दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठीचं 'मिशन मौसम' काय आहे? BBC News Marathi
11 सप्टेंबरला कॅबिनेटने मिशन मौसम नावाच्या योजनेची घोषणा केली. 5 वर्षांमध्ये दोन टप्प्यांमध्ये राबवलं जाईल.
यासाठी पुढच्या दोन वर्षांत 2000 कोटींचा निधी दिला जाणार आहे. Ministry of Earth Science - म्हणजेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या मिशन मौसमद्वारे हवामानाबद्दल काम करणाऱ्या देशातल्या 3 मोठ्या संस्थांमधल्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येणार आहे. India Meteorological Department (IMD) म्हणजेच हवामान खातं, National Centre for Medium Range Weather Forecasting म्हणजे शेतीसाठी फायदयाचा मध्यम पल्ल्याचा राष्ट्रीय हवामान अंदाज मांडणारी संस्था आणि Indian Institute of Tropical Meteorology (IITM) म्हणजे भारतीय उष्णकटीबंधीय हवामान विज्ञान संस्थान या तीन संस्थांमध्ये हवामान अभ्यासासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान या मिशन मौसमद्वारे आधुनिक करण्यात येईल. लेखन, निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर
9/19/2024 • 5 minutes, 31 seconds
GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi
उपग्रह आधारित नव्या टोल आकारणीमुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी आणि कोंडी कमी होईल किंवा संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. एप्रिल 2025 पासून GNSS आधारित टोलची अंमलबजावणी होण्याचा अंदाज आहे आणि कालांतराने ही यंत्रणा Fastag ची जागा घेईल आणि Fastags बंद होतील.
कदाचित यापुढे टोलनाक्याला लांब रांगा लागणार नाहीत आणि तुम्हाला टोलची ठराविक रक्कम भरावी न लागता तुम्ही जितका प्रवास केलाय तेवढ्यासाठीच पैसे भरावे लागतील.टोल आकारणीसाठी येऊ घातलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टीम - GNSS हे होऊ शकतं. काय आहे GNSS ...समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
9/19/2024 • 5 minutes, 6 seconds
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर राहतात कसे? जेवतात, झोपतात कसे? BBC News Marathi
पृथ्वीपासून 400 किलोमीटर्स दूरच्या उंचीवर अंतराळात राहताना कसं वाटतं? तिथे ते खातात - झोपतात क से? व्यायाम कसे करतात? कपडे धुतात का? आणि...अंतराळस्थानकात वास असतो का कसला?
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधलं अंतराळवीरांचं आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्यासाठी पहा, हा व्हीडिओरिपोर्ट : जॉर्जिना रेनर्ड
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : अरविंद पारेकर
9/17/2024 • 6 minutes, 14 seconds
डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस US निवडणुकीतले 9 महत्त्वाचे मुद्दे | BBC News Marathi
5 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सध्याच्या डेमोक्रॅटिक उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चढाओढ आहे.
कोणते मुद्दे आहेत जे अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये महत्त्वाचे ठरतायत? आणि त्याबद्दल राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांची मतं काय आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - शरद बढे
9/12/2024 • 6 minutes, 46 seconds
स्पेसएक्स पोलारिस डॉन मिशन काय आहे? अंतराळ पर्यटन सुरू होणार? BBC News Marathi
खासगी पैशांतून स्पेसवॉकसाठी स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने 10 सप्टेंबरला झेप घेतली. अब्जाधीश जेरर्ड आयझॅकमन हे अंतराळवीर नसूनही स्पेसवॉक करणारे पहिले व्यक्ती ठरण्याची शक्यता आहे.
या मोहीमेचं नावं आहे पोलारिस डॉन. जेरर्ड आयझॅकमन यांच्या Shift4 या उद्योगाने निधी दिलेल्या तीन अंतराळ मोहीमांपैकी ही पहिली मोहीम आहे. फाल्कन 9 च्या या पोलारिस डॉन मोहीमेत जेरर्ड आयझॅकमन यांच्यासोबत त्यांचा जवळचा मित्र असणारे निवृत्त एअर फोर्स पायलट स्कॉट 'किड' पोटीट आणि स्पेस एक्सचे दोन इंजिनियर्स अॅना मेनन आणि सारा गिलीस सहभागी आहेत. अंतराळात जाणाऱ्या या यानाचं नाव आहे रिझीलियन्स (Resilience). हे अंतराळयान या चार प्रवाशांना पृथ्वीपासून तब्बल 1400 किलोमीटर्स (870 मैल) उंचीवर घेऊन जाईल. यापूर्वी 1970च्या दशकामध्ये नासाच्या अपोलो अंतराळ मोहीमांमधली यानं इतक्या उंचीवर अंतराळवीरांना घेऊन गेली होती.
