांकन – प्रियंका, बीबीसी हिंदी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
7/18/20238 minutes, 24 seconds
Episode Artwork

वंदे भारत ट्रेनकडे प्रवासी पाठ फिरवतायत? BBC News Marathi

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 75 वंदे भारत ट्रेन्स सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. चकचकीत दिसणाऱ्या या आधुनिक ट्रेन्स भारतात सोशल मीडियावर तर लोकप्रिय झाल्या आहेत. पण प्रत्यक्षात अनेक मार्गांवर या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे. लेखन – चंदन जजवाडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
7/18/20235 minutes, 49 seconds
Episode Artwork

ऑनलाईन फँटसी गेम्सवर 28 टक्के GST, कुणाला फटका बसणार? BBC News Marathi

तुम्ही कधी ऑनलाईन गेम्स खेळले आहेत का? म्हणजे असे ऑनलाईन फँटसी गेम्स, जे Dream 11, MPL, Rummy Circle, A23, PokerBaazi सारख्या ॲप्सवर खेळले जातात. जर हो, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. सरकारने आता यावर 28 टक्के GST लावला आहे. 10 जुलैला GST काउंसिलच्या 50व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा फटका नेमका कुणाला आणि कसा बसेल? समजून घेऊ या वार्तांकन - निखिल इनामदार आणि हिमांशु भयाणी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
7/14/20235 minutes, 29 seconds
Episode Artwork

नासा चारच दिवसांत चंद्रावर, मग चंद्रयान 3ला 40 दिवस का लागणार? BBC News Marathi

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा एका चांद्र मोहिमेसाठी सज्ज आहे. चंद्रयान-3 ही भारताची आजवरची सर्वांत किचकट आणि सर्वांत महत्त्वाची अंतराळ मोहीम मानली जातेय. हे यान अवकाशात उड्डाण केल्यावर चंद्रावर पोहोचायला 40 दिवस लागतील. पण याआधी 1969 साली मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं, तेव्हा नासाच्या अपोलो 11 यानाने चंद्रापर्यंतचा प्रवास अवघ्या 4 दिवसात पूर्ण केला होता. मग चंद्रयानला पृथ्वीच्या उपग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी एवढा वेळ का लागतो आहे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – श्रीकांत बक्षी, बीबीसी तेलुगू लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
7/13/20235 minutes, 21 seconds
Episode Artwork

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला धक्का, आता काय होणार? BBC News Marathi

वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवला, असे आरोप गेल्या वर्षी आपण ऐकले होते. पण आता या महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतली आहे. त्यावरूनही राजकारण सुरू झालंय. काय होता हा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, ज्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं होतं? आणि तो आता रद्द झाल्यानंतरही मोदी सरकार आशावादी का आहे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
7/11/20235 minutes, 17 seconds
Episode Artwork

जीवघेणे क्लस्टर बाँब अमेरिका युक्रेनला का देतेय? BBC News Marathi

क्लस्टर बाँब किंवा क्लस्टर म्युनिशनचा हवेतून जमिनीवर मारा केला जातो. हा बाँब म्हणजे अनेक लहान लहान बाँब्सचा संच असतो. तो जेव्हा टाकला जातो तेव्हा त्यातून असे अनेक लहान लहान बाँब्स जमिनीवर कोसळतात. यातले काहींचा लगेच स्फोट होतो पण काही मात्र तसेच राहतात. जगातील 100 पेक्षा अधिक देशांनी याचा वापर न करण्याचा करार केला आहे. लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
7/11/20233 minutes, 29 seconds
Episode Artwork

थ्रेड्स ॲप ट्विटरशी स्पर्धा करणार की त्याला मागे टाकणार? BBC News Marathi

काही फरक सोडले तर थ्रेड्स ॲप ट्विटरसारखंच आहे हे आपण पाहतोय. थ्रेड्स ट्विटरशी मैत्रीपूर्ण स्पर्धा करेल असंही मेटाच्या टॉप मॅनेजमेंटने म्हटलंय. पण ट्विटरला ही गोष्ट रुचलेली नाही. मेटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचारही ट्विटरच्या मॅनेजमेंटने बोलून दाखवलाय. इलॉन मस्कने म्हटलं की “स्पर्धा ठीक आहे पण फसवणूक नाही.” लेखन - निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
7/10/20233 minutes, 39 seconds
Episode Artwork

इस्रायली सैन्य जेनिनमध्ये का घुसलं? BBC News Marathi

3 जुलै 2023 रोजी शेकडो इस्रायली सैनिक, ड्रोन्स आणि बुलडोझर्सच्या सोबत जेनिनमध्ये घुसले. दोन दिवस ही कारवाई चालली आणि यादरम्यान चकमकी उडाल्या. त्यात 12 पॅलेस्टिनी मारले गेले आणि एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला. पण जेनिनमध्ये भडका का उडाला? हा रेफ्युजी कँप नेमका कुठे आहे आणि तिथल्या घडामोडींचे काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
7/10/20234 minutes, 48 seconds
Episode Artwork

चंद्रयान-3 मोहीम कशी असेल? BBC News Marathi

जुलै महिन्याच्या मध्यावर चंद्रयान-3 अवकाशात झेपावेल असं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोनं जाहीर केलं आहे. चंद्रयान-3 हे भारताच्या चांद्र अभियानातलं तिसरं यान आहे. या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा म्हणजे अलगदपणे यान उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. ही मोहीम कशी असेल आणि ती का महत्त्वाची आहे? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
7/6/20235 minutes, 10 seconds
Episode Artwork

SCO परिषद भारतासाठी का महत्त्वाची? BBC News Marathi

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं अध्यक्षपद यंदा भारताकडे असून दिल्लीत 4 जुलै 2023 रोजी या संघटनेच्या व्हर्च्युअल परिषदेत सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. पण ही संघटना कशी स्थापन झाली आणि ती नेमकं काय काम करते? भारत त्यात का सहभागी झाला आहे? जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
7/6/20235 minutes, 10 seconds
Episode Artwork

एका तरुणाच्या मृत्यूनंतर का पेटलाय फ्रान्स? BBC News Marathi

17 वर्षांचा नाहेल M नावाचा एक तरुण पॅरिसजवळच्या नॉनटेअर उपनगरात गाडी चालवत असताना पोलिसांनी त्याची गाडी अडवली. पोलिसांनी त्याच्यावर बंदूक रोखली, पण त्या तरुणाने गाडी पळवली, त्यामुळे त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ती गाडी पुढे जाऊन धडकली, पण तोवर नाहेलच्या छातीत गोळी घुसली होती. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सध्या पॅरिसभोवतीचा भाग पेटला आहे. एका किशोरवयीन मुलाच्या अशा मृत्यूनंतर लोक रस्त्यांवर उतरून आंदोलनं करू लागले. काय झालं नेमकं, की एका तरुणाच्या मृत्यूवरून फ्रान्स पेटला आहे? पाहा ही सोपी गोष्ट. लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
7/1/20234 minutes, 53 seconds
Episode Artwork

समान नागरी कायदा आला तर हिंदूंचंही नुकसान होऊ शकतं का? BBC News Marathi

Uniform Civil Code अर्थात समान नागरी संहिता देशात लागू करण्यावरून सध्या राजकारण तापलंय. भाजप आणि उजव्या विचाराच्या संघटना आक्रमक झालेल्या दिसतायत तर दुसरीकडे याला विरोध करणारेही जोरात आहेत. UCC आला तर इतर धर्मांचे पर्सनल लॉ हद्दपार होतील हा एक भाग. पण यामुळे हिंदू समाजाचंही नुकसान होऊ शकतं का? यावरून काय राजकारण चाललंय? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – शौतिक बिस्वास, प्रियंका झा लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
7/1/20236 minutes, 22 seconds
Episode Artwork

नवऱ्याच्या संपत्तीत गृहिणींचा समान वाटा असतो का? BBC News Marathi

पत्नीचाही पतीच्या संपत्तीत समान वाटा असू शकतो का? याच एका प्रश्नाचं उत्तर हायकोर्टाच्या ताज्या एका आदेशातून मिळताना दिसतंय. तज्ज्ञांनुसार हा एक मोठा निर्णय आहे, यामुळे पहिल्यांदाच एखाद्या न्यायालयाने पतीच्या कमाईत पत्नीच्या योगदानाला मान्यता दिली आहे, तसंच गृहिणींच्या संपत्तीच्या अधिकाराची व्याप्ती वाढवली आहे. काय आहे हे प्रकरण? आता यामुळे काय बदलणार? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन: उमंग पोद्दार, बीबीसी प्रतिनिधी लेखन-निवेदन: गुलशनकुमार वनकर एडिटिंग: अरविंद पारेकर
6/29/20235 minutes, 13 seconds
Episode Artwork

पुरात स्वतःचा जीव कसा वाचवाल? मृत्यू कसा टाळाल? BBC News Marathi

गेल्या काही वर्षांमध्ये भारताने, महाराष्ट्राने सातत्याने पूर आणि पुरामुळे होणारं नुकसान पाहिलंय. सरकारी आकडेवारीनुसार देशाच्या एकूण 329 दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळापैकी 40 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र पूरप्रवण आहे. आणि दरवर्षी हे क्षेत्र वाढत चाललंय. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)नुसार दरवर्षी सरासरी 75 लाख हेक्टर भागात पूर येतो, त्यात सुमारे 1600 जीव गमावले जातात, आणि पिकं, घरं आणि संपत्तीचं नुकसान सरासरी 1805 कोटी रुपयांच्या घरात जातं. आणि अर्थात अनेक ठिकाणी पुरामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतात. हे पुरामुळे होणारे मृत्यू आपण कसे टाळू शकतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
6/28/20235 minutes, 53 seconds
Episode Artwork

बंड फसलं, आता पुतिन पुढे काय करतील? BBC News Marathi

वागनर ग्रुपचं बंड अवघ्या 24 तासांत मोडलं. पण या घडामोडी म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बसलेला मोठा धक्का आहे, असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. पुतिन यापुढे काय पावलं उचलतील? वागनर ग्रुपचं काय होईल? युक्रेन युद्धावर आणि पर्यायानं जगावर याचा काय परिणाम होईल? जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
6/26/20234 minutes, 37 seconds
Episode Artwork

मान्सून आणि अर्थव्यवस्था यांचं काय कनेक्शन? BBC News Marathi

साधारणपणे 1 जूनला मान्सून येणार, असं सांगितलं जातं. पण यंदा तर जूनचे तीन आठवडे उलटून गेल्यावरही मान्सूनचा काही थांगपत्ता नाही. मान्सून यावा आणि त्याने पुरेसं बरसावं, अशी अपेक्षा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेतल्या सर्वच घटकांना असते. पण का? भारतीय अर्थव्यवस्थेचं आणि मान्सूनचं हे नातं काय आहे? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – मानसी देशपांडे, बीबीसी मराठीसाठी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
6/24/20235 minutes, 44 seconds
Episode Artwork

‘वर्क फ्रॉम होम’ बंद झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे का? BBC News Marathi

लॉकडाऊनमध्ये आपल्यापैकी अनेकांनी पायजामे किंवा बॉक्सर्समध्येच घरून कामं केली, मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स अटेंड केले. पण आता कोरोना मागे पडलाय, ऑफिसेस पूर्णपणे उघडलीयेत आणि म्हणून वर्क फ्रॉम होमचा पर्याय कंपन्या काढून घेतायत. त्यामुळेच की काय अनेक जण, प्रामुख्याने महिला ऑफिसला दररोज जाण्यापेक्षा नोकरी सोडणं पसंत करताना दिसतायत. असं का होतंय? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – सुशील सिंह, बीबीसी प्रतिनिधी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
6/23/20234 minutes, 15 seconds
Episode Artwork

सेन्सॉर बोर्ड कसं काम करतं? आदिपुरुषवर रिलीजनंतर बंदी येऊ शकते? BBC News Marathi

‘आदिपुरुष’ या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत 200 कोटींची कमाई तर केलीय, पण अनेकांनी यातले संवाद आणि पात्रं पाहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केलीय. खरंतर हा विषय फक्त आदिपुरुषपुरता मर्यादित नाहीय; ‘द केरला स्टोरी’, ‘द काश्मीर फाईल्स’, ‘पद्मावत’ पासून ते अगदी ‘आंधी’ आणि ‘बँडिट क्वीन’पर्यंत, आजवर अनेक सिनेमे बॅन झालेत किंवा त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी रिलीजच्या आधी आणि नंतरही झाली आहे. पण ज्या सिनेमाला आधीच सेन्सॉर बोर्डाने क्लिअर केलं आहे, त्यावर आता अशी बंदी येऊ शकते का? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
6/22/20235 minutes, 18 seconds
Episode Artwork

ITR कसा फाईल करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत | BBC News Marathi

दरवर्षी 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं. पण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ते का भरायला हवं आणि त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर
6/22/20236 minutes, 6 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट : पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात 'या' गोष्टींवर चर्चा होणार नाहीच

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
6/21/20235 minutes, 17 seconds
Episode Artwork

तुम्हालाही एका झटक्यात कॅब मिळत नाही?

अगदी ऐनवेळी ड्रायव्हरने कॅब रद्द केल्याने अनेकांना समस्येचा सामना करावा लागलेला असू शकतो. कधीकधी हे ड्रायव्हर तुम्हाला स्वतःहून कॅब रद्द करायलाही भाग पाडतात. पण मुळात कोठेही जाण्यासाठी आपण कॅब बुक केली तर ड्रायव्हर ऐनवेळी ती रद्द करू शकतात का? हे ग्राहक हक्कांचं उल्लंघन आहे का? असं घडलं तर काय ग्राहक म्हणून काय करावं? वार्तांकन - पेडागडी राजेश, बीबीसी तेलुगू लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
6/20/20234 minutes, 52 seconds
Episode Artwork

परदेशात शिक्षणाला जायचंय? मग हे ऐकाच

परदेशात शिकायची इच्छा कुणाची नसते? परदेशी डिग्री, मोठ्या पगाराची नोकरी करायची, आणि जमलंच तर तिथलंच नागरिकत्व असं स्वप्न अनेकांचं असतं. पण ज्या भरवशावर तुम्ही तिथे शिक्षणासाठी गेलात, ती कागदपत्रंच खोटी निघाली तर? अलिकडेच अशी 700 प्रकरणं समोर आली आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून काय करायला हवं? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
6/17/20235 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट

सोपी गोष्ट
6/16/20235 minutes, 15 seconds
Episode Artwork

रक्तदान कुणी करावं? कुणी करू नये? 6 प्रश्न, 6 उत्तरं | BBC News Marathi

जगभरात 14 जून हा दिवस 'जागतिक रक्तदान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. रक्तदान करण्यासाठी काही विशिष्ट बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं (NACO) यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रक्तदानाविषयी 6 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया. लेखन - टीम बीबीसी मराठी निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
6/14/20234 minutes, 47 seconds
Episode Artwork

प्रेमात क्रूर गुन्हे कसे घडतात? अशा गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? BBC News Marathi

मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एका 56 वर्षीय पुरुषाने त्याच्यासोबत राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेची हत्या केली, तिच्या शरीराचे तुकडे केले आणि काही विचित्र प्रक्रिया करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे सर्वांनाच काही महिन्यांपूर्वीच्या श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण झाली. खरंतर अशा प्रकारची ही काही घटना पहिली नव्हती. पण खरंच इतका क्रूर प्रकार कुणी कसं करू शकतं? आणि असं करून ही या गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - सौतिक बिस्वास, बीबीसी प्रतिनिधी निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
6/13/20235 minutes, 44 seconds
Episode Artwork

मुलांना ऑनलाईन सुरक्षित कसं ठेवायचं? त्यांचा खासगीपणा कसा जपायचा? BBC News Marathi

मुलांनी फोन्स - टॅब्स वापरण्याचं प्रमाण आता वाढलंय. कधी गेमिंग, कधी व्हीडिओज - सोशल मीडियाचा टाईमपास किंवा मग ऑनलाईन शाळा - क्लास - अभ्यास यासाठीसुद्धा. मग ती नेमकं काय पाहतायत, ऑनलाईन काय करतायत यावर बारीक लक्ष देणं पालकांसाठी अशक्य. मग तुमच्या मुलांची ऑनलाईन प्रायव्हसी जपण्यासाठी, ऑनलाईन जगातल्या धोक्यांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
6/13/20234 minutes, 38 seconds
Episode Artwork

चक्रीवादळांचा कालावधी वाढतो आहे का? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
6/12/20235 minutes, 12 seconds
Episode Artwork

ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी CBI का करणार आहे? BBC News Marathi

ओडिशाच्या बालासोर रेल्वे अपघाताची चौकशी CBIला सोपवण्यात आलीय. तीच CBI जिला सुप्रीम कोर्टाने ‘पिंजऱ्यात बंद पोपट’ म्हटलं होतं, जिचा गैरवापर सत्ताधारी करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करतात. खरंतर अशा रेल्वे अपघातांचा तपास स्वतः भारतीय रेल्वे करतं. मग ओडिशा अपघाताची चौकशी CBIकडे का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - चंदन कुमार जजवाडे लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
6/8/20235 minutes, 34 seconds
Episode Artwork

चक्रीवादळं कुठून कशी येतात? त्यांची नावं कोण ठेवतं? 5 प्रश्न, 5 उत्तरं | BBC News Marathi

आतापर्यंत मान्सून मुंबई किंवा कोकणातच काय तर केरळमध्येही पोहोचलेला नाही. दुसरीकडे अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ घोंघावतंय. या वादळामुळे मान्सून लांबलाय का? मुळात चक्रीवादळ काय असतं? त्याचं नाव कोण ठेवतं? जाणून घेऊ 5 बेसिक प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्ट मध्ये. संशोधन - टीम बीबीसी मराठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
6/8/20235 minutes, 35 seconds
Episode Artwork

रायगड अजूनही UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत का नाहीय? BBC News Marathi

रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी. इथेच हिंदवी स्वराज्याची स्थापनी झाली, महाराजांचा राज्याभिषेक झाला. खरंतर 800 वर्षं जुन्या या किल्ल्याने त्याच्या आधी आणि त्याच्या नंतरही बरंच काही पाहिलंय. मग असा समृद्ध इतिहास असलेल्या हा किल्ला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान का नाही? या यादीत कुणाला स्थान मिळतं? आणि त्याने खरंच काय बदलतं? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
6/5/20236 minutes, 48 seconds
Episode Artwork

अहमदनगर ते अहिल्यानगर: नामांतर खरंच कसं होतं? BBC News Marathi

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
6/1/20235 minutes, 33 seconds
Episode Artwork

धूम्रपान सोडायची इच्छा असेल तरीही सोडता का येत नाही? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
5/31/20235 minutes, 25 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पॉक्सो कायदा काय आहे? बृ़जभूषण शरण सिंह यांना अटक का नाही?

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
5/30/20236 minutes, 16 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : महाराष्ट्रातले पैलवान गप्प का राहिले?

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
5/30/20235 minutes, 36 seconds
Episode Artwork

महाराष्ट्रातले पैलवान दिल्लीतल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाविषयी गप्प का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

पैलवान विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियानं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनानं भारतीय कुस्तीचं विश्व ढवळून निघालं आहे. त्यातच 28 मे रोजी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करतानाची दृश्यं पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कुस्तीमध्ये हरयाणा विरुद्ध उत्तर प्रदेश असे दोन गट झाल्याचंही चित्र आहे. पण महाराष्ट्रातले बहुतांश पैलवान या सगळ्या प्रकरणावर फार काही बोलताना दिसले नाहीत. यामागची कारणं काय आहेत? जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
5/30/20235 minutes, 36 seconds
Episode Artwork

पाळी काय असते, हे पुरुषांना कसं कळेल? पुरुषांसाठी विशेष BBC News Marathiचा सोपी गोष्ट पॉडकास्ट

मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया आहे हे मुलांना आणि पुरुषांना माहीत आहे का? स्त्रियांच्या आयुष्यातील या गोष्टीकडे पुरुष, मुलं एक रहस्य असल्यासारखं बघतात. आपल्या समाजात मासिक पाळीबाबत समज गैरसमज आहेत. त्यातही आणखीन अशा काही प्रथा आहेत, ज्यामुळे स्त्रियांचा जीव धोक्यात येतो. पण पुरुषांना, मुलांना जर मासिक पाळीविषयी या गोष्टी माहिती असतील तर त्यांचं आयुष्य खूप सोपं होऊ शकतं. पाहा नासिरुद्दीन यांच्या लेखनावर आधारित हा व्हीडिओ. निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
5/30/20235 minutes, 1 second
Episode Artwork

राज्यात सरकारी शाळांमध्ये एकसमान गणवेशाची सक्ती कशासाठी?

येत्या 15 जूनपर्यंत राज्यातील शाळा सुरू होत आहेत. नवीन दप्तर, नवीन वह्या-पाठ्यपुस्तकं आणि नवीन गणवेश खरेदी करत विद्यार्थी आणि पालकांची तयारी सध्या सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने मात्र नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश असेल. परंतु हा निर्णय राज्यातील सरसकट सर्व शाळांसाठी आहे का? ? राज्य सरकारने असा निर्णय घेण्यामागचं कारण काय असावं? आणि यावर टीका का होत आहे? जाणून घेऊयात लेखन – दीपाली जगताप निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
5/25/20235 minutes, 17 seconds
Episode Artwork

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधक बहिष्कार का टाकतायत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नवी दिल्लीतलं नवीन संसद भवन बनून तयार आहे. 28 मे 2023 ला त्याचं उद्घाटन होत आहे. पण हे उद्घाटन करणार कोण – पंतप्रधान की राष्ट्रपती, यावरून आता वाद रंगला आहे. या संसद भवनाचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतंय. सर्व विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे की या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. देशातल्या अनेक विरोधी पक्षांनी एकत्रितपणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय. कसं आहे हे नवीन संसद भवन? ते कसं उभारण्यात आलं? आणि आता त्यावरून वाद का रंगलाय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
5/24/20236 minutes, 41 seconds
Episode Artwork

2000च्या नोटा बदलून घेताना ‘काळा पैसा’ बाहेर निघेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

तुम्ही जिथे-जिथे 2000ची नोट ठेवली आहे, तिथून ती काढून बँकेत जमा करायची वेळ आली आहे. 2016मध्ये जन्माला आलेली ही नोट अवघ्या साडेसहा वर्षातच का कालबाह्य होतेय? या नोटेमुळे खरंच काळा पैसा रोखता आला का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. अधिकचं वार्तांकन – मानसी देशपांडे लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
5/24/20235 minutes, 41 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : केजरीवालांचे अधिकार मोदींना कमी करायचेत?

दिल्लीच्या नोकरशाहीविषयीचे, अधिकाऱ्यांच्या नेमणुकांचे निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीच्या सरकारकडेच असतील असं सर्वोच्च न्यायालायाच्या घटनापीठानं स्पष्ट केलं. पण आठच दिवसांत केंद्र सरकारनं एक अध्यादेश आणला, जो या निर्णयाविरोधात असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. याकडे काहीजण आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षातली चढाओढ म्हणूनही पाहतायत तर काहींना हा भारतीय संघराज्य प्रणालीवरचा हल्ला वाटतो आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
5/23/20236 minutes, 8 seconds
Episode Artwork

कृत्रिम साखर खाऊ नका, WHOने का सांगितलं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

डायबिटीस, मधुमेह, साखर – आपल्या रक्तातली साखरेची पातळ वाढली की आपण साखर, गोडधोड सारंकाही सोडून पर्याय म्हणून काही कृत्रिम साखरेकडे वळतो. आणि आता, फक्त मधुमेह असलेलेच नाही तर आता निरोगी दिसणारी तरुण मंडळीसुद्धा साधं कोल्डड्रिंक नाही तर डायट सोडासारखे पर्याय घेतायत. पण आता यातली कृत्रिम साखरसुद्धा फायद्याची नाही तर नुकसान करणारी ठरू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे. पाहा WHOचा इशारा नेमका काय, आणि त्याचा अर्थ काय? लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
5/20/20235 minutes, 31 seconds
Episode Artwork

प्रसूती रजा किती मिळावी – 3, 6 की 9 महिने? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

आई होण्यासाठी मिळणारी रजा अर्थात मॅटर्निटी लीव्ह किती असावी - 3 महिने, 6 महिने की त्याहून जास्त? अनेकांच्या मनात या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं आणि तर्क असू शकतात. भारतात हा कालावधी 26 आठवडे करण्यात आला असला, तरीही तो सर्व कंपन्यांसाठी सक्तीचा नाही. आणि आता अनेकांना वाटतंय की ही रजा जास्त वेळ असावी. पण कंपन्यांना ते चालणार का? पाहू या आज मॅटर्निटी लीव्हची ही सोपी गोष्ट. लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
5/18/20235 minutes, 23 seconds
Episode Artwork

तुमचा फोन चोरीला गेला तर सरकार असं शोधून देईल BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

तुमचा कधी फोन हरवलाय किंवा कधी चोरीला गेलाय का? मग तो फोन कधीही परत येत नाही. मग आपण आधी रडतो, मग पोलिसात तक्रार करतो, ते सिम कार्ड ब्लॉक करून घेतो आणि पुढे नवीन फोन आणि डुप्लिकेट सिम घेऊन आपल्या कामाला लागतो. पण तुमचे हरवलेले किंवी चोरीला गेलेले फोन परत मिळवता यावेत, यासाठी आता सरकारने एक नवीन पोर्टल आणलं आहे. पण ते कसं काम करेल? त्याने खरंच फायदा होणार का? लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
5/17/20237 minutes, 8 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : समुद्रातल्या उष्णतेच्या लाटांमुळे काय होतं?

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
5/16/20235 minutes, 43 seconds
Episode Artwork

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता व्हिप कुणाचा लागणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनात पहिला सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे गटाला बसलाय. शिंदे गटानं गुवाहाटीतून निवडलेले पक्षाचे व्हिप अर्थात प्रतोद भरत गोगावले यांची निवड सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली. पण हे व्हिप म्हणजे नेमकं काय? आणि त्यावरूनच आता शिंदे सरकारच्या अडचणी वाढू शकतात का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
5/13/20237 minutes, 14 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सरकारच्या मदतीने स्विगी, झोमॅटोपेक्षा स्वस्तात अन्न मिळणार? कुठे आणि कसं मिळणार?

तुम्ही सहसा जेवण ऑर्डर करायला स्विगी किंवा झोमॅटो वापरता, टॅक्सीसाठी ओला किंवा उबर आणि शॉपिंगसाठी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा किंवा आणखी काही... आता कल्पना करा तुम्हाला या सगळ्या ऑनलाईन ॲप्सची तुलना एकाच ॲपवर करता आली तर? आणि जर ते ॲप सरकारी असेल तर?
5/11/20235 minutes, 46 seconds
Episode Artwork

‘द केरला स्टोरी’ किती खरा? किती प्रोपगंडा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

‘द केरला स्टोरी’ या एका सिनेमावरून सध्या देशात वादंग उठलंय. काही राज्यांनी तो टॅक्स फ्री केलाय, तर काही राज्यांनी त्यावर बंदी घातलीय. म्हणजे दोन वेगवेगळ्या टोकाची पावलं टाकायला लावणारा हा सिनेमा आहे तरी काय? तो किती खरा? किती खोटा आहे? आणि त्यावरून राजकारण का होतंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
5/10/20236 minutes, 57 seconds
Episode Artwork

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षा जास्त हुशार का होत चाललीय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

AI म्हणजेच Artificial Intelligence खरंच इतकं प्रगत झालंय का की तज्ज्ञांनाही आता त्यातला फरक करता येत नाहीय? भविष्यात AI मानवापेक्षाही जास्त हुशार होऊ शकतं, अशी भीती खरी ठरतेय का? AIचा धोका अचानक का वाढलाय? AIमुळे समाजाला खरंच किती धोका? पाहा ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
5/9/20234 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : हनी ट्रॅप म्हणजे काय?

DRDO मधली एका शास्त्रज्ञाला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केल्यानंतर हनी ट्रॅप हा शब्द पुन्हा तुमच्या कानावर पडला असेल. या शास्त्रज्ञाकडून माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी व्यक्तीने ‘हनी ट्रॅप’ वापरून हे सगळं केल्याचा ATS ला संशय आहे. पण हनी ट्रॅप म्हणजे काय प्रकार आहे? याआधी अशा कुठल्या घटना घडल्या आहेत?
5/8/20235 minutes, 30 seconds
Episode Artwork

मणिपूरमध्ये आरक्षणासाठीचं आंदोलन कसं चिघळलं? सोपी गोष्ट 849

मणिपूर राज्यात सध्या जाळपोळ, हिंसाचार आणि अशांतता पसरली आहे, कारण तिथल्या मैतेई समुदायाला ST म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये स्थान द्यायचं की नाही, यावरून वाद सुरू आहे. या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - दिलीप कुमार शर्मा, बीबीसी हिंदीसाठी निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
5/5/20234 minutes, 21 seconds
Episode Artwork

व्लादिमीर पुतिन खरंच बॉडी डबल वापरतात का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ड्रोन हल्ल्याने मारण्याचा युक्रेनने प्रयत्न केला, असा आरोप रशियाने केलाय. मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळलाय. पण वर्षभरापासून युद्धात अडकलेल्या दोन देशांमध्ये तणाव आणखी वाढलाय. नेमकं काय घडलंय? रशियन राष्ट्राध्यक्षांवर खरंच असा हल्ला होऊ शकतो का? हे सगळं रशियानेच घडवून आणलं असेल अशी शंका का घेतली जातेय? आणि यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा पुढचा गिअर टाकला जाईल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – शरद बढे
5/4/20235 minutes, 55 seconds
Episode Artwork

Go First विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

मुंबईच्या वाडिया ग्रुपची गो फर्स्ट, जी आधी गो एअर होती, तिने तीन दिवसांसाठी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. गो फर्स्टने 2 मे रोजी घोषणा केली की त्यांच्याकडे इतकाही पैसा उरला नाहीय की ते त्यांच्या नियोजित फ्लाईट्स उडवू शकतील. परिणामी त्यांना 3 आणि 4 मेच्या सर्व फ्लाईट्स रद्द कराव्या लागत आहेत. नेमकं काय झालंय? आणि किंगफिशर, जेट एअरवेजप्रमाणेच गो फर्स्टचा लास्ट होणार का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
5/4/20235 minutes, 11 seconds
Episode Artwork

शहरात लोक जास्त आणि गावांमध्ये पाणी जास्त असं का? BBC News Marathi

25 एप्रिल 2023 रोजी केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाने पहिल्यांदाच वॉटर बॉडीज सेन्ससचा अहवाल सादर केला. देशात जिथे-जिथे पाणी साठवलं जाऊ शकतं, अशा सर्व जागांची गणना आणि सर्वेक्षण या अहवालासाठी करण्यात आलं. 2018-19 दरम्यान झालेल्या या गणनेनुसार, देशभरात एकूण 24 लाख 24 हजार 540 पाण्याचे साठे आहेत. यापैकी सर्वाधिक तळी हे पश्चिम बंगालमध्ये आहेत, सर्वाधिक जलाशयं आंध्र प्रदेशात तर सर्वाधिक जल संधारण योजनांच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो. आता यापैकी कुठल्या राज्याने कशी बाजी मारलीय? हे समजून घ्यायला पाहा ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
5/4/20237 minutes, 28 seconds
Episode Artwork

आफ्रिकेहून आलेल्या चित्त्यांचा भारतात मृत्यू का होतोय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नामिबियाहून 8 चित्ते भारतात आणले गेले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले गेले. अशा एकूण 20 चित्त्यांपैकी आतापर्यंत दोन चित्त्यांचा जीवही गेलाय. असं काय झालं की हे परदेशी पाहुणे भारतात, मध्य प्रदेशातल्या कूनो राष्ट्रीय उद्यानात येऊन दगावले? त्यांच्यासाठी ही जागा पुरेशी नव्हती की त्यांना इथलं हवामान मानवलं नाही? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – नितीन श्रीवास्तव, बीबीसी प्रतिनिधी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
5/1/20235 minutes, 24 seconds
Episode Artwork

अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, भारत, जपान आणि चीन या सगळ्यांचे यान चंद्राच्या दिशेने झेपावलेत. यापैकी अमेरिका आणि चीनला आतापर्यंत चांगलं यश आलेलं दिसलंय. पण भारत, इस्रायल आणि आता जपानच्या पदरी निराशा आली आहे. आपण चंद्रावर लँड केलंय, तिथून माती दगडही पृथ्वीवर परत आणलेत. मग अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे? पाहा ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
5/1/20235 minutes, 28 seconds
Episode Artwork

बृजभूषण शरण सिंह विरोधात FIR दाखल करायला कुस्तीपटूंना सुप्रीम कोर्टात का जावं लागलं? सोपी गोष्ट पॉडकास्ट

ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा झेंडा फडकवणारे स्टार कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट सध्या दिल्लीच्या रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेत. त्यांचं आंदोलन सुरू आहे बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध. बृजभूषण हे उत्तर प्रदेशमधून भाजपचे खासदारही आहेत. आणि WFIचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लैंगिक शोषण केलंय, असा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे. या कुस्तीपटूंचे नेमके आरोप काय आहेत? त्यावरून क्रीडा विश्वातलं राजकारण का तापलंय? आणि अद्याप यात काही कारवाई का नाही झालीय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
4/29/20237 minutes, 26 seconds
Episode Artwork

आधी नाणार, आता बारसू – कोकणातल्या रिफायनरीचा वाद काय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

2015मध्ये पहिल्यांदा कोकणात एका मोठ्या रिफायनरीचा प्रस्ताव आला. ही 'जगातली सर्वांत मोठी रिफायनरी' असेल, अशी घोषणा करण्यात आली. पण या प्रकल्पासाठी जमीन संपादित करायला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा स्थानिकांनी याला विरोध सुरू केला. या प्रकल्पाने पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा कोकणात निसर्गाचा ऱ्हास होईल, मच्छीमारांचं नुकसान होईल, अशी भीती स्थानिकांनी वर्तवली. नंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारने हा प्रकल्प रत्नागिरीमधल्याच बारसूमध्ये होईल, अशी घोषणा केली. आता तिथेही लोक रस्त्यावर उतरलेत. काय आहे हा रिफायनरीचा प्रकल्प? या प्रकल्पाची गरज काय? आणि त्याला एवढा विरोध का होतोय? समजून घेऊ या सर्व बाजू आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
4/27/20235 minutes, 24 seconds
Episode Artwork

सत्यपाल मलिकना CBI नं का बोलावलं?

जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना त्या राज्यातल्या कथित रिलायंस इन्श्यूरन्स घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात. काही दिवसांपूर्वीच द वायर या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमुळे सत्यपाल चर्चेत आले होते. मोदींचे निकटवर्तीय असलेले लोक दोन फाईल्स पास करण्यासाठी लाच देऊ इच्छित होते, असा मलिक यांचा दावा आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? संशोधन – अभिनव गोयल निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
4/25/20235 minutes, 21 seconds
Episode Artwork

ट्विटरच्या ब्लू टिकचा गोंधळ का वाढलाय? कुठलं अकाउंट खरं, कुठलं फेक? सोपी गोष्ट पॉडकास्ट

फुटबॉलपटू रोनाल्‍डो, अभिनेत्री आलिया भट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यात काय एक गोष्ट समान आहे, सांगा? कालपर्यंत या सगळ्यांचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड होते, त्यांच्या नावापुढे ब्लू टिक दिसत होतं, पण आता नाहीय. फक्त यांचंच नव्हे तर अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांचं व्हेरिफिकेशन बॅज 20-21 एप्रिलच्या रात्रीतून ट्विटवरून उडालं आहे. पण मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अकाउंटवर तर ब्लू टिक दिसतंय, आणि पंतप्रधान मोदींच्या खात्यावर तर राखाडी अर्थात ग्रे टिक आहे. असं कसं? ही ट्विटर व्हेरिफिकेशनची भानगड आहे तरी काय? आणि आता ती समजून घेणं आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
4/22/20236 minutes, 3 seconds
Episode Artwork

रमजान ईद आज आहे की उद्या? यावरून एवढा संभ्रम का?

जगभरातले सुमारे 2 अब्ज मुस्लीम लोक रमजानचा पवित्र महिना संपत आला की आकाशाकडे पाहू लागतात... त्यांना प्रतीक्षा असते की चंद्र कधी निघणार. कारण हाच चंद्र ठरवत असतो की रमजान ईद कधी येणार? दरवर्षी हा गोंधळ असतो की हा सण नेमका कधी साजरा करायचा? कुणी म्हणतंय 21 एप्रिलला ईद आहे तर कुणी 22 एप्रिलला साजरं करायचं म्हणताय. हाच गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करू, या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – अहमन ख्वाजा लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
4/21/20233 minutes, 52 seconds
Episode Artwork

रमजान ईद आज आहे की उद्या? तारखेचा संभ्रम का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

जगभरातले सुमारे 2 अब्ज मुस्लीम लोक रमजानचा पवित्र महिना संपत आला की आकाशाकडे पाहू लागतात... त्यांना प्रतीक्षा असते की चंद्र कधी निघणार. कारण हाच चंद्र ठरवत असतो की रमजान ईद कधी येणार? दरवर्षी हा गोंधळ असतो की हा सण नेमका कधी साजरा करायचा? कुणी म्हणतंय 21 एप्रिलला ईद आहे तर कुणी 22 एप्रिलला साजरं करायचं म्हणताय. हाच गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करू, या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – अहमन ख्वाजा लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
4/21/20233 minutes, 52 seconds
Episode Artwork

सुदानमध्ये संघर्ष का होतो आहे? 5 प्रश्न, 5 उत्तरं

सुदानमध्ये सध्या देशाचं लष्कर आणि निमलष्करी दल एकमेकांसमोर उभे ठाकलेत. सुदान ईशान्य आफ्रिकेतला एक मोठा देश. इथल्या साडेचार कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येत मुस्लीम बहुसंख्य आहेत. पण सुदान जगातल्या सर्वांत गरीब देशांपैकी एक आहे. राजधानी खार्तूममध्ये 15 एप्रिलपासून सुदानी लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष पेटलाय. या संघर्षात जोरदार गोळीबार, हवाई हल्ले होतायत, अनेक निष्पाप बळी जातायत. फक्त सुदानीच नाही इतर देशांचेही लोक तिथे अडकलेत.
4/20/20236 minutes, 57 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासारखा उष्माघात कसा टाळावा?

पुन्हा उन्हाळा आलाय, पुन्हा पारा चढलाय आणि पुन्हा उष्णतेमुळे लोक हैराण झालेत. अशा उन्हात आपली लाही लाही होऊ नये, यासाठी काय करायला हवं?
4/18/20235 minutes, 53 seconds
Episode Artwork

अर्शद अतीक अहमद याच्या एन्काउंटरसारखी प्रकरणं उत्तर प्रदेशात का घडतात? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

माजी खासदार आणि उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता अतीक अहमदला भीती होती की उत्तर प्रदेशात नेल्यावर त्याचा एन्काउंटर केला जाईल, पण 13 एप्रिलला त्याचा नव्हे तर त्याच्या मुलाचा झांशीजवळ एन्काउंटर झाला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी यानंतर पोलिसांची पाठ थोपटली आहे, तर विरोधकांनी याला खोटा एन्काउंटर म्हटलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण? एखादा एन्काउंटर खरा की खोटा, हे कसं ठरतं? आणि मुळात पोलिसांना कुणाला ठार करण्याचा अधिकार कायदा देतो का? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
4/18/20235 minutes, 51 seconds
Episode Artwork

भारतात समलिंगी विवाहाला मान्यता मिळेल? सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतात समलिंगी व्यक्तींच्या लग्नाला कायदेशीर मान्यता द्यायची की नाही, याविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 18 एप्रिलपासून सुरू होते आहे. लोकांच्या हितासाठी ही सुनावणी लाईव्ह स्ट्रीमही केली जाणार आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. या सुनावणीतून काय अपेक्षित आहे? जगभरात समलिंगी विवाहाविषयी कायदा काय सांगतो, जाणून घेऊयात. संशोधन – गीता पांडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
4/17/20236 minutes, 36 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कोव्हिड पुन्हा फोफावतोय का?

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
4/13/20235 minutes, 20 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अमूल विरुद्ध नंदिनी वाद काय आहे?

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
4/12/20235 minutes, 13 seconds
Episode Artwork

GI टॅग काय असतं? आंबा, सोलापुरी चादरीचं ठिकाण निश्चित कसं होतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नुकताच बनारसी पान आणि उत्तर प्रदेशात पिकणाऱ्या लंगडा आंब्यासह आणखी काही वस्तूंना GI टॅग मिळाला. पण हा टॅग आहे काय? तो देतं कोण? आणि त्यामुळे कुणाला कसा फायदा होतो? पाहा या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
4/11/20234 minutes, 46 seconds
Episode Artwork

वाघांना वाचवण्यासाठी भारतात प्रोजेक्ट टायगर कसं सुरू झालं?

एकेकाळी भारतात नेमके किती वाघ होते, याची ठोस आकडवारी सांगता येणार नाही. पण एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात त्यांची संख्या वेगानं रोडावू लागली. यामागचं मुख्य कारण होतं शिकार आणि त्यासाठी बंदुका आणि धातुच्या सापळ्यांचा वापर. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर
4/10/20236 minutes, 23 seconds
Episode Artwork

तुमची गाडी खरंच किती सुरक्षित? हे कोण आणि कसं ठरवतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नुकतंच फोक्सवागन आणि श्कोडा कंपन्यांच्या या गाड्यांना नुकतंच सेफ्टीच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग मिळालं. तर मारुती सुझुकीच्या या गाड्यांना एक आणि दोन स्टार रेटिंग. पण मुळात कोणती गाडी किती सुरक्षित हे ठरतं कसं? पण हे रेटिंग देतं कोण? भारतीय गाड्या किती सुरक्षित आहेत? पाहा या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
4/7/20235 minutes, 4 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अल अक्सा मशिद महत्त्वाची का आहे?

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
4/6/20234 minutes, 53 seconds
Episode Artwork

कच्चं तेल महागल्याने भारतातही पेट्रोल डिझेल महागेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

ओपेक प्लस राष्ट्रगटानं कच्च्या तेलाचं उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा अचानक वाढल्या आहेत. हा ओपेक प्लस गट काय आहे? त्यांनी अचानक तेलाचं उत्पादन कमी का केलं आहे? आणि या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
4/6/20236 minutes, 3 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होतील का?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कायदेशीर पुन्हा चर्चेत आहेत. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रंप यांची चौकशी सुरू आहे. पण या सगळ्याचा ट्रंप यांना तोटा होईल की फायदा? ट्रंप यांना तुरुंगात जावं लागेल का आणि शिक्षा झाली, तर ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का? जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
4/4/20235 minutes, 3 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : वेदोक्त – पुराणोक्त प्रकरण काय आहे?

वेदोक्त आणि पुराणोक्त हे शब्द पुन्हा चर्चेत आले आहेत. अनेकांना लोकांना कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या बाबतीत घडलेले वेदोक्त प्रकरण याचा संदर्भ ऐकून माहिती असेल. सव्वाशे वर्षांपूर्वी वेदोक्ताच्या मुद्द्यावरून दीर्घकाळ चर्चा, मंथन, टीका, आरोप-प्रत्यारोप यांमुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं होतं. पण हे प्रकरण नेमकं काय होतं? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
4/3/20235 minutes, 54 seconds
Episode Artwork

नवीन आर्थिक वर्षांत खर्च आणि गुंतवणुकीचं गणित असं बसवा

पगार येतो, पण पुरतंच नाही असं तुमचं होतं का? प्रयत्न करूनही व्यवस्थित गुंतवणूक होत नाही, त्यावर मनासारखा परतावा मिळत नाही? जवळपास सगळ्याच सर्वसामान्य लोकांचं असं होत असतं. कितीही ठरवलं तरी आर्थिक गणित जमत नसेल तर हा आजची सोपी गोष्ट खास तुमच्यासाठीच आहे. पाहुया की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला येत्या आर्थिक वर्षात तुमच्याकडच्या पैशांचं अधिक चांगलं नियोजन करता येईल. संशोधन – आयव्हीबी कार्तिकेय लेखन – अनघा पाठक निवेदन – सिद्धनाथ गानू एडिट – अरविंद पारेकर
3/31/20234 minutes, 2 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : नरेंद्र मोदी आणि नेतन्याहूंची तुलना का होते आहे?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन नेत्यांची तुलना सध्या सोशल मीडियावर होते आहे. कारण आहे, इस्रायलमध्ये सुरू असलेलं आंदोलन. नेमकं इस्रायलमध्ये काय सुरू आहे आणि भारताशी त्याची तुलना का केली जाते आहे. संशोधन - सर्वप्रिया सांगवान, जान्हवी मुळे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे
3/29/20236 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : टोरनॅडो म्हणजे काय?