कशी होणार आहे ही मोहीम? यादरम्यान कोणते प्रयोग करण्यात येणार आहेत?
रिपोर्ट - पल्लब घोष
निवेदन - गुलशन वनकर
एडिटिंग - शरद बढे
9/11/2024 • 6 minutes, 49 seconds
स्लीप प्निया म्हणजे काय? या आजारातले धोके काय आहेत?
Sleep Apnea म्हणजे झोपेमध्ये श्वसनक्रियेत अडथळा येऊन श्वास थांबणं. यात मेंदू सतर्क होऊन आपल्याला जागं करतो आणि श्वासोच्छवास पुन्हा सुरू होतो. पण यामुळे शांत झोप लागत नाही. दीर्घकाळ असं झालं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. स्लीप अॅप्नियाची लक्षणं कोणती? याचे धोके कोणते आहेत? आणि यावर उपचार काय आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
9/10/2024 • 5 minutes, 39 seconds
शत्रू संपत्ती कायदा म्हणजे काय ज्याद्वारे जनरल मुशर्रफ यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला? BBC News Marathi
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशरर्फ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या उत्तर प्रदेशच्या बागपतमधल्या जमिनीचा लिलाव नुकताच शत्रू संपत्ती कायद्यानुसार करण्यात आला.
पण हा शत्रू संपत्ती कायदा काय आहे? यामध्ये कोणत्या संपत्तीचा समावेश होतो? आणि ती कधी विकता येते?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
9/9/2024 • 4 minutes, 51 seconds
डोळ्यांत ड्रॉप्स टाकून चष्मा जाऊ शकतो का? हे ड्रॉप्स किती सुरक्षित आहेत? BBC News Marathi
एका नवीन औषधाला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGI ने मान्यता दिलीय. हे आहेत PresVu नावाचे डोळ्यांत टाकायचे ड्रॉप्स. जवळचं वाचण्यासाठी चष्मा वापरावा लागणाऱ्यांना या आयड्रॉप्समुळे दिलासा मिळू शकतो.पण काय आहेत हे PresVu आयड्रॉप्स? त्यात नेमकं काय आहे? याचा खरंच फायदा होतो का? आणि या ड्रॉप्सचा वापर किती सुरक्षित आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये...
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
9/6/2024 • 6 minutes, 56 seconds
जगातल्या 99% जनतेला होतोय या गोष्टीचा त्रास | BBC News Marathi
जगामध्ये अशी एक गोष्ट आहे जिचा जगभरातल्या 99% जनतेला त्रास होतोय... आणि दरवर्षी जवळपास 40 लाख लोक याला बळी पडतात.
ही गोष्ट आहे - वायू प्रदूषण - Air Pollution
7 सप्टेंबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज म्हणून पाळण्याचं 2020 मध्ये युनायटेड नेशन्सने जाहीर केलं.
हवेच्या प्रदूषणाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात? जगभरात यामुळे कोणते आजार भेडसावतायत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
9/5/2024 • 5 minutes, 32 seconds
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये आणलेलं अपराजिता विधेयक काय आहे? BBC News Marathi
ममता बॅनर्जींनी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अपराजिता विधेयक आणलं आहे. कोलकात्यातल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा बलात्कार आणि खून झाल्यानंतर मोठी निदर्शनं झाली. त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेने अपराजिता नावाचं एक विधेयक मंजूर केलं. पण काय आहे हे विधेयक? समजून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
9/4/2024 • 5 minutes, 33 seconds
बोईंग स्टारलायनर असं परतणार अंतराळवीरांशिवाय | BBC News Marathi
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना घेऊन गेलेलं बोईंग स्टारलायनर अंतराळ यान आता या दोन अंतराळवीरांशिवायच पृथ्वीवर परतणार आहे. या यानात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ते अंतराळवीरांना पृथ्वीवर परत घेऊन येण्यासाठी सुरक्षित आहे का, याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर हे दोन अंतराळवीर आणखी काही महिने स्पेस स्टेशनलाच मुक्काम करून स्पेस एक्सच्या यानाने परततील, असं नासाने जाहीर केलं. आता बोईंग स्टारलायनर यान परतीचा प्रवास मानवरहित करणार आहे. बोईंग स्टारलायनर पृथ्वीवर कधी आणि कसं परतेल? बोईंगसाठी हे महत्त्वाचं का आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
9/3/2024 • 5 minutes, 31 seconds
वेस्ट बँक काय आहे? इस्रायलने इथे हल्ला का केलाय? | BBC News Marathi
7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यापासून इस्रायलने गाझाला लक्ष्य केलं आणि हमासविरोधात कारवाया तीव्र केल्या. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात इस्रायली सैन्याने वेस्ट बँक भागावर मोठा हल्ला चढवला. इथला बराचसा प्रदेश आधीपासूनच इस्रायलच्याच ताब्यात आहे.