25 मार्चला पंजाबच्या फझिल्कामध्ये आणि अमेरिकेच्या मिसीसीपी राज्यालाही टोरनॅडो वादळांचा मोठा तडाखा बसला आणि त्यात किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पण टोरनॅडो म्हणजे नेमकं काय असतं? हे वादळ कशामुळे येतं? आणि भारताला, विशेषतः महाराष्ट्राला त्यापासून किती धोका आहे, जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे
3/27/20235 minutes, 10 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : हवामान विभागाकडून अतिवृष्टी, दुष्काळ याचे अंदाज कसे लावले जातात?

गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस आता आपल्यासाठी 'अवकाळी' राहिला नाहीये. खरंतर ऋतूंच टाइमटेबलच बदललेलं दिसतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं नियमित चक्र पाहायला मिळत नाही... या बदलाची कारणं काही असो, पण अवकाळी पाऊस येऊ दे की उष्णतेची लाट...हवामान विभागावर खापर फुटतंच...कार्टून्स, मीम्स, व्हॉट्स फॉरवर्ड...हवामान विभागाची खिल्ली उडवायचा चान्स लोक सोडत नाहीत. पण किती जणांना हवामान विभाग काम कसं करतो, ते माहितीये. या विभागाची स्थापना कधी आणि कशी झाली? हवामानाचे अंदाज ते लावतात कसे? याबद्दलच जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – विशाखा निकम एडिटिंग – अरविंद पारेकर
3/27/20233 minutes, 58 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : जगातला सर्वात आनंदी देश कसा शोधतात?

दरवर्षी 20 मार्चला वर्ल्ड हॅपिनेस डे म्हणजे जागतिक आनंद दिन साजरा केला जातो. त्यानिमित्तानं संयुक्त राष्ट्रांतर्फे वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स तयार केला जातो. दरवर्षी त्यावरून चर्चा आणि वादही होतात. हा कसला निर्देशांक आहे? तो कसा तयार करतात आणि त्यात भारत कुठल्या स्थानावर आहे? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
3/22/20236 minutes, 14 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कोव्हिड, फ्लू, अ‍ॅडिनोव्हायरसमध्ये काय फरक आहे?

गेल्या काही आठवड्यांत भारतात आणि महाराष्ट्रातही इन्फ्लुएंझा म्हणजे फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होते आहे. यात H3N2 या फ्लूच्या विषाणूसोबतच H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. त्यातच राज्यात आणि विशेषत: मुंबईत कोव्हिडची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढतेय. याशिवाय देशात काही ठिकाणी विशेषतः लहान मुलांमध्ये अ‍ॅडिनो विषाणूचाही प्रादुर्भाव जाणवतोय. पण हा अ‍ॅडिनोव्हायरस काय आहे? त्याची लक्षणं कोरोना विषाणू आणि इन्फ्लुएन्झापेक्षा किती वेगळी आहेत? तिन्ही व्हायरसपासून संरक्षणासाठी काय करावं? जाणून घेऊया.
3/21/20236 minutes, 9 seconds
Episode Artwork

अमृतपाल सिंग कोण आहे? खलिस्तान चळवळीशी काय संबंध? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमृतपाल सिंग आणि खलिस्तानी चळवळीचं समर्थन करणारी वारिस पंजाब दे ही त्याची संघटना सध्या चर्चेत आहेत. अमृतपालच्या अटकेच्या हालचाली सुरू झाल्यापासून त्याचे पडसाद पंजाबच्या आणि देशाच्या राजकारणात आणि अगदी लंडनमध्येही उमटलेले पाहायला मिळाले. पण हा अमृतपाल सिंग कोण आहे? वारिस पंजाब दे ही संघटना चर्चेत का आहे? संशोधन – अरविंद छाबरा, झोया मतीन लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
3/20/20236 minutes, 11 seconds
Episode Artwork

महाराष्ट्रात आमदारांना पगार, भत्ता, पेन्शन किती मिळतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

महाराष्ट्रातले सुमारे 18 लाख शासकीय कर्मचारी पेन्शनसाठी संपावर गेलेत, आणि अशात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय – आमदारांना किती पेन्शन मिळतं? याच प्रश्नाचं उत्तर आणि हे पेन्शनचं गणित समजून घेणार आहोत, आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – दिपाली जगताप निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
3/17/20234 minutes, 57 seconds
Episode Artwork

इम्रान खान यांच्यावर काय आरोप आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान चर्चेत आहेत. (यांना पोलिसांनी अटक केली आहे). 14 मार्चला लाहोर पोलीस इम्रान खान यांना जमान पार्क येथील निवासस्थानी अटक करण्यासाठी गेले, तेव्हा खान यांच्या समर्थकांनी निदर्शनं केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तेव्हापासून जगाचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलं. पण इम्रान खान यांना पोलीस अटक करायला का आले? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेलं तोशाखाना प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
3/16/20235 minutes, 35 seconds
Episode Artwork

सिलिकॅान व्हॅली बॅंक का बुडली? त्याचा भारतावर काय परिणाम? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

स्टार्ट-अप्समध्ये लोकप्रिय असलेली सिलिकॉन व्हॅली बँक अर्थात SVB 10 मार्च 2023 रोजी बुडली आणि त्याचा फटका भारतातल्या स्टार्ट-अप्सनाही बसला. असं का घडलं?सिलिकॉन व्हॅली बँक महत्त्वाची का होती? या घटनेचे भारतीय कंपन्यांवर काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊयात. संशोधन - विनीत खरे लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
3/15/20235 minutes, 52 seconds
Episode Artwork

ऑस्कर पुरस्कार कोण देतं? कसे दिले जातात? भारतात आजवर कुणाला मिळालेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

जगातले सर्वांत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ऑस्कर पुरस्कार नेमके कोण देतं? तिथे कोणते आणि कसे सिनेमे पाठवले जातात? भारतात आजवर कुणा-कुणाला ऑस्कर पुरस्कार मिळालेत? आणि 'स्लमगडॉग करोडपती'साठी ए आर रहमानला दोन पुरस्कार कसे मिळाले होते? समजून घेऊ या, या सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
3/14/20238 minutes, 21 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इस्राएलमध्ये लोक एवढे का चिडले आहेत?

इस्राएलमध्ये लाखो लोक सरकारविरोधात शनिवारी रस्त्यावर उतरले. गेले दहा आठवडे तिथे निदर्शनं सुरू आहेत आणि या विरोधाचं कारण आहे, पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मांडलेला न्यायव्यवस्थेतल्या बदलांचा प्रस्ताव. नेमके हे बदल काय आहेत? त्याला विरोध का होतो आहे आणि या घडामोडींवर जगानं का लक्ष ठेवायला हवं, जाणून घेऊयात लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
3/13/20234 minutes, 28 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : गर्भसंस्कारांचा फायदा होतो का?

RSS ची महिला संघटना राष्ट्र सेविका समितीशी निगडित असलेल्या संवर्धिनी न्यास या संस्थेने गरोदर महिलांसाठी गर्भ संस्कार अभियानाची सुरुवात केली आहे. मात्र गर्भावस्थेतले मूल खरंच शब्द किंवा भाषा शिकू शकतो का गर्भावस्थेत मूल काही आवाजांना प्रतीक्रिया देतं, पण त्या ध्वनीचा अर्थ बाळांना कळतो का? ? विज्ञानात याबाबत मतमतांतरं आहेत. संशोधन – सुशीला सिंग लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – निलेश भोसले
3/9/20235 minutes
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतात एवढ्या महिला घराबाहेर का पडत नाहीत?

बाबा रोज घराबाहेर पडतात. आई दिवसभर बहुदा घरातच राहते आणि क्वचितच, आठवड्यातून एकदा वगैरे बाहेर जाते असं चित्र भारतात अनेक घरांमध्ये दिसतं. काही मोजक्या शहरांचा, प्रदेशांचा अपवाद सोडला तर भारतीय शहरांमध्ये महिलांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे, असं एका नव्या अभ्यासातून पुन्हा समोर आलं आहे. नेमकी यामागची कारणं काय आहेत आणि ही परिस्थिती बदलणं का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – सौतिक बिस्वास लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे
3/8/20235 minutes, 46 seconds
Episode Artwork

जांभळा रंग महिला दिनाचं प्रतीक कसा बनला ? BBC News Marathi

दरवर्षी 8 मार्चला जगभरात महिला दिन साजरा केला जातो. या दिवसामागे महिला हक्कांसाठी लढ्याची एक शतकाहून अधिक जुनी परंपरा आहे. तसंच महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये, सेलिब्रेशन किंवा आंदोलनामध्ये जांभळ्या रंगाचा वापर केला जातो. यामागची कारणं काय आहेत? पुरुष दिवसही कधी साजरा केला जातो का? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
3/7/20234 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : धुळवडीचे रंग साफ कसे करायचे?

होळी, धुळवड आणि रंगपंचमीला रंग खेळताना जरा सावधच राहा असा इशारा डॉक्टर्स देतात. पण म्हणजे नेमकी काय काळजी घ्यायची, याविषयी आम्ही त्वचारोगतज्ज्ञांना विचारलं. रंग साफ कसे करायचे, कुठल्या परिस्थित डॉक्टरांची मदत घ्यायची, जाणून घ्या. संशोधन – बुशरा शेख लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
3/6/20236 minutes, 33 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सभागृहाचा हक्कभंग म्हणजे काय?

विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्यावरून विधानसभेत खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यावर नेमकं पुढे काय होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण यानिमित्तानं विधिमंडळाचे विशेषाधिकार आणि हक्कभंग पुन्हा चर्चेत आले आहेत. हक्कभंग म्हणजे नेमकं काय असतं, त्याची प्रक्रिया काय आहे आणि संजय राऊतांवर काय कारवाई होऊ शकते, जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
3/2/20235 minutes, 40 seconds
Episode Artwork

EPS अंतर्गत EPFOची वाढीव पेन्शन कशी मिळवायची? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

तुम्ही किंवा तुमचे आईबाबा, किंवा आणखी कुणीही नोकरी करत असेल, तर एक प्रश्न नेहमी चर्चेत असतो – 60नंतर काय? पेन्शन आहे का? आपल्यापैकी काही जणांना पेन्शन मिळतही असेल किंवा काही जण पेन्शनसाठी झगडत असतील. पण आता सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशामुळे काही आजी-माजी कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा मार्ग मोकळा झाला आहे. ही EPS, EPF, EPFO ची भानगड आहे तरी काय? लाखो आजी-माजी कर्मचाऱ्यांचं पेन्शन वाढण्यासाठी 3 मार्च ही तारीख का महत्त्वाची आहे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. वार्तांकन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
2/28/20236 minutes, 46 seconds
Episode Artwork

फेब्रुवारीतच महाराष्ट्रात एवढा उकाडा का वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रासह उत्तर भारतातही उष्णता चांगलीच जाणवू लागली आहे. त्यातच पॅसिफिक महासागरात एल निनोची स्थिती निर्माण होईल असं भाकितही अमेरिकेतील हवामानतज्ज्ञांनी केलंय. याचा भारतातल्या हवामानावर काही परिणाम होईल का? जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
2/28/20235 minutes
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमच्या मुलाला शाळेत कधी घालायचं?

इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचं किमान वय सहा वर्ष हे निश्चित करण्यात आलं असून, ते काटेकोरपणे पाळलं जावं असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा एकदा दिलेत. आता हे वय सहा वर्ष असं कोणी निश्चित केले?शाळेत जाण्याचे योग्य वय काय आहे, जाणून घेऊयात लेखन – जान्हवी मुळे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
2/23/20234 minutes, 34 seconds
Episode Artwork

बीबीसीची सुरुवात कशी झाली? बीबीसीला पैसा कुठून येतो? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, हे नाव तुम्ही, तुमच्या आईवडिलांनी आणि तुमच्या आजीआजोबांनीसुद्धा ऐकलंय, पाहिलंय आणि वाचलंयसुद्धा. पण ही संस्था नेमकी काय आहे? ती कशी काम करते? तिला पैसा नेमका कुठून येतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
2/21/20235 minutes, 30 seconds
Episode Artwork

470 नवीन विमानांमुळे कसा बदलणार एअर इंडियाचा प्रवास? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

एअर इंडिया 470 नवीन विमानं खरेदी करतेय. कशी असतील ही विमानं आणि यामुळे भारताच्या हवाई प्रवासाला टेकऑफ करता येईल का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
2/18/20235 minutes, 33 seconds
Episode Artwork

टर्की-सीरिया भूकंपांनंतर बचावपथक कसं काम करतंय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

तुर्की आणि सीरियात आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे हजारो लोकांचा जीव गेला. 6 फेब्रुवारीला इथे भूकंपाचे धक्के जाणवले होते पण दहा दिवसांनीही बचाव कार्य संपलेलं नाही. अनेक ठिकाणी ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे. भारताच्या NDRFच्या टीमनंमही इथे ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत कार्याला हातभार लावला आहे. पण अशा आपत्तीनंतर ही बचाव पथक नेमकं कसं काम करतात? संशोधन – टीम बीबीसी लेखन - जान्हवी मुळे निवेदन – विशाखा निकम एडिटिंग – अरविंद पारेकर
2/17/20234 minutes, 57 seconds
Episode Artwork

तुर्कीतल्या भूकंपातून भारतानं काय शिकावं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपानंतर भारतात आणि महाराष्ट्रात अशी आपत्ती ओढवण्याची शक्यता किती आहे, याविषयी चर्चा होते आहे. महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना अशा भूकंपाचा खरंच किती धोका आहे? इथे मोठा भूकंप कधी झाला होता? बांधकामं करताना आणि अशा इमारतीत राहताना काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
2/15/20235 minutes, 58 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुर्कीत भूकंपानं इतकं नुकसान का झालं?

तुर्की आणि जपान या दोन्ही देशांना भूकंपाचा मोठा धोका असतो. पण एकीकडे जपानमध्ये गेल्या वर्षी आलेल्या भूकंपात तीनच जणांचा जीव गेला. तर दुसरीकडे, तुर्की आणि सीरियात यंदा आलेल्या भूकंपात मृतांचा आकडा ३३ हजारांवर गेलाय. हे एवढं नुकसान कशानं झालं? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
2/13/20235 minutes, 27 seconds
Episode Artwork

अमेरिका चीन तणाव एका फुग्यावरून कसा वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला, आणि त्यांना वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय. त्यांनी नंतर तो शूट करून पाडून टाकला. पण एक प्रश्न पडतो – सॅटलाईटच्या काळात कुणी असा फुगा का वापरेल? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
2/11/20235 minutes, 20 seconds
Episode Artwork

उपग्रह असताना फुगा का? भारताला चिनी फुग्याचा किती धोका? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला. त्यांना वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय, आणि नंतर त्यांनी तो लक्ष्य करून पाडून टाकला. पण एक प्रश्न पडतो – सॅटलाईटच्या काळात कुणी असा फुगा का वापरेल? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - निवेदन : गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
2/11/20235 minutes, 20 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : मोदींची बोहरा समाजाशी जवळीक का आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीच्या मुंबई दौऱ्यादरम्यान बोहरा मुस्लिम समुदायाच्या एका कार्यक्रमात सहभागी होतील. अंधेरी पूर्व मधल्या मरोळ इथे 'अरेबिक अकादमी'च्या उद्घाटनप्रसंगी मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या या कार्यक्रमाचा संबंध मुंबईसह राज्यात नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांशी आहे का अशी चर्चा सुरू आहे. पण खरंच असं आहे का? दाऊदी बोहरा मुस्लीम कोण आहेत आणि त्यांचं मुंबईतलं स्थान महत्त्वाचं का आहे? संशोधन – मयुरेश कोण्णूर निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
2/9/20235 minutes, 25 seconds
Episode Artwork

शॉर्ट सेलिंग म्हणजे काय? अदानी-हिंडनबर्ग प्रकरणातल्या संज्ञा समजून घ्या | BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अदानी समूहाविषयी हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून शॉर्ट सेलिंग, शेल कंपनी, टॅक्स हेवन, एफपीओ असे वेगवेगळे शब्द तुमच्या कानावर पडले असतील. पण हे शॉर्ट सेलिंग काय असतं आणि ते का केलं जातं? अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाच्या निमित्ताने अशाच वेगवेगळ्या संज्ञांचा अर्थ जाणून घेऊयात. संशोधन – मानसी कपूर निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
2/8/20235 minutes, 15 seconds
Episode Artwork

शक्तिशाली भूकंप का येतात? भूकंप आला तर काय करायचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

24 तासांत सलग दोन शक्तीशाली भूकंपांमुळे तुर्की हादरून गेलंय. 5000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. पण असे शक्तिशाली भूकंप कशामुळे येतात? भारतात त्यापासून किती धोका आहे आणि भूकंप आला, तर काय करायचं, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर
2/7/20235 minutes, 1 second
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : AB फॉर्म म्हणजे काय?

कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, फाडला, चुकीच्या फॉर्ममुळे उमेदवारी रद्द झाली अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. पण हा एबी फॉर्म काय असतो आणि तो का महत्त्वाचा आहे? जाणून घेऊयात. लेखन – हर्षल आकुडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/india-64528474
2/6/20234 minutes, 36 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शाळा प्रवेशासाठी आता 'या' कागदपत्राची सक्ती, काय आहेत नवे नियम?

येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थी दोघांना आधार कार्डची सक्ती आहे. बीडमध्ये एका शिक्षण संस्थेनं बोगस विद्यार्थी दाखवूत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला. त्यामुळे असे प्रकार थांबवण्यासाठी सरकार पावलं उचलतंय. प्रत्येक शाळेत 'व्यवस्थापन समिती' असते हीच समिती आता 'प्रवेश देखरेख समिती' म्हणून काम पाहणारे. काय आहेत शाळा प्रवेशासाठीचे नवीन नियम? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - दीपाली जगताप निवेदन – विशाखा निकम एडिटिंग – अरविंद पारेकर
2/2/20234 minutes, 4 seconds
Episode Artwork

इन्कम टॅक्स भरण्यासाठी तुम्हाला कोणती करप्रणाली सोयीची ठरेल? BBC News Marathi

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला. कररचनेत त्यांनी काही मोठे बदल जाहीर केले आहेत. नवी की जुनी - कोणती करप्रणाली तुम्हाला सोयीची ठरेल? तुम्हाला आता नेमका किती कर भरायचा आहे हे कसं मोजाल? दोन्ही करप्रणालींचे तरुणांवर, पेन्शनर वर्गावर वेगवेगळे परिणाम होणार आहेत का? सविस्तर जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून. लेखन, निवेदन – अमृता दुर्वे एडिटिंग – अरविंद पारेकर
2/1/20234 minutes, 32 seconds
Episode Artwork

यंदाचं बजेट सरकारसाठी तारेवरची कसरत ठरेल का?

केंद्रीय अर्थमंत्री 2024 सालच्या निवडणुकांआधीचा आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सध्याच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीत सरकार काही लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता नाही असं तज्ज्ञांना वाटतं. पण कोव्हिडनंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटकांना सरकारची मदत करावी लागणार हेही नक्की आहे. सीतारमण यांच्यासमोर नेमकी काय आव्हानं आहेत आणि यंदाचं बजेट ही तारेवरची कसरत का ठरू शकते, जाणून घेऊयात लेखन – निखिल इनामदार निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
1/31/20234 minutes, 55 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते बनतील का?

भारत जोडो यात्रेला राजकारणाशी जोडून पाहिलं जाऊ नये, असं स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेसने आवर्जून सांगितलं. पण तरीही राहुल गांधींना त्यांच्या राजकीय वाटचालीत या यात्रेचा फायदा होईल असं काहींना वाटतं. पण खरंच भारत जोडो यात्रा राहुल गांधींना विरोधी पक्षाचे नेते म्हणून ओळख मिळवून देईल का? अधिक जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून. लेखन – इकबाल अहमद निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
1/30/20235 minutes, 32 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमचे अँड्रॉइड स्मार्टफोन्स आता असे बदलणार

आज भारतातले जवळजवळ 97 टक्के स्मार्टफोन्स हे गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात. त्यामुळे या फोन्समध्ये बाय-डिफॉल्ट गुगलच्याच काही गोष्टी टाकून येतात. त्यामुळेच आता गुगल इंडियाला भारतात तब्बल 13 अब्जांची चपराक बसली आहे. काय आहे हे प्रकरण? यामुळे तुमचे-आमचे अँड्रॉइड फोन्स कसे बदलणार? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
1/27/20235 minutes, 43 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : जुन्या पेन्शन योजनेचा वाद काय आहे?

जुन्या पेन्शन योजनेविषयी आम्ही नकारात्मक नाही, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं आणि पेन्शनवरून चर्चेला पुन्हा उधाण आलं. पण जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम किंवा ओपीएस म्हणजे काय आहे? ती पुन्हा लागू करावी अशी मागणी का होते आहे आणि या योजनेला विरोध का होतो आहे? जाणून घ्या. लेखन – जान्हवी मुळे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
1/26/20234 minutes, 45 seconds
Episode Artwork

प्रजासत्ताक दिनाविषयी तुमच्या 6 प्रश्नांची उत्तरं BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

6 जानेवारीला भारताच्या प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी नवी दिल्लीत होणारं संचलन तुम्ही प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर नक्कीच पाहिलं असेल. शाळेत असताना आपापल्या गावात, शहरात होणाऱ्या संचलनातही तुम्ही सहभागी झाले असाल. दर वर्षी हा सोहळा रंगतो. पण अजूनही प्रजासत्ताक दिनाबाबत आणि त्या संदर्भातील इतर अनेक गोष्टींची माहिती अनेकांना नसते. तर अशा काही प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमधून निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
1/25/20235 minutes, 9 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : ग्रीन कॉमेट कसा पाहता येईल?

ग्रीन कॉमेट नावानं ओळखला जाणारा धूमकेतू जगभरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण तब्बल 50 हजार वर्षांनी तो पृथ्वीच्या जवळ आला आहे. म्हणजे याआधी हा धूमकेतू आला होता, तेव्हा इथे पृथ्वीवर निअँडरथल्स या आदिमानवाचा वावर होता आणि या धूमकेतूची एक फेरी पूर्ण होईपर्यंत आधुनिक मानवाची अख्खी प्रजाती विकसित झाली. हा धूमकेतू कसा, कुठे, कधी पाहता येईल आणि धूमकेतूंचा अभ्यास महत्त्वाचा का असतो? जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
1/24/20234 minutes, 43 seconds
Episode Artwork

क्रीडा क्षेत्रातील लैंगिक छळ : कायद्यात नेमक्या काय तरतुदी आहेत? : सोपी गोष्ट पॉडकास्ट

क्रीडा क्षेत्रात महिला खेळाडूंचा लैंगिक छळ होत असतो अशा चर्चा नेहमीच कानावर येत येतात. पण याबद्दल भारतीय कायद्यात नेमक्या काय तरतुदी आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपीगोष्टमध्ये.
1/23/20234 minutes, 31 seconds
Episode Artwork

मोदी सरकार फेक न्यूजला आळा घालणार की माध्यम स्वातंत्र्याला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

आता सरकार एक असा नियम आणू पाहतंय, ज्यामुळे एखादी गोष्ट, बातमी किंवा सोशल मीडिया पोस्ट खरी आहे की खोटी हे ठरवण्याचे अधिकार सरकारलाच असतील. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2021च्या नियमांमध्ये प्रस्तावित दुरुस्तीच्या दस्तावेजात म्हणण्यात आलंय की कुठल्याही सोशल मीडियावर आणि ऑनलाईन पोर्टर्ल्सवर अशा मजकुराला स्थान देण्यात येऊ नये, ज्या मजकुरास माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या Press Information Bureauच्या फॅक्ट चेक युनिटने फेक किंवा खोटं म्हटलेलं आहे. यामुळे माध्यम स्वातंत्र्यावरच गदा येईल, अशी भीती का व्यक्त केली जातेय? खरंच यामुळे फेक न्यूजचा प्रश्न सुटेल की आणखी किचकट होईल? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
1/21/20234 minutes, 52 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आता परदेशात राहूनही UPI पेमेंट्स करता येतील?

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
1/17/20233 minutes, 20 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक आर्थिक परिषद म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडच्या दावोस इथे गेले आहेत. फक्त शिंदेच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस बोम्माई यांच्यासह देशातले मोठे उद्योगपतीही या परिषदेला जाणार आहेत. पण दावोसमध्ये जाऊन हे लोक नेमकं काय करतात? ही परिषद काय आहे? त्यातून कुणाचा फायदा होतो आणि त्यावर टीका का होते आहे? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
1/16/20234 minutes, 37 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवसेनेत पक्षप्रमुख कसा निवडला जातो?

उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून मुदत येत्या 23 जानेवारीला संपत आहे. यासाठी पक्षांतर्गत प्रक्रिया पार पाडण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. 10 जानेवारीला पार पडलेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाने लाखो कागदपत्रं पुरावे म्हणून सादर केली आहेत. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेत बेकायदेशीर बदल करण्यात आल्याचा दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद घटनाबाह्य पद्धतीने तयार केलं असा शिंदे गटाचा आरोप आहे.
1/12/20236 minutes, 22 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : वातावरणातलं हे भगदाड माणूस कसं बंद करतोय?

पृथ्वीभोवतीचं ओझोनचं आवरण वाचवण्याच्या माणसाच्या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणेच यश आलं आहे.पुढच्या काही दशकांतच या आवरणाला पडलेलं भगदाड भरून निघेल असं संयुक्त राष्ट्रांनी एका ताज्या अहवालातून जाहीर केलं आहे. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
1/11/20234 minutes, 24 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : परदेशी विद्यापीठांची भारतीय केंद्रं

सरकार परदेशी विद्यापीठांना भारतात त्यांची केंद्रं उघडण्यासाठी आमंत्रण देण्याच्या विचारात आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अर्थात यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगानं त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा 5 जानेवारीला जाहीर केला.पण यामुळे खरंच विद्यार्थ्यांचा फायदा होईल का? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
1/10/20235 minutes, 19 seconds
Episode Artwork

ब्राझीलच्या राजधानीत हिंसाचार का उसळला? सोपी गोष्ट पॉडकास्ट BBC News Marathi

8 जानेवालीला ब्राझीलच्या राजधानीत संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांचे हजारो समर्थक चालून गेले. काहींनी संसदेत तोडफोड केली तर काहींनी अध्यक्षांच्या खुर्चीवर चढून नव्या राष्ट्राध्यक्षांचा विरोध केला. ब्राझीलमध्ये हे सगळं का घडतंय? या वादाचं मूळ कुठेय? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मधून. निवेदन - विशाखा निकम एडिटिंग - अरविंद पारेकर
1/9/20234 minutes, 46 seconds
Episode Artwork

ग्रीन हायड्रोजन मिशन काय आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

मोदी सरकारने ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा केलीय. त्यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. पण काय आहे हे मिशन? हायड्रोजनपासून ऊर्जा मिळवणं शक्य आहे का? आणि जर हो, तर आपण आजवर या तंत्रज्ञानाचा वापर का नाही केलाय? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
1/7/20234 minutes, 49 seconds
Episode Artwork

भारतात सर्वाधिक रस्ते अपघात कशामुळे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतात 2021 मध्ये तब्बल 4 लाख 12 हजार 432 रस्ते अपघात झाले. यात 1 लाख 53 हजार 972 जणांचा मृत्यू झाला तर 3 लाख 84 हजार 448 जण जखमी झाले. 18 ते 45 वयोगटातील लोक रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू किंवा जखमी होतात. सर्वाधिक रस्ते अपघात तामिळनाडूमध्ये झाल्याची नोंद आहे, त्या मागोमाग उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सातव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. संशोधन – दीपाली जगताप आणि रोहन नामजोशी निवेदन - दीपाली जगताप एडिटिंग- अरविंद पारेकर
1/6/20235 minutes, 29 seconds
Episode Artwork

मानवी मृतदेहापासून खताची निर्मिती शक्य आहे का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमेरिकेत पारंपरिक अंत्यविधीला पर्याय म्हणून ह्युमन कंपोस्टिंग ही पद्धत नावारुपाला येत आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा वॉशिंग्टन राज्याने यासाठी मान्यता दिली होती. आतापर्यंत अमेरिकेच्या सहा राज्यांनी ह्युमन कंपोस्टिंगसाठी परवानगी दिली आहे. यामुळे मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीला आपल्या शवाचं रुपांतर मातीमध्ये किंवा खतामध्ये करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो. ‘ह्युमन कंपोस्टिंग’मध्ये नैसर्गिक आणि सुरक्षित प्रक्रिया वापरून मृतदेहाचं रुपांतर मातीमध्ये करता येऊ शकतं असा दावा आहे. या प्रक्रियेला नॅचरल ऑरगॅनिक रिडक्शन असंही म्हटलं जातं. निवेदन - दीपाली जगताप एडिटिंग- अरविंद पारेकर
1/4/20234 minutes, 24 seconds
Episode Artwork

देशभरात जैन समाजाचे लोक का निदर्शनं करत आहेत? सोपी गोष्ट पॉडकास्ट

महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि झारखंडसह देशभरात सध्या जैन धर्मीयांचं आंदोलन सुरू आहे. नुकतंच कोल्हापूर आणि मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. जैन धर्मीयांसाठी पवित्र स्थळ असलेल्या झारखंडमधील ‘श्री सम्मेद शिखर’ धर्मस्थळाला पर्यटनस्थळ करण्याच्या प्रस्तावाला जैन समुदायाचा विरोध आहे. झारखंड राज्यात गिरीडीह जिल्ह्यात पारसनाथ पर्वतावर जैन धर्मीयांचं पवित्र स्थळ आहे. जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकरांचं याच ठिकाणी निर्वाण झालं तं अशी धारणा आहे. जैन धर्मातील दिगंबर आणि श्वेतांबर अशा दोन्ही पंथांची या धर्मस्थळी आस्था आहे. या धर्मस्थळाला जैन समुदायाचे लोक ‘श्री सम्मेद शिखर’ असं म्हणतात. निवेदन - दीपाली जगताप एडिटिंग- अरविंद पारेकर
1/3/20235 minutes, 22 seconds
Episode Artwork

भारतातही आता आर्थिक मंदी येईल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

2023 या वर्षात जगातल्या एक तृतियांश देशांमध्ये Recession म्हणजे आर्थिक मंदी येईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफनं दिला आहे. यामागची कारणं काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा भारतावर काय परिणाम होईल? भारतातही नजीकच्या काळात आर्थिक मंदी येईल का, जाणून घेऊयात. संशोधन – अर्चना शुक्ला, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
1/2/20234 minutes, 49 seconds
Episode Artwork

कोरोनाची नाकावाटे दिली जाणारी लस कुठे, कितीला, कशी मिळेल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अखेर कोरोनावरची नाकावाटे दिली जाणारी लस अर्थात nasal vaccine आली आहे. भारत बायोटेक म्हणजेतीच कंपनी जी कोव्हॅक्सिन लस देत होती, त्याच कंपनीने ही लस भारतात आता आणली आहे. पण ही लस नेमकी काय आहे? ती कुठे? कशी आणि कितीला मिळेल? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
12/31/20224 minutes, 15 seconds
Episode Artwork

नेपाळमधल्या सत्तांतराचा चीनला फायदा होईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

विवारी (25 डिसेंबर 2022) नेपाळच्या राजधानीत अगदी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पुष्प कमल दाहाल उर्फ प्रचंड यांनी तिसऱ्यांदा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. प्रचंड हे नेपाळमधल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत आणि त्यांची चीनसोबतची जवळीक चर्चेत असते. ते पंतप्रधान झाल्याचा भारत-नेपाळ संबंधांवर आणि चीनसोबतच्या समीकरणांवर काय परिणाम होऊ शकतो? हे जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
12/30/20225 minutes, 25 seconds
Episode Artwork

BF.7 या नवीन कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन लागेल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

चीनमध्ये कोव्हिडचे रुग्ण वाढत आहेत, तशी भारतातही भारतातही भीती वाढली आहे. पण यावेळी आपण कोव्हिडची किती भीती बाळगली पाहिजे? लस, मास्क, गोळ्या, ऑक्सिजन, प्रवास.... याबद्दल तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं बीबीसीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेतली. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
12/29/20225 minutes, 2 seconds
Episode Artwork

बेळगाव केंद्रशासित करता येईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजतो आहे. त्यावर तोडगा निघेपर्यंत एक पर्याय म्हणून बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा, असं उद्धव ठाकरे यांनी सुचवलं. पण खरंच बेळगाव केंद्रशासित करता येईल का? एखादा नवा केंद्रशासित प्रदेश तयार करण्याविषयी कायदा काय सांगतो? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
12/29/20224 minutes, 41 seconds
Episode Artwork

चंदा कोचर यांवर आरोप असलेला ICICI बँक - व्हीडिओकॉन घोटाळा काय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयनं शुक्रवारी (23 डिसेंबर 2022) अटक केली. तर व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांनाही अटक करण्यात आली आहे. व्हिडीओकॉन समूहाला 3250 करोड रुपये कर्ज देताना अनियमितता राखल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
12/28/20225 minutes, 27 seconds
Episode Artwork

BF.7 ओमिक्रॉन व्हेरिअंटपासून आपण घेतलेल्या लशी संरक्षण देतात का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

कोरोनाचे रुग्ण चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत वाढल्यानंतर भारतातही एका नवीन व्हेरिअंटचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावलं टाकायला सुरुवात केलीय, प्रशासन सतर्क झालंय आणि पुन्हा मास्कची सक्ती होणार की काय, म्हणून तुमचीआमची काळजी वाढलीय. पण अशात एक गोष्ट सगळेच विचारतायत, की मी काही महिन्यांपूर्वी ती कोव्हिडची लस घेतली होती, आणि तो बूस्टर डोसही घेतला होता. त्याचं काय? या नवीन कोरोना व्हेरिअंटपासून मी सध्या किती सुरक्षित आहे? याच प्रश्नाचं उत्तर मिळवू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
12/24/20224 minutes, 54 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट : ओमिक्रॉन BF.7 व्हेरियंट किती घातक आहे? त्याची लक्षणं काय आहेत?

हे वर्षं संपता संपता कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट आलेला आहे. चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे रुग्ण भारतात आढळल्याची माहिती समोर आली आहे. BF.7 व्हेरियंटचे भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे. हा नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षण का आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.
12/22/20224 minutes, 55 seconds
Episode Artwork

औषधं घेऊन थांबवता म्हातारपण लांबवता येतं का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अनुवंशशास्त्रज्ञ डेव्हिड सिनक्लेअर गेली 20 वर्षं वृद्धत्व याविषयावर संशोधन करत आहेत. त्यांच्यामते काही अगदी सोप्या सवयींद्वारे वृद्धत्व लांबवून आपण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. तरुण दिसण्याच्या उद्योगाची आजची उलाढाल 110 अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि 2025 पर्यंत 600 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा एक अंदाज आहे. म्हातारपण अपरिहार्य नाही असा संशोधकांचा दावा आहे. सिनक्लेअर यांचं म्हणणं आहे की म्हातारपण अपरिहार्य नाहीये. ते नैसर्गिक नसून एक आजार आहे, त्यातून बरं होता येईल असा विचार करायला हवा. लेखन – अनघा पाठक निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
12/21/20225 minutes, 10 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सर्व धर्मांच्या मुलींची लग्न एकाच वयात व्हावी अशी मागणी का होतेय?

दिल्ली हायकोर्टात एक केस आली होती. एका अल्पवयीन मुस्लीम मुलीने आपल्या पतीसोबत राहण्याचं स्वातंत्र्य आणि त्यासाठी सुरक्षा मागितली होती. यावर निकाल देताना कोर्टाने त्या मुलीचं लग्न वैध ठरवलं होतं. राष्ट्रीय महिला आयोगाने आता याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आणि सगळ्या धर्मांच्या महिलांसाठी लग्नाचं वय समान असावं अशी याचिका दाखल केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आधीच मुलींचं लग्नाचं वय 18 वरून 21 करण्यासाठी लोकसभेत विधेयक घेऊन आल्या आहेत. पण त्या विधेयकावर सध्या स्थायी समिती विचारमंथन करतेय.
12/20/20224 minutes, 25 seconds
Episode Artwork

कोटामधले विद्यार्थी आत्महत्या का करतात? त्यांचे मृत्यू रोखायचे कसे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

कोटा शहर – देशभरातल्या IITमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्यांसाठीची पंढरी. याच कोटातून आता तीन विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याची बातमी येतेय. ही बातमी धक्कादायक आहेच, पण ही काही पहिली वेळ नाहीय, जेव्हा कोटा या बातमीमुळे चर्चेत आलंय. काय आहे कोटाचं कोचिंग विश्व? आणि इथे विद्यार्थी आत्महत्या का करतात? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - मोहर सिंग मीणा, बीबीसी हिंदीसाठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
12/20/20225 minutes, 15 seconds
Episode Artwork

'लोकायुक्त विधेयक आणणार, भ्रष्टाचाराला आळा बसवणार,' शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा : सोपी गोष्ट पॉडकास्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
12/19/20225 minutes, 21 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आंतरधर्मीय विवाहांवर सरकार लक्ष ठेवणार?

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
12/16/20225 minutes, 7 seconds
Episode Artwork

‘कृत्रिम सूर्य’ तयार करण्याचा हा प्रयोग - न्युक्लिअर फ्युजन काय आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

ऊर्जेचा एका नवा स्रोत म्हणजे न्यूक्लियर फ्युजन विकसित करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करतायत. सूर्य आणि बाकीच्या ताऱ्यांनाही प्रकाशित करणारं हे न्यूक्लियर फ्युजन म्हणजे नेमकं काय आहे? गेली शंभर वर्ष शास्त्रज्ञ त्यावर काम का करत आहेत? उर्जेचा हा स्रोत माणसाचं जगणं कसं बदलू शकतो आणि त्यात भारत काय योगदान देतो आहे? जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.
12/15/20225 minutes, 13 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : म्हैसाळ सिंचन योजना काय आहे?

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सीमावादाला पाणी प्रश्नाचीही किनार आहे. सांगलीत गेली कित्येक वर्ष पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या 42 गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी दावा केला आणि हा वाद पुन्हा उफाळून आला. त्यानंतर या गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेचं टेंडर काढायचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलं आहे. पण ही योजना नेमकी काय आहे? अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/articles/cjq7pgnxw41o संशोधन – सरफराज सनदी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
12/13/20224 minutes, 36 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : निर्भया फंडचा योग्य वापर होतो आहे का?

निर्भया फंड सध्या पुन्हा चर्चेत आहे. या निधीतून आणलेल्या गाड्या महिलांच्या नाही, तर VIP नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी वापरत असल्याचा आरोप होतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटातले आमदार आणि खासदारांसाठी या गाड्या वापरत असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून ही चर्चा सुरू झाली. सरकारनं याविषयी अजून कोणतं स्पष्टीकरण जाहीर केलेलं नाही. पण निर्भया फंडच्या वापरावर यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
12/12/20225 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला अक्षय कुमार पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. अक्षय कुमार महाराजांसारखा अजिबात दिसत नाही, अशी टीका होते आहे. पण मग शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे, असा प्रश्नही पुन्हा विचारला जातो आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
12/7/20225 minutes, 56 seconds
Episode Artwork

सोपीगोष्ट पॉडकास्ट : चॅटजीपीटी नव्या जगाचा मंत्र होणार का?

गेल्या आठवडाभरापासून चॅटजीपीटी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. सांगकाम्या बाळूप्रमाणे तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या उत्तरांसह भाषांतर, कथा अगदी साहित्य रचणारा चॅटबॉट आता आपल्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. माणसाचा हा मित्र भविष्यात माणसालाच रिप्लेस करणार का? निवेदन- गुलशनकुमार वनकर लेखन-पराग फाटक व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर
12/6/20225 minutes, 13 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : मोबाईल फोनमधील पेमेंट ॲप्स सुरक्षित ठेवण्याचे सोपे मार्ग माहितीये?

UPI Apps वापरुन आपण पैशांची देवाणघेवाण करत असतो. बहुतेक यूपीआय व्यवहार हे गुगल पे, पेटीएम आणि फोनपेसारख्या थर्ड-पार्टी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने, या माध्यमांमधून होणारे व्यवहार 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, यासाठी काही नियम लागू करण्यात येत आहेत. यासाठी RBI ने काय निकष घालून दिलेत? आपली ही ॲप्स सुरक्षित कशी ठेवायची? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये.
12/5/20225 minutes
Episode Artwork

2023 मध्ये भारतात आर्थिक मंदी येणार का? नोकऱ्या जाणार का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

GDPचे ताजे आकडे आलेत, ज्यात एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत 13.5 टक्क्यांवरून आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत थेट 6.3 टक्क्यांवर आला आहे. खरंतर अर्थव्यवस्थेचे आकडे अनेकांच्या डोक्यावरून जातात. कळतच नाही की यामुळे महागाई कमी होणार की आणखी वाढणार? नोकऱ्या राहणार की जाणार? देश नेमका प्रगती करतोय की पुढे आर्थिक मंदी येणार? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. विश्लेषण – आलोक जोशी, ज्येष्ठ पत्रकार लेखन, सादरीकरण – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
12/2/20226 minutes, 6 seconds
Episode Artwork

एड्सची लागण झालीच तर काय? HIVवरच्या 10 प्रश्नांची उत्तरं | BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

1 डिसेंबर म्हणजे जागतिक एड्स दिन. दरवर्षी लाखो लोकांना HIVची लागण होऊन एड्स हा आजार झाल्याचं कळतं. आणि उपचार उपलब्ध नसल्यामुळे आजवर जगभरात 4 कोटींपेक्षा जास्त लोकांचा बळीही या रोगाने घेतलाय. पण एड्स होतो कसा? तो टाळावा कसा? आणि HIVची लागण झालीच तर काय करावं? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं, या सोपी गोष्टमध्ये. संशोधन - टीम बीबीसी मराठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - शरद बढे
12/1/20225 minutes, 24 seconds
Episode Artwork

धारावीची झोपडपट्टी अदानी कशी बदलणार? BBC News Marathi सोपी गोष्ट 739

धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, असं म्हणतात. या धारावीचा पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पासाठीचा लिलाव नुकताच अदानी समुहाने जिंकला. 60 हजारहून अधिक झोपड्या आणि 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या धारावीचा पुनर्विकास कसा होणार? निवेदन - दीपाली जगताप एडिटिंग- अरविंद पारेकर
11/30/20225 minutes, 34 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आरक्षणाचा फायदा नेमका कोणाला?

EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. 2019 मध्ये केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आर्थिक निकषांवर खुल्या प्रवर्गातील घटकांना 10 टक्के आरक्षण जाहीर केलं. हे 10 टक्के आरक्षण नेमकं कोणासाठी आहे? या आरक्षणासाठी पात्रतेचे निकष काय आहेत? आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? EWS अंतर्गत सरकारने शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे.
11/29/20225 minutes, 2 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : चीनमध्ये कोव्हिड लॉकडाऊन विरोधात हजारो लोक रस्त्यावर

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीला लोकांचा तीव्र विरोध आहे. चीनच्या उरुमकी शहरात 2 दिवसांपूर्वी एका इमारतीला आग लागली. त्यात 10 जणांचा मृत्यू झाला. शी यांच्या कडक लॉकडाऊनच्या धोरणांमुळे इथं मदत पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच 10 लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या घटनेवरून जे आंदोलन सुरू झालं त्याचं लोण आता देशभरात पसरताना दिसतंय
11/28/20224 minutes, 38 seconds
Episode Artwork

पॉलिग्राफ टेस्ट काय असते? आफताब पूनावालाच्या टेस्टमधून काय निघणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

श्रद्धा वालकरचा खून आफताब पूनावालाने कसा केला, त्याने कुठली हत्यारं वापरली, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याचे अनेक तपशील बाहेर येत आहेत. पण अजूनही कोर्टात मांडण्यासाठी ठोस पुरावे कमी पडतायत. त्यामुळेच पोलिसांनी आफताबच्या नार्को आणि पॉलिग्राफ टेस्ट्सची मागणी कोर्टाकडे केली होती. पॉलिग्राफ टेस्ट नेमकी काय असते? ती का आणि कशी केली जाते? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
11/25/20224 minutes, 50 seconds
Episode Artwork

गोवरची जगभरात साथ येणार? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

कोरोनाचं आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा WHOने दिला आहे. गोवर, ज्याला measles ही म्हटलं जातं, हा एक वेगाने पसरणारा आजार आहे, आणि तो पूर्ण लसीकरणानेच टाळता येतो. जर याची साथ आलीच, तर तुम्ही आम्ही काय करायला हवं, जाणून घेऊ या 10 प्रश्नोत्तरांमधून आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
11/24/20225 minutes, 6 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कर्नाटकने महाराष्ट्राच्या 40 गावांवर दावा का केलाय?

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद गेली अनेक दशकं सुरू आहे. तो सोडवण्यासाठी शिंदे सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या एका विधानाने या वादाला नव्याने तोंड फुटलंय. कर्नाटक सरकार महाराष्ट्राची, सांगलीतली जवळपास 42 गावं ताब्यात घ्यायचा विचार करतंय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय.
11/23/20224 minutes, 47 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : राज्यपालांना पदावरून हटवता येतं का?

कुलपती या नात्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 19 नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना D. Lit पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या भाषणात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर त्यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केलीय. परंतु राज्यपाल हे घटनात्मक पद असताना त्यांना हटवणं शक्य असतं का? कोणत्याही राज्याचं सरकार राज्यपालांना हटवू शकतं का? राज्यपालांना हटवण्याचे अधिकार नेमके कोणाकडे आहेत आणि त्यासाठीची प्रक्रिया काय?
11/22/20225 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : COP27 करारानं नेमकं काय साधलं?

इजिप्तमध्ये COP27 या हवामान परिषदेच्या अखेरीस एका ऐतिहासिक करारावर 197 देशांनी स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत हवामान बदलाचे परिणाम भोगणाऱ्या विकसनशील देशांसाठी आंतरराष्ट्रीय निधी उभारला जाणार आहे आणि श्रीमंत आणि विकसित देश त्यासाठी पैसा पुरवतील. भारत आणि पाकिस्ताननं या निधीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
11/21/20224 minutes, 37 seconds
Episode Artwork

लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा काय आहे?

श्रध्दा वालकर या वसईच्या 28 वर्षीय तरुणीची आफताब या तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या केली. श्रध्दा आणि आफताब यांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघं दिल्लीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. या घटनेमुळे लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. खरंच लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे काय असतं? कायद्यात याबद्दल नेमकं काय म्हटलंय? आणि अशा जोडप्यांना भारतात कायदा काय संरक्षण देतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये...
11/18/20224 minutes
Episode Artwork

नार्को टेस्ट म्हणजे काय? श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पूनावालाची ही चाचणी किती महत्त्वाची? सोपी गोष्ट पॉडकास्ट

वसईच्या श्रद्धा वालकरचा खून आफताब पूनावालाने कसा केला, याचे वेगवेगळे आणि धक्कादायक तपशील रोज समोर येत आहेत. पण त्याने आतापर्यंत दिलेले जबाब आणि त्याच्याकडून मिळेले दस्तावेज, जसं की ऑनलाईन व्यव्हार, सोशल मीडिया चॅट्स, यांमधून काही विसंगत माहिती पोलीसांसमोर आली. त्यामुळे पोलिसांनी आफताबची नार्को टेस्ट करण्याची मागणी कोर्टाकडे केली होती, जी कोर्टाने मंजूरही केली आहे. पण ही नार्को टेस्ट नेमकी काय असते? ती कशी आणि कशासाठी केली जाते? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
11/17/20223 minutes, 37 seconds
Episode Artwork

गोवर म्हणजे काय? मुंबईत गोवरचे रुग्ण का वाढत आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

मुंबईमध्ये गोवरच्या रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत गोवरमुळे 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या मुंबईत गोवरचे निश्चित निदान झालेले 142 रुग्ण आहेत, शिवाय 1079 रुग्णांना ताप - पुरळ अशी लक्षणं आहेत, आणि ते गोवरचे संशयित म्हणून धरले जातायत. मुंबईत गोवरच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्रीय आरोग्य पथकही दाखल झालंय. गोवर हा आजार नेमका काय आहे? गोवर रुग्णांची संख्या अचानक वाढतेय? त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.... लेखन, संशोधन - टीम बीबीसी मराठी निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
11/16/20223 minutes, 29 seconds
Episode Artwork

ट्विटर, मेटा आणि ॲमेझॉनवर नोकर कपातीची वेळ का आली आहे? BBC News Marathi

बदलतं बिझनेस मॉडेल आणि अनिश्चित अर्थव्यवस्थेने संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगात मोठी घसरण झाली आहे. इलॉन मस्कने कंपनी विकत घेतल्यानंतर काही दिवसांतच ट्विटरमधल्या 50% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. नोहेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात मेटा या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मालक कंपनीने 11,000 कर्मचार्‍यांना काढून टाकत असल्याची घोषणा केली. म्हणजे एकूण कर्मचाऱ्यांपैकी 13 टक्के. जर अ‍ॅमेझॉनने10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तर एकूण कर्मचारी संख्येपैकी 3 % लोकांना ते घरी पाठवतील. लेखन - प्राजक्ता पोळ निवेदन - गुलशनकुमार वानकर एडिटिंग - अरविंद पारेकर
11/15/20223 minutes, 26 seconds
Episode Artwork

डायबेटीस बरा होऊ शकतो का? तो रोखण्यासाठी काय करायचं? BBC News Marathi

काही वेलनेस सेंटर आणि ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्स कडून अशी जाहिरात केली जाते की त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांमधून मधुमेह पूर्णपणे बरा होतो. पण मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का? जागतिक मधुमेह दिनानिमित्त याबाबत सविस्तर पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये... लेखन - पद्मा मीनाक्षी, प्राजक्ता पोळ निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
11/15/20223 minutes, 23 seconds
Episode Artwork

G20 परिषदेच्या चिन्हातलं कमळ भारताचं की भाजपचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

G20 राष्ट्रगटाचं अध्यक्षपद आता भारताकडे आलंय. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 अध्यक्षपदाच्या नव्या लोगोचं 8 नोव्हेंबरला अनावरण केलं आणि एका वादाला तोंड फुटलं. या लोगोतल्या कमळावर विरोधी पक्षांनी टीका केलीय. नेमके काय आक्षेप आहेत? सरकारची या लोगोमागची भूमिका काय आहे? आणि मुळात G20चं अध्यक्षपद म्हणजे नेमकं काय असतं? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर
11/12/20224 minutes, 1 second
Episode Artwork

शिवचरित्रावरील चित्रपट हे कलाकारांचं स्वातंत्र्य की इतिहासाचा विपर्यास? BBC News Marathi

मराठीत सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत सिनेमांची लाटच आली आहे. पण या सिनेमांतून खरंच इतिहास मांडला जातो आहे का? की या सिनेमांच्या माध्यमातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचा किंवा राजकीय अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो? लेखन – अमृता कदम निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
11/10/20225 minutes, 39 seconds
Episode Artwork

डोनाल्ड ट्रंप या निवडणुकीनंतर पुन्हा कमबॅक करतील का? | BBC News Marathi

आठ नोव्हेंबरला अमेरिकेत तिथल्या संसदेसाठी निवडणुका होतायत. या मिडटर्म इलेक्शन म्हणजे मध्यावधी निवडणुकांकडे जगाचंही लक्ष लागलं आहे. मिडटर्म इलेक्शन इतकं महत्त्वाचं का आहे? या निवडणुकीच्या निकालाचा अमेरिकेच्या राजकारणावर आणि पर्यायानं जगावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
11/8/20225 minutes, 38 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बलात्कार पीडितेची केली जाणारी '2 फिंगर टेस्ट' काय असते?

बलात्कार पीडितेवर करण्यात येणाऱ्या '2 फिंगर टेस्ट'वर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली आहे. महिलेवर बलात्कार झालाय का नाही? हे तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात येते.
11/4/20224 minutes, 44 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कुंकू-टिकलीचा महिलांच्या कर्तृत्वाशी संबंध आहे का?

महिला पत्रकारानं टिकली लावली नाही म्हणून तिच्याशी बोलायला शिवप्रतिष्ठान संघटनेच्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी नकार दिला. 2 नोव्हेंबर 2022 रोजी मंत्रालयात हा प्रकार घडला, त्यानंतर राज्याच्या महिला आयोगानं भिडे यांना नोटीस पाठवली आहे. सोशल मीडियावरही तीच्या निधनानंतर महिलांचं कर्तृत्त्व संपतं का? याविषयी चर्चा सुरू आहे. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
11/3/20225 minutes, 5 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : डिजिटल रुपी म्हणजे काय?

रिझर्व्ह बँकेने डिजिटल रूपी हे नवं चलन लागू केलं आहे. आता आपल्या खिशातला रुपया डिजिटल कसा झालाय? तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शनपेक्षा वेगळा कसा असेल? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
11/2/20225 minutes, 3 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : ब्राझिलमधल्या सत्तापालटाचा भारताला फायदा होईल?

ब्राझीलमध्ये उजव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना हरवून डाव्या विचारसरणीचे माजी राष्ट्राध्यक्ष लुला ड सिल्वा पुन्हा सत्तेत आले आहेत. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीच्या निकालाकडे पर्यावरणाचा विजय म्हणूनही पाहिलं जातंय. लुला पुन्हा सत्तेत येण्याचा भारत-ब्राझील संबंधांवर काय परिणाम होईल? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
11/1/20225 minutes, 20 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : गर्दीत अपघात टाळण्यासाठी काळजी घ्यायला हवी?

मांढरदेवी यात्रा आणि मुंबईच्या एलफिन्स्टन ब्रिजवरील दुर्घटनाही तुम्हाला आठवत असतील. अशा दुर्घटनांसाठी कोण जबाबदार किंवा त्या कशा टाळता येतील यावरही अनेकदा चर्चा होते. पण गर्दीत अडकल्यावर काय काळजी घ्यायला हवी?
10/31/20225 minutes, 21 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलॉन मस्कनी ट्विटरच्या सीईओला का काढलं?

जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसानं जगातल्या सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी एकाची खरेदी केली आहे. इलॉन मस्क आता ट्विटरचे मालक बनले आहेत, त्यांनी कंपनीचा ताबा घेताच सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी झाल्याचं वृत्त आहे. मस्क यांनी असं का केलं?
10/28/20224 minutes, 12 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतीयांचं आरोग्य हवामान बदलामुळे धोक्यात?

भारतात उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 55 टक्के वाढ झाल्याचं लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे.नेमकं हा अहवाल काय सांगतो आणि हवामान बदलाचा माणसाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आहे? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
10/27/20224 minutes, 49 seconds
Episode Artwork

दिवाळीच्या फराळाचे हे पदार्थ कुठून आले? BBC News Marathi | सोपी गोष्ट पॉडकास्ट

लाडू, चकली, शेव, करंजी, शंकरपाळे, अनारसे... ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना? अशा फराळाशिवाय दिवाळीचा सण अपुरा वाटतो. दिवाळीत प्रत्येक भारतीय घरात फराळ केला जातो, प्रांतागणिक त्यात वैविद्ध आढळतं, पण पण तुम्हाला माहीतेय यातले काही पदार्थ परदेशातून आपल्याकडे आलेत आणि आता अगदी आपलेच झालेत! आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेणार आहोत, हीच दिवाळीच्या फराळाची गोष्ट. संशोधन - रश्मी वारंग निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
10/27/20225 minutes, 9 seconds
Episode Artwork

दिवाळीचे फटाके कुठून आले? BBC News Marathi | सोपी गोष्ट पॉडकास्ट

दिवाळी किंवा दीपावली – म्हणजे दिव्यांची रास. मग दिव्यांसोबतच फटाके या उत्सवाचा भाग कधी झाले? भारतात फटाके आले तरी कुठून? ते मुघलांनी आणले होते का? पाहा ही सोपी गोष्ट. संशोधन - राजीव लोचन, इतिहासकार, पंजाब विद्यापीठ निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
10/27/20225 minutes
Episode Artwork

दिवाळीत सूर्यग्रहण, 'या' समजुती किती खऱ्या, किती खोट्या?

ग्रहणकाळात काय करायचं, काय नाही करायचं याचे सल्ले देणारे अनेक व्हीडिओ यूट्यूबवरही दिसून येतात. पण ग्रहण म्हणजे नक्की काय, त्याच्या समजुती खरंच योग्य आहेत का, ऐका सोपीगोष्टमध्ये.
10/24/20224 minutes, 9 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बीटीएस हा के-पॉप बँड लोकप्रिय का आहे?

बीटीएस हा जगप्रसिद्ध दक्षिण कोरियन बँड लवकरच सक्तीच्या सैन्यसेवेसाठी दाखल होणार आहे. हा बँड इतका लोकप्रिय का आहे आणि त्यांना सैन्यात सेवा का करावी लागते आहे, जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
10/19/20224 minutes, 34 seconds
Episode Artwork

शी जिनपिंग चीनमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

चीनमध्ये शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत. चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होईल. पण जिनपिंग पुन्हा सत्तेत आले, तर त्याचा भारतावर कसा परिणाम होईल? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/international-63285315
10/18/20225 minutes, 29 seconds
Episode Artwork

भारत खरंच भुकेला आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

सलग दुसऱ्या वर्षी भारताची जागतिक भूक निर्देशांकात घसरण झाली आहे. एकीकडे सरकार हा निर्देशांक म्हणजे देशाची प्रतीमा मलिन करण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप करत आहे, तर दुसरीकडे कुपोषण ही देशातली मोठी समस्या असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
10/17/20225 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिक्षकांनी मुलांना मारहाण केली तर..

नोएडामध्ये घडलेल्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत. पण त्यामुळे शिक्षकांच्या शिक्षेच्या पद्धती चर्चेत आल्या आहेत. संशोधन – सुशीला सिंह निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
10/13/20224 minutes, 43 seconds
Episode Artwork

बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा काय आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

दिल्लीमध्ये एका धर्मांतराच्या कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यातल्या आपण हिंदू देवीदेवतांची पूजा करणार नाही, अशा आशयाच्या प्रतिज्ञेवरून भाजप आणि आम आम आदमी पक्षामध्ये राजकारण सुरू झालं. आपच्या मंत्र्याला राजीनामाही द्यायला लागला. नेमकं काय झालंय? आणि मुळात आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा काय सांगतात? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/india-63217207
10/11/20225 minutes, 32 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवसेनेचा निवडणूक चिन्हांचा इतिहास

शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरीतल्या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह दिसणार नाही. शिवसेनेनं दुसऱ्या एखाद्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरम्यान पक्षातल्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाकडे मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली आहे तर शिंदे गटानं त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या चिन्हांची मागणी केली आहे. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
10/10/20225 minutes, 23 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : महात्म गांधींना नोबेल पुरस्कार का मिळाला नाही?

विज्ञानाच्या जगात नोबेल मिळणं म्हणजे तुमच्या कामगिरीवर, यशावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं मानलं जातं. पण हे पुरस्कार सुरू करणारे आल्फ्रेड नोबेल कोण होते? त्यांनी हे पुरस्कार का सुरू केले ? गणितासारख्या विषयात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही? महात्मा गांधींना नोबेल कधीच का मिळालं नाही जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
10/6/20225 minutes, 32 seconds
Episode Artwork

दसरा मेळावा का सुरू झाला? दसऱ्याला राजकीय महत्त्व का आलं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दसरा साजरा केला जातो, विशेषतः महाराष्ट्रात. इथे नागपूरपासून ते भगवानगड ते मुंबईपर्यंत, वेगवेगळ्या संस्था, संघटना, पक्ष आपापल्या परंपरेनुसार दसरा साजरा करतात. खूप आधीपासून दसऱ्याकडे राजकीय शक्तिप्रदर्शनाचा दिवस म्हणूनही पाहिलं जातं. हा दिवस इतका का महत्त्वाचा आहे? आणि याला राजकीय रंग कसा आला? पाहू या दसऱ्याची ही सोपी गोष्ट. वार्तांकन - टीम बीबीसी मराठी लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
10/5/20224 minutes, 53 seconds
Episode Artwork

टोकनायझेशन ऑनलाईन बँकिंगमुळे सुरक्षित होणार आहे का? BBC News Marathi

तुम्हाला गेल्या काही दिवसांत बँकेचा मेल, मेसेज आलं असेल. तुमच्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी टोकन तयार केलंय असं काहीतरी. सध्या ऑनलाईन शॉपिंगसाठी जोरदार सेल सुरू आहेत. तुम्ही UPI वापरून सहज सटासट ही खरेदी करताना ती अधिक सुरक्षित व्हावी म्हणून ही नवी प्रणाली आलीय – टोकनायझेशन. टोकनायझेशनसाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या २ वर्षांत अनेकदा मुदतवाढ दिली. पण आता मात्र हे करणं आवश्यक असणार आहे..
10/4/20224 minutes, 7 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मॅरिटल रेप आणि गर्भपाताबद्दल सुप्रीम कोर्ट काय महत्त्वाचं बोललंय?

महिलेचं लग्न झालेलं असो वा नसो, गर्भधारणा तिच्या इच्छेने झाली असो वा नसो, 24 आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याचा तिला अधिकार आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. भारतातल्या गर्भपाताच्या कायद्याचा इतिहास पाहता, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. पण यामुळे नेमकं काय बदलणार? यात मॅरिटल रेपबद्दलही सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय? पाहूया आजची सोपी गोष्ट संशोधन – टीम बीबीसी निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
9/30/20225 minutes, 47 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बुद्धिबळात चीटिंगच्या आरोपांनी खळबळ का उडाली? | सोपी गोष्ट

नीमनवर चीटिंगचे आरोप आहेत मात्र त्यानं ते नाकारले आहेत, पण याआधी ऑनलाईन खेळात चीटिंग केल्याचं मान्य केलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्याचा बुद्धिबळावर काय परिणाम होईल? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
9/29/20225 minutes, 35 seconds
Episode Artwork

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंकडे आता कोणते पर्याय? | सोपी गोष्ट

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' कोणाला मिळणार? याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोग सुरू करेल. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाअंतर्गत बहुमत सिद्ध करावं लागेल.
9/28/20223 minutes, 45 seconds
Episode Artwork

डार्ट मोहिमेतून नासा खरंच पृथ्वीचा जीव वाचवणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेनं सोमवारी आपलं एक यान जाणून बुजून एका लघुग्रहावर आदळवलं. नासाच्या डार्ट मोहिमेचाच हा भाग होता. आणि ही मोहीम पृथ्वीला वाचवण्यासाठी आखलेली होती. नासाची ही डार्ट मोहीम काय आहे? सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
9/27/20225 minutes, 10 seconds
Episode Artwork

पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर भारतात कारवाई का होतेय? । BBC News Marathi

मागच्या आठवड्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालय यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. देशभरात 15 राज्यांमध्ये एकाच वेळी छापे घालून संघटनेच्या शंभरच्या वर कार्यकर्त्यांना या कारवाईत ताब्यात घेण्यात आलंय. ही संघटना आणि तिचे कार्यकर्ते देशात फुटीरतावादी कारवाया करत असल्याचा ठपका तपास यंत्रणेनं ठेवलाय. तर पीएफआय संघटनेकडूनही कारवाईचा निषेध होतोय. हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि पीएफआय संघटना नेमकी काय आहे? तिच्यावर कारवाई का होतेय? जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
9/26/20225 minutes, 49 seconds
Episode Artwork

मूनलाइटिंग म्हणजे काय? विप्रो, इन्फोसिस कर्मचाऱ्यांवर कारवाई का करतंय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतातल्या मोठ्या आयटी कंपन्या आता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करू लागल्या आहेत, जे सकाळच्या शिफ्टला एका ऑफिसमध्ये पूर्णवेळ काम करत आहेत, आणि दुपारहून सुटी झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या एका कामातून पैसे कमावत आहेत. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना ताकिद दिली आहे, तर विप्रोने चक्क 300 कर्मचाऱ्यांना याच कारणावरून कामावरून काढून टाकलंय. हा प्रकार आहे मूनलाइटिंग. हे चूक आहे की बरोबर? वैध आहे की बेकायदेशीर? बघू या ही सोपी गोष्ट. संशोधन - टीम बीबीसी मराठी निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
9/24/20225 minutes, 18 seconds
Episode Artwork

इराणमध्ये महिला सार्वजनिकरीत्या हिजाब का जाळतायत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अलीकडे इराणमध्ये एका 22 वर्षीय महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर तिथे महिलांचं आंदोलन चांगलंच पेटलंय. ही महिला हिजाबसक्तीचा विरोध करत होती. आणि तिला अटक केल्यानंतर पोलिसांच्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा जनतेचा दावा आहे. इराण हा इस्लामिक रिपब्लिक देश आहे. आणि तिथे सार्वजनिक ठिकाणी महिलांनी काय परिधान करावं यासाठी कडक ड्रेसकोड आहे. त्या विरोधात 2014 पासून महिला तिथं आंदोलन करतायत. पण, या ताज्या हिंसक घटनेनंतर हिजाबविरोधी आंदोलन पुन्हा ऐरणीवर आलंय. यावेळी त्याची व्याप्तीही मोठी आहे. इराणमध्ये नेमकं काय सुरू आहे आणि महिलांचा हिजाब विरोधाचा लढा याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
9/22/202218 minutes, 33 seconds
Episode Artwork

जगात आर्थिक मंदी खरंच येणार का? भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

आधीच कोव्हिडमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. किंवा काही कुटुंबांनी घरातल्या कमावत्या व्यक्ती गमावल्या. आणि या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच जागतिक मंदीची भीती घोंघावत आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही तसा अंदाज वर्तवला आहे. खरंच 2023मध्ये मंदीची परिस्थिती उद्भवू शकते का? मंदी आली तर भारतावर त्याचा काय परिणाम होईल, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
9/21/20224 minutes, 54 seconds
Episode Artwork

खाजगी व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले तर काय करावं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
9/20/20224 minutes, 43 seconds
Episode Artwork

पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वेतन का मिळतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळतो हे पुन्हा एकदा एका संशोधन अहवालाच्या माध्यमातून उघड झालं आहे. समान पात्रता आणि क्षमता असूनही हे रोजगाराचं प्रमाण पुरुषांमध्ये 41 टक्क्यांनी जास्त आहे. वेतन आणि रोजगाराच्या बाबतीत फक्त स्त्री-पुरुष अशीच असमानता नाही तर अल्पसंख्यांक (मुस्लीम) आणि अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांनाही अशा असमानतेचा मुकाबला करावा लागत आहे. या परिस्थितीची कारणमीमांसा आणि उपाय जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
9/19/20224 minutes, 49 seconds
Episode Artwork

नामिबियातून आलेले चित्ते भारताशी कसं जुळवून घेणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

चित्ता हा सगळ्यात वेगवान आणि चपळ प्राणी. पण, 75 वर्षांपूर्वी हा प्राणी भारतातून नामशेष झाला. चित्त्यांचं पुन्हा भारतात पुनर्वसन करण्यासाठी आता केंद्रसरकारने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात मागवले आहेत. आणि त्यातले पहिले आठ चित्ते 17 सप्टेंबरला भारतात दाखल होणार आहे. चित्त्यांचा हा विमान प्रवास कसा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे भारतात आणल्यावर ते इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेतली याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - सौतिक बिस्वास लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
9/16/20224 minutes, 43 seconds
Episode Artwork

मूल दत्तक घेण्यासाठीच्या नियमांमध्ये झाले ‘हे’ बदल BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतातल्या मुलं दत्तक घेण्याच्या कायद्यामध्ये अलीकडेच काही बदल करण्यात आले. त्यानुसार, दत्तक ग्रहणाची कायदेशीर प्रक्रिया आणि त्याची सुनावणी न्यायालयासमोर न होता जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर होईल. न्यायालयांवरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. पण, त्यामुळे दत्तक ग्रहणाची प्रक्रिया आधीपेक्षा सुटसुटित आणि लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात या प्रक्रियेच्या अंमलबजावणीचा गोंधळ वाढलेला दिसतोय. कायद्यातले बदल आणि त्यामुळे लोकांचा गोंंधळ का उडायला, समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
9/15/20225 minutes, 17 seconds
Episode Artwork

कोहिनूर हिरा कुठे आहे? दूर करा हे 6 गैरसमज BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

कोहिनूर हिरा जगातल्या सगळ्यात मौल्यवान आणि वजनदार हिऱ्यांपैकी एक हिरा मानला जातो. भारतीयांच्या मनात या हिऱ्याचं एक वेगळं स्थान आहे. पण, त्याचबरोबर ब्रिटिशांनी हा हिरा भारताकडून लुटून नेला असा एक समज भारतीयांच्या मनात आहे. त्याचबरोबर या हिऱ्याबद्दल आख्यायिकाही खूप आहेत. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया कोहिनूरविषयीचे सहा मोठे गैरसमज… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
9/14/20225 minutes, 9 seconds
Episode Artwork

ताडोबातले हत्ती जामनगरला हलवण्याला विरोध का होतोय? । BBC News Marathi

महाराष्ट्राच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि गडचिरोली इथून तेरा हत्ती गुजरातच्या जामनगरमधल्या खाजगी प्राणी संग्रहालयात पाठवण्याचा निर्णय मे 2022मध्ये वन विभागाने घेतला. या निर्णयाला राज्य आणि केंद्रसरकारनेही परवानगी दिली आहे. पण, प्रश्न हा आहे की, आपल्या नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या प्राण्यांना बंदिस्त प्राणी संग्रहालयात का पाठवायचं? त्यासाठीच प्राणीहक्क संघटना आणि स्थानिक लोकांनीही याला विरोध केला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. आणि वन विभागाने पत्रक काढून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली. अखेर वर्तमानपत्रात आलेली एक बातमी बघून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे. आणि आता कायदेशीर सुनावणी सुरू होणार आहे. हत्तींच्या हस्तांतरणाचा निर्णय आणि त्याविषयीचे कायदे जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
9/14/20225 minutes, 26 seconds
Episode Artwork

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अंत्यसंस्कार कसे होणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रिटिश साम्राज्यावर 71 वर्षं राज्य केलं. देशाला दुसऱ्या महायुद्धातून सावरताना बघितलं आणि पुढेही अशी अनेक स्थित्यंतरं पाहिली. ब्रिटिश जनतेशी आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश राजघराणं तसंच परंपरांशी त्या प्रामाणिक राहिल्या. आता त्यांच्यावरचे अंत्यसंस्कारही ब्रिटिश परंपरेला धरून आणि शासकीय इतमामात पार पाडण्यात येतील. पुढचे काही दिवस ब्रिटिश जनतेसाठी नेहमीसारखे नसतील. त्यांच्यासाठी काय बदलेल आणि ब्रिटिश परंपरेनुसार, शाही अंत्यसंस्कार नेमके कसे पार पडतात आज जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये माहिती - बीबीसी न्यूज निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
9/9/20224 minutes, 38 seconds
Episode Artwork

भारत जोडो पदयात्रा राहुल आणि काँग्रेसला तारेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो पदयात्रा’ तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असलं तरी राजकीय हेतूही लपवून ठेवलेला नाही. कारण, 2024 ची सार्वत्रिक निवडणूक आणि काँग्रेस पक्षाला तसंच राहुल यांच्या नेतृत्वाला उभारी देण्यासाठी देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचा हा निकराचा प्रयत्न आहे हे उघड आहे. पण, सध्याचा देशातला सर्वशक्तिशाली पक्ष आणि निवडणूक यंत्रणेत माहीर असलेल्या भाजपला ही पदयात्रा आव्हान देऊ शकेल का, पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - सौतिक विश्वास, राघवेंद्र राव निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
9/8/20225 minutes, 48 seconds
Episode Artwork

राजपथाचा कर्तव्यपथ का केला जातोय? त्याचा इतिहास काय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

राजपथाचं नाव आता कर्तव्य पथ असं केलं जाणार आहे. पण असा निर्णय का घेण्यात आला आहे? या रस्त्याचा इतिहास आणि महत्त्व काय आहे? संशोधन – विवेक शुक्ला लेखन - जान्हवी मुळे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
9/8/20224 minutes, 58 seconds
Episode Artwork

पाकिस्तानात प्रलय कशामुळे आला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

पाकिस्तानला गेले काही दिवस भीषण पुराचा सामना करावा लागतो आहे. एरवी कोरड्या आणि शुष्क मानल्या जाणाऱ्या इथल्या प्रांतांमध्येही अतीवृष्टीनं कहर केला आहे. यामागे काय कारणं आहेत? संशोधन – जॉर्जिना रेनार्ड निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/international-62256081
9/6/20225 minutes, 15 seconds
Episode Artwork

INS विक्रांत युद्धनौका भारतीय नौदलासाठी किती महत्त्वाची? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारताची सर्वांत मोठी, स्वदेशी युद्धनौका INS विक्रांत 2 सप्टेंबर 2022ला भारतीय नौदलात दाखल झाली. 262 मीटर लांब, 45 हजार टन वजनी आणि 7500 हजार मैलांची रेंज असलेली ही युद्धनौका तयार व्हायला तब्बल २० हजार कोटी रुपये आणि १३ वर्षं लागली. आज भारताजवळच्या समुद्रात अनेक आंतरराष्ट्रीय हालचाली पाहायला मिळत आहेत. या सगळ्यात INS विक्रांतमुळे भारतीय नौदलाची शक्ती खरंच कशी वाढणारे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – जुगल पुरोहित लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-62750278 Back link to this SoGo 667 - https://www.youtube.com/watch?v=wGhVaAgcPes
9/3/20225 minutes, 17 seconds
Episode Artwork

काँग्रेस आणि भाजपमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी 2019च्या जुलैमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. खरंच काँग्रेस आणि भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष आपले अध्यक्ष कसे निवडतात? वार्तांकन - सरोज सिंग लेखन आणि निवेदन - दिपाली जगताप एडिटिंग - निलेश भोसले
9/1/20225 minutes, 21 seconds
Episode Artwork

मोदक कुठून आले? भारतात कुठे कुठे मोदक बनतात? । BBC News Marathi

श्रीगणेशाला मोदकांचा नेवैद्य आवडतो असं वर्णन पुराणापासून चालत आलं आहे. आई पार्वतीने गणेशाला अमृतयुक्त मोदक खायला दिला अशी कथा आहे. पण, ही पुराणातली कथा झाली. आपल्याकडे मोदक नक्की कुठून आले? गणपतीला मोदक दाखवण्याची परंपरा कधी आणि कुठून सुरू झाली? महाराष्ट्राखेरीज इतर कुठल्या राज्यांत मोदक बनवले जातात, पाहूया सोपी गोष्टमध्ये… निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
8/31/20224 minutes, 5 seconds
Episode Artwork

दुधाच्या किंमती कशामुळे वाढल्या? । BBC News Marathi

दूध हा अनेक भारतीयांसाठी रोजच्या आहारातला महत्त्वाचा घटक आहे. पण गेल्या काही दिवसांत दुधाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामागची कारणं काय आहेत? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
8/30/20224 minutes, 2 seconds
Episode Artwork

माणूस पुन्हा चंद्रावर का चालला आहे?। BBC News Marathi

माणसाला पुन्हा चंद्रावर नेणारी मोहीम म्हणून नासाच्या आर्टेमिस प्रकल्पाकडे पाहिलं जातंय. यातला पहिला टप्पा म्हणजे आर्टेमिस-1. तांत्रिक कारणामुळे आर्टेमिस-1चं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. ही मोहीम नेमकी काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
8/29/20225 minutes, 6 seconds
Episode Artwork

बेनामी संपत्ती म्हणजे काय? त्याविषयीचा कायदा वादात का सापडला? । BBC News Marathi

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच बेनामी संपत्ती (प्रतिबंधक) सुधारणा कायदा 2016 मधल्या काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या आहेत. या तरतुदींचा उपयोग सत्ताधारी पक्ष राजकीय सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप होत होता. या नेमक्या कुठल्या तरतुदी आहेत? मूळात बेनामी संपत्ती म्हणजे काय? अशी कायद्याची गरज काय होती, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/26/20226 minutes, 10 seconds
Episode Artwork

अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत अन्नटंचाई का निर्माण झालीय? BBC News Marathi सोपी गोष्ट 671

कोरोनाचा उद्रेक, मंदी सदृश वातावरण आणि रशिया, युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात महागाई वाढलीय. तसंच अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत, जगाला अन्न टंचाईचा मुकाबला करावा लागतोय. जगभरात नेमकी काय परिस्थिती आहे? त्या मागची कारणं काय? आणि ही परिस्थिती किती काळ राहील पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/25/20225 minutes, 34 seconds
Episode Artwork

रशिया, युक्रेन युद्ध अजून संपत का नाहीए? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

रशिया आणि युक्रेन मधील युद्धाला म्हणता म्हणता सहा महिने झाले. 24 ऑगस्टला खरंतर युक्रेनचा स्वातंत्र्यदिन आहे. पण, हा देश सध्या आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी लढतोय. दुसरीकडे रशियाचंही युद्धात मोठं नुकसान झालंय. तरीही दोन्ही देश मागे हटण्याचं नाव घेत नाहीएत. त्यामुळे युद्ध चिघळतंय. रशिया - युक्रेन युद्धात सध्या नेमकं काय सुरू आहे? संयुक्त राष्ट्रसंघ आणि पाश्चात्य देशांची नेमकी भूमिका काय आहे, पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/24/20225 minutes, 57 seconds
Episode Artwork

सरकारी बँकांचं खाजगीकरणाने लोकांचं आर्थिक हित जपलं जाईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

बँकांच्या खाजगीकरणाचा मुद्दा अधून मधून कायम गाजतो. केंद्रसरकारने दोन सरकारी बँकांच्या खाजगीकरणाची तयारी सुरू केलेली असतानाच अलीकडे रिझर्व्ह बँकेनं आपल्या वेबसाईटवर एक संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध केला. आणि यात चक्क सरकारी बँकांचं महत्त्व सांगताना खाजगीकरणासाठी अधिक व्यापक दृष्टिकोण ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आलीय. देशाच्या मध्यवर्ती बँकेनं अशाप्रकारे लेख प्रसिद्ध केल्यामुळे हा सरकारला ‘घरचा आहेर’ आहे का, यावरही चर्चा रंगली. आणि दुसऱ्याच दिवशी रिझर्व्ह बँकेला एक स्पष्टीकरणही प्रसिद्ध करावं लागलं? असं या लेखात नेमकं काय म्हटलंय आणि सरकारी बँकांच्या खाजगीकरणाचा व्यापक दृष्टिकोण नेमका काय असावा, पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/23/20226 minutes, 21 seconds
Episode Artwork

हेरगिरीच्या या जहाजामुळे भारत-चीन संबंध आणखी चिघळतील? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

चीनचं एक हेरगिरी करणारं जहाज मागचे काही दिवस श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात तैनात आहे. तिथं ते युद्धाभ्यास करणार आहे. पण, त्यामुळे भारताची चिंता मात्र वाढलीय. या जहाजात अत्याधुनिक रडार यंत्रणा आहे, ज्यामुळे चीन भारतीय क्षेपणास्त्रांची अचूकता आणि टप्पा यांचा माग काढू शकेल. आणि दुसरं म्हणजे चीन हंबनटोटा या लंकन बंदाराचा लष्करी कारवायांसाठी वापर करेल अशी भीती भारताला वाटतेय. तर चीन दक्षिण चिनी समुद्रात आपलं वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. ही एक धोक्याची घंटा आहे. भारत - चीन संबंध यामुळे बिघडू शकतील का? भारताने चीनला घाबरायला हवं का? पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/20/20225 minutes, 30 seconds
Episode Artwork

जॅकलिन फर्नांडेझला अडचणीत आणणारं खंडणी प्रकरण काय आहे? । BBC News Marathi

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडेझ सध्या भलत्याच अडचणीत सापडली आहे. दोनशे कोटी रुपयांच्या खंडणीच्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने तिच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. या खंडणी प्रकरणाबद्दल तिला माहिती होती. पण, तिने ती तपास यंत्रणेला वेळेवर दिली नाही, असा तिच्यावर आरोप आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? आणि जॅकलिनशी याचा संबंध कसा आला पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/18/20224 minutes, 31 seconds
Episode Artwork

बिल्किस बानो खटल्यातल्या दोषींची सुटका कशामुळे झाली? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या अकरा दोषींची अलीकडेच सुटका करण्यात आली. गुजरात सरकारच्या 1992मधल्या शिक्षा माफी धोरणाला अनुसरून हे निर्देश देण्यात आले. पण, सामूहिक बलात्कार आणि सात जणांची हत्या असे गंभीर आरोप असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा माफी मिळावी का? आणि जुन्या शिक्षा माफी धोरणात बदलाची आवश्यकता आहे का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. केंद्रात आणि गुजरातमध्येही सत्तेत असलेल्या गुजरात सरकारवर टीका होतेय. ज्या शिक्षा माफी धोरणामुळे या अकरा गुन्हेगारांची सुटका झालीय ते धोरण समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - राघवेंद्र राव, तेजस वैद्य लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/17/20226 minutes, 13 seconds
Episode Artwork

देश विकसित आहे की, विकसनशील हे कसं ठरवलं जातं? । BBC News Marathi

2047 पर्यंत देशाला पुन्हा विकसित देश बनवा, सामर्थ्यशाली बनवा अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिली. भारत हा विकसनशील देश आहे, तर अमेरिका, जर्मनी यासारखे देश म्हणजे विकसित देश, असं आपण ऐकत आलो आहोत. पण, मूळात विकसित देश आणि विकसनशील देश कुठले हे कसं ठरतं? जीडीपीचा आकार गृहित धरला तर भारत जगात पाचव्या स्थानावर आहे. तरीही आपण विकसनशील कसे? संयुक्त राष्ट्रसंघाने विकसित आणि विकसनशील देशांची केलेली वर्गवारी कशावर आधारित आहे? या सगळ्या गोष्टी समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/17/20225 minutes, 54 seconds
Episode Artwork

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचे अपघात कधी थांबणार? । BBC News Marathi

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या निधनानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्यावरचा हा काही पहिलाच अपघात नाही आणि इथे दुर्घटनेत एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जीव जाण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. पण अनेक अपघात होऊनही इथे परिस्थिती का सुधारत नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
8/15/20225 minutes, 19 seconds
Episode Artwork

रुपी बँक का बंद झाली? । BBC News Marathi

रिझर्व्ह बँकेनं अखेर पुण्याच्या जुन्या रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. 22 सप्टेंबरपासून बँक कुठलेही व्यवहार करू शकणार नाही. 112 वर्षं जुन्या बँकेवर ही वेळ का आली? आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या सहकारी बँकांना नेमकं कुणाचं ग्रहण लागलंय? कारण, आकडेवारी असं सांगते की, 2017 पासून तब्बल 67 सहकारी बँका बंद झाल्या आहेत. आणि इतर अनेक बँका याच मार्गावर आहेत. तेव्हा सहकारी बँकांवर ही वेळ का आली तेच पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
8/15/20226 minutes
Episode Artwork

नितिश कुमार विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतील का ? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नितिश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना थेट भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हानच देऊन टाकलं. पक्ष संपण्याची भीती की राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा... नेमकं काय कारण आहे जे नितीशकुमारांना इथपर्यंत घेऊन आलंय? स्वतःचा पक्ष वाचवण्याबरोबरच नितिशकुमार नरेंद्र मोदींना राष्ट्रीय पातळीवर आव्हान देऊ शकतील का? नितिश कुमार यांच्यासाठी काय आहेत जमेच्या बाजू आणि कुठल्या त्यांच्या विरोधात जाऊ शकतात, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/11/20225 minutes, 43 seconds
Episode Artwork

डोनाल्ड ट्रंप यांच्या घरावर एफबीआयने छापे का मारले? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या फ्लोरिडातल्या घरावर अलीकडेच एफबीआयने छापा मारला. एका माजी अध्यक्षाच्या घरावर सरकारी यंत्रणेचा छापा पडण्याची ही पहिलीच खेप आहे. आणि त्यावरून अमेरिकेत भरपूर चर्चा होत आहे. ट्रंप यांनी अर्थातच हा त्यांच्याविरोधातला राजकीय डाव असल्याचं म्हटलंय. तर विरोधकांनी ट्रंप यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केलीय. अमेरिकेत नेमकं काय सुरू आहे. आणि ट्रंप यांच्या घरावर छापा का पडला जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/10/20225 minutes, 55 seconds
Episode Artwork

नितिश कुमार आणि भाजपा मध्ये वादाची ठिणगी कुठे पडली? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

महाराष्ट्रातील सत्तानाट्य अजून पुरतं संपलेलं नाही. इतक्यात दूर बिहारमध्ये नवीन नाट्य आकार घेतंय. जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितिश कुमार यांनी भाजपाबरोबर काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. आणि सगळं अपेक्षेप्रमाणे घडलं तर तिथे जदयू, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस असं महागठबंधन सरकार अस्तित्वात येऊ शकतं. भाजपा आणि नितिश कुमार यांचे संबंध कायम तिखट-गोडच होते. पण, सरकार पाडण्या इतकं अलीकडे काय घडलं? या वादाची ठिणगी कुठे पडली? आणि बिहार नाट्याचं महाराष्ट्रातील नाट्याशी काय कनेक्शन आहे? पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/9/20226 minutes, 30 seconds
Episode Artwork

वादग्रस्त ठरलेला फौजदारी प्रक्रिया कायदा नेमका काय आहे? । सोपी गोष्ट 658

अलीकडेच देशात फौजदारी प्रक्रिया (ओळख) 2022 कायदा लागू झाला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हा कायदा संमत झाला असला तरी गदारोळ दोन्ही ठिकाणी झाला. आणि या नव्या कायद्याला विरोधही होतोय. गुन्हेगारांबरोबरच ‘इतर व्यक्तीं’ची जैव-शारीरिक माहिती साठवून ठेवण्याची तरतूद या कायद्यात आहे. आणि हा त्या लोकांच्या गोपनीयता आणि खाजगीपणाच्या अधिकारावर घाला आहे, असा आरोप होतोय. हा नेमका कायदा काय आहे आणि त्याला इतका विरोध का होतोय पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/8/20226 minutes, 30 seconds
Episode Artwork

शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या नवीन प्रभाग रचनेचा भाजपला फायदा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय तो आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना पुन्हा एकदा बदलण्याचा. 2017 साली तेव्हाच्या देवेेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसारच आता महापालिका निवडणुका होतील. हा निर्णय का महत्त्वाचा आहे आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/5/20226 minutes, 46 seconds
Episode Artwork

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

सणासुदीचे दिवस तोंडावर आले असताना केंद्रसरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना एक खूशखबर दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यांत 4%ची वाढ होणार आहे. तसंच निवृत्ती वेतनाच्या वितरण प्रणालीतही सुटसुटीतपणा येणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या आखणी कुठल्या शिफारसींना केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय. आणि त्याने आपल्या पगारावर काय परिणाम होणारए पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/4/20224 minutes, 45 seconds
Episode Artwork

गोल्ड एक्सचेंजमुळे सोन्याचे दर कमी होतील का? BBC News Marathi सोपी गोष्ट

अलीकडेच देशाचं पहिलं आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज स्थापन करण्यात आलंय. सोनं आणि चांदी फिजिकल स्वरुपात इथं ट्रेड होणार आहे. त्यामुळे सोनार आणि इतर वित्तीय संस्थाही थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून सोनं विकत घेऊ शकतील. याआधी रिझर्व्ह बँकची मान्यता असलेल्या काही बँका आणि संस्थाच सोनं बाहेरून आणू शकत होत्या. याचा परिणाम सोन्याचे दर कमी होण्यावर होईल का? ग्राहकांना इतर काय फायदे यातून मिळू शकतील? पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/3/20224 minutes, 58 seconds
Episode Artwork

संजय राऊत प्रकरण: राजकीय नेत्यांनी ईडीचा धसका का घेतलाय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा ईडीचा राजकीय वापर झाल्याचे आरोप होत आहेत. असे आरोप नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने होत आलेले आहेत. नेत्यांवरील कारवाई ईडीला शक्य होते ती मनी लाँडरिंग विरोधी कायद्याचा वापर करून. आणि 2005मध्ये हा कायदा लागू झाल्यापासून त्यात अनेकदा असे बदल किंवा सुधारणा करण्यात आल्यात ज्यामुळे या नेत्यांना जामीन मिळणं कठीण झालंय. या कायद्यामध्ये झालेले बदल आज समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
8/2/20226 minutes, 7 seconds
Episode Artwork