मध्यपूर्वेतल्या अत्यंत संवेदनशील ठिकाणांपैकी एक असं वेस्ट बँक काय आहे? त्यावर नेमकं नियंत्रण कुणाचं आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
9/3/2024 • 6 minutes, 36 seconds
कमी दाबाचा पट्टा म्हणजे काय? त्याचा पावसाशी काय संबंध? BBC News Marathi
पावसाचा अंदाज वर्तवताना त्यामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचा नेहमी उल्लेख होतो. काय असतो हा कमी दाबाचा पट्टा? त्याचा पाऊस पडण्याशी काय संबंध असतो?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येलेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
8/31/2024 • 3 minutes, 58 seconds
रिलायन्स, डिस्नी विलीनीकरण : मीडिया क्षेत्रात काय उलथापालथ होणार? BBC News Marathi
रिलायन्स आणि डिस्नी इंडिया यांच्या विलिनीकरणला मान्यता मिळाल्याने भारतातल्या मीडिया इंडस्ट्रीतली अनेक गणितं बदलणार आहेत. विलिनीकरणातून तयार होणारी कंपनी ही 70,350 कोटी रुपयांचं मूल्यांकन - Valuation असणारी भारतातली मीडिया क्षेत्रातली अवाढव्य कंपनी असेल. आणि या नवीन कंपनीच्या वाढीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज यात रु.11,500 कोटींची गुंतवणूक करेल.नेमका कोणता करार झालाय रिलायन्स आणि डिस्ने मध्ये? Jio Cinema आणि Disney+ Hotstar हे दोन्ही OTT प्लॅटफॉर्म एकत्र होणार का?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येलेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
8/30/2024 • 6 minutes, 1 second
मंगळ ग्रहावर जीवसृष्टी सापडू शकेल का? BBC News Marathi
नासाच्या संशोधकांना मंगळावर पृष्ठभागाखाली खोल पाण्याचे साठे सापडले आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाणी असेल तर त्यामुळे मंगळावर पृष्ठभागाखाली जीवसृष्टी असण्याची शक्यताही निर्माण होते. पृथ्वीवर पृष्ठभागाखाली एक प्रचंड मोठं जैविक विश्व असल ्याचं गेल्या काही दशकांमध्ये अभ्यासातून समोर आलंय आणि मंगळावरही कदाचित हीच परिस्थिती असू शकते. मंगळावर जीवसृष्टी असलीच तर ती पृष्ठभागाखाली असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट - मायकल मार्शल
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
8/29/2024 • 7 minutes, 14 seconds
रिझर्व्ह बँक आणणार ULI, कर्ज मिळणं सोपं कसं होणार? BBC News Marathi
लहान कर्जं घेणाऱ्या, ग्रामीण भागातल्या ग्राहकांना कर्ज मिळणं सोपं जावं म्हणून रिझर्व्ह बँक एका नवीन प्रणालीवर काम करत असल्याचं RBI चे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर केलंय. Unified Lending Interface. Lending म्हणजे कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी - सुरळीत करण्यासाठीची ही प्रणाली आहे. गेल्यावर्षी या ULI ची चाचणी सुरू करण्यात आली आणि त्यातल्या निष्कर्षांवरून ही प्रणाली देशभरात लाँच कधी करायची, हे रिझर्व्ह बँक ठरवेल. ही नवी प्रणाली कशासाठी आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येलेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
8/29/2024 • 3 minutes, 58 seconds
युनिफाईड पेन्शन स्कीम ही केंद्र सरकारची नवीन योजना क ाय आहे? BBC News Marathi
केंद्र सरकारने UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिलीय. जुनी पेन्शन योजना (Old pension Scheme) पुन्हा लागू करावी यासाठी काही राज्यांत आंदोलनं झाली, काही राज्यांनी ही Old Pension Scheme लागू केली. आणि अचानक ही नवीन - एकीकृत पेन्शन योजना जाहीर झाली. युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे? जुनी पेन्शन योजना म्हणजेच Old Pension Scheme आणि NPS पेक्षा यामध्ये काय बदल करण्यात आले आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येलेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