भारतात लहान मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतो आहे?। BBC News Marathi

भारतात लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. वेळीच उपाय केले नाहीत तर यातून आरोग्याच्या नव्या समस्या उभ्या राहतील असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. संशोधन – गीता पांडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
8/2/20225 minutes, 44 seconds
Episode Artwork

रणवीर सिंगला न्यूड फोटोशूट प्रकरणी शिक्षा होऊ शकते का? BBC News Marathi सोपी गोष्ट

आपल्या न्यूड फोटोग्राफीमुळे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या वादात सापडलाय. त्याच्यावर मुंबई पोलीसांकडे तक्रारही दाखल झाली आहे. अमेरिकन मासिकासाठी काढलेले फोटो रणवीर सिंह यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले होते. हे फोटो अश्लील असल्याचा आरोप होतोय. पण, अश्लीलतेविषयीचा भारतीय कायदा काय सांगतो? त्यानुसार रणवीरला शिक्षा होऊ शकते का, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - प्रियंका झा लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/29/20225 minutes, 13 seconds
Episode Artwork

भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात जाणाऱ्यांची संख्या का वाढतेय? BBC News Marathi सोपी गोष्ट

दरवर्षी दीड लाखांच्या वर उच्चशिक्षित, कुशल भारतीय तरुण भारतीय नागरिकत्वाचा त्याग करतात. अर्थात, भारत सोडून ते अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलिया अशा प्रगत देशांचा आसरा घेतात. तिथलं राहणीमान, शिक्षण - नोकरीच्या संधी यांची भुरळ तरुणांना पडते. पण, त्यामुळे भारतात ‘ब्रेनड्रेन’ सारखी परिस्थिती उद्भवते. तरुण स्थलांतराची ही समस्या आणि त्याची कारणं पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - शुभम किशोर लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/28/20224 minutes, 55 seconds
Episode Artwork

कोरोना विषाणूचा उद्रेक वुहान मांस बाजारातूनच झाला - अहवाल | BBC News Marathi सोपी गोष्ट

2019च्या डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहानमधल्या मांस विक्री बाजारातूनच झाला असे निष्कर्ष आता ताज्या अहवालातूनही निघाले आहेत. संशोधकांच्या दोन वेगवेगळ्या गटांनी उपलब्ध डेटा आणि माहितीच्या आधारे तसे सबळ पुरावे असल्याचं म्हटलं आहे. हे अहवाल कोरोना विषाणूविषयी आणखी काय माहिती सांगतात, कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आला आहे का, पाहूया सोपी गोष्ट क्रमांक 650… लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर
7/27/20224 minutes, 19 seconds
Episode Artwork

म्यानमारमध्ये खरंच नागरी युद्ध सुरू होईल का? । BBC News Marathi

आपला शेजारी देश श्रीलंका सध्या आर्थिक अडचणी सापडलाय. तर दुसरीकडे, म्यानमारमध्येही यादवी युद्धा सदृश परिस्थिती आहे. परिस्थिती वेळोत आटोक्यात आली नाही तर तिथे नागरी युद्ध सुरू होईल असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघानेच दिलाय. असं नेमकं तिथं काय घडतंय? लष्कराच्या उठावानंतर परिस्थिती कशी चिघळली, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - बीबीसी बर्मीज् लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/26/20225 minutes, 1 second
Episode Artwork

द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती करण्यामागे भाजपची रणनिती काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट 648

द्रौपदी मूर्मू यांनी देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. त्याचबरोबर त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. हीच त्यांची ओळख सध्या राजकीय दृष्ट्या चर्चेची बनलीय. भारतीय जनता पार्टीने आदिवासी महिलेला मुख्यमंत्री करून नेमकं काय साध्य केलं, यामागे पक्षाची काय रणनिती आहे यावर चर्चा सुरू आहे. सोपी गोष्टमध्ये शोधूया याच प्रश्नांची उत्तरं… संशोधन - सरोज सिंह लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/25/20225 minutes, 15 seconds
Episode Artwork

भारत श्रीलंकेला इतकी मदत का करतोय? । BBC News Marathi

श्रीलंका आर्थिक संकटात सापडल्यानंतर यावर्षी भारताने श्रीलंकेला चीनपेक्षा जास्त आर्थिक मदत केली आहे. पण, श्रीलंकेतल्या एका गटाकडून या मदतीवर टीकाही होतेय. काही आंदोलनकर्त्यांनी ‘देश अमेरिका, भारताकडे गहाण टाकू नका,’ सूर लावला आहे. तर काही नागरिकांनी भारताच्या मदतीचं कौतुकही केलंय. मूळात भारताबद्दल श्रीलंकन नागरिकांचं नेमकं मत काय आहे, तिथे चीनवर भारत वरचढ ठरेल का, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - अनबरासन एथिराजन लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/22/20226 minutes, 17 seconds
Episode Artwork

इम्रान खानना पंजाबमधील विजयामुळे संजीवनी । BBC News Marathi

पाकिस्तानचं पंतप्रधानपद गमावल्यावर इम्रान खान बॅकफूटवर गेले होते. पण नुकतंच पंजाब प्रांतातल्या पोटनिवडणुका जिंकून त्यांच्या पक्षानं कमबॅक केलं आहे. पाकिस्तानसाठीच नाही तर दक्षिण आशियासाठीही हा विजय महत्त्वाचा कसा आहे ? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
7/21/20224 minutes, 34 seconds
Episode Artwork

संजय पांडे अडचणीत का आले? BBC News Marathi

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे माजी प्रभारी महासंचालक संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयानं मंगळवारी 19 जुलैला अटक केली होती. दिल्लीतील कोर्टानं त्यांना 9 दिवस ईडीच्या कोठडीत पाठवलं आहे. शेअर बाजारासंदर्भातील एका प्रकरणात अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप संजय पांडे यांच्यावर आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
7/20/20224 minutes, 37 seconds
Episode Artwork

ऋषी सुनक आणि युकेच्या पंतप्रधानपदाची शर्यत BBC News Marathi

बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर आता युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान ठरू शकतात. पण ऋषी सुनक ही शर्यत जिंकू शकतात का? त्यांची आजवरची वाटचाल कशी होती? हे जाणून घेण्याआधी मुळात ब्रिटिश पंतप्रधानांची निवड कशी होते, त्याची माहिती करून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
7/19/20225 minutes, 20 seconds
Episode Artwork

रुपया घसरल्यामुळे माझ्या खिशावर काय परिणाम होईल । BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर जाऊन पोहोचलाय. गुरुवारी तो काही सेकंदांसाठी का होईना 80 च्याही पार गेला. आणि तज्ज्ञांचं तर असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात तो आणखी खाली म्हणजे अगदी 81 रुपयापर्यंत घसरू शकतो. असं नुसतं ऐकायला थोडंस किचकट वाटतं ना! आणि याचा माझ्याशी काय संबंध असंही तुम्हाला वाटेल. पण, रोजच्या जीवनात आपल्या खिशावर याचा अप्रत्यक्ष परिणाम होतच असतो. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर दूरगामी परिणाम होतो. म्हणूनच सोपी गोष्टमध्ये आज समजून घेऊया रुपया आणि डॉलरच्या किमती कशा ठरतात, सध्या त्या का वाढतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे? लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/16/20225 minutes, 51 seconds
Episode Artwork

उबर फाईल्स प्रकरण काय आहे? । BBC News Marathi

ओला किंवा उबर टॅक्सी आपल्या सगळ्यांसाठी सोयीची. आणि आरामदायी प्रवासामुळे आपली या सेवांना पसंती असते. पण, अलीकडेच उबर कंपनीतं कामकाज कसं चालतं किंवा कसं बेकायदेशीर पद्धतीने चालतं याचा खुलासा कऱणाऱ्या काही फाईल्स कंपनीच्याच माजी अधिकाऱ्याने उघड केल्या आहेत. त्यावरून जगभर गाजलेली ही सेवा किती सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झालाय. उबर कंपनीविषयी असं या फाईल्समध्ये नेमकं काय आहे, पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/14/20225 minutes, 44 seconds
Episode Artwork

श्रीलंकेपासून भारताने काय धडा घ्यावा । BBC News Marathi

श्रीलंका देशावर जशी दिवाळखोरीची वेळ आली आहे, तशीच ती भारतावर येईल का अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. काहींनी भारतातल्या महागाईकडेही बोट दाखवलं. आणि अशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त केली. खरंच भारतात महागाई नियंत्रणाबाहेर जाऊ शकते का? आणि श्रीलंकेच्या संकटातून भारताने काय धडा घ्यायला पाहिजे, हे आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया… संशोधन - सरोज सिंह लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/14/20226 minutes, 57 seconds
Episode Artwork

K2 हा धूमकेतू पृथ्वीवर आदळेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

येत्या 14 जुलैला पृथ्वीच्या अगदी जवळून ‘के2’ हा मोठा धूमकेतू जाणार आहे. हा धूमकेतू तब्बल 18 किमी लांब आहे. त्यामुळे साध्या दुर्बीणीला तो दिसू शकणार आहे. त्याच्यापासून पृथ्वीला धोका आहे का? हे धूमकेतू कुठून आणि का येतात? आणि ते आदळले तर काय होऊ शकतं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/12/20224 minutes, 41 seconds
Episode Artwork

श्रीलंकेचं आर्थिक गणित कुठे फसलं? । BBC News Marathi

श्रीलंकेतली आर्थिक प्रश्न दिवसेंदिवस चिघळतोय. महागाई आणि वस्तूंच्या तुटवड्यामुळे वैतागलेल्या आंदोलनकर्त्यांनी रविवारी राष्ट्राध्यांच्या सरकारी निवासस्थानावरच हल्ला केला. या आंदोलनामुळे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना निवासस्थान सोडावं लागलं. आणि ते पळून गेले. देशात परकीय चलनाचा अभूतपूर्व तुटवडा जाणवतोय. पण, मूळात श्रीलंकेवर ही परिस्थिती काय ओढावली? देशाचं आर्थिक गणित कुठे बिघडलं? जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - आयेशा परेरा लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/11/20226 minutes, 49 seconds
Episode Artwork

काँग्रेस पक्षाने तीन वेळा निवडणूक चिन्ह का बदललं? BBC News Marathi | सोपी गोष्ट

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गटाने वारंवार आपणच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. आणि फक्त पक्षावरच नाही तर पक्षचिन्ह म्हणजे धनुष्य-बाणावरही त्यांनी दावा आहे. तर उद्धव ठाकरे यांनीही धनुष्य बाण आपलाच असल्याचं म्हटलंय. यावरून पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह याविषयीही चर्चा होऊ लागलीय. त्या निमित्ताने सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया भारतातल्या सगळ्यात जुन्या पक्षाविषयी ज्यांनी तीनदा निवडणूक चिन्ह बदललंय. लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/9/20227 minutes, 9 seconds
Episode Artwork

'रॉकेट्री' फेम नंबी नारायण, ज्यांना गद्दारीच्या आरोपात अडकवलं गेलं... सोपी गोष्ट BBC News Marathi

आर माधवन आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असलेला रॉकेट्री सिनेमा सध्या गाजतोय. इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर तो बेतलेला आहे. ही कहाणी खरंच थरारक आहे. रॉकेट तंत्रज्ञान परस्पर पाकिस्तानला विकल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. देशाने त्यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. पण, शेवटी गुन्हे अन्वेषण विभागाने चार वर्षांनी त्यांना क्लिनचिट दिली. आता आपल्याविरोधात बनावट कट रचणाऱ्यांचा तपास व्हावा अशी नारायणन यांची इच्छा आहे. त्यांचं हे सिनेमालाही लाजवेल, असं कथानक समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - सौतिक बिस्वास लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/7/20225 minutes, 42 seconds
Episode Artwork

सेक्स स्कँडलमुळे पडणार युकेमध्ये बोरीस जॉन्सन सरकार? BBC News Marathi सोपी गोष्ट

महाराष्ट्रात जसं मागचे पंधरा दिवस एक सत्तानाट्य घडून आलं, तसंच वातावरण सध्या युकेमध्ये आहे. पंतप्रधान बोरिस बेकर यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे खासदार नाराज आहेत. आणि त्यातून मागच्या एका महिन्यात दुसऱ्यांदा त्यांच्यावर पंतप्रधानपद गमावण्याचं संकट घोंघावतंय. यावेळी केंद्रस्थानी आहेत त्यांचे निकटचे सहकारी आणि खासदार ख्रिस पिंचर. असं नेमकं काय घडतयं युकेमध्ये? पाहूया सोपी गोष्ट… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/6/20225 minutes, 17 seconds
Episode Artwork

रेस्टॉरंटकडून बिलामध्ये आकारला जाणारा सर्व्हिस चार्ज कसा रद्द कराल?। BBC News Marathi

आपल्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटच्या बिलामध्ये सर्व्हिस चार्ज आकारला जातो. सर्व्हिस चार्ज म्हणजेच सेवाशुल्क. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एकप्रकारची 'टिप' असते जी ग्राहकांकडून सक्तीने वसूल केली जाते. पण आता सर्व्हिस चार्ज रद्द करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकारणाने दिले आहेत. संशोधन, लेखन - दीपाली जगताप निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
7/6/20223 minutes, 58 seconds
Episode Artwork

एकनाथ शिंदे आणि चंद्राबाबू यांच्या बंडातील साम्य । BBC News Marathi

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि 27 वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये तेलगू देसममध्ये झालेलं एक बंड यामध्ये राजकीयदृष्ट्या भरपूर साम्य आहे. तिथेही बंडखोर नेते चंद्राबाबू नायडू यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आणि पुढे जाऊन पक्षाचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आलं. याबाबतीत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर दावा असला तरी तो मुद्दा न्यायालयात जाणार आहे. पण, आंध्रमधलं ‘ते’ बंड उद्धव ठाकरेंसाठी भीती वाढवणारं तर शिंदे गटासाठी दिलासा देणारं ठरू शकतं. पाहूया सोपी गोष्ट… संशोधन - नीलेश धोत्रे लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/4/20225 minutes, 1 second
Episode Artwork

नवे कामगार कायदे सोप्या शब्दात । BBC News Marathi

जुलै महिन्यापासून नवीन कामगार कायदे प्रत्यक्षात आणण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे. आणि तसं झालं तर आपली कामाची पद्धत आणि आपल्याला हातात मिळणारा पगार असे मूलभूत बदल आपल्या प्रोफेशनल आयुष्यात होणार आहेत. काय आहेत हे नवे कामगार कायदे आणि मूळ कायद्यांमध्ये नेमके काय बदल झाले आहेत हे समजून घेऊया… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
7/1/20225 minutes, 46 seconds
Episode Artwork

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण अडचणी कायम? | BBC News Marathi

एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्यासमोरच्या अडचणी संपलेल्या नाहीत. आम्ही शिवसेनेतच आहोत, आम्ही पक्ष सोडलेला नाही, असे शिंदे समर्थक आमदार वारंवार करत आहेत. पण आता ते भारतीय जनता पक्षात विलीन होणार की आणखी कोणतं पाऊल उचलणार? त्यांच्यासमोर कोणते पर्याय आणि अडचणी आहेत? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61994342
7/1/20224 minutes, 39 seconds
Episode Artwork

बहुमत चाचणीत ऐनवेळी कहानीमे ट्विस्ट? । BBC News Marathi

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या विधानसभेतली बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागेल. पण या बहुमत चाचणीत एखादा ट्विस्ट पाहायला मिळाला तरी आश्चर्य वाटायला नको. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61955517
6/30/20225 minutes, 4 seconds
Episode Artwork

एकनाथ शिंदे प्रकरणात चर्चेत आलेला नबाम रेबिया खटला काय आहे? । BBC News Marathi

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाचा संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. पण या सुनावणीदरम्यान वारंवार एका खटल्याचा दाखला देण्यात येत होता, तो म्हणजे नबाम रेबिया प्रकरण. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? महाराष्ट्रातील आत्ताच्या राजकीय परिस्थितीत या प्रकरणाला नेमकं का महत्त्व आलंय? आणि त्याच्या आधारे कोर्टात काय युक्तीवाद झाला आहे? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61955517
6/28/20224 minutes, 32 seconds
Episode Artwork

अमेरिकेत गर्भपातावरून वाद, भारतात कायदा काय सांगतो? । BBC News Marathi

अमेरिकेतल्या गर्भपाताच्या कायद्यासंदर्भातला एक निर्णय, म्हणजे रो विरुद्ध वेड खटला सध्या जगभर चर्चेत आहे आणि अमेरिकेचा जगावरचा प्रभाव पाहता या घटनेचा जगातल्या प्रत्येक स्त्रीशी संबंध आहे. नेमका हा निर्णय काय आहे? गर्भपाताच्या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे का? लेखन – अनघा पाठक, मानसी दास निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/international-58761820 https://www.bbc.com/marathi/international-61938721
6/28/20226 minutes, 19 seconds
Episode Artwork

एकनाथ शिंदेंना धनुष्य बाण मिळेल का? । BBC News Marathi

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामध्ये त्यांच्याकडे दोन तृतियांश आमदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत आपण खरे शिवसैनिक आहोत, अशी त्यांची भूमिका कायम आहे. अशावेळी ते शिवसेनेवरच दावा करतील का? आणि पुढे जाऊन पक्ष चिन्ह म्हणजे धनुष्य-बाण आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील का? किंबहुना ते तसं करू शकतील का, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
6/25/20227 minutes, 51 seconds
Episode Artwork

एकनाथ शिंदेंची 'नाराजी' हे 'ऑपरेशन लोटस'च आहे, कारण...। BBC News Marathi

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अंतर्गत विरोधांमुळे पडेल, असं राज्यातले भाजपचे नेते सतत म्हणत होते. पण आता सरकार खरंच पडायला आलेलं असताना मात्र हीशिवसेनेतली अंतर्गत समस्या आहे, असा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. पण हा खरंच 'शिवसेनेचे अंतर्गत विषय' आहे का? की या बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे? विश्लेषण – आशिश दीक्षित निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61905235
6/23/20226 minutes, 36 seconds
Episode Artwork

एकनाथ शिंदेंनी पक्षांतर केलं तर सरकार पडेल? । BBC News Marathi

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील काही आमदारांसह सुरत गाठलं आणि ते भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. पण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात असं थेट जाता येतं का? शिंदेंनी हे पाऊल उचललं, तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होईल का? शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार पक्ष बदलून आपली आमदारकीही कायम ठेवू शकतात का? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61862782
6/21/20225 minutes, 3 seconds
Episode Artwork

अग्निपथसारख्या योजना भारताशिवाय कुठल्या देशांत आहेत? BBC News Marathi

भारत सरकारने मंगळवारी (14 जून) लष्करातील अल्पकालीन नियुक्तीची अग्निपथ योजना जाहीर केली. जगात असे अनेक देश आहेत जिथं सैन्यात अल्प कालावधीसाठी भरती करण्यात येते. पण इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशांमध्ये लष्करात सेवा करणं सक्तीचं आहे. अशा योजनांचा काय परिणाम होतो? संशोधन – टीम बीबीसी लेखन – जान्हवी मुळे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
6/20/20224 minutes, 47 seconds
Episode Artwork

माऊंट एव्हरेस्टचा बेस कँप का हलवला जातोय? । BBC News Marathi

नेपाळ सरकारने माऊंट एव्हरस्टचा बेस कँप दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतलाय. आता जिथं कँप आहे ती जागा ग्लेशियरवर आहे. आणि तिथला बर्फ झपाट्याने वितळतोय. आणि ठिसूळही झालाय. कसा आहे नवा बेस कँप? आणि नेपाळ सरकारवर ही वेळ का आली? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - शरद बढे
6/17/20226 minutes, 25 seconds
Episode Artwork

मोहम्मद पैगंबर विधेयक नेमकं काय आहे? । BBC News Marathi

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या मुस्लीम प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यावरील वक्तव्याचे पडसाद अजूनही देशभर उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात धार्मिक द्वेष विरोधी एक विधेयक संमत होण्याची मागणी होत आहे. 17 तारखेला या विधेयकाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मुंबईत एक मोर्चाही आयोजित केला आहे. ‘महम्मद पैंगबर विधेयक’ या नावाने चर्चा होत असलेलं हे विधेयक नेमकं काय आहे आणि राज्यात ते संमत होऊ शकतं का, पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - दीपाली जगताप लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
6/16/20225 minutes, 43 seconds
Episode Artwork

मोदी सरकार दहा लाख नोकऱ्या आणणार कुठून? BBC News Marathi

केंद्रसरकारने येत्या 18 महिन्यांमध्ये 10 लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली आहे. यात रेल्वे, गृहखातं आणि संरक्षण खात्यातल्या नोकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सरकारने घोषणा तर केली. पण, एवढ्या नोकऱ्या सरकार आणणार कुठून? आणि सरकारी नोकऱ्यांमधून बेरोजगारीचा खरा प्रश्न सुटेल का? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
6/15/20226 minutes, 43 seconds
Episode Artwork

नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे? BBC News Marathi

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची दोन दिवस चौकशी झाली. वर्तमानपत्राची 2000 कोटी रुपये किमतीची मालमत्ता चुकीच्या पद्धतीने आपल्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर काँग्रेसनं राजकीय सूडबुद्धीने गांधी कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केलाय. 2012मध्ये समोर आलेलं हे नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
6/14/20226 minutes, 35 seconds
Episode Artwork

परवेझ मुशर्रफ यांना नेमका काय आजार झालाय? BBC News Marathi

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या मृत्यूबद्दल काही दिवसांपूर्वी अफवा पसरली होती. शेवटी त्यांच्या कुटुंबीयांनी एक पत्रक काढून ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर मुशर्रफ यांना नेमकं काय झालंय याचीही माहिती दिली. मुशर्रफ यांना बरा न होण्यासारखा एक दुर्धर आजार झालाय अँमीलॉयडॉसिस. हा आजार अमेरिकेतही दोन लाख लोकांमागे एखाद्यालाच होतो. असा हा दुर्मीळ आजार नेमका काय आहे आणि परवेझ मुशर्रफ सध्या कसे आणि कुठे आहेत जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
6/13/20226 minutes, 6 seconds
Episode Artwork

UPI मधून क्रेडिट कार्डचे पैसे खर्च करण्यात तुमचा फायदा आहे का? BBC News Marathi

आपला फोन वापरून UPI च्या माध्यमातून तुम्ही आपल्या बँक अकाउंटमधले पैसे खर्च करत असाल. पण आपल्याकडे नसलेले पैसे खर्च करायचे असले तर? म्हणजे क्रेडिट कार्डवरचे पैसे तुम्ही UPI मधून खर्च करू शकलात तर? Reserve Bank ने तशी घोषणा केलीय. पण यामुळे काय साध्य होणार आहे? यातून तुमचा फायदा होईल का? संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
6/10/20224 minutes, 37 seconds
Episode Artwork

राज्य सभा निवडणूक कशी होते? मतदानाची प्रक्रिया काय असते? BBC News Marathi

राज्यसभेच्या निवडणुकांकडे आपलं सहसा लक्ष तजात नाही. पण यावेळी महाराष्ट्रात होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत आणि दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केलाय. राज्यसभा निवडणुकीचं गणित अत्यंत किचकट असतं. हे खासदार कसे निवडले जातात? पाहा ही सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - शरद बढे
6/8/20227 minutes, 7 seconds
Episode Artwork

प्रेषित पैगंबरांचं चित्र का दाखवलं जात नाही? BBC News Marathi

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित पैगंबराबद्दल काही उद्गार काढले आणि मोठा वाद झाला. पैगंबरांबद्दल बरंच काही लिहीलं गेलंय. पण त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती कधीच का पाहायला मिळत नाही? इस्लाममध्ये अल्लाह आणि प्रेषितांच्या प्रतिमा रेखाटण्यावर बंदी आहे का? जेव्हा जेव्हा अशाप्रकारे प्रेषितांच्या प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इतकी तीव्र प्रतिक्रिया का उमटली? पाहा ही सोपी गोष्ट संशोधन - जॉन मॅकमेनॉस, संकलन – जान्हवी मुळे लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
6/7/20225 minutes, 34 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट - नुपूर शर्मा आणि प्रेषित पैगंबर प्रकरणात भारताने मुस्लीम देशांपुढे नमतं का घेतलं?

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये प्रेषित पैगंबराबद्दल काही वादग्रस्त उद्गार काढले. यावरून अरब, आखाती आणि हळुहळू अनेक मुस्लीम देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपने या प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली पण अजूनही टीका थांबलेली नाही. प्रश्न हा आहे की भारतातून प्रतिक्रिया उमटली तेव्हा भाजपने कारवाई केली नाही, पण मुस्लीम देशांच्या विरोधानंतर चक्रं फिरली. असं का झालं? पाहा ही सोपी गोष्ट संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
6/7/20226 minutes, 11 seconds
Episode Artwork

UFO किंवा उडती तबकडी खरंच अस्तित्वात आहे का? सोपी गोष्ट | BBC News Marathi

कोल्हापूरमध्ये मध्यंतरी आकाशात पांढऱ्या रंगाची एक गूढ वस्तू तरंगताना दिसली होती. ही उडती तबकडी असल्याच्या चर्चाही तेव्हा झाल्या. त्याचवेळी अमेरिकेत सर्वोच्च स्तरावर एक संशोधनही सुरू होतं, ते म्हणजे उडत्या तबकड्या किंवा UFOच्या अस्तित्वावर…या संशोधनातून नेमकं काय बाहेर आलं? खरंच उडत्या तबकड्या जगात आहेत का? त्या परग्रहावरून येतात का, पाहूया सोपी गोष्टमध्ये…. लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
6/3/20226 minutes, 10 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बनावट नोटांचं प्रमाण दुपटीने का वाढलं?

रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षं 2021-22 मध्ये देशात बनावट नोटांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे बनावट चलन कसं पसरलं? खोट्या नोटा कशा ओळखायच्या आणि त्यांचा एवढा सुळसुळाट झालाय, संशोधन – ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61667088
6/2/20225 minutes, 58 seconds
Episode Artwork

काश्मिरात पुन्हा हत्यांचं सत्र सुरू झालंय का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

अवघ्या दोन आठवड्यांत दोन काश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. असं नेमकं का होतंय? काश्मीर पोलीस सांगतायत की दहशतवादी संघटना हे हल्ले करतायत, पण स्थानिक नेत्यांनुसार भाजपचं राजकारण आणि अगदी काश्मीर फाईल्स या सिनेमानेही काश्मीरमधलं वातावरण चिघळवलंय. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
6/1/20224 minutes, 50 seconds
Episode Artwork

पुतिन यांचा खरंच मृत्यू झाला आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

ब्रिटिश गुप्तहेर संघटना एमआयसिक्सच्या एका सूत्राने ब्रिटिश मीडियाला मुलाखत देऊन व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली आहे. पुतिन यांच्या मृत्यूची अफवा पसरण्याची ही खरंतर पहिलीच वेळ नाही. पण, यावेळी एका देशाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनं तशी शक्यता व्यक्त केलीय. पण, यात कितपत तथ्य आहे. आणि युद्धाच्या वेळी अशा बातम्या का आणि कशा पसरवल्या जातात? लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - शरद पवार
5/31/20225 minutes, 47 seconds
Episode Artwork

आधार कार्ड मास्क वापरून सुरक्षितता जपू शकाल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

आधार कार्डाच्या सुरक्षिततेवरून पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. आधार प्राधिकरणाने 27 मेला एक पत्रक काढून हॉटेल, मॉल अशा खाजगी संस्थांना आधारची प्रत देऊ नका, अशा सूचना ग्राहकांना केल्या. त्यावरून भरपूर टीका झाल्यावर हे पत्रकही मागे घेतलं. आधारच्या प्रती जोडणं का धोकादायक आहे. त्यामुळे खरंच सुरक्षितता धोक्यात येते का आपल्या आधारमधील माहितीची सुरक्षितता कशी जपायची पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
5/31/20225 minutes, 23 seconds
Episode Artwork

कुतुब मिनारच्या जागी पाडलेली हिंदू, जैन मंदिरं पुन्हा उभारण्याची मागणी का होतेय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

ताज महाल, ज्ञानवापी मशीद यांच्यावरून वाद होत असतानाच आता त्यात कुतुब मिनारचीही भर पडली आहे. कुतुब मिनारच्या परिसरात प्रार्थना करण्याची, तसंच इथली पाडलेली जैन आणि हिंदू मंदिरं पुन्हा उभारण्याची विनंती काहींनी कोर्टाला केली आहे. कुतुब मिनार नेमका कुणी बांधला? तो कसा बांधला? संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
5/27/20224 minutes, 51 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट - नरेंद्र मोदींच्या या 8 निर्णयांनी अच्छे दिन आणले का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

गेल्या 8 वर्षांत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. या निर्णयांनी ‘अच्छे दिन’ आणले का? त्यांचा तुमच्या आमच्यावर कसा परिणाम झाला? पंतप्रधान म्हणून मोदींच्या 8 वर्षांच्या कारकीर्दीतील 8 मोठ्या निर्णयांचा हा आढावा. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
5/26/20227 minutes, 35 seconds
Episode Artwork

अमेरिकेत बंदुका सहज का मिळतात? हा हिंसाचार कसा थांबवता येईल? सोपी गोष्ट पॉडकास्ट

8 वर्षांच्या एका मुलाने अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात एका प्राथमिक शाळेवर हल्ला केला आणि त्यात 19 मुलांचा आणि 2 जणांचा मृत्यू झाला. ज्या वयात आपल्याकडे गिअरच्या गाडीचं पक्कं लायसन्स मिळतं त्या वयात या मुलाकडे रायफल आली कुठून? उघडपणे बंदुका बाळगण्याचं स्वातंत्र्य अमेरिकेत का आहे? संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
5/26/20226 minutes, 45 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मंकीपॉक्स आजार काय आहे?

युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात सध्या मंकीपॉक्स या आजाराची चर्चा आहे. कांजिण्या आणि देवी रोगासारखं पुरळ अंगभर उठतं आणि जोडीला ताप आणि सांधेदुखीमुळे लोक हैराण होतात. भारतातही मंकीपॉक्सचा धोका आहे का? त्याची प्राथमिक लक्षणं काय आहेत, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
5/21/20225 minutes, 29 seconds
Episode Artwork

मंकीपॉक्स आजार काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात सध्या मंकीपॉक्स या आजाराची चर्चा आहे. कांजिण्या आणि देवी रोगासारखं पुरळ अंगभर उठतं आणि जोडीला ताप आणि सांधेदुखीमुळे लोक हैराण होतात. भारतातही मंकीपॉक्सचा धोका आहे का? त्याची प्राथमिक लक्षणं काय आहेत, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
5/20/20225 minutes, 29 seconds
Episode Artwork

राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका झाली कारण | सोपी गोष्ट पॉडकास्ट

21 मे 1991 रोजी राजीव गांधींची तामिळनाडूत निवडणूक प्रचारादरम्यान हत्या झाली होती. त्यांच्या मारेकऱ्याला अलिकडेच सुप्रीम कोर्टाने दोषमुक्त केलं. या प्रकरणाची ही सोपी गोष्ट.
5/19/20225 minutes, 17 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट - ‘या’ घटस्फोट खटल्याची जगभरात चर्चा का होतेय?

‘जॉनी डेपला कोकेन आणि दारूचं व्यसन होतं. तो मला मारहाण करायचा आणि गायब व्हायचा.’ असा आरोप अभिनेत्री अँबर हर्डनं केला आहे. ‘अँबर कधीकधी थोबाडीत मारायची, कधी टीव्हीचा रिमोट फेकून मारायचr,कधी वाईन फेकायची असा हिंसक स्वभाव तिचा होता.’ असा आरोप अभिनेता जॉनी डेपने केला आहे.
5/18/20225 minutes, 30 seconds
Episode Artwork

प्रार्थना स्थळांचा कायदा काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

देशात प्रार्थना स्थळांवरून नवीन वाद निर्माण होऊ नयेत यासाठी 1991मध्ये केंद्रसरकारने प्रार्थना स्थळांविषयीचा कायदा अस्तित्वात आणला. आताही ज्ञानवापी मशिदीच्या निकालादरम्यान हा कायदा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्या निमित्ताने हा कायदा नेमका काय आहे, आणि बदलत्या काळात त्याचं महत्त्व काय जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
5/17/20225 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: गहू निर्यात बंदीमुळे गव्हाचे दर कमी होतील का?

भारताने नुकतीच गव्हाच्या निर्यातीवर तात्पुरती बंदी घातली आहे. देशात गहू आणि एकूणच अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत. त्या आटोक्यात आणण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं केंद्रसरकारने म्हटलंय. पण, त्याचा किती उपयोग होईल. आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही का? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन, लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
5/17/20225 minutes, 54 seconds
Episode Artwork

आकाशगंगेच्या ब्लॅक होलचा फोटो काय गूढ उकलणार? सोपी गोष्ट पॉडकास्ट

आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक महाकाय कृष्णविवर आहे. त्याचं नाव Sagitarrius A. त्याचा पहिला फोटो शास्त्रज्ञांनी अपार मेहनतीने मिळवला आहे. त्यातून आपल्याला काय नवीन माहिती मिळेल? संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
5/13/20225 minutes, 6 seconds
Episode Artwork

ताज महाल की तेजोमहालय? 22 बंद खोल्यांचं गूढ काय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

शाहजहानने आपल्या मृत पत्नीसाठी बांधलेला हा महाल एका शिवमंदिराच्या जागेवर उभाय का? 1631 ते 1653 या काळात संपूर्ण ताज महालाचा परिसर उभा राहिला. ज्या 22 खोल्या बंद आहेत त्या उघडून तिथे असलेल्या मूर्ती आणि शिलालेखांचा शोध घ्यायला कोर्टाने पुरातत्व विभागाला सांगावं अशी याचिका अलाहाबाद हाय कोर्टात दाखल केली गेली. कोर्टाने मात्र ही याचिका फेटाळून लावली आहे. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
5/12/20224 minutes, 47 seconds
Episode Artwork

ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिर पाडून उभारली होती का?

वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या भीतींवर हिंदू मूर्ती आहेत आणि तिथे प्रार्थना करण्याची परवानगी मिळाली अशी याचिका दिल्लीतल्या पाच महिलांनी केली आहे. यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. बाबरीप्रमाणेच ज्ञानवापी मशिदीचाही वाद आहे का? औरंगजेबाने विश्वनाथ मंदिर पाडून तिथे मशीद बांधली असं म्हणतात यात किती तथ्य आहे? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
5/11/20224 minutes, 51 seconds
Episode Artwork

रुपयाची घसरण नरेंद्र मोदी सरकार थांबवू शकतं का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे भाव गडगडले. रुपयाने आजवरची निचांकी पातळी गाठली. रुपया स्वस्त झाल्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल? येत्या काळात रुपया पुन्हा वधारेल का? संशोधन – सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
5/10/20225 minutes, 24 seconds
Episode Artwork

भारताचे कोरोना मृतांचे आकडे मोदी सरकारने कमी दाखवले की WHO ने फुगवले? सोपी गोष्ट पॉडकास्ट

कोव्हिडमुळे भारतात 47 लाख मृत्यू झाले असं WHO चा अहवाल सांगतो. भारताने हा आकडा पावणे पाच लाखांच्या घरात म्हटलाय. WHO ची आकडेवारी आणि ती मोजण्याची पद्धत विश्वास ठेवण्यालायक नाही अशीही टीका केलीय. प्रश्न हा आहे की भारताचे कोव्हिड मृत्यू मोदी सरकारने लपवले की WHO ने फुगवले? पाहणार आहोत आजची सोपी गोष्ट लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
5/6/20226 minutes, 31 seconds
Episode Artwork

रेपो दरवाढीचे आपल्यावर होणारे ‘पाच’ परिणाम | सोपी गोष्ट पॉडकास्ट

अखेर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 40 अंकांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी हे पाऊल बँकेला उचलावं लागलं. येणारा काळ आणखी मोठ्या व्याजदर वाढीचा असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशावेळी सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया रेपो दर वाढल्यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
5/6/20226 minutes, 54 seconds
Episode Artwork

गर्भपाताचा निर्णय कुणाच्या हातात हवा? सोपी गोष्ट पॉडकास्ट

गर्भपात करण्याचा अधिकार किंवा हक्क महिलांना असावा का, यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. निमित्त आहे अमेरिकेत फुटलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या ड्राफ्टचा. तिथे न्यायालयाने आपला निकाल अजून दिलेला नाही. पण, हा ड्राफ्ट तशाच्या तशा अंमलात आला तर अमेरिकन महिलेला असलेला हा अधिकार काढून घेतला जाईल. भारतातही गर्भपात कायदा अस्तित्वात आहे. पण, त्यात निर्णयाचं किती स्वातंत्र्य महिलांना आहे हा प्रश्नच आहे. सोपी गोष्टमध्ये याच मुद्यावर चर्चा करूया… संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
5/4/20226 minutes, 7 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: LICIPO मध्ये गुंतवणूक कशी करावी?

एलआयसीचा बहुचर्चित आयपीओ येत्या चार तारखेपासून बाजारात येत आहे. भारतातील आतापर्यंतची हा सगळ्यात मोठा आयपीओ असला तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे आर्थिक अस्थिरता वाढलेली असताना एलआयसी कंपनी शेअर बाजारात उतरत आहे. अशावेळी या आयपीओमध्ये सहभागी व्हावं का? गुंतवणुकीची रणनिती नेमकी काय असावी, आज बघूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
5/3/20225 minutes, 46 seconds
Episode Artwork

प्रमोद महाजन यांची भाऊ प्रवीण कडून हत्या झाली तेव्हा काय घडलं? सोपी गोष्ट पॉडकास्ट

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या मृत्युला आता सोळा वर्षं झाली. पण, अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत - त्यांचाच लहान भाऊ प्रवीणने त्यांची हत्या का केली? प्रवीण महाजन यांनी तुरुंगातून लिहिलेलं पुस्तक ‘माझा अल्बम’ आणि खटल्या दरम्यान कोर्टात नोंदवण्यात आलेल्या साक्षी यांच्या आधाराने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
5/3/20225 minutes, 31 seconds
Episode Artwork

कोकाकोलामध्ये खरंच पूर्वी कोकेन होतं का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क पुढची कोणती कंपनी घेणार, याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी एक ट्वीट करून सांगितलंय की, "मी कोका कोला विकत घेणार आणि त्यात पुन्हा कोकेन टाकणार." ते पुन्हा म्हणतायत तर याचा अर्थ कोका कोलामध्ये याआधी कोकेन किंवा इतर कुठले ड्रग्स वापरले जायचे का? त्यामुळेच आपल्याला कोका कोला एवढं आवडतं का? कोका कोलाची जी आजवरची सिक्रेट रेसिपी आहे, त्यात खरंच काही अमली पदार्थ असतात का? किंवा होते का? याचबद्दल पाहू या आजची ही सोपी गोष्ट. संशोधन - अनघा पाठक लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
5/3/20227 minutes, 41 seconds
Episode Artwork

नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे? कोणत्या सरकारमुळे पेट्रोल महागलंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केली, पण काही राज्यांनी व्हॅट कमी न केल्यामुळे पेट्रोलचे भाव जास्त आहेत, असं मोदी म्हणतायत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींच्या वक्तव्यावर जोरदार टीका केलीय. ते म्हणतात की पंतप्रधान चुकीची माहिती पसरवतायत. खरं कुणाचं? पेट्रोल, डिझेलच्या किमती कुणामुळे कमी होत नाहीयत? संशोधन, लेखन – सिद्धनाथ गानू निवेदन – विशाखा निकम एडिटिंग – निलेश भोसले
4/28/20226 minutes, 14 seconds
Episode Artwork

पाम तेलाचा तुटवडा, म्हणजे महागाई पुन्हा वाढणार? सोपी गोष्ट पॉडकास्ट

महागाईचा भडका उडालाय, हे आपण रोज बातम्यांमध्ये ऐकतो, वाचतो. पण हे किती शब्दशः खरं आहे बघा ना. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत, खाण्या पिण्याच्या वस्तूंचे भाव वाढलेत आणि या आगीत आता आणखी तेल ओतलं जाईल की काय, अशी भीती आहे. खायच्या तेलाचे भाव किलोमागे 3 ते 5 रुपयांनी वाढतील, अशी चिन्हं आहेत. याचं कारण म्हणजे आपल्याकडे आयात होणाऱ्या पाम तेलाची आवक कमी होऊ शकते. इंडोनेशियाने तिथून निर्यात होणाऱ्या पाम तेलावर कडक निर्बंध लादलेत. आता पुढे काय होणारे? फक्त खायचं तेल महागेल की आणखीही काही? भारताने गेल्या वर्षी मिशन पाम तेल सुरू केलं होतं त्याचं काय झालं? पाहणार आहोत आजची सोपी गोष्ट संशोधन / लेखन - सिद्धनाथ गानू आवाज - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
4/27/20225 minutes
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलॉन मस्कनी ट्विटर विकत घेतलं, आता पुढे काय?

इलॉन मस्कनी ट्विटर विकत घेतलं. मुक्त अभिव्यक्तीचा पुरस्कार करणारे मस्क आता लोकांना ट्विटरवर वाटेल ते बोलण्याची मुभा देतील का? सगळे निर्बंध उठवले जातील का? मस्कच्या मालकीचं ट्विटर पूर्वीपेक्षा वेगळं असेल का? संशोधन, लेखन - सिद्धनाथ गानू निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - निलेश भोसले
4/27/20225 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : फ्रान्समध्ये ‘मुस्लीविरोधी’ नेत्याला मॅक्रॉन यांनी कसं हरवलं?

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मरीन ल पेन यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पेन यांच्या भूमिका मुस्लीमविरोधी असल्याची टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती. मॅक्रॉन यांनी महागाईचा फटका बसू न देता उजव्या आणि डाव्या दोन्ही विचारसरणींच्या पक्षांचा पराभव कसा केला? पाहा ही सोपी गोष्ट. संशोधन, लेखन – सिद्धनाथ गानू निवेदन – ऋजुता लुकतुके एडिटिंग – निलेश भोसले
4/25/20224 minutes, 41 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: राज ठाकरे बाळासाहेबांचं अनुकरण करत आहेत का?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि त्यांची वक्तव्ये चर्चेत आहेत. राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमागचं नेमकं कारण काय आहे आणि राज ठाकरे यांची वाटचाल बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने सुरू आहे का? त्याचे नेमके परिणाम काय असू शकतात? संशोधन – हर्षल आकुडे निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
4/19/20225 minutes, 14 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : मोदी सरकार तुमच्या खासगी माहितीवर CPC द्वारा गदा आणतंय का?

लोकसभेनं संमत केलेल्या द क्रिमिनिल प्रोसिजर (आयडेंटिफिकेशन) या विधेयकावरून वाद सुरू आहे. पण हा कायदा बेकायदेशीर असल्याचा आणि त्यामुळे नागरीकांच्या खासगीपणाच्या हक्कावर गदा येत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर सरकारचं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्था, गुन्ह्यांचा तपास आणि खटल्यांचा वेगानं निकाल लागण्यात यानं मदत होईल. संशोधन – टीम बीबीसी, निवेदन - जान्हवी मुळे, एडिटिंग – अरविंद पारेकर
4/18/20225 minutes, 13 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जेम्स लेन यांच्या पुस्तकाचा वाद पुन्हा का सुरू झाला?

13 फेब्रुवारी 2003 या दिवशी ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एक पुस्तक प्रकाशित केलं आणि महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले. पुस्तकाचं नावं होतं - शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया आणि लेखक होते अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन. जेम्स लेन कोण आहेत? शिवाजी महाराजांवर त्यांनी काय लिहिलं, ज्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण बदललं? राज ठाकरेंनी हा मुद्दा पुन्हा का काढलाय? या सगळ्या उत्तरांसाठी पाहा आजची सोपी गोष्ट. संशोधन – ओंकार करंबेळकर निवेदन - विशाखा निकम एडिटिंग – अरविंद पारेकर
4/15/20225 minutes, 4 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अझान आणि मशिदीतल्या भोंग्याविषयी नियम काय सांगतात?

लाऊडस्पीकरवरून दिली जाणारी अझान हा केवळ भारतातच नाही तर अगदी काही मुस्लिम देशांतही वादाचा विषय ठरला आहे. धार्मिक स्थळी ध्वनिक्षेपक किंवा कुठलीही साऊंड सिस्टिम वापरण्याविषयी भारतातले नियम काय सांगतात? संशोधन – जान्हवी मुळे, दीपाली जगताप निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
4/13/20225 minutes, 37 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ब्राह्मणांनी मांसाहार का आणि कधी सोडला?

दिल्लीत राम नवमी आणि चैत्र नवरात्रीत मांसाहारावर बंदीच्या मुद्द्यावरून वाद रंगला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तर मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्षही झाला. पण शाकाहारी हिंदू किंवा जैन विरुद्ध मांसाहारी मुस्लीम, अशी भारतीय खाद्यसंस्कृतीची विभागणी करता येत नाही आणि सगळेच हिंदू शाकाहारी आहेत असंही नाही. संशोधन – अपर्णा अल्लूरी, जान्हवी मुळे निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
4/13/20225 minutes, 40 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात सैन्यभरती का थांबली आहे आणि लष्करकपात का होऊ शकते?

14 लाख कर्मचारी असलेलं भारतीय सैन्य हे रोजगारनिर्मितीच्या बाबतीत देशातच नाही तर जगातही आघाडीच्या संस्थापैकी एक आहे. लष्करातली नोकरी अभिमानाची आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यानं मोठ्या प्रमाणात भारतीय तरूण सैन्यात जायला उत्सुकही असतात. पण गेली दोन वर्ष सैन्यभरतीच झालेली नाही. संशोधन – सौतिक बिस्वास निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
4/11/20224 minutes, 44 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : राजपक्षे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे देश डबघाईला आल्याचा आरोप का होतोय?

श्रीलंकेतल्या आर्थिक परिस्थितीच्या विरोधात श्रीलंकेत निदर्शनं झाही. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षेंनी आणीबाणी लावली आणि नंतर आणखी निदर्शनांनंतर ती उठवलीही. याचा राजकीय फटकाही त्यांना आणि पक्षाला बसला कारण अर्थमंत्र्यांसह या मंत्रिमंडळातल्या अनेकांनी राजीनामा दिला. अनेक स्थानिक श्रीलंकन या परिस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि एकूणच राजपक्षे कुटुंबाला दोषी धरतायत. राजपक्षे कुटुंबातलं कोण-कोण या सरकारमध्ये कोणत्या पदावर आहे, किंवा होतं...आणि या सगळ्याचा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालाय? संशोधन : हर्षल आकुडे लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : अरविंद पारेकर
4/8/20225 minutes, 11 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये फार आघाडी का घेता आली नाही?

रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारीला हल्ला केला. या युद्धाला आता 44 दिवस झाले आहेत. पण इतक्या दिवसांच्या संघर्षानंतरही रशियाला युक्रेनमध्ये आतपर्यंत शिरता आलेलं नाही. रशियाच्या तुलनेत लहान असणाऱ्या युक्रेनवर वरचढ ठरणं रशियाला इतकं कठीण का गेलं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : अरविंद पारेकर
4/8/20226 minutes, 10 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : भाजपच्या स्थापनेला होता मुस्लीम प्रमुख पाहुणा

गेल्या चार दशकांत भारतीय जनता पक्षानं भारतीय राजकारणात प्रमुख राजकीय पक्ष म्हणून आपलं स्थान बळकट केलं आहे. पण या पक्षाची स्थापना कशी झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उदरातून जन्मलेला जनसंघ आणि जनसंघाच्या कुशीची उब आणि जनता पार्टीतली घुसळण या दोहोंतून भाजपचा जन्म झाला, असपण इतकंच सांगावं, इतकाच काही मर्यादित इतिहास नाही. संशोधन - नामदेव काटकर निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर
4/6/20225 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले जातात, कारण...

देशात भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या सर्वाधिक केसेस कर्नाटकात नाही, तर महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्या आहेत. यामागे काय कारणं असावीत? संशोधन – जान्हवी मुळे, मेधावी अरोरा निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
4/5/20225 minutes, 21 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पाकिस्तानचा पंतप्रधान 5 वर्षं पदावर का टिकत नाही?

पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून, म्हणजे 1947 पासून आजपर्यंत तिथे कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाहीये. भारतात नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदींसारखे नेते कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुन्हा निवडून आले, तेव्हा शेजारच्या देशात हे का होऊ शकलं नाही? बीबीसी मराठीवर पाहूया सोपी गोष्ट क्रमांक 569 मध्ये.
4/4/20224 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार अमेरिका किंवा रशियापैकी एका देशाची बाजू घेईल?

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारताने अत्यंत सावध भूमिका घेतलीय. आपण संयुक्त राष्ट्रांमधल्या प्रस्तावांवर कोणत्याच बाजूने मत दिलेलं नाही. आपण रशियाची उघडपणे निंदा केली नाही, पण युक्रेनलाही निराश केलं नाही. रशिया आणि अमेरिका जगातल्या विविध राष्ट्रांना आपापल्या बाजूने वळवू पाहतायत. भारत ही तारेवरची कसरत कशी पार पाडेल? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन,लेखन,निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
4/1/20225 minutes, 27 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत का वाढतायत?

गेले 9 दिवस देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ होताना आपण पाहातोय. कधी 50 पैसे तर कधी 75 पैसे तर कधी काही रुपयांमध्येही ही वाढ होतेय. पण गेल्या 9 दिवसांत 8 वेळा ही वाढ का झालीये? एकीकडे रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे देशांतर्गत कारणं यामुळे या किंमतीत वाढ होतेय का? संशोधन, लेखन, निवेदन – ओंकार करंबेळकर एडिटिंग – अरविंद पारेकर
3/30/20225 minutes, 35 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: हिंदूंना भारतातल्या काही राज्यांमध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळू शकतो का?

सध्या सर्वोच्च न्यायालयात एका देशांतल्या काही राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या याचिकेवर सुनावणी चालू आहे. आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत असं २०११ ची जनगणना सांगते. मग हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा अधिकार कोणाचा? केंद्र सरकारचा की राज्यांचा? या विषयावर ही सोपी गोष्ट.
3/29/20227 minutes, 25 seconds
Episode Artwork

काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी जबाबदार कोण? काँग्रेस, भाजप की इतर कुणी? सोपी गोष्ट पॉडकास्ट

1990 मध्ये काश्मीर खोऱ्यातून पंडितांनी पलायन केलं. यासाठी नेमकं जबाबदार कोण होतं? भाजपच्या पाठिंब्यावर तेव्हा व्ही. पी. सिंह केंद्रात सत्तेत होते, पण काश्मिरातली परिस्थिती ही काही एका वर्षाचा परिणाम नव्हती. या सगळ्या घटनांमागे काय पार्श्वभूमी होती? संशोधन, लेखन, निवेदन - मयुरेश कोण्णूर एडिटिंग - अरविंद पारेकर
3/28/20229 minutes, 2 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : श्रीलंकेत महागाई इतकी का भडकली आहे?

महागाईचा प्रश्न भारतात त्रास देतो आहेच, पण श्रीलंकेत परिस्थिती इतकी गंभीर आहे की गेल्या एका आठवड्यात 16 श्रीलंकन नागरिक पळ काढून भारतात आलेत. ते आता तामिळनाडूत पोलिसांच्या ताब्यात आहेत. आपल्या शेजाऱ्यावर इतकी वाईट परिस्थिती कशी ओढवली? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
3/25/20225 minutes, 51 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार का होतो?

पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात जो हिंसाचार घडला त्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर संशयित हल्लेखोरांच्या घरांना आग लावली गेली. एका घरात 8 लोक असताना त्यांचं घर जाळलं गेलं. सहा महिला आणि 2 मुलांचा जळून मृत्यू झाला. बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचा इतिहास आहे. काय आहे हा प्रकार? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
3/24/20227 minutes, 9 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : उद्धव ठाकरेंप्रमाणे नातेवाईकांमुळे अडचणीत आलेले मुख्यमंत्री कोण?

मेव्हण्यांवर ईडीचे छापे पडले आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी व्हायला लागली. यापूर्वी महाराष्ट्राचे दोन मुख्यमंत्री त्यांच्या नातेवाईकांसंबंधीच्या प्रकरणांमुळे आपल्या पदावरून पायउतार झालेले आहेत. ही प्रकरणं काय होती? कोण होते हे मुख्यमंत्री? पाहा. संशोधन – नीलेश धोत्रे लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
3/24/20224 minutes, 38 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : व्लादीमीर पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय?

व्लादीमीर पुतीन युक्रेन आक्रमणाबद्दल नेमका काय विचार करतायत यावर अवलंबून आहे की हे युद्ध कसं आणि कधी संपेल. पुतीन म्हणतायत की हे आक्रमण रशियाने नाही, युक्रेनने सुरू केलं. पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? जगभरातले गुप्तहेर याची उकल करण्याचा प्रयत्न करतायत. या गुप्तहेरांना काय सापडलं? संशोधन - गॉर्डन कॉरेरा लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
3/22/20226 minutes, 18 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आशा सेविकांना किटमध्ये रबरी लिंग देण्यावरून वाद का झाला?

आशा सेविकांना कुटुंब नियोजन आणि लैंगिक आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी जी किट्स दिली जातात त्यात एक रबरी लिंग देण्यात येण्यावरून वाद झाला आहे. अशाप्रकारची मॉडेल्स वापरणं आशा सेविकांना अवघडल्यासारखं करू शकतं असा काहींचा दावा आहे तर मुळात यात नवीन काही नसून यापूर्वीही अशाप्रकारची मॉडेल्स वापरली जात होती असं प्रशासन आणि काही आशा सेविकांनी सांगितलं आहे. काय आहे हा वाद? संशोधन – बीबीसी मराठी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
3/22/20226 minutes, 22 seconds
Episode Artwork

गोड पदार्थ, साखर खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडतं का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

साखर सोडली की आरोग्य सुधारतं असा अनेकांचा समज आहे. अनेक लोक साखरेला आपला शत्रू मानतात. निरोगी राहण्यासाठी साखरेचा त्याग करायला हवा का? साखर खाल्ल्यामुळे आजार होतात का? तज्ज्ञ काय सांगतात? ऐका आजची सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
3/18/20225 minutes, 39 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अजित पवारांनी अर्थसंकल्पात शिवसेनेला कमी वाटा दिला का?

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी शिवसेनेला सर्वांत कमी वाटा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र भरभरून बजेट मिळालं असा दावा देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत चर्चेदरम्यान केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीवाटपावरून कुरबूर का आहे? याचे काय परिणाम होतील? संशोधन - दीपाली जगताप लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
3/18/20225 minutes, 38 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : – काश्मीरमध्ये ‘या’ 5 कट्टरतावादी संघटनांनी पसरवला होता हिंसाचार

काश्मिरी पंडितांचा मुद्दा सध्या चर्चिला जातोय. त्यांना काश्मिरातून पलायन करायला भाग पाडण्यात कोणत्या संघटनांचा हात होता? काश्मिरी पंडितांविरुद्ध हिंसाचार कुणी घडवून आणला होता? काश्मिरमध्ये हिंसाचार करणाऱ्या या 5 कट्टरतावादी संघटनांबद्दल जाणून घ्या. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
3/16/20226 minutes, 19 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: उष्माघात म्हणजे काय? तो कसा टाळायचा?

मुंबईत पारा चढलाय. मुंबईकरांना उन्हाचे चांगलेच चटके जाणवतायत. अशावेळी उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोकचीही भीती असते. हे काय असतं? त्यापासून कसं वाचायचं? पाहा ही सोपी गोष्ट.
3/16/20226 minutes, 11 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: काश्मिरी पंडितांचं पलायन कसं झालं होतं?

19 जानेवारी 1990 हा दिवस काश्मिरी पंडितांसाठी खूप वेदनादायी आहे. यात दिवशी काश्मिरातून पंडितांचं पलायन सुरू झालं. पाकिस्तानधार्जिण्या घोषणा आणि हिंदूंना धमकवणाऱ्या घोषणांचा जोर वाढत असताना जीव मुठीत धरून अनेक काश्मिरी हिंदू कुटुंबं काश्मीर खोरं सोडून गेली. हे सगळं का आणि कसं झालं? सोपी गोष्टच्या या भागातून जाणून घ्या. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
3/14/20225 minutes, 28 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट – अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचा अर्थ 7 सोप्या मुद्द्यांत

महाराष्ट्राचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला. महाराष्ट्राला 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अनेक घोषणा केल्या. काही जुन्या, काही नव्या. या अर्थसंकल्पाचा अर्थ आणि त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम जाणून घ्या 7 सोप्या मुद्द्यांमध्ये. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
3/11/20228 minutes, 2 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट – गिरीश महाजन यांचं जळगाव प्रकरण काय आहे?

भाजप नेत्यांना संपवण्यासाठी राज्य सरकारने कट केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्या एका जुन्या प्रकरणात मकोका लावण्यासाठी राज्य सरकारने वकिलांना हाताशी धरून कट रचला असा फडणवीसांचा आरोप आहे. पण हे मूळ प्रकरण काय होतं? संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
3/10/20226 minutes, 4 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट - झुंड, पावनखिंड चित्रपटांवरून जातीय वाद का झाला?

गंगूबाई काठियावाडी, झुंड आणि पानवखिंड हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात सुरू आहेत. पण त्याचवेळी यांच्याभोवती काही नवीन प्रश्न उभे राहिले. कोणत्या चित्रपटाला पसंती द्यायची यावरून सुरू झालेली चर्चा जातीय अस्मितांवर कशी पोहोचली? बहुजन विरुद्ध अभिजन असं या सगळ्याला स्वरुप का आलं? जाणून घेऊ या सोपी गोष्टच्या या भागातून. संशोधन – जान्हवी मुळे लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
3/10/20225 minutes, 47 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट - अणूबॉम्ब वापरण्याचे अधिकार कुणाकडे असतात?

युक्रेन रशिया युद्धात रशिया अण्वस्त्र वापरेल का ही भीती व्यक्त केली जात आहे. अण्वस्त्र आहेत म्हणून एखाद्या देश ती सहज वापरू शकतो का? जगात असे कोण लोक आहेत ज्यांच्याकडे ती वापरण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या या सोपी गोष्ट मधून. संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
3/8/20227 minutes, 14 seconds
Episode Artwork

राज्य सरकारला राज्यपालांना पदावरून काढण्याचा अधिकार असतो का?

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातलं सख्य जगजाहीर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्घाटनाला, राज्यपालांना आपलं अभिभाषण अर्ध्यात सोडून जावं लागलं. राज्य सरकार राज्यपालांबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रारही देणार आहे. या तक्रारीतून काय साध्य होईल? राज्य सरकारकडे राज्यपालांना पदावरून बाजूला करण्याचा अधिकार आहे का? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
3/4/20224 minutes, 54 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जगात कुठल्या देशांकडे आहेत अण्वस्त्र?

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतीच देशाच्या अण्वस्त्र यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश त्यांना आहेत. पण, ही धमकी आहे की, पुतिन खरंच अण्वस्त्राचा वापर करायला मागे पुढे पाहणार नाहीत. या दोन्ही परिस्थिती या युद्धाचं स्वरुप काय असेल. देशात किती देश आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
3/1/20226 minutes, 53 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : युक्रेन रशिया युद्धाचे तुमच्यावर हे 5 परिणाम होऊ शकतात

युक्रेन आणि रशियात युद्ध भडकलंय. युरोपाबरोबरच सगळ्या जगाचं लक्ष त्याकडे लागलंय. पण इथे भारतात बसून तुमच्या माझ्यावर याचे परिणाम कसे होऊ शकतात? आपला याच्याशी थेट संबंध कसा येणार आहे? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागामधून. संशोधन – सरोज सिंह लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
2/25/20224 minutes, 32 seconds
Episode Artwork

व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन का जिंकायचंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

दोन शेजारी देशांमधल्या कुरबुरी तशा नव्या नाहीत. पण युक्रेन आणि रशियामधला संघर्ष युद्धाच्या शक्यतेपर्यंत पोहोचला आहे. त्यात पुतिन यांनी युक्रेनमधल्या दोनेस्क आणि लुहांस्क या दोन भागांचं स्वातंत्र्य मान्य केलं आहे. तसंच युक्रेन स्वतंत्र राष्ट्र म्हणून कधी अस्तित्वात नव्हताच अशा आशयाचं विधानही त्यांनी केलंय. पुतिन यांच्या मनात युक्रेनविषयी एवढी चीड का आहे? लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
2/24/20224 minutes, 33 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: रशिया ‘या’ तीन मार्गांनी रशियावर हल्ला करू शकतो…

रशियाने युक्रेनमध्ये रणगाडे घुसवल्याचा आरोप करत आता ग्रेट ब्रिटनने रशियावर निर्बंध लादले आहेत. युरोपमध्ये आता खऱ्या अर्थाने युद्धाचे ढग जमू लागले आहेत. रशियाने मात्र आपली भूमिका हल्ला करण्याची नाही हीच ठेवली आहे. पण, त्याचबरोबर युक्रेन सीमेवर दोन लाखांच्या जवळपास सैनिक उभे करत त्यांनी आपली युद्धसज्जताही दाखवून दिली आहे. जर रशियाने खरंच हल्ला केला तर त्यांच्यासमोर कुठले तीन पर्याय आहेत हे युद्ध रणनिती तज्ज्ञांशी बोलून बीबीसीने जाणून घेतलं आहे. पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
2/22/20226 minutes, 48 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: रशिया जगावर महायुद्ध लादत आहे का?

‘रशिया, युरोप आणि जगावर दुसऱ्या महायुद्धानंतरचं मोठं युद्ध लादण्याच्या उंबरठ्यावर आहे,’ असं मोठं विधान ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष झालाच तर तो अख्खं जग व्यापेल अशी भीती पाश्चात्य देशांमध्ये स्पष्ट दिसतेय. नेमकं या दोन देशांमध्ये काय सुरू आहे, युद्ध होईल का, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
2/21/20225 minutes, 55 seconds
Episode Artwork

तुमच्याबद्दल अप्रिय माहिती इंटरनेटवरून डिलिट करता येईल का? । सोपी गोष्ट पॉडकास्ट

‘राईट टू बी फरगॉटन’ म्हणजे विसरण्याच्या अधिकारावर सध्या मीडियामध्ये भरपूर चर्चा होतेय. गोपनीयतेच्या अधिकाराशी मिळताजुळता असा हा प्रकार आहे. तुमच्या बद्दल इंटेरनेटवर उपलब्ध असलेली विशिष्ट जुनी सार्वजनिक माहिती डिलिट करण्याचा हा अधिकार आहे. आणि असा कायदा युरोपीयन देशांमध्ये अस्तित्वातही आहे. अशा कायद्याची आवश्यकता काय आणि भारतात केंद्रसरकारची यावर काय भूमिका आहे आज बघूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - गीता पांडे लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
2/18/20226 minutes, 21 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत खरंच लाहोर काबीज करू शकला असता का?

भारतीय सैन्याकडे एकदा सोडून तीनदा लाहोर जिंकण्याची संधी होती…पण, काँग्रेसनं ती गमावली असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये निवडणूक प्रचारसभे दरम्यान केलं आहे. आता निवडणुकीचा प्रचार आहे म्हटल्यावर हे विधान राजकीयदृष्ट्या प्रेरित असणार हे आपण धरून चालूया. पण, इतिहासाच्या कसोटीवर हे विधान कितपत तग धरू शकतं. ज्या तीन युद्धांचा दाखला मोदींनी दिलाय तेव्हा खरंच भारतीय सैन्य लाहोर काबीज करण्याच्या जवळ होतं का, आणि समजा केलं असतं तर ते टिकवून ठेवू शकलो असतो का, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
2/18/20227 minutes, 11 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: स्लीप ॲप्निया आजार जीवघेणा आहे का?

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचा मृत्यू स्लीप ॲप्नियामुळे झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे. त्यानंतर या आजाराविषयी सगळीकडे कुतुहल निर्माण झालं आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर स्लीप ॲप्निया म्हणजे झोपेत श्वास घ्यायला अडथळा होणं. घोरणं हा ही त्याचाच एक सौम्य परिणाम आहे. पण म्हणजे या आजारामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? स्लीप ॲप्नियाबद्दल जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
2/18/20225 minutes, 47 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: एबीजी शिपयार्ड कंपनीने बँकांना कसं फसवलं?

विजय माल्या, नीरव मोदी यांच्या कर्ज घोटाळ्यालाही मागे टाकेल असा 22,492 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा मागच्या आठवड्यात समोर आला आहे. आणि तो घडवून आणणारे एबीजी शिपयार्ड कंपनीने मालक आणि संचालक देश सोडून फरारही झाले आहेत. हा देशातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बँक घोटाळा मानला जातोय. एबीजी कंपनीने एकूण 28 बँकांची फसवणूक कशी केली, समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
2/18/20227 minutes, 34 seconds
Episode Artwork

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राजकारण का होतंय? | सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या अनधिकृत पुतळ्याचं प्रकरण अजून मिटलेलं नाही. त्यात गेल्या आठवड्यात तिथल्या महापालिका आयुक्तांवरही शाईफेक करण्यात आली. नेमका वाद काय आहे आणि पुतळे उभारण्याविषयीची नियमावली काय सांगते? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – जान्हवी मुळे, नितेश राऊत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
2/15/20225 minutes, 44 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: गौतम अदानींनी अंबानींना कसं मागे टाकलं?

भारतातील आणि आशियातीलही सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण हे ठरवण्यासाठी सध्या गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यामध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे. 29 जानेवारी आणि 8 फेब्रुवारी या दोन दिवशी गौतम अदानी यांनी चक्क मुकेश अंबानी यांना मागेही टाकलं. पण, मुकेश यांनी दुसऱ्याच दिवशी आपली जागा परत मिळवली. मुकेश अंबानी मागची दहा वर्षं आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण, गौतम अदानींनी मागच्या दहा वर्षांत मोठी मजल मारून त्यांना आव्हान दिलं आहे. आज सोपी गोष्टमध्ये पाहूया गौतम अदानींनी मुकेश अंबानींना कसं मागे टाकलं? संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
2/11/20227 minutes, 17 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : हिजाब घालणं हा घटनेने दिलेला अधिकार आहे का?

कर्नाटकच्या दोन शहरांमधून सुरू झालेला वाद आता देशभरात पोहोचलाय. मुलींनी कॉलेजमध्ये हिजाब घालून यायचा की नाही यावरून वादंग पेटलाय. हिजाब घालणं हा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग आहे. पण ते शैक्षणिक संस्थेच्या परिसरात घालण्याचाही अधिकार आहे का? त्यावर निर्बंध घालता येऊ शकतात का? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
2/9/20224 minutes, 54 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यात स्पर्धा होती का?

लता मंगेशकर आणि आशा भोसले, सख्ख्या बहिणी आणि श्रेष्ठ गायिका. एकाच काळात हिंदी, मराठी तसंच विविध भाषांमध्ये संगीत क्षेत्रात दोघी कार्यरत होत्या. पण या दोघींमध्ये स्पर्धा होती का? कधी एकमेकींमुळे संधी हुकली असं घडलं का? संगीत सौजन्य - सारेगामा, सोनी संशोधन – अमृता कदम लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
2/7/20225 minutes, 14 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचं घोडं कुठे अडलंय?

भारत सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी देणार हा प्रश्न गेली काही वर्षं विचारला जातोय. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीने त्यासंर्भातला अहवाल 2013 साली सादर केला. केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने त्यासंदर्भातली शिफारस करणारा अहवाल मोदी सरकारला काही वर्षांपूर्वीच सादर केला. तेव्हापासून हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सरकार सांगत आलंय. मग गोष्टी कुठे अडल्या आहेत? संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
2/4/20226 minutes, 35 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : वाईन पिण्याचा खरंच आरोग्याला फायदा होतो का?

महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाबरोबरच वाईनच्या आरोग्यावर होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांची जोरदार चर्चा सुरू झाली. वाईन पिणं आरोग्याला पोषक की घातक? किती प्रमाणात अल्कोहोल पिणं सुरक्षित असतं? या सगळ्यामागे शास्त्रीय आधार आहे का याची ही सोपी गोष्ट लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
2/3/20226 minutes, 42 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इन्कम टॅक्स स्लॅब न बदलल्याने मध्यमवर्गीयांचं नुकसान झालं का?

तुम्ही नोकरी करत असाल तर बजेटमध्ये तुमची नजर आयकराबद्दलच्या घोषणांवर असेल. इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढतेय का हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल. पण यंदा तसं झालं नाही, खरंतर गेली काही वर्षं ही सवलत मिळालीच नाहीय. यामुळे पगारदारांचं, मध्यमवर्गीयांचं नुकसान झालंय का? विरोधक, सरकार आणि तज्ज्ञ काय म्हणतात? ऐका ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
2/2/20226 minutes, 31 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: बजेटमधील ‘डिजिटल घोषणा’

गेल्यावर्षी निर्मला सीतारमण यांनी सादर केलेलं बजेट पेपरलेस होतं. म्हणजे, नेहमीसारखा कागद आणि फायलींवर पैसा खर्च न करता सगळे मंत्री आणि सभागृहाला चक्क ऑनलाईन कॉपी देण्यात आली. यावर्षीचं बजेट पुन्हा एकदा पेपरलेस तर होतंच. शिवाय ते डिजिटलही होतं असं म्हणावं लागेल. कारण, बँकिंगपासून शेती आणि आरोग्य क्षेत्रातही सरकारने डिजिटल व्यवहारांवर आणि सोयींवर भर द्यायचं ठरवलंय. इतकंच नाही तर देशात पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणाही सरकारने केलीय. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बघूया डिजिटल क्षेत्रात नेमके काय बदल होणारएत. संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
2/1/20225 minutes, 6 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: तरुणांमध्ये बेरोजगारी का वाढतेय?

रेल्वे भरती परिक्षेतील गोंधळामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश बरोबरच देशभरातले विद्यार्थी सध्या चिडलेले आहेत. आधीच कोरोना काळात कमी झालेला रोजगार आणि त्यातच सरकारी भरती प्रक्रियेतल्या गोंधळामुळे तरुणांना संधी गमावाव्या लागत आहेत. त्यातच राष्ट्रीय पातळीवर जाहीर झालेल्या आकडेवारीत डिसेंबर 2020मध्ये देशात बेरोजगारीचा दर आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 7.91% असल्याचं समोर आलं आहे. देशात तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीएत? एकटा कोरोना याला जबाबदार आहे का, पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - सौतिक बिश्वास, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
1/31/20226 minutes, 20 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: रशिया - युक्रेन सीमेवर काय घडतंय?

रशिया आणि यु्क्रेन दरम्यानचा तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच रशियाने युक्रेन सीमेवर तब्बल एक लाख सैनिक तैनात केल्याची बातमी आहे. त्यामुळे सध्या दोघांमध्ये युद्धविराम असला तरी रशिया कुठल्याही क्षणी युक्रेनवर प्रत्यक्ष हल्ला करेल अशी भीती पाश्चात्य देश आणि अमेरिकेला वाटत आहे. रशिया इतका आक्रमक का आहे? पाश्चात्य देश या मुद्यावर रशियाविरोधात का एकवटले आहेत? आणि रशिया-युक्रेन युद्ध झालंच तर जगावर, भारतावर त्याचा काय परिणाम होईल जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - डेव्हिड ब्राऊन, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
1/28/20226 minutes, 30 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अँटीबायोटिक्स घेऊनही लाखो लोक का मरत आहेत?

अँटिबायोटिक्स म्हणजे प्रतीजैविक औषधांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खरंतर क्रांती घडून आली. मलेरिया, न्युमोनिया यासारखे आजार एकेकाळी जीवघेणे ठरत होते. पण, त्यातून लोकांचा जीव वाचला. पण, यात अँटिबायोटिक्सचा जर अतीवापर किंवा गैरवापर झाला तर काय होतं याचा अनुभव आता जग घेतलंय. औषधांची परिणामकारकता कमी होऊन आपलं शरीर रोगांना प्रतिकार करणं थांबवू शकत नाही. त्यामुळे अँटिबायोटिक औषध घेऊनही लोकांचा मृत्यू ओढवतो. २०१९मध्ये जगभरात बारा लाख लोकांचा मृत्यू हा न्युमोनिया किंवा इतर श्वसनाचे विकार यामुळे झाला आहे. अँटिबायोटिक्सच्या अतीवापराचाच हा परिणाम असल्याचं संशोधक मानतात. यावर उपाय काय, पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - फिलिपा रॉक्सबी, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
1/27/20225 minutes, 16 seconds
Episode Artwork

पद्म पुरस्कारांची निवड कशी होते? आजवर कोणी पद्म पुरस्कार नाकारलाय? सोपी गोष्ट पॉडकास्ट 521

पद्म पुरस्कार हे सरकारतर्फे दिले जाणारे नागरी सन्मान आहेत. विविध क्षेत्रांत असमान्य कार्य करणाऱ्या नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात. पण या पद्म पुरस्कारांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? हे का दिले जातात? पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? आणि आजवर कोणी आणि का हे पुरस्कार नाकारले आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : अमृता दुर्वे लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
1/26/20227 minutes, 14 seconds
Episode Artwork

रशिया - युक्रेन तणाव : युरोप गारठण्याशी रशियाचा काय संबंध? | सोपी गोष्ट पॉडकास्ट 520

भर थंडीच्या काळात त्यांच्याकडे ऊर्जा संकट निर्माण झालंय. प्रचंड मागणी असूनही युरोपियन देशांना कमी गॅस पुरवठा होतोय. पुरेसा नैसर्गिक वायू मिळाला नाही तर युरोपातल्या देशांमध्ये ऊर्जा निर्मिती कमी होईल आणि परिणामी लोकांना या थंडीच्या काळात विजेचा तुटवडा भासेल. पण नेमका आताच युरोपात हा ऊर्जा तुटवडा का निर्माण झालाय? आणि याचा रशिया आणि युक्रेनमधल्या तणावाशी काय संबंध आहे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
1/25/20226 minutes, 44 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : गांधीजींचं आवडतं गाणं बीटिंग द रिट्रिट कार्यक्रमातून का वगळलं?

महात्मा गांधींना आवडणाऱ्या इंग्रजी गीताची धून 1950पासून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातल्या ‘बीटिंग द रिट्रिट’ मध्ये सैन्यदलाचं संगीतपथक वाजवत असे. पण 72 वर्षांपासून वाजणारी ही धून या वर्षापासून वाजणार नाही. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही होत आहेत. या गाण्याची आणि वादाची ही सोपी गोष्ट. लेखन/निवेदन - मयुरेश कोण्णूर एडिटिंग - निलेश भोसले
1/25/20228 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अमर जवान ज्योती राष्ट्रीय शहीद स्मारकात विलीन का करण्यात आली?

आता नवीन तयार केलेल्या नॅशनल वॉर मेमोरियलच्या ज्योतीमध्ये अमर जवान ज्योती विलीन करण्यात आली. पण असं का करण्यात आलं? हे करून काय साध्य होतंय? तब्बल 50 वर्षांपासून शहिदांना सलामी देत असलेल्या एका ज्योतीचं महत्त्व कमी केलं जातंय का? याची कारणं ऐतिहासिक आहेत की राजकीय? पाहूया अमर जवान ज्योतीची ही सोपी गोष्ट. लेखन–निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
1/21/20227 minutes, 58 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: या ज्वालामुखीत विनाशकारी उद्रेक का झाला? | सोपी गोष्ट 517

15 जानेवारी 2022 रोजी टोंगामधील बेटावर झालेल्या ज्वालामुखी उद्रेकानंतर विस्फोटाच्या लहरी पॅसिफिक महासागरातच नाही, तर भारतात आणि थेट ब्रिटनमध्येही जाणवल्या. या ज्वालामुखीनं इतका विनाश का केला? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
1/21/20225 minutes, 27 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: या दोन बहि‍णींनी 9 मुलांची हत्या का केली? | सोपी गोष्ट 515

अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी किरण शिंदेच्या साथीनं 13 लहान मुलांचे अपहरण आणि त्यातील 9 मुलांची निघृण हत्या केली होती. नव्वदच्या दशकात घडलेल्या या बालहत्याकांडाचा विषय निघाला की आजही अंगावर शहारे येतात. संशोधन – स्वाती पाटील लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे
1/19/20226 minutes, 22 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : फटे स्कॅमसारख्या फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या?

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवत विशाल फटे नावाच्या व्यक्तीने बार्शी, सोलापूरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता गुंतवणूक कशी करायची? समजा आपल्याकडे भरपूर परतावा देणारी योजना असल्याचं कोणी सांगितलं, तर कोणकोणत्या गोष्टी तपासून पहायच्या? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. संशोधन : अमृता दुर्वे लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
1/18/20226 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कोरोनाची साथ 2022 मध्ये संपणार का?

कोरोनाचे रुग्ण कमी होतायत असं वाटेपर्यंत ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट आली. कोरोनाची साथ नेमकी कधी संपणार असा प्रश्न अनेकांना असतो. 2022 च्या वर्षात कोरोना पँडेमिककडून एंडेमिककडे जाईल का? हा आजार किती काळ गंभीर राहील? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन- मयांक भागवत व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
1/17/20225 minutes
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: श्रीलंकेत महागाई इतकी वाढलीय? एखादा देश दिवाळखोर कसा होतो?

एखाद्या व्यक्तीनं बिलांची थकबाकी देणं बंद केलं तर काय होतं? तुम्हाला पैशाच्या मागणीसाठी त्रास देणारे फोन येतात, धमक्यांची पत्रं येतात आणि त्यानंतर तुमच्या इतर मालमत्तांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातो. मग एखादा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येतो तेव्हा काय होतं? श्रीलंकेत सध्या काय सुरू आहे? कर्ज, परकीय चलन आणि महागाई यांचा एकमेकांशी काय संबंध? समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्ये. संशोधन : रजनीश कुमार लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
1/14/20227 minutes, 2 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ठाकरे सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय आता का घेतला?

महाराष्ट्रातली सर्व दुकानं आणि आस्थापना म्हणजे commercial establishments च्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. आधीच्या नियमांतल्या पळवाटा बंद करणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचं उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. दुकानांच्या पाट्यांबद्दल आताच निर्णय घेण्यामागचं काय कारण आहे? दुकानांच्या पाट्या मराठीत करून नेमकं काय साध्य होईल? संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
1/13/20228 minutes, 24 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: केंद्र सरकारकडे व्होडाफोन आयडियाचा 36% हिस्सा का देण्यात येतोय?

व्होडाफोन आयडिया लिमिटेडमधले 35.8% शेअर्स सरकारला देण्याच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. BSNL - MTNL ची वाईट असताना दुसरीकडे व्होडाफोन - आयडियामध्ये सरकारी भागीदारी कशाला? नेमकी ही काय भानगड आहे? यात Vodafone-Idea कंपनीचा काय फायदा? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
1/12/20225 minutes, 36 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आर्थिक प्रगती होत असतानाही बेरोजगारीचा दर इतका जास्त का?

कोव्हिड 19मुळे झालेला लॉकडाऊन, कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट यातून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण अजूनही पूर्वीइतकं नाही. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा रोजगारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. भारतातलं नोकऱ्यांचं संकट हे वाटतं त्यापेक्षा अधिक गहन असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारतातल्या बेरोजगारीचा दर डिसेंबर 2021मध्ये 8% पर्यंत गेला होता. देशातला रोजगार आणि पगारी नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. काय आहे यामागचं कारण? समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन: सौतिक बिस्वास आणि टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
1/12/20227 minutes, 54 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस घेऊनही काहींना पुन्हा कोव्हिड का होतोय?

मागच्या 24 तासात भारतात एक लाखांच्या वर नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. थोडक्यात रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा जोमाने वाढतोय. आणि यावेळी आधी लस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग झाल्याच्या केसेस आहेत. जगभरातच ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारानंतर लस घेतल्यानंतर झालेला ब्रेकथ्रू संसर्ग पाहायला मिळाला आहे. लस घेतल्यावरही कोरोना संसर्ग का होतो? तिसरा लशीचा डोस त्यावर प्रभावी ठरेल का? पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीस लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
1/12/20225 minutes, 29 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पंतप्रधानांची सुरक्षा इंदिरा गांधींच्या हत्येनंतर SPG कडे कशी आली?

1984 साली इंदिरा गांधींची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर Special Protection Groupची स्थापना झाली. त्यांचं काम कसं चालतं? त्यांच्याव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाकडे असते? ऐकू या या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – सिद्धनाथ गानू, टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
1/7/20225 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मुस्लीम महिलांवर अश्लील शेरेबाजी आणि ट्रोलिंग कोण करतं?

इंटरनेटवर फ्री अ‍ॅप सुरू करून त्यावर प्रथितयश मुस्लीम महिलांबद्दल अश्लील मजकूर छापणे आणि त्यांना ट्रोल करण्याचं आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी कारवाई करत 18 वर्षांची एक तरुणी आणि 21 वर्षांच्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. लहान वयात ही मुलं असे उद्योग का करतात? मुस्लीम समाजातल्या मुलींवर याचा काय परिणाम होतोय, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… [https://www.youtube.com/watch?v=5NZkcGZ5XL8] संशोधन - ऋजुता लुकतुके, मयांक भागवत लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले Twitter Tags @MumbaiPolice @priyankac19 @priyankac19 @RujutaLuktuke
1/5/20224 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन नॅचरल व्हॅक्सिन असल्याचा दावा किती खरा? | सोपी गोष्ट 505

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट आली आहे. पण रुग्णालयात दाखल होण्याचं आणि मृत्यूचं प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे तीव्र संसर्गजन्य असूनही ओमिक्रॅान व्हेरियंट कोरोना विरोधातील लढाईत 'नॅचरल व्हॅक्सीन' असल्याचा दावा काहींनी केला आहे. पण अनेक तज्ज्ञांनी तो खोडून काढला आहे. संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
1/4/20225 minutes, 35 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवीन वर्षी ‘या’ पाच गोष्टी कशा बदलतील?

2022 सालात आणखी कुठला कोरोना व्हेरियंट त्रास देईल की, लशीमुळे सगळे सुरक्षित असू? वर्क फ्रॉम होममध्ये काही बदल होईल का? मेटाव्हर्स, 4जी यामुळे आपलं जग किती बदलेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याचीच उत्तरं शोधूया आजच्या सोपी गोष्टमध्ये… [https://www.youtube.com/watch?v=RHqZmep_MlA] संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
1/3/20225 minutes, 59 seconds
Episode Artwork

सुधीर मुनगंटीवार साहेब, लैंगिकतेविषयी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची ही घ्या उत्तरं | सोपी गोष्ट पॉडकास्ट

भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत केलेलं हे वक्तव्य. सुधीर मुनंगटीवारांनी प्रश्न विचारला की एखादा व्यक्ती LGBTQA समुदायाचा आहे की नाही हे कसं कळणार? एखाद्या पुरुषाला पुरुषाबद्दल आकर्षण आहे, याचं सर्टिफिकिट कोण देणार? त्याची व्याख्या काय? सुधीर भाऊंना पडलेल्या या प्रश्नांची सोप्या भाषेत वैज्ञानिक आणि कायदेशीर उत्तर शोधू या, आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अनघा पाठक एडिटिंग - निलेश भोसले
12/31/20215 minutes, 26 seconds
Episode Artwork

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा शोध कसा घेतला जातोय? | सोपी गोष्ट 502 पॉडकास्ट

कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता अनेक जाणकारांनी मांडली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारनं ओमिक्रॅान व्हेरियंटचा प्रसार कुठे आणि किती प्रमाणात झालाय याचा शोध सुरू केला आहे. सर्वेक्षणाचं हे काम कसं सुरू आहे? संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – निलेश भोसले
12/30/20216 minutes, 12 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: नितेश राणे कुठे आहेत? संतोष परब प्रकरण काय आहे? | सोपी गोष्ट 500

नारायण राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातला वाद तसा जुना आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासूनच ही आग भडकली होती. पण नव्यानं ठिणगी पडली आहे ती संतोष परब हल्ला प्रकरणानं. हे प्रकरण काय आहे आणि त्याचा राणे-ठाकरे वादाशी काय संबंध आहे? लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
12/28/20215 minutes, 6 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: धर्म संसद म्हणजे काय? | सोपी गोष्ट 499

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये आणि छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भरलेल्या धर्म संसदेत साधू-महंतांच्या वादग्रस्त विधानांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण धर्म संसद म्हणजे नेमकं काय असतं? लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
12/27/20215 minutes, 12 seconds
Episode Artwork

डेबिट-क्रेडिट कार्डने ऑनलाईन शॉपिंग करताय? आता बदलणार हे नियम - सोपी गोष्ट पॉडकास्ट

ऑनलाईन खरेदी किंवा कोणत्याही प्रकारच्या देवाण-घेवाणीसाठी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता का? एक क्लिक केलं आणि आवडता ड्रेस, आवडते शूज ऑर्डर झाले, ओटीटीचं सबस्क्रिप्शन झालं, इतकंच काय मोबाईलचं, लाईटचं बिलही भरलं गेलं अशी तुम्हाला सवय आहे का? मग आता तुम्हाला आपल्या सवयी बदल्याव्या लागतील. तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरण्याबदद्ल नवे नियम 1 जानेवारी पासून लागू होणार आहेत. कोणते आहेत नियम? जाणून घेऊया.
12/24/20214 minutes, 53 seconds
Episode Artwork

ओमिक्रॉनला हलक्यात घेणं महागात पडू शकतं कारण... सोपी गोष्ट पॉडाकास्ट

ओमिक्रॉन हा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आलाय हे तर एव्हाना तुमच्या कानावर आलं असेल. पण हा सौम्य व्हेरियंट आहे म्हणून अनेक जण त्याला हलक्यात घेत आहेत. पण पण ओमिक्रॉन खरंच सौम्य आहे का? जर तो सौम्य आहे, तर मग अनेक देशांतल लॉकडाऊन का लागत आहे? जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.
12/23/20215 minutes, 11 seconds
Episode Artwork

हवाला म्हणजे काय? कसा चालतो कारभार? यात किती उलाढाल असते? सोपी गोष्ट 496

अनेकदा सेलेब्सवर, किंवा आपल्या नेत्यांवरही पैसा लपवल्याचे, करचोरीचे आरोप लागतात. असा बेकायदेशीर पैसा लपवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातलाच एक म्हणजे हवाला. हाही शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेलच. पण हा हवाला नक्की काय असतो? त्याचं रॅकेट कसं चालतं? आणि ही सिस्टिम नेमकी आली कुठून? जाणून घेऊया आजच्या बीबीसी मराठीच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अनघा पाठक एडिटिंग - निलेश भोसले
12/23/20215 minutes, 39 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट - पनामा पेपर्स नक्की काय प्रकरण आहे?

समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन संसदेत भडकल्याची ही काही पहिली वेळ नव्हती. पण यावेळी त्या कशामुळे चिडल्या, ते नेमकं कळू शकलं नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सत्ताधारी बाकांमधून कुणी कमेंट केली, त्यामुळे त्यांना राग आला एवढंच कळलं. पण कुणी काय म्हटलं हे गदारोळात ऐकू आलं नाही. पण त्या चिडल्या त्याच सुमारास त्यांच्या सूनबाई आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची पनामा पेपर्स प्रकरणी एडीने चार तास चौकशी केली. पनामा पेपर्स काय आहेत आणि ऐश्वर्याने नेमकं असं केलंय ज्यामुळे त्यांची चौकशी होतेय? पाहूया सोपी गोष्टमध्ये.
12/21/20214 minutes, 50 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट - मुलीचं लग्नाचं वय किती असावं?

लग्न करण्यासाठी मुलींचं कायदेशीर वय आता 18 वरून 21 करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि आता हे बिल संसदेत मांडलं जातंय. पण या निर्णयाला देशातले अनेक राजकीय पक्ष विरोध करत आहेत. मुलीचं लग्नाचं वय नक्की का वाढवलं, मोदी सरकारच्या या निर्णयाचा राजकीय पक्ष का विरोध करत आहेत? आणि मुख्य म्हणजे याने खरंच स्त्री पुरुष समानता येईल का? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.
12/20/20214 minutes, 37 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीनची आर्थिक प्रगती जगाला का खुपतेय?