8/29/2024 • 4 minutes, 45 seconds
चंद्रयान-3ने चंद्रावर लाव्हा कसा शोधला? BBC News Marathi
चंद्रावर पाणी आहे का, बर्फ आहे का अशी अनेक कोडी उलगडण्याचा प्रयत्न गेला बराच काळ सुरू आहे. पण आता चंद्रावर वितळलेल्या लाव्हाचा समुद्र होता का याचं काही प्रमाणात उत्तर मिळालेलं दिसतंय. भारताच्या चंद्रयान 3 ने चंद्राची जमीन कशी तयार झाली याबाबत महत ्त्वाचा शोध लावलाय. त्याबद्दलच जाणून घेऊया, आजच्या सोपी गोष्टमध्येरिपोर्ट - जॉर्जिना रन्नार्ड, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - शरद बढे
8/26/2024 • 4 minutes, 25 seconds
सखी सावित्री समिती काय आहे? ती काय काम करते? BBC News Marathi
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाले.
शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल, यासाठी काही नियम, सूचना आहेत का? कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेबद्दलची विशाखा समिती असणं जसं बंधनकारक आहे, त्याच धरतीवर शाळांमध्ये सखी सावित्री समिती असणंही आवश्यक आहे.
काय आहे ही सखी सावित्री समिती? ती काय काम करते? सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये इतर कोणत्या उपाययोजना असणं आवश्यक आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट आ णि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
8/22/2024 • 4 minutes, 59 seconds
परदेशात उपलब् ध औषधं भारतात मिळण्याचा मार्ग सोपा, काय आहेत नवे नियम? BBC News Marathi
जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये मान्यता मिळालेली औषधं आता भारतात चाचण्या झाल्या नसल्या, तरी मिळू शकणार आहेत. औषध कंपन्यांची भारतातील नियामक - ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने आता एका महत्त्वाच्या ऑर्डरद्वारे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली औषधं भारतात येण्याचा मार्ग मोकळा केलाय. एखाद्या औषधाला जगात इतरत्र मान्यता मिळालेली असली, तरी आतापर्यंत भारतामध्ये क्लिनिकल टेस्टिंग करून, मान्यता मिळाल्यानंतरच हे औषध फार्मा कंपन्यांना भारतामध्ये विकता येत होतं. पण ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने काही विशिष्ट आजार आणि उद्दिष्टांसाठीच्या औषधांच्या भारतातल्या विक्रीच्या नियमांत बदल केले आहेत.समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
8/21/2024 • 5 minutes, 24 seconds
UPSC ची लॅटरल एन्ट्रीची जाहिरात वादात का अडकली? BBC News Marathi
UPSC च्या वेबसाईटवरची नोकऱ्यांसाठीची जाहिरात वादात सापडलीय. Joint Secretary म्हणजे सहसचिव, Director - संचालक आणि Deputy Secretary म्हणजे उप-सचिव पदासाठीच्या Lateral Entry म्हणजे थेट नियुक्तीसाठीची ही जाहिरात आहे. दिल्लीमधील विविध मंत्रालयं आणि खात्यांच्या मुख्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने या नेमणुका होतील. या नेमणुका 3 वर्षांच्या कालावधीसाठी असतील आणि हा काळ 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
या नेमणुका कशा होणार? किती पदं अशा प्रकारे भरली जाणार? या नोकऱ्यांमध्ये आरक्षण का नसणार? यावर विरोधी पक्षाने काय आक्षेप घेतला आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अभिजीत कांबळे
एडिटिंग - शरद बढे
8/20/2024 • 4 minutes, 56 seconds
डेंग्यूवरची लस तयार करणं अवघड का आहे? BBC News Marathi