पुढच्या दोन दशकांमध्ये चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकून जगात क्रमांक एकची अर्थव्यवस्था होईल असा तज्ज्ञांचा होरा आहे. चीनने मिळवलेलं हे यश मागच्या वीस वर्षांत मिळवलेलं आहे. पण, सध्या अमेरिका आणि इतर युरोपीयन देश तसंच गरीब देशांनाही ते सलतंय. असं नेमकं का? चीनच्या या घोडदौडीत जगाला नेमका काय धोका आहे? जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - फैसल इस्लाम, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
12/18/20216 minutes, 36 seconds
Episode Artwork

विंटर ऑलिम्पिक आणि विगर मुसलमानांच्या मुद्द्याचा काय संबंध आहे? सोपी गोष्ट

फेब्रुवारी 2022मध्ये चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. पण चीनमधल्या शिनजियांग प्रांतामध्ये वीगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आपण या स्पर्धांवर डिप्लोमॅटिक बहिष्कार टाकत असल्याचं अमेरिका, युके, कॅनडाने म्हटलंय. धोरणात्मक किंवा राजनैतिक बहिष्कार म्हणजे नेमकं काय? त्यातून काय साध्य होईल? आणि या सगळ्यावर चीनचं म्हणणं काय आहे? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले
12/17/20216 minutes, 40 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर हल्ले का होतायत?

काश्मीर खोऱ्यात श्रीनगर शहराच्या बाहेर झेवनमध्ये एका पोलीस व्हॅनवर झालेल्या कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले. काश्मीरमध्ये मागच्या काही महिन्यात सामान्य नागरिक आणि पोलिसांवरील हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे. काश्मीर पोलिसांच्या मते आंतरराष्ट्रीय आतिरेकी संघटनांचे छोटे छोटे गट हे संघटित हल्ले घडवून आणत आहे. ही झाली पोलिसांची बाजू. पण, काश्मीरमध्ये नेमकं काय घडतंय? सामान्य नागरिक आणि पोलिसांवर असे हल्ले का होतायत? पोलिसांनी जबाबदार धरलेली काश्मीर टायगर्स ही संघटना नेमकी काय आहे? पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
12/15/20215 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन व्हेरियंटवर बुस्टर डोस उत्तर आहे का?

जगभरात सगळीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार होत असतानाच आता युकेमध्ये या व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मग सांगावं लागलं की, ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका. त्यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली. युकेमध्ये पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत सगळ्यांना बुस्टर डोस देणार अशी घोषणा करून टाकली. युकेच नाही तर जगभरात नवीन व्हेरियंट्सशी लढण्यासाठी बुस्टर डोसकडे आशेनं बघितलं जातंय. तसं जगभरातल्या संशोधकांना का वाटतंय. आणि भारताची बुस्टर डोसबद्दलची भूमिका नेमकी काय आहे पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - जेम्स गॅलागर, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
12/13/20215 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड -19 विरोधातल्या लशींचा दुसरा डोस घेणं महत्त्वाचं का आहे?

महाराष्ट्रातल्या 83 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोव्हिड 19 विरोधातल्या लशीचा दुसरा डोस घेतलाच नसल्याचं समोर आलंय. कोरोना व्हायरसच्या विरोधात परिणामकारक ठरण्यासाठी लशीचे दोन्ही डोस घेणं महत्वाचं आणि गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. मग असं असताना केवळ एक डोस घेऊन पुरेसं संरक्षण मिळेल का? दुसरा डोस घेतलाच नाही तर काय होईल? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
12/10/20217 minutes, 5 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : रशिया आणि युक्रेनमध्ये काय बिनसलंय #सोपीगोष्ट 487

रशियाने युक्रेनलगतच्या त्यांच्या सीमेजवळ सैन्य तैनात केल्याने सध्या या भागावर युद्धाचे ढग जम होताना दिसत आहेत. आपला असा कोणताही इरादा नसल्याचं रशियाने म्हटलं असलं तरी युक्रेनच्या नेत्यांनी मात्र 2022च्या सुरुवातीला हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये नेमकं काय बिनसलं आहे? जगातल्या कोणत्या देशांचा युक्रेनला पाठिंबा आहे? आणि जगातले देश रशियावर कशी कारवाई करू शकतात? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
12/10/20217 minutes, 21 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : OBC आरक्षणाचा जन्म कसा झाला? #सोपीगोष्ट 486

6 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले.त्यामुळे राज्यातल्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय. ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केल्यावर ज्या मंडल आयोगाचा संदर्भ येतो, तो काय होता? OBC आरक्षण द्यायला कधीपासून सुरुवात झाली? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : नामदेव काटकर लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
12/8/20215 minutes, 21 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लष्करासाठीचा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी का होते आहे?

नागालँडमध्ये लष्कराच्या हातून 14 नागरिकांचा मृत्यू झाला. देशातल्या अशांत क्षेत्रात काम करताना सशस्त्र दलांना विशेषाधिकार देणारा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी केली जाते आहे. नागालँड तसंच मेघालयच्या मुख्यमंत्र्‍यांनी ही मागणी केली आहे. हा कायदा काय आहे? तो लष्कराला कोणते अधिकार देतो? या कायद्याविरोधात कोणते आक्षेप आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- शरद बढे
12/7/20218 minutes, 25 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा Freedom of Expression हे शब्द सहसा कोणत्यातरी वादाच्या संदर्भानेच येतात. त्यामुळेच बहुतेक वेळा त्यांचा विचारही एकाच बाजूने केला जातो. आपण या बाजूंमध्ये अडकून न पडता या प्रकरणाच्या मुळात शिरू या. त्याची व्याख्या, त्याच्यावरचे निर्बंध हे सगळं पाहू या. संशोधन – सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
12/6/20216 minutes, 5 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशिल्ड लशीमुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का तयार होत होत्या?

सुरुवातीच्या काळात ऑक्सफर्डमध्ये संशोधन झालेल्या (भारतात आपण तिला कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो) कोरोना लशीमुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रमाण अत्यल्प असलं तरी लोकांमध्ये त्यामुळे लशीबद्दल संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर संशोधकांनी याचा अभ्यास करून गुठळ्या तयार होण्याचं कारण शोधून काढलं आहे. लशीच्या सुधारित आवृत्तीसाठी याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. हे संशोधन आणि त्याचं महत्त्व जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - जेम्स गॅलाघर लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- शरद बढे
12/4/20214 minutes, 8 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: सोयापेंड आयात वादात का सापडली?

सोयापेंड आयातीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा लोकसभेतही मांडला होता. सोयापेंड आयातीवरून नेमका काय वाद निर्माण झालाय? या आयतीचे शेतकरी आणि बाजारपेठेवर काय परिणाम होऊ शकतात? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : अमृता दुर्वे, श्रीकांत बंगाळे लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
12/2/20215 minutes, 57 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध कसा घेतला जातोय?

दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आतापर्यंत जगभरातल्या 12 देशांमध्ये सापडलेला आहे. या व्हेरियंटमध्ये आधीच्या डेल्टा, डेल्टा प्लस वा इतर व्हेरियंटपेक्षा वेगळं काय आहे? आणि या व्हेरियंटचं निदान कसं केलं जातंय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
12/1/20215 minutes, 22 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका कसा परतवणार? | सोपी गोष्ट 480

ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी कितपत प्रभावी ठरतील, हे अजून स्पष्ट नसलं, तरी लशीमुळे गंभीर आजाराचा धोका किमान काही प्रमाणात कमी होऊ शकतो, याविषयी जगभरातल्या तज्ज्ञांचं एकमत असल्याचं दिसतं. पण भारतात अजूनही कोव्हिड लसीकरणाचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत अजूनही कमीच आहे. अशा परिस्थितीत भारत ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का? संशोधन - जान्हवी मुळे, मयांक भागवत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे
11/30/20215 minutes, 34 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन, लॉकडाऊन आणि लशींबद्दल पाच प्रश्न, पाच उत्तरं

ओमिक्रॉन या कोरोनाच्या सर्वांत नवीन व्हेरियंटमुळे जगात अनेक ठिकाणी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत सर्वांत गंभीर मानल्या गेलेल्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही हा व्हेरियंट जास्त वेगाने पसरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा व्हेरियंट किती घातक आहे? याच्यावर लशी काम करतील का? लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची ही उत्तरं. संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग- शरद बढे
11/30/20217 minutes, 9 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाला बाहेरच्या बाहेर पळवून लावणारी ही लस कुठली?

आतापर्यंत जगात 26 कोटी लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. पण, काही लोक असेही आहेत, खासकरून आरोग्यसेवक जे सतत कोव्हिड रुग्णांच्या संपर्कात आहेत. पण, विषाणूशी इतका जवळचा संबंध येऊनही त्यांना कोव्हिड झाला नाही. जगातील असे काही लोक संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत नवीन कोरोना लशीच्या संशोधनासाठी. कोरोनाच्या संपर्कात येऊनही कोव्हिड न झालेल्या लोकांचा अभ्यास करून संशोधकांनी नव्या कोरोना लशीचा फॉर्म्युला शोधला आहे. येणाऱ्या काळात हे संशोधन कोरोनाविरोधातील लढ्याला नवी दिशा देऊ शकतं. सोपी गोष्टमध्ये पाहूया ही नवी लस कसं काम करेल... संशोधन - जेम्स गॅलगर लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
11/26/20214 minutes, 12 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : टोमॅटोचे दर वाढण्यामागचं 'हे' आहे खरं कारण

भारतात थंडीच्या काळात सहसा टोमॅटो स्वस्त होतात. पण सध्या देशभरात टोमॅटोच्या किंमती 70 ते 110 रुपये किलोदरम्यान आहेत. कशामुळे हे भाव इतके वाढले? हवामान बदलाचा पिकांवर कसा परिणाम होतोय? आणि या पुढच्या काळातही असंच होत राहणार का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
11/25/20216 minutes
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी येण्याची शक्यता का आहे? | सोपी गोष्ट 476

23 नोव्हेंबरला केंद्र सरकारनं जाहीर केलं की भारतात बिटकॉईनसारख्या डिजिटल करंसीविषयी कायदा बनवण्याच्या दिशेनं काम सुरू झालं आहे. यंदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यासंदर्भातलं विधेयक मांडलं जाणार आहे. क्रिप्टो करंसीवर कायद्याची गरज का आहे आणि मुळात क्रिप्टो करन्सी काय असते? संशोधन – अमृता दुर्वे, मोहम्मद शाहीद लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
11/24/20215 minutes, 57 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल का नाही? | सोपी गोष्ट 475

भारतात गावं-शहरं स्वच्छ ठेवण्याची मोहीम रुजावी यासाठी केंद्र सरकारनं 2016 साली स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सुरु केले. त्यात गेली सलग पाच वर्ष इंदूरनं बाजी मारली आहे. पण या सर्वेक्षणात महाराष्ट्र नेमका कुठे आहे? गाडगे महाराजांचं राज्य स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या स्थानावर का नाही? महाराष्ट्रातली शहरं स्वच्छ राखण्यात कोणत्या अडचणी आहेत? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
11/24/20214 minutes, 52 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेटीएमच्या शेअरची किंमत का कोसळली?

पेटीएमची मालक कंपनी One 97 Communications च्या IPO साठी लोकांनी भरपूर बोली लावली. पण प्रत्यक्ष बाजारात त्याच्या शेअर्सची किंमत घसरली आणि अनेकांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला. पेटीएमला शेअर मार्केटमध्ये भाव का नाही मिळाला? येणाऱ्या काळात इंटरनेट कंपन्यांच्या IPO बद्दल काय सावधगिरी बाळगायची? संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
11/23/20215 minutes, 34 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अब्राहमी धर्म नेमका काय आहे?

धर्मावरून होणारे वाद हे तसे जगाला नवीन नाहीत. इस्त्रायलमधला ज्यू-ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मियांमधला संघर्ष तसंच भारतातलं हिंदू-मुस्लीम द्वंद्वं अशी ज्वलंत उदाहरणं त्यासाठी देता येतील. या धार्मिक वादांमधून मोठी मोठी युद्धं घडलीत. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण पेटलंय. ईजिप्त, इस्त्रायल आणि मध्य-पूर्व देशांमध्ये सध्या नवा धार्मिक वाद उभा राहतोय तो अब्राहमला देव मानणाऱ्या अब्राहमी धर्मावरून. काय आहे हा नवीन धर्म? आणि त्यावरून वाद का निर्माण होतोय? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
11/19/20215 minutes, 12 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : रझा अकादमी काय आहे? अमरावती दंगलीशी संस्थेचा संबंध आहे का?

त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती, मालेगाव, नांदेड, औरंगाबादसह इतर काही ठिकाणी मुस्लीम संघटनांनी बंद पुकारला होता. काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनाला अमरावती, मालेगावसह काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. या हिंसाचाराच्या मागे रझा अकादमी असल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे. रझा अकादमी म्हणजे काय आहे? ही संस्था कोणाची आहे? त्यांची कार्यपद्धती काय? रझा अकादमी राजकीय पक्षाशी संबधित आहे का? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट संशोधन : दीपाली जगतापनिवेदन : अमृता दुर्वेव्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
11/18/20216 minutes, 14 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: एक शब्द बदलला म्हणून भारतावर टीका का होते आहे? | सोपी गोष्ट 471

हवामान बदलाचा मुद्दा निघाला की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका आणि धोरणं अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. ग्लासगोमध्ये नुकतीच पार पडलेली COP26 हवामान परिषदही त्याला अपवाद नव्हती. या परिषदेअखेर सर्व सहभागी देशांमध्ये नवा 'हवामान करार' झाला. पण त्यानंतर भारत आणि चीन या दोन देशांवर टीका होते आहे.संशोधन - नवीन खडका, रजनी वैद्यनाथन लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
11/17/20215 minutes, 19 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतात वाढत जाणाऱ्या प्रदूषणाची काय कारणं आहेत?

जगातल्या कोणत्याही ठिकाणी असलेल्या प्रदुषणापेक्षा दहापट जास्त प्रदुषण उत्तर भारतात आहे. हे प्रदुषण पसरत जातंय आणि यामुळे भारतातील लोकांचं आयुष्य अडीच ते 10 वर्षांनी कमी होऊ शकतं असा अंदाज शिकागो विद्यापीठाच्या संशोधनाने व्यक्त केला आहे. भारतातील प्रदुषणामागे काय कारणं आहेत? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले.
11/16/20216 minutes, 32 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमची कार महाग होण्याची ही आहेत 4 मोठी कारणं

एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत आणि दुसरीकडे कारची किंमतही वाढलीय. महागाईचा दुहेरी फटका का बसतो आहे? भारतासह जगभरात कारच्या किमती का वाढल्या आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागात. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले.
11/16/20216 minutes, 10 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: एसटी संप भाजपमुळे चिघळतोय या आरोपात तथ्य किती?

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भाजप नेते चिथावत आहेत, भरकटवत आहेत आणि ते नंतर त्यांची जबाबदारी घेणार नाहीत असा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. भाजपचे नेते म्हणतात की हे लोकांचं आंदोलन आहे आणि सरकार अहंकारी आहे. दोन्ही बाजूने केल्या जाणाऱ्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? ऐकू या आजची सोपी गोष्ट. संशोधन- दीपाली जगताप लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
11/12/20215 minutes, 5 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट - महाराष्ट्र का गारठला?

गेले दोन दिवस राज्यात संध्याकाळनंतर पारा घसरतोय. 10 नोव्हेंबरला पुण्यामध्ये 10 अंश सेल्शियस तापमान नोंदवण्यात आलं. इतरही ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमी आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात इतकी थंडी का आली? यंदाचा हिवाळा कसा असणार आहे? उत्तर भारतात काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी ऑक्टोबर अखेरपासूनच बर्फवृष्टीला सुरुवात झालीय. हे सगळं कशामुळे होतंय? ला निना आणि एल निनो या हवामान विषयक संज्ञा काय आहेत? आणि त्यांचा जगभरातल्या हवामानावर काय परिणाम होतो? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन आणि लेखन : जान्हवी मुळे, अमृता दुर्वे निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
11/11/20215 minutes, 57 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इन्स्टाग्रामचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय का?

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक आणि प्रतिकूल परिणाम होतोय असा एक निष्कर्ष या अ‍ॅपची मुख्य कंपनी मेटाच्याच एका अंतर्गत अहवालात निघाला होता. आणि त्यानंतर अख्ख्या अमेरिकेत आणि हळू हळू जगभरात गहजब माजला. खरंच इन्स्टाग्रामचा असा परिणाम मुलांच्या मनावर होतो का? नेमका काय परिणाम होतो? आणि वाईट परिणाम टाळण्यासाठी काय करावं जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये...संशोधन - शिओना मॅक्युलमलेखन, निवेदन - ऋजुता लुकतुकेएडिटिंग- निलेश भोसले
11/11/20215 minutes, 47 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: IPO म्हणजे नेमकं काय?

दिवाळीचा हंगाम हा शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांसाठी आयपीओचा हंगाम म्हटला जातो. कारण, साधारण या सुमारास बाजारात नवीन आयपीओ म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफर्स येतात. पण, आयपीओ म्हणजे नेमकं काय, त्यात गुंतवणूक करावी की न करावी? गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…संशोधन, लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
11/9/20217 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाचा ‘हा’ जिन भारतीयांसाठी धोकादायक?

कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या काळात कोरोना अनेकदा बदलला; त्यात जनुकीय बदल झाले. त्याचवेळी शास्त्रज्ञांचा असाही अभ्यास सुरू होता की, कुठल्या प्रकारच्या लोकांना याचा धोका सर्वाधिक आहे आणि का? याचं एक उत्तर असं आहे की, दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांमध्ये शास्त्रज्ञांना एक असा कोव्हिड जिन्स आढळून आला आहे ज्यामुळे फुप्फुसाला इजा होऊन कोव्हिडमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण या लोकांमध्ये दुप्पट आहे. पण, म्हणून घाबरून जाण्याची गरज आहे का? या नव्या कोव्हिड जिन आणि त्याच्या संशोधनाबद्दल आज जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
11/9/20213 minutes, 11 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : एसटी महामंडळाचं विलीनीकरण करावं अशी मागणी का होतेय?

गेली काही वर्ष राज्यातली परिवहन सेवा तोट्यात आहे. कोव्हिडच्या लॉकडाऊनचा एसटीलाही मोठा फटका बसला. लॉकडाऊनचा बराच काळ एसटीची सेवा पूर्णपणे बंद होती. तर एसटी सेवा सुरू झाल्यानंतरही प्रवाशी संख्येत घट झालेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत व्हावेत, पगारवाढ मिळावी, घरभाडं भत्ता आणि महागाई भत्ता वाढवावा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता आणि घरभाडं भत्ता वाढवण्याची घोषणा केली. पण एक कर्मचारी संघटना एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन करतेय. नेमकं काय होईल या विलीनीकरणाने ? आणि राजकीय पक्षांनी यावर काय भूमिका घेतली आहे? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्टसंशोधन, लेखन, निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
11/5/20217 minutes, 34 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शेअर बाजारात गुंतवणूक करणं किती फायद्याचं वा धोक्याचं?

शेअर बाजारातल्या चढउतारांबद्दल नेहमी चर्चा होत असते. जगभरातल्या घडामोडींचे परिणाम शेअर बाजारावर होत असतात. स्टॉक मार्केटमध्ये नेमकी किती गुंतवणूक करावी? त्यासाठी काय करावं लागतं? आणि यात पैसे बुडायचा किती धोका असतो? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट संशोधन, निवेदन : ऋजुता लुकतुके व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
11/4/20216 minutes, 3 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेट्रोल,डिझेलच्या किमती कधी कमी होतील?

2021च्या संपूर्ण वर्षात पेट्रोल - डिझेलच्या दरांत सतत वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्हींच्या दरांनी 100 रुपयांचा पल्ला ओलांडलेला आहे. नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम इंधनाच्या दरांवर होतो? आंतरराष्ट्रीय घडामोडी याला कारणीभूत असतात का? आणि देशातलं सरकार इंधनाच्या किंमती कमी करू शकतं का, जाणून घेण्यासाठी पहा सोपी गोष्ट संशोधन : अमृता दुर्वे लेखन,निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
11/4/20215 minutes, 23 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट - पर्यावरणविषयक जाहीर केलेली उद्दिष्टं भारत गाठू शकेल का?

2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यवर आणले जाईल, असं मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या परिषदेत म्हटलंय. या परिषदेचं उद्दिष्ट 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरोवर आणण्याचं आहे. पण भारताने यासाठी आणखी 20 वर्षं लागणार असल्याचं म्हटलंय. कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. चीन आणि अमेरिका पहिल्या दोनमध्ये आहेत. भारताने आणखी काय जाहीर केलंय आणि ही उद्दिष्टं गाठण्याच्या मार्गात काय अडथळे असतील? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट संशोधन : टीम बीबीसी लेखन,निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
11/2/20216 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अतिभयंकर नैसर्गिक आपत्ती आता ‘न्यू नॉर्मल’ ठरणार

तीव्र अशा उष्णतेच्या लाटा (हीटवेव्हज), विध्वंसकारी पूर आता आपल्यासाठी न्यू नॉर्मल ठरणार आहेत, आपल्या जगण्याचाच एक भाग होणार आहेत असं जागतिक हवामान संघटनेने म्हटलं आहे. 2021 मधली हवामान बदलाची स्थिती यासंबंधी जो एक रिपोर्ट प्रकाशित झालाय त्यात एका शब्दाला अधोरेखित केलंय – ‘आपल्या डोळ्यादेखत बदलणारी परिस्थिती.’ ’द स्टेट ऑफ क्लायमेट’ असं नाव असणारा हा रिपोर्ट भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याची एक झलक दाखवतो. वाढतं तापमान, वाढती समुद्राची पातळी, अतिभयंकर नैसर्गिक आपत्ती असं सगळं त्यात आहे. COP26 परिषद लोकांसाठी आणि पृथ्वीसाठीही एक टर्निंग पॉईंट ठरायला हवी अशीच अपेक्षा अनेकांची आहे. पण आता त्यातून नेमकं काय साध्य होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पर्यावरणसंबंधी बातम्या, व्हीडिओ तसंच इतर विषयांसंबधी अपडेटेड बातम्या पाहाण्यासाठी बीबीसी मराठीच्या साईटला नक्की भेट द्या.
11/1/20214 minutes, 42 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीनचा नवा सीमा सुरक्षा कायदा काय आहे?

मागचे सतरा महिने भारत आणि चीन दरम्यानच्या सीमेवर तणाव आहे. जून 2020मध्ये गलवान इथं दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेला रक्तरंजित संघर्ष कुणी विसरू शकणार नाही. त्यातच आता चीनच्या कम्युनिस्ट सरकारने देशात नवीन सीमा सुरक्षा कायदा आणलाय. चीनसाठी तो सीमेचं सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी केलेला कायदा आहे. पण, या कायद्यामुळे तिथलं सैन्य दळ आणि सीमेवरच्या राज्यांनाही वेळ प्रसंगी पोलिसी कारवाई करण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. हा चिनी कायदा नेमका काय आहे आणि त्यामुळे भारत-चीन सीमा वाद आणखी चिघळणार आहे का, हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…संशोधन - बीबीसी मॉनिटरिंग लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
10/29/20215 minutes, 11 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: आर्यन खानला जामीन मिळणं कठीण का झालं? ड्रग्जबद्दलचा NDPS कायदा काय आहे?

आर्यन खान आणि इतर आरोपींवर NDPS कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा कायदा नेमका काय आहे? इतर कायद्यांच्या तुलनेत हा कायदा कठोर आणि वेगळा आहे का? आर्यन खानकडे ड्रग्ज मिळाली नाहीत, त्याने अंमली पदार्थांचं सेवनही केलेलं नव्हतं. मग त्याला जामीन मिळणं कठीण का झालं? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट. संशोधन : टीम बीबीसी लेखन,निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
10/27/20216 minutes, 38 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: 43 कोटींचं इनाम असलेल्या ड्रग माफियाला अशी झाली अटक

73 हजार किलो कोकेनचं स्मगलिंग केलेल्या एका ड्रग माफियाची ही गोष्ट आहे. दाइरो आंतोनियो उसुगा उर्फ ओतोनिएल या ड्रग तस्कराला कोलंबियात अटक झाली. अमेरिकेत त्याच्यावर खटला भरला गेलाय. कोण आहे हा ओतोनिएल? ऐका सोपी गोष्ट. लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
10/27/20214 minutes, 19 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल महागाईच्या फटक्यातून फ्लेक्स फ्युएल इंजिन सोडवतील का?

‘पुढची गाडी फ्लेक्स इंजिन असलेली घ्या, म्हणजे खर्चही कमी होईल आणि प्रदूषणही’ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल असं इंजिन लवकरच सगळ्या नव्या गाड्यांमध्ये बसवणं आपण बंधनकारक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. फ्लेक्स फ्युएल इंजिन काय असतात, ती कसं काम करतात आणि त्यांचे फायदे-तोटे काय हे सांगणारी ही सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
10/26/20216 minutes, 13 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: फेसबुकचं मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? सोपी गोष्ट 452

मेटाव्हर्स या तंत्रज्ञानाविषयी सध्या सगळ्यांना कुतुहल आहे. फेसबुक कंपनीने तर हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पन्नास लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केलीय. इंटरनेटचा भविष्यकाळ म्हणून या तंत्रज्ञानाकडे पाहिलं जातंय. पण, मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? आणि फेसबुकचा त्याच्याशी काय संबंध आहे, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
10/22/20215 minutes, 37 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: व्हॉट्सॲप चॅट पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य ठरतात का? सोपी गोष्ट 453

आर्यन खान प्रकरण असेल किंवा रिया चक्रवर्तीची चौकशी किंवा अर्णब गोस्वामी – पार्थो दासगुप्ता यांचा कथित TRP घोटाळा, तपास यंत्रणा आपल्या आरोपांना आधार देण्यासाठी व्हॉट्सॲप चॅट्सचा हवाला देत असतात. पण कोर्टा व्हॉट्सॲप चॅट्सना पुरावा म्हणून मान्यता देतं? नेमकं काय आहे लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
10/22/20215 minutes, 30 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महागाई अशीच कायम राहणार का? | सोपी गोष्ट 451

भारतात सध्या सामान्य माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबून जातो आहे. रोजच्या जेवणातल्या भाजीपाल्यापासून ते कपडे आणि कंप्युटर्सपर्यंत अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामागची कारणं काय आहेत आणि महागाई कमी होण्याची काही शक्यता आहे का? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
10/20/20215 minutes, 44 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : काश्मिरमध्ये स्थलांतरित मजुरांवर हल्ले का होत आहेत?

काश्मीरच्या कुलमागमध्ये रविवारी 17 ऑक्टोबरला दोन बिगर काश्मिरी नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गेल्या दीड महिन्यात याठिकाणी काश्मीरचे नसलेल्या पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. परप्रांतिय मजुरांनी जिवाच्या भीतीने काश्मीरखोऱ्यातून पलायन सुरू केलंय. जे मजूर थांबले आहेत, त्यांच्या मनात भीती आहे. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या काश्मिरी पंडित आणि शीख समुदायातल्या व्यक्तींच्या हत्यांमुळे काश्मिरमधला हा अल्पसंख्याक समाजही तणावाखाली आहे. काय सुरू आहे काश्मिर खोऱ्यात, कोण आहे या हत्यांमागे? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट. अधिक माहितीसाठी वाचाhttps://www.bbc.com/marathi/india-58948539
10/19/20215 minutes, 7 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: बांगलादेश हिंदूंवर हल्ल्यांनंतर मोदी सरकारला शेख हसीना यांनी काय सांगितलं?

नवरात्रात पूजा मंडपांमध्ये, हिंदू मंदिरांवर हल्ले झाले. काही ठिकाणी हिंदूंच्या घरांना आगी लावल्या गेल्या. पण बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणतात की भारताने खबरदारी घ्यावी की तिथे असा घटना घडणार नाहीत ज्यामुळे बांगलादेशच्या हिंदूंवर हल्ले होतील. पण शेख हसीना त्यांच्या देशातल्या हिंदूंच्या रक्षणासाठी भारताला इशारा का देतायत?
10/19/20216 minutes, 55 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत चीन युद्धानंतर चीनने माघार का घेतली होती?

भारत आणि चीन सीमेवरून गेली अनेक दशकं वाद सुरू आहे. चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केलं होतं, पण त्यानंतर त्यांनी युद्धात वरचढ ठरत असूनही माघार घेतली. भारताने चीनविरोधात काय डावपेच लढवले? चीन आजही भारतीय भूभागांवर दावा का सांगतो? अरुणाचल प्रदेशला चीन दक्षिण तिबेट का म्हणतो? ऐका ही सोपी गोष्ट. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- शरद बढे
10/16/20216 minutes, 13 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: शिवसेनेनं इलेक्टोरल बाँड्समधून किती कमाई केली? | सोपी गोष्ट 445

मोदी सरकारने राजकीय पक्षांना देणगीतून मिळणारा काळा पैसा दूर ठेवण्याच्या इराद्यानं 2017 साली इलेक्टोरल बाँड्सची योजना आणली होती. तेव्हापासूनच इलेक्टोरल बाँड्सवर सातत्याने टीका होतेय. पण भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांसारख्या राष्ट्रीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्षही इलेक्टोरल बाँड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचं एका अहवालातून समोर आलंय. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- अरविंद पारेकर
10/12/20215 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीन तैवानबरोबर युद्ध करण्याची तयारी करतोय का?

गेल्या काही दिवसांत चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घिरट्या घालायला सुरुवात केली. चीन म्हणतं तैवान त्यांचाच एक प्रांत आहे, पण तैवानचं म्हणणं आहे की ते एक स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि चीन आपलं म्हणणं त्यांच्यावर लादू शकत नाही. अशात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चीनच्या एकीकरणाबद्दल बोलतायत. चीन तैवानशी युद्ध करण्याची तयारी करतोय का? यांच्यातलं भांडण नेमकं कुठे सुरू झालं? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- अरविंद पारेकर
10/11/20216 minutes, 50 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट: मलेरियाची लस यायला 100 वर्षं का लागली?

जवळपास 100 वर्षांनंतर मलेरियावरची पहिली लस उपलब्ध झालीय. आफ्रिका खंडातल्या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना या RTS,S लशीचे 4 डोस आता देण्यात येणार आहेत. 2019 या एका वर्षात आफ्रिकेत तब्बल 2,60,000 बालकांचा जीव मलेरियामुळे गेला होता. त्यामुळे ही लस या लहानग्यांच्या दृष्टीने विज्ञानातला एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासंचालयक ट्रेड्रॉस गिब्रायसुस यांनी म्हटलंय. पण मलेरियाची लस विकसित करणं इतकं कठीण का होतं? कोणत्या कारणांमुळे याला इतकी वर्षं लागली? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. अधिक माहितीसाठी वाचा https://www.bbc.com/marathi/international-58824954
10/9/20216 minutes, 31 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: गरीब-श्रीमंत दरी कमी करण्यासाठी चीन काय करणार आहे?

शी जिनपिंग यांच्या कॉमन प्रॉस्पेरिटी या उद्दिष्टासाठी चीन काय पावलं उचलतोय याकडे जगाचं लक्ष आहे. गरीब-श्रीमंत दरी कमी करण्यासाठी चीन काय करणार आहे? उच्च उत्पन्न असलेल्यांना चीन काय संदेश देतं आहे? बड्या उद्योगांना या धोरणाचा फटका बसणार आहे का? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
10/8/20215 minutes, 58 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऐन सणासुदीला घरी बत्ती गुल होणार का?

गेले काही दिवस देशात कोळशाचा साठा संपत आल्यामुळे काही राज्यांमध्ये अचानक वीज जाऊ शकते किंवा लोड शेडिंगही सुरू करावं लागू शकतं, अशा बातम्या सगळीकडे पसरल्या आहेत. कोरोनानंतर वाढलेली मागणी आणि त्याप्रमाणात उत्पादन होत नसल्यामुळे ही समस्या सध्या उद्भवली आहे. पण, खरंच वीज निर्मिती ठप्प होऊन सणासुदीच्या काळात आपल्याला अंधारात जावं लागेल का? आणि इतकी वर्षं झाली तरी आपण अजून कोळशाऐवजी इतर नैसर्गित स्त्रोत वापरून उर्जा निर्मिती का करू शकत नाही? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
10/6/20216 minutes, 18 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीन जगाला कर्जाच्या दलदलीत ढकलतो आहे का?

चीनने जगाला कर्जाच्या दलदलीत अडकवलं आहे का, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. अमेरिके पाठोपाठ चीनही जगातली दुसरी आर्थिक महासत्ता आहे. पण, अध्यक्ष शी जिनपिंग यांचा महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्प मात्र गरीब देशांच्या जीवावर उठला आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, अशा प्रकल्पामधून चीनची रणनिती स्पष्टपणे दिसतेय. आणि ती म्हणजे जगातल्या जमेल तितक्या देशांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीसाठी गुंतवणूक करायची. आणि त्या माध्यामातून देशाच्या आर्थिक नाड्या आपल्याकडे ओढायच्या. पण, याचे जगावर नेमके काय परिणाम होत आहेत जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - सिलिया हॅटन लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- अरविंद पारेकर
10/1/20216 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: डिजिटल हेल्थ आयकार्ड कसं काढायचं? ते फायद्याचं की तोट्याचं?

डॉक्टरकडे गेल्यावर पेशंटची मेडिकल हिस्ट्री घेताना अनेकदा खूप वेळ लागतो. पण तुमची आरोग्यविषयक सगळी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रकल्प आहे. आयुष्यान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला एक हेल्थ आयडी मिळू शकेल ज्यावर त्यांची सगळी आरोग्यविषयक माहिती साठवली जाईल. याचा नेमका कसा फायदा होईल? यात कुठले धोके आहेत का? ऐका आजची सोपी गोष्ट. संशोधन- कमलेश लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
9/29/20214 minutes, 51 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: सर्वात श्रीमंत मंदिर अडचणीत का आलं? | सोपी गोष्ट 435

केरळचं पद्मनाभस्वामी मंदिर जगातलं सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. पण याच मंदिराचा कारभार चालवण्यासाठी देवस्थानच्या समितीला आर्थिक मदतीची गरज भासली, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दादही मागितली. पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. पद्मनाभस्वामी मंदिराची गोष्ट काय आहे? आणि अशा श्रीमंत देवस्थानांच्या संपत्तीचा सरकारला वापर करता येईल का? संशोधन – इमरान क़ुरैशी, टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- शरद बढे
9/28/20216 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ईव्हरग्रांड क्रायसिस नेमका काय आहे?

ईव्हरग्रांड या चिनी रियल इस्टेट कंपनीवर तब्बल 300 अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज आहे. हे कर्ज अवाढव्य चीनच्या जीडीपीच्या 2% इतकं आहे. मूळात कंपनीवर इतकं कर्ज कसं झालं. आणि त्यामुळे जगावर 2009च्या लेहमन ब्रदर्स सारखं मंदीचं संकट येऊ शकतं का? जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- अरविंद पारेकर
9/24/20215 minutes, 56 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात हिंदूंची संख्या कमी होतेय का?

2011च्या भारतीय जनगणनेचा धर्मावर आधारित अभ्यास करून प्यु रिसर्च सेंटर या अमेरिकन संस्थेनं काही लक्षवेधक निरीक्षणं मांडली आहेत. मुस्लीम समाज जास्त मुलं जन्माला घालत असल्यामुळे त्यांची लोकसंख्या वर्षानुवर्षं गेली. उलट हिंदू लोकसंख्या काळाबरोबर कमी होत असल्याचा समज समाजात असतो. पण, प्यु रिसर्चच्या अहवालानुसार, मुस्लीम स्त्रियांचा प्रजनन दर मागच्या पन्नास वर्षांत 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. भारतात हिंदूंचं प्रमाण खरंच कमी होत आहे का, पाहूया सोपी गोष्ट… संशोधन - सौतिक बिश्वास लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- अरविंद पारेकर
9/23/20215 minutes, 34 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: स्वतःच्या नावापुढे आईचं नाव लिहीण्यात काय अडचणी येतात?

स्वतःच्या नावापुढे वडिलांच्या नावासह किंवा त्याऐवजी आईचं नाव लिहीण्याची अनेक उदाहरणं सध्या पाहायला मिळतात. पितृसत्ताकाला आव्हान देणं ही त्यामागची एक भूमिका आहे पण एकमेव नाही. कायदा आई आणि वडिलांना पालक म्हणून समान स्थान आणि हक्क देतो का? नाव बदलण्यात काय अडचणी येतात? ते बदलल्यानंतरही अडचणी येतात का? ऐका ही सोपी गोष्ट. संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- अरविंद पारेकर
9/21/20215 minutes, 9 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पंजाबमधील दलित शिखांबद्दल माहीत आहे का?

चरणजीत सिंह चन्नी यांच्या रुपाने पंजाबला पहिला शीख दलित मुख्यमंत्री मिळाला. पंजाबमध्ये दलितांची लोकसंख्या 32 टक्के आहे, पण त्यांची राजकीय ताकद किती आहे? दलितांनी शीख धर्मापासून वेगळं होण्याचेही प्रयत्न केले होते का? दलितांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव किती आहे? या सगळ्या प्रश्नांची ही सोपी गोष्ट. संशोधन- दीपाली जगताप, सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- अरविंद पारेकर
9/20/20215 minutes, 34 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अब्रुनुकसानी म्हणजे काय? कायदा काय सांगतो?

किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ते 100 कोटींचा अब्रुनकसानीचा दावा दाखल करत असल्याचं सांगितलं. राजकीय आरोप-प्रत्यारोपांनंतर अनेकदा अब्रुनुकसानीचे आरोप होतात, दावे केले जातात. कायदा याबद्दल काय सांगतो? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
9/15/20215 minutes, 55 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: NEET-MBBS Exam अन्यायकारक असल्याचं सांगत तामिळनाडू रद्द का करत आहे?

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET परीक्षा तामिळनाडूला रद्द करायची आहे. त्यासाठी विधानसभेने एक विधेयकही पारित केलं आहे. NEET परीक्षा गरीब, ग्रामीण भागातून आलेल्या तसंच मागास स्तरांतील विद्यार्थ्यांवर अन्याय करते. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? डॉक्टर आणि वैद्यकीय प्रवेश हाताळलेल्या तज्ज्ञांना काय वाटतं? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
9/14/20215 minutes, 53 seconds
Episode Artwork

महिला आयोग काय काम करतो? त्यांना काय अधिकार आहेत?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत महिलांविरोधात अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबईतील बलात्कार प्रकरणाची दखल घेतली आहे. महिलांसंबंधातील गुन्ह्यांची महिला आयोग दखल घेत असतो. पण या आयोगाला काय अधिकार असतात? त्यांचं नेमकं काम काय? महाराष्ट्रात 2019 पासून आयोगावरच्या नेमणुका का रखडल्या आहेत?संशोधन- सिद्धनाथ गानू, प्राजक्ता पोळ लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
9/13/20216 minutes, 1 second
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: बाप्पांच्या आरतीच्या वेळी सॅनिटायर का वापरू नये?

कोरोना काळात गणेशोत्सव साजरा होणार असल्यामुळे आपल्याला काही कोव्हिडचे नियम पाळावे लागणार आहेत. आणि यात मास्क बरोबरच हाताच्या स्वच्छतेसाठी आपण वापरतो सॅनिटायझर. पण, सॅनिटायझर हा अल्कोहोल युक्त ज्वालाग्राही पदार्थ आहे. आणि त्याच्या मुळे खासकरून गणेश आरतीच्या वेळी सॅनिटायझर लावू नका, अशा सूचना काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने दिल्या आहेत. पण, खरंच गणेशोत्सवाच्या काळात सॅनिटायझर वापरणं किती धोकादायक आहे. आणि इतर कुठली काळजी आपण घेतली पाहिजे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
9/9/20215 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टी वारंवार का होते? 5 ठळक कारणं

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होतोय, अनेक धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत, अनेक ठिकाणी पूर आला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही काळात अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमागे ‘हवामान बदल’ आहे असं आपण अनेकदा ऐकतो. पण म्हणजे नेमकं काय घडतं आहे? घटना घडण्याची 5 कारणं पाहणार आहोत सोपी गोष्टच्या या भागात. संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
9/8/20216 minutes, 17 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओबीसी आरक्षणासाठी इंपिरिकल डेटा कसा गोळा केला जाणार?

सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केलं. ते पुन्हा द्यायचं तर त्यासाठी आधी इंपिरिकल डेटा गोळा करायला हवा असंही कोर्टाने सांगितलं. मुळात इंपिरिकल डेटा म्हणजे काय? राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला तो 3 ते 4 महिन्यांत गोळा करायला सांगितलं आहे. तो कोणत्या पद्धतीने गोळा केला जाईल? ओबीसी आरक्षण दिलं तरी ते 50 टक्क्याची मर्यादा ओलांडू शकत नाही, त्यासाठी काय खबरदारी घेतली जाणार आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं, आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- प्राजक्ता पोळ, सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
9/7/20215 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात आयुष्मान भारतपेक्षा कृषी कायद्यांच्या जाहिरातीला प्राधान्य का?

मोदी सरकारने कोव्हिडच्या काळात जाहिरातींवर 212 कोटी रुपये खर्च केले. पण यातला अत्यंत छोटा हिस्सा आयुष्मान भारत या वीमा योजनेच्या जाहिरातीवर खर्च झाला असं बीबीसीच्या तपासात समोर आलं. माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवली गेली. कृषी कायदे, नागरिकत्व कायदा, स्टॅच्य ऑफ युनिटी यांच्या जाहिरातींवर मोदी सरकारने आयुष्मान भारतच्या प्रचारापेक्षा अनेक पटींनी जास्त खर्च केला. ही योजना अनेक लोकांना माहीतच नसल्याने त्यांना तिचा लाभ घेता आला नसल्याची तक्रार यापूर्वी एक संसदीय समितीनेही नोंदवली होती. काय आहे यामागची परिस्थिती, जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून. संशोधन- अर्जुन परमार लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
9/6/20214 minutes, 51 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: PF वरील कराचा तुमच्या खिशावर परिणाम होईल? | सोपी गोष्ट 418

भविष्य निर्वाह निधी किंवा प्रॉव्हीडंट फंड( Employees' Provident Fund) वर आता कर आकारणीला सुरुवात झाली आहे. प्रॉव्हीडंट फंडात वर्षाला अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास, त्याच्या व्याजावर कर भरावा लागेल. म्हणजे नेमकं काय होणार आहे? सरसकट सगळ्यांसाठी व्याजावर कर लावला जाणार का? दरवर्षी लागणार का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
9/3/20215 minutes, 35 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार तालिबानशी बातचीत का करत आहे? | सोपी गोष्ट 417

नरेंद्र मोदी सरकार तालिबानविषयी आपलं धोरण बदलत असल्याचं चित्र आहे. मंगळवारी (31 ऑगस्ट) कतारमध्ये भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझाईंची भेट घेतली. मोदी सरकारनं तालिबानशी बातचीत का सुरू केली आहे? या सगळ्यातून भारताला काय मिळणार आहे? संशोधन – रजनीश कुमार, जान्हवी मुळे लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
9/2/20216 minutes, 38 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना विषाणूही डेंग्यू-मलेरियासारखा भारतात एंडेमिक बनेल का?

भारतात कोव्हिड-19नं आता काही प्रमाणात 'एंडेमिक स्टेज' म्हणजे स्थानिक आजाराचं रूप घेतलं असावं, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHOच्या वरिष्ठ संशोधक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. पण भारतात खरंच असं काही होत आहे का? एखादा आजार एंडेमिक होणं म्हणजे काय? त्यानं साथीवर कसा परिणाम होऊ शकतो? संशोधन – झोया मतीन लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
9/1/20215 minutes, 16 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अमेरिकेला मात का आणि कशी दिली?

अफगाणिस्तान हे अमेरिकेचं सर्वांत दीर्घकाळ चाललेलं युद्ध होतं. अमेरिकेने आपलं सगळं सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर काढलं आहे. 20 वर्षं तिथे राहूनही अमेरिका तालिबानचा बीमोड करू शकली नाही. तालिबानने अमेरिकेवर मात कशी केली? यापूर्वी अमेरिकेवर अशी वेळ कधी आली होती?संशोधन- झुबेर अहमद लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
8/31/20215 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तालिबान अफगाणिस्तानमध्ये पैसे कसे कमवतं?

20 वर्षं सत्तेबाहेर राहूनही तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपली मुळं शाबूत ठेवली. शस्त्रास्त्रं खरेदी, फौजा पोसणं यासाठी तालिबानने पैसा आणला कुठून? अमली पदार्थांचा व्यापार, खंडणी गोळा करणं या सगळ्यातून तालिबानने किती पैसा उभा केला आहे? अफगाणिस्तानच्या डबघाईत असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी तालिबान कसं देऊ शकेल? तालिबानच्या खात्याचा ताळेबंद मांडणारी ही सोपी गोष्ट.
8/30/20215 minutes, 49 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवऱ्याने बळजबरी केली तर तो बलात्कार नाही?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं मनानं, शरीरानं, सर्वार्थानं एकत्र येणं. पण या नाजूक नात्याच्या पडद्याआड एखाद्या महिलेवर तिच्या नवऱ्यानंच बळजबरी केली तर? तो गुन्हा ठरेल का? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे, तो छत्तीसगढ हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे. हा निर्णय काय आहे? विवाहअंतर्गत बलात्कार म्हणजे मॅरिटल ररेपविषयी भारतीय न्यायव्यवस्था आणि सरकारची भूमिका काय आहे? आणि मुळात नवऱ्यानं बळजबरी केली तर ती बलात्कार ठरते का? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
8/27/20216 minutes, 1 second
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार रेल्वे, हायवे, सरकारी कंपन्या भाड्याने का देतंय? मुद्रिकरण म्हणजे काय?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी दिल्लीत जाहीर केलेल्या नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन (NMP) नुसार सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या मालकीची एकूण सहा लाख कोटी रुपयांची मालमत्ता खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे. त्यावरून राहुल गांधी आक्रमक झालेत आणि सरकार सगळी संपत्ती विकून टाकतंय असा त्यांनी आरोप केलाय. राहुल गांधींना मॉनेटायझेशनचा अर्थच कळला नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. पण मॉनेटायझेशन किंवा मुद्रिकरण म्हणजे नेमकं काय होणार आहे? सरकारनं काय जाहीर केलं आहे? सरकारची त्यामागची भूमिका काय आहे आणि त्याला विरोध का होतो आहे? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
8/27/20216 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशात तिसरी लाट येणार आहे का?

कोरोनाचे आकडे आता कमी होत आहेत. सार्वजनिक ठिकाणं उघडत आहेत. आयुष्य हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात होतेय.. पण त्यातच बातमी आली की तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येऊ शकते. खरंच तसं होणार आहे का? त्याबद्दल जाणकार, डॉक्टर आणि सरकारचं काय म्हणणं आहे? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/25/20215 minutes, 17 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: उद्धव-राणे वादाची ठिणगी कशी पडली?

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं पोलिसांत तक्रार दाखल करण्याबरोबरच राज्यांत राणेंच्या विरोधात आंदेलनही सुरू केलं आहे. नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद तसा पंचवीस वर्षं जुना आहे. आज सोपी गोष्टमध्ये बघूया दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशी पडली? संशोधन - अमृता कदम, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/24/20215 minutes, 12 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदींची लोकप्रियता घसरत आहे का?

देशात आणि देशाबाहेरही अलीकडे झालेल्या काही सर्वेक्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घसरत चालल्याचं समोर आलं आहे. इंडिया टूडे साप्ताहिकाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात तर फक्त 24% लोकांना वाटतंय की, नरेंद्र मोदीच पुढचे पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत. मोदींची लोकप्रियता खरंच घसरतेय का? घसरत असेल तर पुरावा काय? आणि काय आहेत त्या मागची कारणं, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - सौतिक बिश्वास लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/23/20214 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचं धोरण खरंच सौम्य होईल का?

तालिबानने अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार आणण्याची आणि आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर जुळवून घेण्याची ग्वाही दिली आहे. पण, आपल्या मूळ कट्टरतावादी विचारसरणीशी ते कितपत फारकत घेतील हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. तालिबानच्या प्रवक्त्यांनी केलेले दावे आणि प्रत्यक्ष वास्तव पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/20/20215 minutes, 16 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचा पाडाव शक्य आहे का?

एकीकडे तालिबानने रविवारीच युद्धसमाप्तीची घोषणा केली आहे. आणि ते सरकार स्थापनेच्या प्रयत्नांत आहेत. तर तालिबान विरोधी गट पंजशीर खोऱ्यात एकत्र येताना दिसतोय. आधीचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह आणि संरक्षणमंत्रीही या गटात आहेत, असं बोललं जातंय. पण, तालिबान विरोधी या गटाला तालिबानचा पाडाव करणं जमेल का? पाहूया अफगाणिस्तानमध्ये काय सुरू आहे आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/19/20214 minutes, 53 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: शरिया कायदा म्हणजे नेमकं काय?

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर ते मुस्लीम राष्ट्र असल्याचं घोषित केलंय. तेव्हापासून अफगाणिस्तानात आता शरिया कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू होणार का, ही चर्चाही जगभर सुरू झालीय. पण, मूळात शरिया कायदा नेमका आहे काय? तो इतका वादग्रस्त का आहे? याविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/18/20216 minutes, 30 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचे अफगाणिस्तानातील नवे नेते

तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवलंय. यावेळी तालिबान नेतृत्व इतर देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे ठेवण्यावर भर देईल. आणि त्यासाठी कट्टरतावाद थोडा कमी करेल असं बोललं जातंय. पण, मूळात तालिबानची रणनिती ठरवतं कोण? आणि आताही अफगाणिस्तानवर राज्य करणारे तालिबानचे प्रमुख नेते कोण आहेत? त्यांची ओळख करून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/17/20216 minutes, 47 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अफगाणिस्तान-तालिबान युद्धाचे थरारक 72 तास

तालिबानसाठी लढणारे हातात बंदुका घेऊन एकेक शहर पादाक्रांत करत राजधानी काबूलच्या दिशेने येत होते. तालिबानचं सैन्य फक्त 60 हजारांचं आणि अफगाण सरकारकडे होते 3 लाखांहून जास्त सैनिक. तालिबानकडे होते लुटलेली, जुनी शस्त्र. तर अफगाण फौजांकडे होते अत्याधुनिक शस्त्रास्त्र. पण असं असून फक्त 72 तासांमध्ये तालिबानने एकेक करत डझनभर शहरांवर ताबा मिळवत काबुल गाठलं. पत्त्याच्या बंगल्यासारखं का कोसळलं अफगाणिस्तान सरकार.. पाहूया बीबीसी मराठीवर सोपी गोष्ट. संशोधन - बीबीसी टीम लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/16/20215 minutes, 48 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लशीमुळे गर्भपाताचा धोका असतो का?

कोव्हिडची लस घेतली तर गरोदर महिलांना गर्भपाताचा धोका असतो. कोव्हिड लस गर्भनाळेवर हल्ला करू शकते. कोव्हिडच्या लशीमुळे पुरुषांना नपुंसकत्व येऊ शकतं असे अनेक दावे तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. कोव्हिड लशींचे काही दुष्परिणाम निश्चितच आहेत पण त्यामागची तथ्यं जाणून घेणं गरजेचं आहे. या काही दाव्यांचा हा फॅक्ट चेक. संशोधन- टीम बीबीसी लेखन - सिद्धनाथ गानू निवेदन- अमृता दुर्वे एडिटिंग- निलेश भोसले
8/13/20215 minutes, 30 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये तालिबानला पाठिंबा देऊन भारताला शह देऊ पाहतंय का?

अफगाणिस्तानमध्ये तालिबान वेगाने मोठाले प्रदेश काबीज करत चाललं आहे. तालिबानने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी नेत्यांच्या विधानांवरून दिसतं की ते अफगाण सरकारपेक्षा तालिबानला प्राधान्य देत आहेत. तालिबानला बळ देऊन भारताला शह देण्याचा हा प्रयत्न आहे का? पाकिस्तानला यातून काय साध्य करायचं आहे?ऐका ही सोपी गोष्ट. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
8/12/20215 minutes, 9 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओबीसी लोकसंख्येची मोजणी करायला मोदी सरकार का तयार नाही?

जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी जोर धरतेय. 2021 च्या जनगणनेत जातिनिहाय मोजणी झाली नाही तर देशातले दलित आणि मागासवर्गीय त्यावर बहिष्कार टाकतील असा इसारा लालू प्रसाद यादव यांनी दिला आहे. जातींची मोजणी झाली तर आरक्षणाची गणितं सोपी होऊ शकतील असाही अनेकांचा दावा आहे. पण मोदी सरकारचा जातिनिहाय जनगणना करायला नकार आहे. 2021 च्या जनगणनेत ओबीसींची गणना होणार असं मोदी सरकारने 2018 मध्ये म्हटलं होतं, मग आता सरकारने घूमजाव का केलंय? ऐका आजची सोपी गोष्ट.संशोधन - सरोज सिंह लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
8/11/20216 minutes, 35 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: IPCC Climate Change Report भारताला काय धोक्याचा इशारा देतो?

संयुक्त राष्ट्रांच्या IPCC या संस्थेने हवामान बदलावरील आपल्या अहवालात संपूर्ण जगासाठी काही अत्यंत गंभीर इशारे दिलेत. भारतालाही अनेक धोक्याचे इशारे देण्यात आलेत. या शतकात भारताला पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळं यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना अनेकदा करावा लागू शकतो असं हा अहवाल सांगतो. हे सगळं का होतं आहे? हे रोखण्यासाठी काय करता येईल? आता केलेले प्रयत्न उपयोगी येतील की वेळ निघून गेली आहे? ऐका आजची सोपी गोष्ट.संशोधन- टीम बीबीसी लेखन- सिद्धनाथ गानू निवेदन- विनायक गायकवाड एडिटिंग- निलेश भोसले
8/10/20216 minutes, 38 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन एकत्र घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते?

एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घ्यायचे नाहीत असंच भारत सरकार आतापर्यंत सांगत आलंय. पण आता ICMR चं एक संशोधन म्हणतं की कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन चा प्रत्येकी एक डोस घेतला तर कोरोनापासून जास्त संरक्षण मिळतं. जगातले इतरही देश लसीकरण करताना दोन वेगवेगळ्या लशींचे डोस देतात. पण भारतात असं होईल का? ऐका आजची सोपी गोष्ट.संशोधन- टीम बीबीसीलेखन, निवेदन- सिद्धनाथ गानूएडिटिंग- निलेश भोसले
8/10/20213 minutes, 47 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चुंबन घेणं कायद्याने गुन्हा आहे का?

मुंबईत एका सोसायटीने अलीकडेच बाहेरच्या रस्त्यावर ‘नो किसिंग झोन’ असा बोर्ड लावला आहे. लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक बागा आणि चौपाट्या बंद असल्यामुळे तरुण प्रेमी युगुलं सोसायट्यांच्या बाहेर एकत्र जमतात, एकमेकांना मिठी मारतात, चुंबन घेतात. याला आळा बसावा हा सोसायटीवाल्यांचा प्रयत्न होता. तर मुलांच्या मते इतर जागा बंद असल्यामुळे ते असे जमतात. कुणाला त्रास देण्यासाठी नाही. या प्रकारातून पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी किसिंगवर बंदी असावी का? किंसिंग अश्लील आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याविषयी कायदा काय सांगतो जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/6/20216 minutes, 4 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पाक पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान भाड्याने देणार का?

एखादा देश इतका गरीब झालाय की त्यांनी पंतप्रधानांचं निवासस्थानच भाड्याने देण्यासाठी काढलंय असं तुम्ही कुठे ऐकलंत तर! आणि त्यातही हा देश पाकिस्तान असेल तर! सरकारी कामकाजावर होणारा खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने पंतप्रधानांचं निवासस्थानच भाड्याने देऊ केल्याची बातमी मध्यंतरी तिथल्याच काही टीव्ही चॅनलनी दिली होती. मग ती भारतातही पसरली. पण हे खरं आहे का? ही बातमी आली कुठून? या मागचं वास्तव काय आहे आणि पाकिस्तान सरकार खरंच पंतप्रधान निवासस्थान भाड्याने देऊ शकतं का? ऐकूया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - शुमैला जाफरी लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/5/20214 minutes, 3 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या बुस्टर डोसची गरज आहे का?

कोरोना व्हायरस इतका बदलतोय म्हणजे म्युटेट होतोय की, जगभरात लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याच्या काही घटना समोर आल्यात. त्यावर उपाय म्हणून काही देशांनी लशीचे बूस्टर डोसही सुरू केले. तेव्हापासून तुमच्यातल्या काही प्रेक्षकांनीही हा प्रश्न पॉडकास्ट किंवा सोपी गोष्टमध्येही अनेकदा विचारलाय, की लशीचा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे का? आज सोपी गोष्टमध्ये हेच जाणून घेऊया… संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/4/20214 minutes, 48 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ई-रुपी म्हणजे नेमकं काय?

केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी ई-रुपी योजनेचं उद्घाटन सोमवारी झालंय. या अंतर्गत विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना एका मोबाईल संदेशाद्वारे आर्थिक मदत मिळू शकेल. लोकांच्या हातात एका मोबाईल क्लिकवर पैसे देणारी ही ई-रुपी योजना आणि तिचे फायदे-तोटे समजून घेऊया संशोधन- ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
8/2/20216 minutes, 12 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबान चीनच्या मदतीने भारताला धोका ठरेल का?

अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबान वेगाने मोठाल्या भूभागावर नियंत्रण मिळवतंय. त्याचवेळी तालिबानी शिष्टमंडळ चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घ्यायला पोहोचलं. चीनच्या मदतीने तालिबान अफगाणिस्तानावरची आपली पकड मजबूत करू पाहतंय. चीन आणि तालिबानचं जवळ येणं भारतासाठी धोकादायक ठरू शकेल का? संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
7/29/20215 minutes, 41 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागांमध्ये नेत्यांच्या दौऱ्यांनी अडथळे आणले का?

कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पुराने हाहाःकार माजवला. यापूर्वीही अनेक भागांना पुराचा असाच तडाखा बसला होता. पण त्या अनुभवातून प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही का असा प्रश्न हे पूरग्रस्त करत आहेत. आधी नियोजनाचा अभाव, नंतर एकापाठोपाठ एक नेत्यांचे दौरे आणि त्यात अडकलेलं प्रशासन या सगळ्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला. यावेळचा पूर रोखण्यात नियोजन कमी पडलं का? नेत्यांचे दौरे मदतकार्यात अडथळे आणतात का? ऐका ही सोपी गोष्ट.संशोधन- दिपाली जगताप लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
7/29/20215 minutes, 27 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: आसाम मिझोरम सीमावाद काय आहे? त्यात पोलिसांचा मृत्यू कसा झाला?

दोन राज्यांमध्ये असलेला सीमावाद ही काही नवीन गोष्ट नाही. पण आसाम आणि मिझोराममधील सीमावाद इतका टोकाला गेला की दोन्ही पोलीस दलांमध्ये संघर्ष झाला. आसामचे सहा पोलीस या संघर्षात मारले गेले. आज मिझोराम राज्य असलेला प्रदेश एकेकाळी आसामचा भाग होता. मग या सीमावादाची सुरुवात झाली कुठे? ही दोन राज्य हा प्रश्न मिटवू शकतील की नाही?संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
7/27/20216 minutes, 28 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चिपळूण, कोल्हापूर पुरामागे हवामान बदल हे कारण आहे का?

गेल्या काही वर्षांत दुष्काळ, ढगफुटी, पूर अशी टोकाची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. आपल्याला एकाच वेळी दोन टोकाच्या संकटांशी सामना का करावा लागतो आहे? या सगळ्या गोष्टींमागे हवामान बदल हे कारण आहे का? जगभरात तापमानवाढ आणि हवामान बदलाबद्दल काही काळ चर्चा होत आहे. या सगळ्याचे आपल्यावर काय परिणाम होतायत? संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
7/26/20216 minutes, 53 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: उदारीकरण म्हणजे काय? त्याने भारताचा फायदा झाला की तोटा?

24 जुलै 1991 ला डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. भारताने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि एक मोठं संकट टळलं. पण उदारीकरण म्हणजे नेमकं काय? त्याचा फायदा झाला की तोटा? संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
7/23/20215 minutes, 44 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लॉकडाऊन न लावता जपानने कोव्हिडवर नियंत्रण मिळवलं का?

कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत असताना जपानने वेगाने आपल्या सीमा बंद केल्या नाहीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी इतर अनेक देशांप्रमाणे जपानने लॉकडाऊनचाही आधार घेतला नाही. काही काळपर्यंत जपानने कोव्हिडवर नियंत्रण मिळवल्याचं चित्र होतं. पण आता जपानमध्ये काय परिस्थिती आहे? टोकियो ऑलिम्पिकपूर्वी जपानमध्ये केसेस का वाढत आहेत?संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
7/22/20215 minutes, 13 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना मृत्यूंचा आकडा मोदी सरकारने कमी दाखवला का?

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात चार लाखांपेक्षा अधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. पण प्रत्यक्षात हा आकडा त्याहूनही जास्त असेल असा अंदाज अभ्यासक वर्तवत आहेत. कोरोनाच्या काळात जून 21 पर्यंत भारतात 34 लाख ते 47 लाखांदरम्यान अतिरिक्त मृत्यू झाले असल्याचा संशोधकांचा दावा आहे. भारत सरकारने अतिरिक्त मृत्यूंची आणि त्यातून कोव्हिड मृतांची संख्या जाहीर करावी अशी मागणी केली जातेय. हे सगळं समजून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- सौतिक बिस्वास लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
7/21/20215 minutes, 12 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पॉर्न पाहणं, बनवणं हा भारतात गुन्हा आहे का?

उद्योगपती राज कुंदरा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न फिल्म्सशी संबंध असल्यावरून त्यांना अटक झालीय आणि अनेक वेगवेगळ्या कलमांअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेलेत. भारतात 2015 मध्ये 850 पेक्षा जास्त पॉर्न वेबसाईट्स बॅन केल्या गेल्या. चाईल्ड पॉर्नोग्राफी हा भारतात गुन्हा आहे. पण सर्व प्रकारचं पॉर्न पाहणं हा गुन्हा आहे का? कायदा नेमकं काय म्हणतो? या संवेदनशील विषयाची ही सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- शरद बढे
7/20/20215 minutes, 35 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेगॅसस स्पायवेअर वापरून भारतीय पत्रकारांवर पाळत ठेवली गेली?

जगभरातल्या 15 माध्यमसंस्थांनी एकत्र येऊन केलेल्या एका तपासात असं दिसून आलंय की भारतातले 40 आणि जगातले 1400 लोक पेगॅसस नावाच्या एका स्पायवेअरच्या सहाय्याने पातळीखाली होते. हे स्पायवेअर NSO या इस्रायली कंपनीच्या मालकीचं आहे. पण या कंपनीने हे सगळे दावे फेटाळले आहेत. आपण हे तंत्रज्ञान फक्त सरकारांनाच विकतो असं या कंपनीचं म्हणणं आहे. मग याचा अर्थ खुद्द सरकारांनीच या लोकांवर पाळत ठेवली का? हे सगळं कसं काम करतं? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- शरद बढे
7/19/20215 minutes, 37 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : देशद्रोहाचा कायदा रद्द करावा का?

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षं झाली तरी देशाला देशद्रोहाच्या कायद्याची गरज आहे का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी केंद्रसरकारला विचरलाय. आणि बरोबरच या कायद्याचा राजकीय गैरवापर होत असल्याचं मतही व्यक्त केलं आहे. देशद्रोहाचा कायदा ब्रिटिशांनी 1870मध्ये आणला. आणि त्याचा वापर भारतीय स्वातंत्र्य चळवळ मोडून काढण्यासाठी केला. पण, स्वातंत्र्यानंतरही सत्ताधारी पक्षाकडून विरोधी मतांचा बिमोड करण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे आरोप अनेकदा होतात. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर भाष्य केलं आहे. त्या निमित्ताने बघूया देशद्रोहाचा कायदा आणि खरंच तो रद्दबातल करण्याची वेळ आली आहे का, आजच्या सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/16/20215 minutes, 48 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलेक्ट्रिक कार, बाईक खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का?

वाहनांच्या गर्दीमुळे होणारं हवेतलं प्रदूषण टाळायचं असेल तर एक उपाय म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स... इ-कार किंवा इ-बाईक हे वाहन क्षेत्रातलं आपलं भवितव्य आहे असं सगळेच मानतात. केंद्रसरकारनेही वेळोवेळी इ-वाहनांना प्रोत्साहन देण्याविषयी सुतोवाच केलंय. त्यालाच अनुसरून आता महाराष्ट्रात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी ई-पॉलिसी आणली आहे. 2025 पर्यंत नवीन वाहनांच्या खरेदीत 10% वाहनं ही इलेक्ट्रिक असावीत असं उद्दिष्ट या धोरणात आाहे. आपला देश आणि महाराष्ट्र इ-वाहनांच्या क्रांतीसाठी तयार आहे का? इ-वाहनांचं भवितव्य देशात काय आहे, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/15/20216 minutes, 23 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज आहे का?

11 जुलै या जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यासाठी प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा जाहीर केला. दोन पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना आरक्षण, सरकारी अनुदान मिळणार नाही, असं हा कायदा सांगतो. आसाम, कर्नाटक या इतर राज्यांतही तशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1% च्या आत राखणं हे या कायद्यांचं उद्दिष्ट आहे. पण, हा कायदा म्हणजे 2022च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू-मुस्लीम कार्ड खेळण्याचा भाजपचा डाव आहे अशी टीका विरोधी पक्षांनी केलीय. तर सामाजिक अंगानेही या कायद्याचा विचार होणं गरजेचं आहे. म्हणूनच आज सोपी गोष्टमध्ये आधी बघूया हा कायदा आणि त्यावरच्या राजकीय, सामाजिक प्रतिक्रिया… संशोधन - टीम बीबीसी लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/14/20215 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सरकार पेट्रोल,डिझेलचे दर कमी का करत नाही?

देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल पाठोपाठ डिझेलनेही दरांची शंभरी गाठली आहे. इंधनाच्या किमती आटोक्यात ठेवायच्या असतील तर केंद्राने उत्पादन शुल्क आणि राज्यसरकारने मूल्यवर्धित कर कमी करणं गरजेचं आहे. पण, त्यामुळे सरकारला मिळणारा महसूल बुडेल या भीतीने दोन्ही सरकारं हे कर कमी करत नाहीएत. सामान्यांवर मात्र त्यामुळे महागाईचा बोजा पडतोय. पेट्रोलचे दर सरकार का कमी करत नाही जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/13/20216 minutes, 7 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सौर वादळ म्हणजे काय?

अमेरिकेतली हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी वेबसाईट स्पेसवेदर डॉट कॉमवर सध्या एक इशारा झळकतोय. सूर्याच्या वातावरणात तयार झालेलं एक वादळ अती प्रचंड वेगाने अंतराळात फिरून आता पृथ्वीच्या दिशेनं सरकतंय. आणि ते पृथ्वीवरही धडकू शकतं. पण सोलार स्टॉर्म किंवा हे सौर वादळ नेमकं असतं काय? यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? यामुळे पृथ्वीवरचं तापमान अचानक वाढेल का? इंटरनेट, जीपीएस बंद पडेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/12/20215 minutes, 30 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : महिलांची ऑनलाईन बदनामी कशी थांबवायची?

तुम्ही महिला असाल. आणि एकेदिवशी अचानक तुम्हाला कळलं की, तुमचा फोटो आणि सोशल मीडियावरची तुमची इतर माहिती वापरून इंटरनेटवर तुम्हाला बदमान करण्यात येतंय तर? फक्त बदनामीच नाही तर तिथं तुमच्याबद्दल अश्लील बोललं जातंय आणि तुम्हाला चक्क विकायला काढलंय तर? संताप तर येईलच पण, त्याचबरोबर काही क्षण अगदी असहाय्य पण वाटेल. काही मुस्लीम महिलांच्या बाबतीत अलीकडे तसंच झालंय. सुल्ली डिल्स नावाचं एक ओपन सोर्स ॲप त्यासाठी तयार करण्यात आलं होतं. आणि बदनामी झालेल्यांच्यामध्ये काही प्रथितयश मुस्लीम महिला पत्रकारही आहेत. दिल्ली आणि मुंबई पोलीस सध्या हा गैरप्रकार करणाऱ्यांचा शोध घेतायत. यानंतर हे ॲप डिलिटही करण्यात आलंय. पण, त्यानिमित्ताने आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया महिलांची अशी बदनामी कशी थांबवता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं सोशल मीडिया प्रोफाईल कसं सुरक्षित ठेवायचं? संशोधन - कीर्ती दुबे लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/10/20215 minutes, 40 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अफगाणिस्तानातील युद्धाची 20 वर्षं

अफगाणिस्तानमध्ये सध्या नेमकं काय चाललंय? अमेरिकन सैन्य तिथून माघार का घेतंय? आणि अमेरिकेनं माघार घेतल्यावर पुन्हा तिथं तालिबानी राज्य येऊ शकेल का? अल् कायदा पुन्हा सक्रिय होईल का? असे कितीतरी प्रश्न सध्या तिथली परिस्थिती बघून विचारले जातायत. तसा हा देश गेली 20 वर्षं दहशतवाद आणि युद्धामुळे होरपळतोय. पण आता तिथं नेमकं काय घडतंय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - ऋजुता लुकतुके, अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
7/9/20216 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतात 95% लग्नांमध्ये दिला जातो हुंडा

देशात हुंडाविरोधी कायदा 1961पासून अस्तित्वात असूनही 95% लग्नांमध्ये अजूनही हुंडा स्वीकारला जातो आणि दिला जातो. हा धक्कादायक अहवाल जागतिक बँकेनं दिला आहे. त्यासाठी बँकेच्या एका गटाने 27 राज्यांमधली 40,000च्या वर लग्नांमध्ये झालेल्या खर्चाचा अभ्यास केला आहे. काही ठिकाणी थेट हुंडा न देता त्याचं स्वरुप बदललंय. त्यामुळे आज पुन्हा वेळ आलीय हुंडा या दुष्ट आणि महिलांसाठी अन्यायकारक सामाजिक प्रथेबद्दल बोलण्याची. हुंड्याची प्रथा आणि तिचे सामाजिक दुष्परिणाम याविषयी बोलूया सोपी गोष्टमध्ये….लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/8/20216 minutes, 54 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : नरेंद्र मोदींना मंत्रिमंडळ विस्तार का करायचाय?

कोरोना परिस्थितीमुळे थांबलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी होणार अशी चर्चा सर्वत्र आहे. आणि यात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हीना गावित यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, नरेंद्र मोदी आताच का मंत्रिमंडळ विस्तार करत आहेत? यामागे राजकीय समीकरणं आहेत की प्रशासकीय सोय? पाहूया आजची सोपी गोष्टमध्ये... लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/7/20215 minutes, 48 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : MPSC परिक्षांच्या गोंधळाला जबाबदार कोण?

कोरोनाच्या काळात MPSC स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जोरदार फटका बसलाय. 2019पासून ही परीक्षा नियमित होत नाहीए, झाली तर नियुक्ती होत नाहीए आणि मुख्य स्पर्धा झाली तर मुलाखती होत नाहीएत. त्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुण मुलांचा मात्र कोंडमारा होतोय. पण, MPSC परिक्षांच्या गोंधळाला नेमका जबाबदार कोण, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/6/20217 minutes, 31 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अजित पवार पुन्हा EDच्या रडारवर?

ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाचा आहे. त्यामुळे ईडीने केलेली कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि अजित पवार खरंच यात अडचणीत येऊ शकतील का, याविषयी बोलूया सोपी गोष्टमध्ये... लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/5/20216 minutes, 35 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : हिंदुत्व म्हणजेच खरं राष्ट्रीयत्व आहे का?

प्यू रिसर्च या आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात 64% भारतीय हिंदूंनी हिंदुत्व म्हणजेच राष्टीयत्व असल्याची भावना व्यक्त केली आहे. हिंदू असणं म्हणजे खरा भारतीय असं त्यांना वाटतं! असं हिंदूंना का वाटतं, पूर्वीपासून त्यांना असं वाटत होतं, की अलीकडे ही भावना बळावली आहे. राजकीय आणि सामाजिक अंगांनी याचा परामर्श घेऊया सोपी गोष्टमध्ये... लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/2/20216 minutes, 49 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : हिंदुत्व म्हणजेच खरं राष्ट्रीयत्व आहे का?

प्यू रिसर्च या आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात 64% भारतीय हिंदूंनी हिंदुत्व म्हणजेच राष्टीयत्व असल्याची भावना व्यक्त केली आहे. हिंदू असणं म्हणजे खरा भारतीय असं त्यांना वाटतं! असं हिंदूंना का वाटतं, पूर्वीपासून त्यांना असं वाटत होतं, की अलीकडे ही भावना बळावली आहे. राजकीय आणि सामाजिक अंगांनी याचा परामर्श घेऊया सोपी गोष्टमध्ये...लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
7/1/20215 minutes, 57 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : मुंबईतील मुलं तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित आहेत का?

मुंबईत एप्रिल-जून महिन्यात झालेल्या एक सीरो सर्व्हेत 18 वर्षांखालील 51% मुलांमध्ये कोरोना अँटीबॉडीज् तयार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आधीच्या महिन्यात हे प्रमाण 39% होतं. याचा अर्थ एकतर या मुलांना आधी कोरोना संसर्ग होऊन गेला आहे. किंवा ते कोरोना संसर्गग्रस्तांच्या संपर्कात आले आहेत. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा सगळ्यात जास्त धोका आहे असं बोललं जातं. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल चांगलाच म्हणायला हवा. पण, त्याचं वैद्यकीय दृष्ट्या विश्लेषण आणि विश्वसनीयता समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…. संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
6/29/20215 minutes, 25 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमावरून वाद का झालाय?

ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाला विरोध आणि समर्थन का केलं जात आहे?
6/28/20216 minutes, 34 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: नरेंद्र मोदींनी काश्मिरी नेत्यांबरोबर आत्ताच बैठक का घेतली?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मिरी नेत्यांबरोबर 24 जून या दिवशी दिल्लीत बैठक घेतली. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यापूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे, पण प्रादेशिक पक्षांना हे मान्य नाही. काश्मिरी पक्ष 370 च्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार आहेत, केंद्राच्या लेखी तो विषय संपला आहे. जर गेल्या दोन वर्षांत कुणाच्यात भूमिकेत बदल झाला नसेल तर ही बैठक घेतल्याने काय साध्य झालं? यामागे अजून काय गणितं आहेत? ऐकू आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- सिद्धनाथ गानू, रियाझ मसरूर लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- शरद बढे
6/25/20217 minutes, 1 second
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: निपाह व्हायरस महाबळेश्वरमध्ये सापडला, संसर्गाचा धोका किती?

महाबळेश्वरच्या एका गुहेत काही वटवाघुळांमध्ये निपाह व्हायरस सापडला. या व्हायरसचा यापूर्वी चार वेळा भारतात उद्रेक होऊन गेला आहे. केरळमध्ये 2018 साली या व्हायरसमुळे 18 लोकांचा मृत्यू झाला होता. निपाहवर अजूनही कोणतीही लस नाही किंवा ठोस उपचारपद्धतीही नाही. वटवाघुळांमधून निपाहचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता किती असते? या व्हायरसपासून सुरक्षित कसं राहायचं? या सगळ्याची उत्तरं देणारी आजची ही सोपी गोष्ट. संशोधन-मयांक भागवत लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
6/24/20214 minutes, 58 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पवारांनी राष्ट्रीय आघाडीची घोषणा करणं का टाळलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी काल राष्ट्रमंचची बैठक झाली आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं की, पवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इतर पक्षांची एकत्र आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांत आहेत का? काल त्याविषयी काही घोषणा होईल असंही वाटलं होतं. पण, प्रत्यक्षात मोदी विरोधात अशा राष्ट्रीय आघाडीबद्दल काहीच बोललं गेलं नाही. अशावेळी सोपी गोष्टमध्ये बघूया शरद पवार यांनी अशी घोषणा करणं का टाळलं? सध्या नाही तरी भविष्यात अशी आघाडी उभी राहील का? तिचं नेतृत्व कोण करेल? संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
6/23/20216 minutes, 33 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शरद पवारांची पंतप्रधान होण्याची संधी कशी हुकली?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशातल्या विरोधी पक्षांची एकत्र मोट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते किती यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल. पण, यातून शरद पवार यांची देशाचा पंतप्रधान होण्याची कित्येक वर्षांची इच्छा पुन्हा वर आली की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. यापूर्वीही शरद पवार यांनी 1990 च्या दशकांत काँग्रेस पार्टीत असताना दोनदा पंतप्रधान होण्याचा निकराचा प्रयत्न केला होता. जाणून घेऊया याच दोन प्रयत्नांविषयी जेव्हा शरद पवार पंतप्रधान होता होता राहिले. संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
6/22/20217 minutes, 6 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : राम मंदिराच्या जागा खरेदीवरून घोटाळ्याचा आरोप का होतोय?

अयोध्येतल्या प्रस्तावित राम मंदिरासाठी जागा खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप एकदा नाही तर दोनदा झालाय. समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीने या मुद्यावरून राम जन्मभूमी न्यास ट्रस्ट आणि पर्यायाने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. तर राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचं म्हटलंय. ट्रस्टने गोळा केलेले बहुतेक पैसे हे जनतेच्या वर्गणीतून गोळा केलेत. त्यामुळे इथे लोकांच्या विश्वासाचा प्रश्न आहेच. शिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार हे नक्की. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया राम मंदिर जमिनीचे हे दोन वाद आणि त्याचे उमटणारे राजकीय पडसाद…संशोधन - बीबीसी टीम लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
6/21/20215 minutes, 49 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे महिनाभरात येणार का?

राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. गर्दी वाढली आणि लोकांनी आरोग्याचे नियम पाळले नाहीत तर महिन्या दोन महिन्यांतच राज्यात तिसरी लाट येऊ शकते अशा बातम्या आल्या पण यावर स्पष्टीकरण देताना कोव्हिड टास्कफोर्सच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी अशी कोणतीही कालमर्यादा दिली नव्हती. वेगाने पसरणारा डेल्टा आणि नव्याने आलेला डेल्टा प्लस व्हेरियंट, तसंच इतर कारणांमुळे राज्यात पुढची लाट लवकर येईल का? त्याचा जास्त फटका कुणाला बसेल? या सगळ्याबद्दलची ही सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
6/18/20215 minutes, 21 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोका कोला, पेप्सी सारखी पेयं आरोग्यासाठी वाईट असतात का?

फुटबॉलर रोनाल्डोने कोकची बाटली सरकवून लोकांना पाणी प्या असं सांगितलं आणि नेहमी चर्चा होणारा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्‍ड ड्रिंक्स पिणं आरोग्यासाठी हानीकारक असतं का? कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यानंतर प्रसन्न वाटतं, मग ती शरीरात जाऊन अपाय कसा करू शकतात? त्यांचं व्यसन लागू शकतं का? या सगळ्याची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
6/17/20215 minutes, 31 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सोन्याच्या हॉलमार्किंगमुळे ग्राहकांचा काय फायदा होणार?

भारतात सोन्याला गुंतवणूक म्हणूनही महत्त्व आहे आणि सोन्याचे दागिने, इतर कलात्मक वस्तूंसाठी या धातूचं श्रृंगारिक मूल्यही मोठं आहे. आता 16 जून पासून केंद्रसरकारने सोन्याचे दागिने आणि वस्तूंचं हॉलमार्किंग अनिवार्य केलंय. हॉलमार्कचं प्रमाणपत्र असेल तरंच या वस्तू सोनार विकू शकेल. शिवाय सोनार आता 14, 18 आणि 22 कॅरेटचेच दागिने विकू शकणार आहेत. घाबरू नका, हॉलमार्किंग ग्राहकांच्या भल्यासाठीच आहे. पण, त्याचा नेमका फायदा काय? आता तुमच्याकडे असलेल्या वस्तूंवर हॉलमार्कचा शिक्का नसेल तर काय होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
6/16/20215 minutes, 46 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : गौतम अडाणी - डीलमेकर आणि तितकेच वादग्रस्त उद्योगपती

14 जून रोजी अडाणी एंटरप्राईजेस् कंपन्यांचे शेअर कोसळल्यामुळे गौतम अडाणी यांची नरेंद्र मोदींशी मैत्री, मागच्या दहा वर्षांत त्यांच्या कंपन्यांची झालेली भरभराट हे विषय पुन्हा ऐरणीवर आले आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया देशातले दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अडाणी यांच्याविषयी आणि त्यांच्याभोवतीच्या वादांविषयी, आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - शरद बढे
6/15/20216 minutes, 15 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इस्त्रायलमध्ये नेफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान

इस्त्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांची बारा वर्षांची राजवट उलथून आठ पक्षांचं आघाडी सरकार सत्तेत आलं आहे. रविवारी तिथल्या संसदेत झालेल्या बहुमत चाचणीत नेतन्याहू यांच्या पक्षाचा एका मताने निसटता पराभव झाला. आता आठ पक्षांची एकत्र मोट बांधण्याचं अवघड काम नवे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांना करायचं आहे. पण नेतन्याहू यांच्या पराभवासाठी हे आठ परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष कसे एकत्र आले? आणि या सत्ता बदलामुळे भारत आणि इस्त्रायल यांच्या मैत्रीवर काही परिणाम होईल का, जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - शरद बढे
6/14/20216 minutes, 20 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शालेय विद्यार्थ्यांनी करायचा हा ब्रिज कोर्स कुठला?

महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाचं नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होईल. यंदाही सुरुवात ऑनलाईनच होणार आहे. आणि यावेळी मुलांना पहिले पंधरा दिवस एक खास ‘ब्रिज कोर्स’ पूर्ण करायचा आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत मुलांना मागच्या वर्षीचा अभ्यासक्रम किती समजला आहे हे शिक्षकांना कळावं आणि मुलांचीही काही संकल्पनांची उजळणी व्हावी यासाठी हा पाठ्यक्रम SCERT मंडळाने ठरवला आहे. हा ब्रिज कोर्स कुणाला करायचा आहे, तो अनिवार्य आहे का, कधी करायचा याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...संशोधन - दीपाली जगताप लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
6/11/20214 minutes, 43 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट : ‘होल्डिंग पाँड्स’ मुंबईला पूरापासून वाचवू शकतील का?

मुंबई शहरात पावसाळ्यात निर्माण होणारा पूराचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं टोकयोच्या धर्तीवर जमिनीखाली पाणी वाहून नेणारे बोगदे खणण्याचं ठरवलं आहे. या भूमिगत तळ्यांना होल्डिंग पाँड्स म्हणतात. आणि असा पहिला प्रकल्प येत्या दहा दिवसांत मुंबईच्या हिंदमाता परिसरात कार्यान्वितही होणार आहे. सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया होल्डिंग पाँड्स प्रकल्पाविषयी आणि या प्रकल्पामुळे तरी मुंबईची पूरस्थिती आटोक्यात येईल का याविषयी...संशोधन - मयांक भागवत, ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
6/11/20216 minutes, 6 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा नेमका घोळ काय आहे?

अपक्ष खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नवनीत यांनी सादर केलेलं जातीचं प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे. यावर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचं हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पण, जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावर त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे का, त्यांच्या जात प्रमाणपत्राचा नेमका घोळ काय आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी मराठी टीम लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
6/9/20216 minutes, 9 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लैंगिक ओळख जपण्यासाठीचा समलैंगिकांचा लढा

2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 रद्द केलं. त्यामुळे समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देशात मिळाली. पण, तरीही समलैंगिक लोकांचा लढा अर्धवट होता. कारण, कित्येक घरांमध्ये मुलगा किंवा मुलगी समलैंगिक आहे समजल्यावर ही लैंगिकता स्वीकारली जात नाही. आणि समलैंगिक भावना दडपण्यासाठी कन्व्हर्जन थेरपीचा सल्ला दिला जातो. आता मद्रास हायकोर्टाने एका महत्त्वपूर्ण खटल्यात अशी थेरपीही कायदेबाह्य केली आहे. समलैंगिकांना सामाजिक समानता बहाल करण्याबरोबरच अशी थेरपी देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याबद्दल कोर्टाने सविस्तर निकाल दिला आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया समलैंगिक मुलगा आणि मुलीसाठी मनस्ताप देणाऱ्या या कन्व्हर्जन थेरपीबद्दल आणि त्याविषयीच्या कायद्यांबद्दल, सोपी गोष्टमध्ये... संशोधन - जान्हवी मुळ्ये, ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
6/8/20216 minutes, 35 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इन्कम टॅक्स रिटर्न भरणं झालं अधिक सोपं

यंदा तुम्ही विवरणपत्र ऑनलाईन भराल तेव्हा तुमचा तो अनुभव वेगळा असू शकतो. कारण, सर्वसामान्य नागरिकांना विवरणपत्र ऑनलाईन भरता यावं आणि त्यांच्यासाठी ही प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी व्हावी यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करवसुली मंडळाने आपल्या वेबसाईटमध्ये (www.incometax.gov.in) काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आणि ही नवी वेबसाईट आजपासून जनतेसाठी खुली झाली आहे. जाणून घेऊया या नवीन वेबसाईटविषयी आणि त्यातील बदलांविषयी, सोपी गोष्टमध्ये...लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
6/7/20215 minutes, 13 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जुही चावला 5G नेटवर्कवरून का भडकली आहे?

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या नेटवर्कमुळे पर्यावरणाची हानी होते. म्हणून ते प्राणी आणि माणसासाठीही सुरक्षित असल्याची ग्वाही कोर्ट देऊ शकतं का, असा सवाल त्यांनी विचारला आहे? त्यानिमित्ताने 5G तंत्रज्ञान, त्याचे फायदे आणि पर्यावरणाची होणारी हानी हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बघूया खरंच 5G अपायकारक आहे का? संशोधन- ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
6/3/20216 minutes, 29 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात आत्मनिर्भर भारत योजनेचा लोकांना फायदा झाला की नाही?

कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तेव्हा गेल्यावर्षीच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला. आणि याच नावा अंतर्गत कामगार वर्ग आणि लघु, मध्यम उद्योजकांसाठी 20,00,000 कोटींचं एक पॅकेजही त्यांनी जाहीर केलं. आता एक वर्षं उलटलं. या वर्षभरात केंद्रीय आकडेवारी असं सांगते की, देशाचा जीडीपी विकास दर 7.3% नी कमी झाला आहे. मग आत्मनिर्भर भारत योजनेवर खर्च झालेले 20 लाख कोटी रुपये नेमके गेले कुठे? कोरोना काळात सरकारकडून लोकांना नेमकी किती आणि कशी मदत मिळाली? की मिळालीच नाही? पाहूया सोपी गोष्टमध्ये... संशोधन- सरोज सिंह लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
6/2/20217 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जीडीपीच्या परिक्षेत नरेंद्र मोदी पास की, नापास?

30 मे ला नरेंद्र मोदी सरकारने 7 वर्षांचा कालावधी पूर्ण केला. तर 31 मे ला देशाची वर्षभरातली आर्थिक कामगिरी सांगणारा जीडीपी विकास दर जाहीर झाला. देशाचं हे आर्थिक रिपोर्ट कार्ड असं सांगतंय की, आर्थिक वर्षं 2020-21 मध्ये देशाचा आर्थिक विकासदर उणे किंवा वजा 7.3% होता. म्हणजे आपली अर्थव्यवस्था इतक्या टक्क्यांनी घसरली किंवा आकुंचन पावली. पण मग याचा अर्थ काय? याचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होणार आहे? आपली कामगिरी इतर देशांच्या तुलनेत कशी होती? हे समजून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…संशोधन- ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
6/1/20216 minutes, 45 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मेहुल चोकसी यांची हिरे व्यापारी ते फरार गुन्हेगार होण्यापर्यंतची गोष्ट

पंजाब नॅशनल बँकेत बनावट कागदपत्रं सादर करून तब्बल 13,600 कोटी रुपयांची कर्ज उचलणारा मेहुल चोक्सी 2018 मध्ये भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. अँटिग्वा देशाने त्यांना नागरिकत्वही दिलं. त्यानंतर दोन वर्षांनी आता त्यांना जवळच्या डॉमनिका बेटांवर अटक झाली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्याचा आधार घेऊन त्यांना भारतात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण, या हालचालींनी यश येईल का? मूळात मेहुल चोकसी यांचा प्रथितयश व्यापारी, पीएनबी घोटाळा ते देशातून फरार होणं हा सगळा प्रवास समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन- ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
5/31/20216 minutes, 57 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड-19 संसर्ग झाल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका आहे का?