भारतामध्ये विकसित करण्यात येणाऱ्या डेंग्यूच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातली ट्रायल सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलीय. ICMR - इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पॅनेशिया बायोटेक (Panacea Biotec) कंपनी मिळून ही लस विकसित करत आहेत. डेंग्यूच्या एका प्रकारावरची लस दुसऱ्या प्रकारापासून संरक्षण देत नाही. हीच गोष्ट लस विकसित करण्यात आव्हान आहे. या प्रक्रियेत आणखी कोणती आव्हानं आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
8/19/2024 • 6 minutes, 48 seconds
Mpox ची साथ आणि महाराष्ट्रातला माकडताप हे एकच आहेत का? BBC News Marathi
आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये पसरलेली एम् पॉक्स (Mpox) ची साथ ही सार्वजनिक आरोग्यासाठीची आणीबाणीची स्थिती असून जागतिक चिंतेचा विषय असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. या आजाराला पूर्वी मंकीपॉक्स (Monkeypox) म्हटलं जात असे. किती धोकदायक आहे हा संसर्ग?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
8/16/2024 • 5 minutes, 33 seconds
युक्रेनने रशियात घुसून हल्ला का केला? BBC News Marathi
6 ऑगस्टला युक्रेनने रशियाच्या भूभागात शिरून हल्ला केला. मॉस्कोच नाही, तर युक्रेनमधले अनेकजण आणि या युद्धावर लक्ष ठेवून असणाऱ्या जगभरातल्या अनेकांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता.
आठवडा उलटल्यानंतरही रशियन सैन्याला अजूनही या भूभागात पुन्हा वरचस्मा प्रस्थापित करण्यासाठी झगडावं लागतंय.
युक्रेनने रशियाच्या भागावर केलेला हल्ला हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. सैन्याचा तुटवडा असताना असा धाडसी हल्ला करण्याचा निर्णय कीव्हने का घेतला?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
8/16/2024 • 5 minutes, 48 seconds
मंगळाच्या पोटात सापडलं पाणी! कसा लागला शोध? BBC News Marathi
मंगळावरच्या खडकाळ पृष्ठभागाच्या खोलवर आत वैज्ञानिकांना पाण्याचा साठा सापडला आहे.नासाच्या मार्स इनसाईट लँडर (Mars Insight Lander) च्या डेटाचा अभ्यास करताना हा शोध लागला आहे. 2018 साली नासाचा हा लँडर मंगळावर उतरला होता. मंगळाच्या ध्रुवांवर गोठलेलं पाणी आणि वातावरणामध्ये पाण्याच्या वाफेच्या अस्तित्त्वाचे पुरावे यापूर्वीच आढळले आहेत. पण मंगळावर द्रव स्थितीतलं पाणी असल्याचं पहिल्यांदाच आढळलं आहे.कसा लागला हा शोध? मंगळावर कुठे पाणी आहे?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - व्हिक्टोरिया गिल
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
8/16/2024 • 4 minutes, 30 seconds
हिंडनबर्ग रिसर्च कंपनी काय करते? BBC News Marathi
सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेशी संबंधित असलेल्या ऑफशोअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमधून करण्यात आला आहे. हिंडनबर्ग रिसर्च कंपनी काय आहे? ती काय काम करते? या कंपनीच्या नव्या रिपोर्टमधून अदानी उद्योग समूह आणि सेबी संबंधित कोणते आरोप करण्यात आले आहेत?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
8/16/2024 • 6 minutes, 4 seconds
वक्फ बोर्ड म्हणजे काय? कायद्यातल्या बदलांवर कोणते आक्षेप घेण्यात आलेयत? BBC News Marathi
वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवणार असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजुजू यांनी म्हटलंय. 8 ऑगस्टला हे दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून समिती स्थापन करण्याचा निर्णय घेणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलंय.
वक्फ बोर्ड म्हणजे काय? या वक्फ कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा सरकारतर्फे सुचवण्यात आल्या आहेत? आणि त्यावर आक्षेप काय आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
8/9/2024 • 6 minutes, 33 seconds
आरोग्य विम्यावरील GST चा वाद काय आहे? BBC News Marathi