आजारातून बरं झाल्यानंतरही अनेकदा त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ सहन करावे लागतात. तशीच काहीशी गत कोव्हिडची. कोव्हिड-19 मुळे नव्याने होणाऱ्या मधुमेहावर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. डायबेटोलॉजिस्ट सांगतात की कोव्हिडमुळे नव्याने मधुमेह होण्याचं प्रमाण 10 टक्के आहे. यामागे काय कारणं आहेत? हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? संशोधन- मयांक भागवत लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
5/28/20214 minutes, 37 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमधून पसरला का याचा बायडन सरकार का करतंय तपास?

कोरोना व्हायरसचा उगम नेमका कसा झाला? तो चीनच्या लॅबमध्ये जन्माला आला होता या दाव्याला आजवर धुडकावलं गेलं. पण आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुप्तचर यंत्रणांना या दाव्याचीही सखोल शहानिशा करण्याचे आदेश दिलेत. अनेक तज्ज्ञांनीही हा व्हायरस प्रयोगशाळेत जन्मलेला असण्याची शक्यता पूर्णतः फेटाळता येणार नाही असं म्हटलंय. नेमकं सत्य काय आहे? ऐका आजची सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
5/27/20216 minutes, 14 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारताला अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत परत येण्याची चिंता का आहे?

अमेरिकन सैन्य 20 वर्षं अफगाणिस्तानात राहूनही तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित इतर कट्टरतावादी गटांचं कंबरडं मोडू शकलं नाही. तिथली लोकशाही प्रक्रिया अजूनही पूर्णपणे स्थिरावू शकलेली नाही. त्यामुळेच अमेरिका बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण होण्याची भीती आहे. लोकशाही सरकार जाऊन तालिबान सत्तेत आलं तर भारतासाठी चिंतेचं कारण ठरेल का? संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
5/27/20216 minutes, 59 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाव्हायरस उपचारासाठी मोदी सरकारची आयुष्मान भारत योजना कामी आली का?

गरीबांना कोरोनाचे उपचार ‘आयुष्मान भारत’ योजनेत मोफत मिळणार असल्याची घोषणा सत्यात उतरली का?
5/25/20216 minutes, 17 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस भारतात लहान मुलांना कधीपासून मिळणार?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संसर्गापासून वाचण्यासाठी लसीकरण हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे असं जगभरातल्या जाणकारांचं सांगणं आहे. सध्या भारतात लहान मुलांना लस दिली जात नाही पण जगातल्या काही देशांमध्ये हे केलं जातं. लहान मुलांना लस देण्याचे काय फायदे आहेत? त्यादृष्टीने भारतात काय हालचाली सुरू आहेत? ऐका आजची ही सोपी गोष्ट संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
5/24/20215 minutes, 27 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: काँग्रेस टूलकिट वापरून नरेंद्र मोदींची बदनामी करत असल्याचा भाजपचा दावा खरा की खोटा?

कोव्हिड काळात काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी टूलकिटचा वापर करत असल्याचं उघड झाल्याचा दावा भाजपने केलाय. #CongressToolkitExposed असा हॅशटॅग वापरून भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं पण हे टूलकिट फेक असल्याचं अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं. भाजप खोटारडा पक्ष असल्याचं काँग्रेस म्हणते तर हे खोटं असल्यास खुशाल काँग्रेसने या सगळ्याची चौकशी करावी असं भाजप म्हणतो. नेमकं प्रकरण काय आहे? कोव्हिड काळात हे राजकारण का सुरू आहे? ऐका आजची सोपी गोष्ट. संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
5/21/20216 minutes, 48 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना होम टेस्ट किट काय आहे? गुळणी करून कोरोनाची चाचणी कशी करायची?

कोरोनाची टेस्ट म्हटली की डोळ्यासमोर येतो स्वॉब आणि पीपीई किट घातलेले लोक. पण आता घरच्या घरीच कोरोना टेस्ट करता येणार आहे. पुण्याच्या माय लॅब या कंपनीने विकसित केलेलं घरच्या घरी टेस्ट करण्याच्या किटला ICMR ने मान्यता दिली आहे. तसंच नागपूरच्या नीरी या संस्थेने विकसित केलेल्या सलाईनच्या पाण्याची गुळणी करून सँपल घेण्याच्या तंत्रालाही मान्यता मिळाली आहे. काय आहेत या टेस्ट आणि त्यांचा कसा फायदा होईल? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- प्रवीण मुधोळकर, सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
5/20/20215 minutes, 17 seconds
Episode Artwork

इस्रायल कसा जन्माला आला? स्वातंत्र्य, इतिहास, आणि पॅलेस्टाईनशी वैर | सोपी गोष्ट

मुस्लिमबहुल प्रदेशात इस्रायल हा ज्यूंचा देश कसा जन्माला आला?
5/19/20215 minutes, 54 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनावरचं भारतीय औषध किती प्रभावशाली?

कोरोना : DRDO 2 DG हे कोव्हिडवरील भारतीय औषध किती प्रभावी आहे?
5/18/20217 minutes, 44 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकारने इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षात इस्रायलची बाजू का घेतली नाही?

इस्रायल आणि हमास यांच्यात गेले काही दिवस तीव्र संघर्ष सुरू आहे. अनेक लोकांचे यात जीव गेलेत, अनेक बेघर झालेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत आणि इस्रायल यांच्यातले संबंध अधिक दृढ झाल्याचं चित्र आहे. दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांच्या देशांना भेटी दिल्या. पण तरीही भारताने सध्याच्या संघर्षात इस्रायलची बाजू घेतलेली नाही. उलट पॅलेस्टाईनच्या न्याय्य उद्दिष्टांना भारताचं समर्थन असल्याचं राजदूतांनी संयुक्त राष्ट्रांना सांगतलं. मोदी सरकारच्या काळात भारताने इस्रायलची बाजू का घेतली नाही? ऐका आजच्या सोपी गोष्ट मध्ये. संशोधन- राघवेंद्र राव लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
5/17/20215 minutes, 10 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर का वाढवलं?

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर आता 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे इतकं वाढवण्यात आलं आहे. याचा अर्थ हा की, पहिल्या डोस नंतर दुसरा डोस तीन ते चार महिन्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे उलट लसीची परिणामकारकता वाढते असं संशोधनातून दिसून आलंय. तुमच्यापैकी अनेकांना सध्या दुसरा डोस मिळवताना अडचणी येतायत. कारण, लशीच उपलब्ध नाहीएत. अशावेळी तर या निर्णयाने मोठाच दिलासा मिळाला असेल. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर वाढल्यामुळे काय फायदा होणार आहे…संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
5/14/20216 minutes, 18 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इस्त्रायल - पॅलेस्टाईन एकमेकांशी सारखे का भांडतात?

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. आणि दोन दिवसांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर हा संघर्ष युद्धाचं रुप घेतो की काय, अशी भीतीही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानचा मूळ वाद नेमका काय आहे हे समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…संशोधन - बीबीसी टीम लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - ऋजुता लुकतुके, अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
5/13/20216 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऐन ईदच्या सणाला इस्त्रायल देश का पेटलाय?

एकीकडे अख्खं जग कोव्हिडचा सामना करत असताना मध्य-पूर्व आशियातल्या गाझा पट्टीत आणि जेरुसलेममध्ये वेगळाच संघर्ष सुरू झालाय. इस्त्राएलनं गाझा पट्टीतली १३ मजली हनाडी टॉवर ही इमारत पाडल्यानंतर हमास या कट्टरतावदी संघटनेनं इस्त्रायलच्या दिशेनं 130च्या वर रॉकेट्स डागली. आणि यात तेल अवीव हे इस्त्रायलचं महत्त्वाचं शहरही त्यांनी सोडलं नाही. या सगळ्यात आतापर्यंत तीसच्यावर नागरिकांचा जीव गेलाय. जेरुसलेम या धार्मिक स्थळावरून ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांमधला वाद पुरातन आहे. त्यातच ऐन ईदच्या सणाला कोणती नवी ठिणगी पडली, सध्या हा परिसर अशांत का आहे, समजून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये…संशोधन - ऋजुता लुकतुकेलेखन, निवेदन - ऋजुता लुकतुकेएडिटिंग - निलेश भोसले
5/12/20215 minutes, 45 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना रुग्णांना स्टिरॉईडचा फायदा होतो की तोटा?

डेक्झामेथेझॉन आणि इतरही काही स्टिरॉईड्स सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारी औषधं म्हणून गौरवली गेली. पण, दुसऱ्या लाटेत स्टिरॉईड्सच्या अतीवापराचे परिणामही बघायला मिळत आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीच्या दिवसांत स्टिरॉईडचा वापर झाल्यामुळे उलट संसर्ग वाढल्याचीही काही उदाहरणं आहेत. म्हणूनच आज कोरोना रुग्णांसाठी स्टिरॉईडचा वापर कसा आणि कुठे करायचा जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - मयांक भागवतलेखन, निवेदन - ऋजुता लुकतुकेएडिटिंग - निलेश भोसले
5/11/20216 minutes
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनानंतर कान, डोळ्यांना येणारी काळी बुरशी

कोव्हिड19च्या आजारातून बरे झालेल्या काही रुग्णांना नंतर काळी बुरशी किंवा म्युकोर मायकोसिसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. आणि त्यामुळे नाक, कान, डोळा किंवा अगदी मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचून अर्धांग वायूचा झटका किंवा डोळे काढण्यापर्यंत वेळ आली आहे. काळी बुरशीचा संसर्ग असलेल्या या आजाराला शास्त्रीय नाव आहे म्युकोर मायकोसिस. या आजाराविषयी आज सविस्तर जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...संशोधन - बीबीसी टीम वार्तांकन सहाय्य - निलेश पाटील लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
5/10/20216 minutes, 41 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे? सरकार काय सांगतं? | सोपी गोष्ट 333

मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे? असा सवाल विचारला जातोय.
5/7/20215 minutes, 23 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मराठा आरक्षण मोदी सरकार मिळवून देऊ शकेल? | सोपी गोष्ट 332

कलम 370 हटवतानाची हिंमत मराठा आरक्षणासाठी दाखवा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
5/6/20215 minutes, 10 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: नरेंद्र मोदी कोरोना काळातही नवी संसदेची इमारत का बांधत आहेत? | सोपी गोष्ट 329

‘नव्या संसदेवर खर्च होणारे 20 हजार कोटी लस, ऑक्सिजन विकत घेण्यासाठी वापरता आले नसते का?’
5/3/20215 minutes, 19 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लशीचा डोस मिळायला उशीर झाला तर काय होईल?

कोरोना लसीचा एक डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला दोन आठवड्यात कोरोनापासून संरक्षण मिळतं आणि मधल्या वेळेत या व्यक्तीला कोरोना झालाच तरी इतरांना संसर्ग होण्याचा धोका 49%नी कमी होतो, असं युकेमधील एक संशोधन सांगतं. भारतात सध्या लशीच्या तुटवड्यामुळे काहींना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. अशावेळी दुसरा डोस मिळायला उशीर झाला, दुसरा डोस मिळालाच नाही तर काय होईल या प्रश्नांची उत्तरं बघूया सोपी गोष्टमध्ये संशोधन - मयांक भागवत, बीबीसी आरोग्य टीम लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
4/30/20215 minutes, 23 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस 18+ साठी कोविनवर नोंदणी झाली, पण लस कधी मिळणार? सोपी गोष्ट 327

18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार असं सरकारने जाहीर केलं. त्यासाठी नोंदणीही सुरू झाली. पण लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळत नाही अशीच परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळतेय. असं का होतं आहे? 18 वर्षांच्या वरच्या लोकांना देण्यासाठी राज्यांकडे पुरेशा लशी आहेत का? महाराष्ट्राने याबद्दल काय निर्णय केलाय? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
4/29/20213 minutes, 53 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना ऑक्सिजन व्हेंटिलेटर PM केअर्स फंडमधून किती आले? किती चालले? सोपी गोष्ट 326

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडतेय. कोव्हिडच्या संकटाशी लढण्यासाठी सुरू केलेल्या PM केअर्स फंडमधून किती व्हेंटिलेटर घेतले गेले? त्यातले किती प्रत्यक्षात हाती आले आणि किती कार्यान्वित झाले? बीबीसीने सरकारी कागदपत्रं आणि माहिती अधिकारा वापर करून या प्रश्नांचा पाठपुरावा केला. ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- कीर्ती दुबे, टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
4/29/20215 minutes, 25 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: प्रोनिंगमुळे कोरोना रुग्णांचा जीव वाचतो का?

प्रोनिंग' म्हणजे पोटावर पालथं झोपणं. श्वास घेण्यासाठी त्रास होणाऱ्या कोव्हिड रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकतं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. आणि या पद्धतीला वैद्यकीय मान्यताही दिली आहे. रुग्णामधील ऑक्सिजन पातळी कमी झाली किंवा श्वास घ्यायला त्रास होत असले तर घरच्या घरी प्रोनिंग करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. तेव्हा शास्त्रीय प्रोनिंग कसं करायचं आणि त्याचे फायदे जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये.... संशोधन - बीबीसी मराठी टीम लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
4/27/20215 minutes, 45 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परमोच्च बिंदू नेमका कधी आणि किती येईल?

महाराष्ट्रात आणि देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. आताच रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या अहवालानुसार, अजून देशात दुसऱ्या लाटेचा परमोच्च बिंदू म्हणजे पीक आलेलाच नाही. तो मे महिन्याच्या मध्यावर येणार आहे. आणि तोपर्यंत दर दिवसाला रुग्णसंख्या 5 लाखांपर्यंत जाऊन पोहोचलेली असेल, असा अंदाज आहे. अशावेळी आपण नेमकं काय करायचं कोरोनाची ही लाट नक्की कधी ओसरेल जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
4/26/20215 minutes, 43 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात ऑक्सिजन तुटवडा का आहे? ऑक्सिजन पुरवठा सुरळीत कसा होणार? सोपी गोष्ट 323 (BBC News Marathi)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. देशातली ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून ऑक्सिजन आयात करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. रेल्वे, विमानामार्फत ऑक्सिजनची वाहतूक केली जात आहे. पण मुळात ऑक्सिजनचा तुटवडा का पडला? आरोग्य यंत्रणा बेसावध होती का? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
4/23/20215 minutes, 58 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना व्हायरस म्युटेशन ट्रिपल म्युटंट काय आणि किती घातक आहे? | सोपी गोष्ट 322

कोरोना व्हायरसची विविध म्युटेशन्स म्हणजे उत्परिवर्तनं जगभरात सापडत आहेत. भारतात सापडलेल्या म्युटेटेड कोरोनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत ‘डबल म्युटंट’चा मोठा हात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण आता ट्रिपल म्युटंटबद्दल बोललं जात आहे. तो काय आहे? त्यापासून आपल्याला किती धोका आहे? कोरोनाची आणखी किती म्युटेशन्स पाहायला मिळतील? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – बीबीसी मराठी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
4/22/20214 minutes, 49 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? HRCT टेस्ट कधी करतात? सोपी गोष्ट 321

कोरोनाचा संसर्ग शोधण्यासाठी कोरोना चाचणी करणं गरजेचं असतं. पण जर लक्षणं असूनही टेस्ट रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला तर? असं होण्याची कारणं काय असतात? रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही लक्षणं असतील तर काय करायचं? सध्या अनेक कोव्हिड रुग्णांची केली जाणारी HRCT टेस्ट काय असते? ती कोणत्या रुग्णांनी करावी? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – मयांक भागवत, सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
4/21/20215 minutes, 13 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस 18 वर्षांवरच्या सर्वांना पुरेल इतका साठा भारताकडे आहे का?। सोपी गोष्ट 320

18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस 1 मे पासून घेता येणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीला अनेक राज्यांनी ही मागणी केली होती, पण तेव्हा केंद्र सरकारने अशाप्रकारच्या मागण्या चिंताजनक आहेत म्हणत खूप टीका केली होती. मग आता दोन आठवड्यांत परिस्थितीत काय बदल झाला? सरसकट प्रौढांचं लसीकरण करण्याचा निर्णय का घेतला गेला? सगळ्यांना देता येतील इतक्या लशी भारताकडे आहेत का? नसतील तर त्या मिळवण्याची योजना काय आहे? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन - सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
4/20/20216 minutes, 5 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनामुळे महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन उद्धव ठाकरे करतील?

गुढी पाडव्यापासून राज्यात कडक निर्बंध आहेत. आठवडा उलटला तरी राज्यातल्या कोरोनाच्या केसेस वाढतानाच दिसत आहेत. अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन होताना पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं अनेक मंत्री म्हणत आहेत. ज्यांनी यापूर्वी लॉकडाऊनचा विरोध केला ते मंत्रीही आता त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. हे मतपरिवर्तन कसं झालं? कोरोनाचा प्रसार मंदावण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही का? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन - बीबीसी मराठी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
4/19/20216 minutes, 12 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लहान मुलांना कोरोना झाला तर काय काळजी घ्यायची?

भारतात कोरोनाची परिस्थिती आता इतकी बिकट झालीये की, दिवसाला 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होतेय. त्यातच एक चिंतेची गोष्ट म्हणजे, मुंबईत लहान मुलांमध्ये कोव्हिड होण्याचं प्रमाण तब्बल 65%नी वाढलंय. खासकरून महानगरांमध्ये मुलांमधल्या कोव्हिडचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आणि यात पाच वर्षांच्या आतल्या मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. अशावेळी लहान मुलांमध्ये कोव्हिडची दिसणारी लक्षणं नेमकी काय आहेत? त्यावर काय उपचार आहेत? आणि मुलांसाठी नेमकी काय खबरदारी घ्यायची? याचबद्दल बोलूया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - अमृता दुर्वे, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
4/16/20217 minutes, 27 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड परिस्थिती हाताळताना राज्यसरकारने केलेल्या 7 संभाव्य चुका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात 24 तासांत 2 लाख रुग्णांची विक्रमी नोंद झालीये. आणि महत्त्वाचं म्हणजे यातले किमान 25% रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात हॉस्पिटल बेड्स, औषधं, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवतोय. अनेक जणांना रेमडेसिविर मिळत नाहीये. अनेकांना ऑक्सिजन मिळत नाहीये तर हॉस्पिटलमध्ये बेड मिळवायलाही झगडावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊनसारखेच कडक निर्बंध लावलेत. पण महाराष्ट्रावर ही वेळ का आली? आज सोप्या गोष्टीमध्ये जाणून घेऊया राज्य सरकारकडून महाराष्ट्रातली परिस्थिती हाताळण्यात झालेल्या 7 संभाव्य चुका... संशोधन - सरोज सिंह लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
4/15/20218 minutes, 9 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लॉकडाऊनविषयी तुमच्या मनातल्या 7 प्रश्नांची उत्तरं

‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कडक निर्बंध पुढच्या पंधरा दिवसांसाठी लागू केले आहेत. पण, त्यांचं भाषण संपल्या संपल्या सोशल मीडियावर आणि बीबीसीच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरही सगळ्यांचे धडधडा प्रश्न यायला लागले. कलम 144, संचारबंदी म्हणजे नेमकं काय? आम्हाला कुठल्या कामासाठी बाहेर पडता येईल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. अशाच महत्त्वाच्या 7 प्रश्नांची उत्तर सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
4/14/20217 minutes, 57 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनापासून वाचण्याचे ‘हे आहेत 9 फंडे

एक वर्ष उलटून गेलंय, संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलंय. पहिली लाट जात नाही तोच दुसऱ्या लाटेनं कहर केलाय. तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. आणि त्यामुळेच आपल्याला अधिक काळजी घ्यायला सांगितल जातंय. लस आहे पण ती आपला 100% बचाव करू शकते का? तर नाही... आणि म्हणूनच आपल्याला कोरोनासोबत आणि आपली काळजी घेत जगावं लागणार आहे. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया कोरोनासोबत जगण्याचे 9 फंडे…आणि ते ही स्वीत्झर्लंडमधल्या मऊ, लुसलुशीत चीजच्या तुकड्यांबरोबर... लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
4/14/20215 minutes, 34 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: रेमडेसिविर जीव वाचवत नाही, तर मग त्यावरून एवढा गदारोळ का?

एकीकडे रेमडेसिविर या औषधासाठी कोव्हिड रुग्णांचे नातेवाईक जीवाचं रान करताना दिसतायत. महाराष्ट्रभर या औषधाचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेनं ऑक्टोबर 2020मध्येच या औषधामुळे कोव्हिड रुग्णाचा जीव वाचत नाही, असा निर्वाळा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं हे मत असताना राज्यात रेमडेसिविरचा वापर का होत आहे? रेमडेसिविरमुळे रुग्णाला काय मदत मिळते? याविषयी जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
4/12/20215 minutes, 46 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा का निर्माण झाला?

कोरोनाची दुसरी लाट देशभरात सुरू झाली आणि १ एप्रिलपासून केंद्रसरकारने ४५ वर्षांवरच्या वयोगटातल्या सगळ्यांसाठी लसीकरण मोहीम खुली केली. लसीकरणाची व्याप्ती तर वाढली. पण, देशातल्या वाढलेल्या गरजेला पुरे पडतील इतक्या लशी देशात उपलब्ध आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. केंद्रसरकारने वारंवार हे नाकारलं असलं तरी देशात लशींचा तुटवडा भासतोय असं उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटनेही म्हटलंय. लस पुरवठ्याच्या बाबतीत नेमकी परिस्थिती काय आहे? लसीचा तुटवडा का झालाय, जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये…संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुकेलेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
4/9/20216 minutes, 45 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लसीमुळे खरंच रक्ताच्या गुठळ्या होतात का?

ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस घेतल्यावर शरीरात रक्ताची गुठळी तयार होणं हा अगदीच क्वचित आढळणारा साईड इफेक्ट आहे, असं काल युरोपीयन युनियनच्या औषध नियामक संस्थेनं स्पष्ट केलं. आणि युरोपातल्याच काय जगातल्या सगळ्याच देशांमध्ये लोकांना हायसं वाटलं असणार. कारण, भारतातही ज्या दोन लसींना मान्यता मिळालीय त्यातली एक ऑक्सफर्ड - अँस्ट्राझिनिकाची लस आहे, जिला आपण कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो. भारतात रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या फारशा घटना समोर आल्या नव्हत्या. पण, धास्ती तर वाटतेच. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया खरंच अँस्ट्राझिनिका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात का, आणि आता त्यावर तज्ज्ञांचं काय मत आहे, आजच्या सोपी गोष्टमध्ये… संशोधन - बीबीसी आरोग्य टीम लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
4/8/20216 minutes, 28 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात सरसकट लसीकरण शक्य आहे का?

भारतात कोरोनाची सुरुवात होऊन आता एक वर्ष उलटून गेलंय. पण पहिली लाट जाते ना जाते तोच दुसरी लाट धडकलीये. गेल्या 24 तासात देशात एकूण 1,15,436 रुग्णांची नोंद झालीये. गेल्या वर्षभरातील देशातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. तर त्यातले 55,469 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडलेत. म्हणजे देशातील रुग्णसंख्येच्या जवळपास 50% रुग्ण महाराष्ट्रात सापडतायत. हे आकडे सांगण्याचं कारण म्हणजे, एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय की, राज्यात कोरोनाचा इतका कहर आहे मग सरसकट लसीकरण का केलं जात नाहीये? लसीकरणासाठीची वयोमर्यादा पाळणं खरंच गरजेचं आहे का? महाराष्ट्र सरकारनं तशी विनंती केंद्राकडे केलीये. पण त्यावर केंद्र सरकारचं, आरोग्य तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? आणि असं सरसकट लसीकरण योग्य आहे का? याचविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये… संशोधन - सरोज सिंह, मयुरेश कोण्णूर लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
4/7/20216 minutes, 56 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: व्लादिमीर पुतिन यांनी रशियन राजकारणावर पकड कशी मिळवली?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहू शकणार आहेत. एका घटनादुरुस्तीमुळे पुतिन यांना हे शक्य होणार आहे. 36मध्ये पुतिन 83 वर्षांचे असतील. तोपर्यंत ते निवडणुका जिंकत राहिले आणि प्रकृतीनेही साथ दिली तर ते सर्वोच्च पदावर राहू शकतील. आणि त्यांनी तोपर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण केला तर ज्येष्ठ नेते स्टॅलिन यांना मागे टाकून ते रशियातले सगळ्यात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेले नेते असतील. आहे ना विलक्षण?मूळात पुतिन हे साधंसुधं व्यक्तिमत्व नाहीच आहे मूळी. आंतरराष्ट्रीय राजकारणातला त्यांचा दबदबा आणि रशियातली त्यांची माचोमॅनची प्रतिमा असं सगळंच विलक्षण आहे. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये व्लादिमीर पुतिन या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊया…. संशोधन - टीम बीबीस, ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
4/6/20215 minutes, 9 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात नक्षलवादी चळवळ कशी फोफावली?

क्रांती म्हणजे कुठली मेजवानी नव्हे, एखादा सुरेख निबंध लिहिणं नव्हे. तर क्रांती हा सत्ताधाऱ्यांविरोधातला सशस्त्र उठाव आहे. चीनमधल्या कम्युनिस्ट क्रांतीचे आद्य नेते माओ त्से तुंग यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. आज मला आठवलं कारण, याच विचारांनी प्रेरित झालेल्या देशातल्या नक्षली गटांनी ३ एप्रिलला बिजापूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाबरोबर केलेला संघर्ष आणि यात २२ जवानांचा झालेला मृत्यू. १९६७ पासून भारतात नक्षलवादी गट सक्रिय आहेत. पण, त्यांच्या नेमक्या मागण्या का आहेत, सरकारबरोबर त्यांचा संघर्ष अशा वारंवार का होतो, आज समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
4/5/20216 minutes, 29 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: सायबर हल्ला, रॅन्समवेअर वापरून खंडणी मागणाऱ्यांपासून कसं वाचायचं?

कॉम्प्युटरमधले पॉर्न व्हीडिओ प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन हॅकर्सनी खंडणी वसूल केली.
4/2/20215 minutes, 42 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लॉकडाऊनशिवाय दुसरे पर्याय काम करत नाहीत का?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. जगात इतरही अनेक देशांनी अनेकदा लॉकडाऊन लावले आहेत. पण तसं न करताही कोरोनाचा संसर्ग दूर ठेवता येतो का? एकीकडे काही देश कोरोनाचं संकट थोपवण्यासाठी अनेकदा लॉकडाऊन लावतायत तर दुसरीकडे एकदाही लॉकडाऊन न केलेले देश आहेत. यातला नेमका कोणता उपाय अधिक चांगला? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
4/1/20215 minutes, 50 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इलेक्टोरल बाँड्स काळा पैसा राजकारणापासून दूर ठेवू शकतात का?

2017 मध्ये मोदी सरकारने अर्थसंकल्पात इलेक्टोरल बाँड्स किंवा निवडणूक रोखे घोषित केले. हे बाँड्स राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठीचं एक साधन आहे. पण राजकीय पक्षांना या बाँड्समार्फत मिळालेल्या देणग्या घोषित न करण्याचं बंधन नाही. तसंच या बाँड्समार्फत कोण देणगी देतंय ते सुद्धा गुप्त ठेवलं जातं. या सगळ्यामुळे राजकारणतील पारदर्शकतेला तडा जातो असा अनेकांचा दावा आहे. यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो का? सामान्य माणसांवर या सगळ्याचा काय परिणाम होतो? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न. संशोधन - सिद्धनाथ गानू लेखन,निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- अरविंद पारेकर
3/31/20217 minutes, 7 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: सुएझ कालव्यात अडकलेलं 'एव्हर गिव्हन' जहाज कसं बाहेर निघालं?

दोन लाख टन वजनाचं ‘एव्हरग्रीन’ नावाच्या तैवानी मालवाहतूक कंपनीचं ‘एव्हरगिव्हन’ हे जहाज सोमवारी अखेर सुएझ कालव्यातून मोकळं झालं. साधारण आठवडाभर हे जहाज काव्याच्या दक्षिणेकडच्या टोकाशी अडकून पडल्याने या कालव्यात अक्षरशः ट्रॅफिक जाम झाला होता. या बोटीच्या दोन्ही बाजूने 350 पेक्षा जास्त जहाजं आणि बोटी अडकून पडल्या. मधल्या काळात जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं. अधिक तपास केल्याशिवाय ही बोट मुळात अडकलीच कशी याचा उलगडा होणार नाही. ही बोट सोडवण्यासाठी काय काय करावं लागलं? यात कुणी महत्त्वाची भूमिका बजावली? पाहूया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - टीम बीबीसी, सिद्धनाथ गानू लेखन,निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- अरविंद पारेकर
3/29/20215 minutes, 49 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: सुएझ कालव्यात कशी अडकली महाकाय बोट?

दोन लाख टन वजनाचं तैवानी कंपनीचं ‘एव्हरग्रीन’ हे जहाज मंगळवारी जगप्रसिद्ध सुएझ कालव्यात अडकलं. आणि त्यामुळे या कालव्यात चक्क ट्राफिक जाम झाला आहे. पर्यायी कालव्यातून तात्पुरती वाहतूक सुरू झाली असली तरी सध्या तीसच्यावर जहाजं अजून अडकून पडली आहेत. आशियाला युरोपशी जोडणारा हा महत्त्त्वाचा जलमार्ग आहे. आणि तिथेच ट्राफिक जाम झाल्यामुळे जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान होतंय. पण, बोटीचा हा अपघात घडला कसा, त्याचे काय परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत, पाहूया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
3/26/20215 minutes, 34 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशाचे आगामी सरन्यायाधीश एन रमण्णा नेमके कोण आहेत?

देशाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून नुतलापट्टी वेंकट रमण्णा यांच्या नियुक्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे. पण त्याचवेळी रमण्णा यांच्या विरोधात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिक न्यायालयाने फेटाळली आहे. किंबहुना ही याचिका फेटाळल्यावरच रमण्णा यांच्या शिफारसीचं पत्र बोबडे यांनी पाठवलं. पण, सरन्यायाधीश पगासाठी नाव सुचवलेले रमण्णा त्यांच्याच राज्यात वादग्रस्त का ठरलेत? त्यांच्या विरोधातले वाद काय आहेत? आणि त्यांनी कुठल्या महत्त्वाच्या खटल्यात न्यायनिवाडा केलाय? म्हणजे, थोडक्यात आपल्या आगामी सरन्यायाधीशांविषयी आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया… संशोधन - ऋजुता लुकतुके, बाला सतीश लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
3/25/20215 minutes, 27 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात खरंच पुन्हा लॉकडाऊन लागेल का?

एकीकडे देशात पहिला राष्ट्रीय लॉकडाऊन लागला त्याला २४ मार्चला एक वर्ष होतंय. आणि त्याचवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होऊन पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी चर्चा सुरू झालीय. फेब्रुवारीच्या मध्यापासून देशभर सरासरी चाळीस हजार नवीन रुग्ण सापडतायत. आणि त्यातले साठ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणून लोकांच्या मनात भीती वाढतेय की, पुन्हा लॉकडाऊन लागेल का? तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बोलूया खरंच लॉकडाऊनची शक्यता किती आहे. आणि मूळात लॉकडाऊनचा निर्णय घेताना कोणते निकष राज्यसरकार लावत असतं. संशोधन - ऋजुता लुकतुके, राहुल गायकवाड लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- शरद बढे
3/24/20216 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारला जोडलं का?

तुमचं पॅनकार्ड आणि तुमचं आधारकार्ड ही तुमची दोन महत्त्वाची सरकारी ओळखपत्रं आहेत. आणि आता ती ऑनलाईन जोडणं किंवा एकमेकांना लिंक करणं केंद्रसरकारने अनिवार्य केलंय. त्यासाठी शेवटची मुदत आहे ३१ मार्च पर्यंतची. तोपर्यंत तुम्ही तसं केलं नाहीत तर तुमचं पॅनकार्ड इनअँक्टिव्ह किंवा तात्पुरतं स्थगित होऊ शकतं. तुमच्या पुढच्या सगळ्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी हे महत्त्वाचं आहे बरं का! म्हणूनच आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया पॅन आधारशी कसं जोडायचं, का जोडायचं आणि नाही जोडलं तर काय होईल? संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- शरद बढे
3/23/20216 minutes, 47 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पाकला का करायची आहे भारताशी मैत्री?

भारत पाकिस्तान दरम्यान सीमेवर होणाऱ्या चकमकी अलीकडे कमी झाल्यात असं वाटतं का? कारण न्यूजपेपर आणि वेबसाईटवर तशा बातम्या तरी कमी झाल्यात. अधिकृत बातमी असं सांगते की, मागच्या तीन आठवड्यात सीमेपलीकडून असा कुठलाही मोठा गोळीबार झालेला नाही. उलट, भारत आणि पाकिस्तानने २००३च्या युद्धविराम कराराचं पुन्हा पालन करायचं ठरवलं आहे अशी बातमी तुम्हाला बघायला मिळेल. आणि भर म्हणून मंगळवारी दोन देशांमधला सिंधू नदी पाणी वाटपाच्या प्रश्नावरही दोन्ही देशांदरम्यान चर्चा होणार आहे. यावेळी शांततेचा आणि युद्धविरामाचा प्रस्ताव पाकिस्तानकडून आलाय. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बोलूया पाकिस्तानला भारताशी पुन्हा शांतता का प्रस्थापित करायचीय. आणि भारताचा त्याला प्रतिसाद कसा आहे, सोपी गोष्टमध्ये…. संशोधन - बीबीसी उर्दू टीम, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- शरद बढे
3/22/20216 minutes, 43 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवा गर्भपात कायदा महिलांसाठी हिताचा आहे का?

गर्भपात कायद्यातील (MTP) सुधारणा काय आहेत? त्यामुळे महिलांना फायदा मिळेल का?
3/18/20217 minutes, 1 second
Episode Artwork

कोरोना लस : महाराष्ट्रात कसं सुरू आहे लसीकरण? किती जणांनी लस घेतली?

भारतामध्ये सुरू असलेली कोरोनाची लसीकरण मोहीम ही जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे.
3/12/20216 minutes, 23 seconds
Episode Artwork

नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यास तो देशद्रोह ठरतो का? सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय? BBC New Marathi

नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यास तो देशद्रोह ठरतो का?
3/4/20216 minutes, 39 seconds
Episode Artwork

कोरोना लस, कोविन अॅप आणि इतर प्रश्नांची उत्तरं (BBC News Marathi)

कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला खरा पण त्यातही अनंत अडचणी येतायत. अनेकांनी तांत्रिक बिघाडांबद्दल तक्रार केलीय. पण त्यापलीकडेही अनेक प्रश्न आहेत, शंका आहेत. कोरोना लसीकरणाबद्दल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तज्ज्ञांकडून मिळवली. ऐका ही सोपी गोष्ट. संशोधन- मयांक भागवत लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
3/4/20215 minutes, 9 seconds
Episode Artwork

मुंबई वीज पुरवठा चीनच्या सायबर हल्ल्याने बंद झाला होता? सोपी गोष्ट 285 (BBC News Marathi)

मुंबईत ऑक्टोबर 2020 मध्ये अचानक काही तास लाईट गेले आणि कधीही न झोपणारं शहर ठप्प झालं. यात घातपात होता का याची चौकशी राज्य सरकार करत होतं. आता यामागे सायबर हल्ला असल्याचं सरकारने मान्य केलंय. पण तो चीनी हल्लेखोरांनी केला की नाही हे मात्र ते स्पष्टपणे सांगत नाहीयत. मुंबईत नेमकं काय घडलं होतं? असे सायबर हल्ले कसे केले जातात? संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
3/2/20214 minutes, 24 seconds
Episode Artwork

महाराष्ट्र विधानसभा विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळावरून खडाजंगी का झाली? (BBC News Marathi)

ही विकास महामंडळं कशासाठी निर्माण झाली होती? त्यांचा किती उपयोग झाला?
3/1/20215 minutes, 44 seconds
Episode Artwork

कोरोना व्हायरसपासून लहान मुलांची काळजी कशी घ्यायची? सोपी गोष्ट 283

कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातली रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. वाशिम, सातारा, सोलापुरात जवळपास 300 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थी कोव्हिड पॉझिटिव्ह झाले. कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होतच नाही असा अनेकांचा ग्रह आहे. लहान मुलांची कोरोनाच्या काळात काळजी कशी घ्यायची? शाळांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय करायला हवे? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमधून.संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
2/26/20215 minutes, 42 seconds
Episode Artwork

बँकांचं खाजगीकरण केलं तर तुमचा फायदा की तोटा? सोपी गोष्ट 282

मोदी सरकारने या बजेटमध्येच बँकांच्या खाजगीकरणासंबंधी घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी बुधवारी दिलेल्या एका भाषणाने सरकार नेमक्या किती बँकांचं खाजगीकरण करणार याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खाजगीकरणाने बँकांचा, ठेवीदारांचा आणि सरकारचा फायदा होणार की तोटा? जाणून घ्या. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
2/25/20214 minutes, 51 seconds
Episode Artwork

फेसबुक आणि गुगल ऑनलाईन बातम्या दाखवणं बंद करू शकतात? सोपी गोष्ट 281

तुम्ही फेसबुक, गुगल किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर बातम्या पाहत असाल. त्या फुकट असतात. पण ही ॲप्स चालवण्यासाठी पैसे लागतातच. या कंपन्यांना हा पैसा कुठून मिळतो? त्या पैशाच्या वाटपावरूनही वाद आहेत. मग या कंपन्या आपल्या प्लॅटफॉर्म्सवर बातम्या दाखवणं थेट बंद करू शकतात का? जाणून घ्या सोपी गोष्ट च्या या भागात.संशोधन- टीम बीबीसीलेखन, निवेदन- सिद्धनाथ गानूएडिटिंग- निलेश भोसले
2/24/20215 minutes, 20 seconds
Episode Artwork

कोरोना व्हायरस : रामदेवबाबांच्या पतंजली कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी, डॉक्टर्स कोरोनिलबद्दल काय म्हणतात? #सोपीगोष्ट 280

योग गुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेलं कोरोनिल औषध लाँच केलं. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये, हे औषध कोरोनावर परिणामकारक असण्याचा दावा करण्यात आला. तर या औषधाला WHO, IMF आणि इतरांकडून मान्यता मिळेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोरोनिलच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. कोरोनिलविषयी काय दावे करण्यात आले? आणि त्यावर कोणी काय प्रतिक्रिया दिलेली आहे? जाणून घेण्यासाठी ऐका ही सोपी गोष्ट संशोधन : मयांक भागवत लेखन,निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
2/23/20216 minutes
Episode Artwork

कोरोना व्हायरस : डबलमास्किंग म्हणजे एकावेळी दोन मास्क घातल्याने जास्त संरक्षण मिळतं का? #सोपीगोष्ट 279

एका ऐवजी 2 मास्क एकावेळी वापरणं अधिक सुरक्षित असल्याचं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने म्हटलंय. कोव्हिड 19 पसरवणाऱ्या Sars –CoV2 या मूळ विषाणूच्या तुलनेत त्याचे नवीन व्हेरियंट्स हे अधिक Transmissible म्हणजे पसरण्याजोगे असल्याचं म्हणत डॉ. अँथनी फाऊची यांनी लोकांना डबल मास्किंगचा सल्ला दिलाय. असं करावं का, त्यामुळे कोव्हिडपासून डबल संरक्षण मिळतं का? त्यामुळे गुदमणार नाही का? आणि महत्त्वाचं म्हणजे डबल मास्किंगसाठी कोणते मास्क वापरायचे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. संशोधन : अमृता दुर्वे निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
2/22/20215 minutes, 39 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अशी अवेळी गारपीट का झाली?

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात अशी अवेळी गारपीट का झाली?
2/19/20215 minutes, 20 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: शिवजयंती तारखेचा वाद काय आहे?

राज्यभर एकाच तारखेला शिवजयंती का साजरी होत नाही?
2/18/20215 minutes, 12 seconds
Episode Artwork

कोरोना व्हायरस : कोव्हिड 19साठीची लस घेतलेली व्यक्ती कोरोना पसरवू शकते का?

एखाद्या व्यक्तीने लस घेतल्यानंतरही तिच्यामार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो का?
2/17/20215 minutes, 57 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल-डिझेलच्या किमती आटोक्यात येतील का? (BBC News Marathi)

पेट्रोलने गाठली शंभरी, इंधन दरवाढीवर केंद्रसरकार काय पावलं उचलणार?
2/16/20217 minutes, 26 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: दिशा रवी यांना अटक झाली ते टूलकिट प्रकरण (BBC News Marathi)

२२ वर्षीय पर्यावरणवादी नेत्या दिशा रवी यांना ‘टूलकिट प्रकरणी’ दिल्ली पोलिसांनी काल अटक केली आहे. ग्रेटा थुनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना केलेल्या ट्विटच्या टूलकिट एडिटर दिशा रवी होत्या. आणि या टूलकिटच्या माध्यमातून खलिस्तानी चळवळीशी संबंधित भारताविरोधात द्वेष पसरवणारा संदेश पसरवण्याचा त्यांचा उद्देश होता, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणामुळे टूलकिट हा नेमका काय प्रकार आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आज सोपी गोष्टमध्ये तेच समजून घेणारोत. शिवाय जाणून घेणार आहोत टूलकिट प्रकरणाविषयी...
2/15/20215 minutes, 9 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भीमा कोरेगाव प्रकरणात पुरावे पेरले गेले होते का?

सायबर हल्ला करून आरोपीविरुद्ध कागदपत्रं पेरली गेल्याचा दावा केला जातोय.
2/12/20214 minutes, 19 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: Koo App Twitter ला पर्याय ठरेल का?

कू चा पिवळा पक्षी ट्विटरच्या निळ्या पक्ष्याला चोच मारेल का?
2/11/20214 minutes, 19 seconds
Episode Artwork

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चार दिवस रोज बारा तास काम कराल का?

'चार दिवस काम, तीन दिवस आराम' ही आयडिया तुम्हाला कशी वाटते?
2/10/20215 minutes, 26 seconds
Episode Artwork

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकरांच्या ट्वीट्सची चौकशी सरकार करू शकतं का? सोपी गोष्ट 270

दबावाखाली ट्वीट्स केले का याची चौकशी केली तरी गुन्हा दाखल करता येईल का?
2/9/20214 minutes, 9 seconds
Episode Artwork

उत्तराखंड चमोली हिमस्खलन का घडलं? हिमस्खलन म्हणजे काय?

स्की करताना साधा वाटणारा बर्फ इतकं घातक रूप कसं धारण करू शकतो? हिमस्खलन म्हणजे नेमकं काय?
2/8/20214 minutes, 37 seconds
Episode Artwork

IndvsEng : भारत वि. इंग्लंड टेस्ट मॅचसाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन SG बॉलची खासियत काय आहे?

भारत-इंग्लंड टेस्ट मॅचसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉलची खासियत तुम्हाला माहिती आहे का?
2/5/20215 minutes, 1 second
Episode Artwork

शेतकरी आंदोलन : आंतरराष्ट्रीय पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला की तोटा?

रिहानाच्या पाठिंब्याने शेतकऱ्यांचा लोचा?
2/4/20217 minutes, 10 seconds
Episode Artwork

कॅण्डिडा ऑरिस बुरशी काय आहे? निपाह व्हायरस आणि स्वाईन फ्लू कोरोना इतकेच जीवघेणे ठरू शकतात का?

कोरोनापेक्षा ‘हे’ तीन आजार जीवघेणे ठरू शकतात?
2/3/20216 minutes, 36 seconds
Episode Artwork

म्यानमारमधल्या लष्करी उठावाचा भारतावर काय परिणाम होईल?

आँग सान सू ची यांना झालेली अटक आणि म्यानमारमधल्या लष्करी बंडाकडे भारताचं लक्ष का आहे?
2/2/20216 minutes, 32 seconds
Episode Artwork

बजेट 2021 : अर्थसंकल्पामधल्या कोणत्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल?

अर्थसंकल्पातल्या ‘या’ गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल.
2/1/20215 minutes, 33 seconds
Episode Artwork

लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचं संरक्षण करणारा POCSO कायदा काय आहे?

लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचं संरक्षण करणाऱ्या POCSO कायद्याविषयीची सोपी गोष्ट
1/29/20217 minutes
Episode Artwork

बजेट म्हणजे काय? अर्थसंकल्पात काय-काय असतं?

1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प सोप्या शब्दांत समजून घेण्यासाठी ऐका ही सोपी गोष्ट.
1/29/20216 minutes, 23 seconds
Episode Artwork

Welcome

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
1/21/20211 minute